Mobile Offer - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 10:59:04 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Vivo Phone वर दिवाळी ऑफर; 101 रुपयांच्या डाउन पेमेंटवर खरेदी करता येणार डिवाइस https://www.91mobiles.com/marathi/101-rupee-vivo-smartphone-big-joy-diwali-offer-with-cashback-and-discount/ https://www.91mobiles.com/marathi/101-rupee-vivo-smartphone-big-joy-diwali-offer-with-cashback-and-discount/#respond Mon, 17 Oct 2022 11:23:55 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14066 Phone Offer: दिवाळीसाठी आता कमी दिवस शिल्लक आहेत त्यामुळे ग्राहकांनी खरेदी सुरु केली आहे. भारतात सणासुदीच्या दिवसांमध्ये नवीन वस्तू खरेदी करण्याची पद्धत आहे. यात स्मार्टफोन्सचा देखील समावेश असतो म्हणून मोबाइल कंपन्या या कालावधीत आकर्षक ऑफर्सची घोषणा करतात. त्यानुसार आता मोबाइल ब्रँड विवोनं देखील आपल्या चाहत्यांसाठी धमाकेदार ऑफर सादर केली आहे. दिवाळीच्या निमित्ताने Vivo Phones फक्त […]

The post Vivo Phone वर दिवाळी ऑफर; 101 रुपयांच्या डाउन पेमेंटवर खरेदी करता येणार डिवाइस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Phone Offer: दिवाळीसाठी आता कमी दिवस शिल्लक आहेत त्यामुळे ग्राहकांनी खरेदी सुरु केली आहे. भारतात सणासुदीच्या दिवसांमध्ये नवीन वस्तू खरेदी करण्याची पद्धत आहे. यात स्मार्टफोन्सचा देखील समावेश असतो म्हणून मोबाइल कंपन्या या कालावधीत आकर्षक ऑफर्सची घोषणा करतात. त्यानुसार आता मोबाइल ब्रँड विवोनं देखील आपल्या चाहत्यांसाठी धमाकेदार ऑफर सादर केली आहे. दिवाळीच्या निमित्ताने Vivo Phones फक्त 101 रुपयांच्या डाउन पेमेंटवर विकत घेता येतील. विवो मोबाइल ऑफर अंतगर्त Vivo Y series, Vivo V25 series आणि Vivo X80 series स्मार्टफोन्स दमदार डिस्काउंटसह विकले जात आहेत.

विवो इंडियानं आपल्या ट्वीटर हँडलच्या माध्यमातून आपल्या दिवाळी ऑफरची माहिती दिली आहे. कंपनीनं हिला Big Joy Diwali Offer असं नाव दिलं आहे जी आजपासूनच सुरु झाली आहे. या ऑफर अंतगर्त Vivo Smartphones फक्त 101 रुपयांमध्ये विकत घेता येतील. फक्त इतकेच नव्हे तर अनेक विवो मोबाइल्सवर 2,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक दिला जात आहे विवोकडून ब्रँडच्या स्मार्टफोनवर 6 महिन्यांची एक्सटेंडेड वॉरंटी देखील दिली जात आहे. हे देखील वाचा: 5G पेक्षा 4G उत्तम; ‘या’ 5 कारणांमुळे नव्या नेटवर्कपासून तुम्ही देखील दूर राहाल

101 rupee vivo smartphone Big Joy Diwali offer with cashback and discount

Vivo Phone Offer

विवोच्या दिवाळी ऑफरमध्ये कंपनीच्या Vivo V25 series आणि Vivo X80 series सोबतच वाय सीरीजच्या Vivo Y75, Vivo Y35, Vivo Y22 आणि Vivo Y16 स्मार्टफोन्सचा समावेश करण्यात आला आहे. हे विवो फोन्स फक्त 101 रुपयांच्या पेमेंट करून विकत घेता येतील तसेच उर्वरित रक्कम नंतर फेड करता येईल. या ऑफर अंतर्गत 101 रुपयांमध्ये फोन घरी घेऊन येण्यासाठी त्याची किंमत 15,000 रुपयांपेक्षा अधिक असणं आवश्यक आहे. या विवो दिवाळी ऑफरची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा)

Vivo Y16 Price and Specifications

भारतात सर्वात नवीन विवो स्मार्टफोन विवो वाय16 आहे 12,499 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. हा स्मार्टफोन 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.51 इंचाच्या एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्लेवर लाँच झाला आहे. फोन अँड्रॉइड 12 आधारित फनटच ओएस 12 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो पी35 चिपसेट देण्यात आला आहे. या विवो मोबाइलमध्ये 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. हे देखील वाचा: BGMI Unban: PUBG च्या इंडिया व्हेरिएंटचं होणार दणक्यात पुनरागमन, लोकप्रिय युट्युबरनं केला दावा

vivo y16 india launch price 12499 vivo mobile phone

फोटोग्राफीसाठी हा विवो मोबाइल ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला 2 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Vivo Y16 ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक व अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी या स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा मोबाइल फोन 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Vivo Phone वर दिवाळी ऑफर; 101 रुपयांच्या डाउन पेमेंटवर खरेदी करता येणार डिवाइस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/101-rupee-vivo-smartphone-big-joy-diwali-offer-with-cashback-and-discount/feed/ 0
Best Smartphone Deals: आयफोनला मागे टाकणारा फोन स्वस्तात; अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सेलमध्ये ‘या’ फोन्सवर जबरदस्त ऑफर्स https://www.91mobiles.com/marathi/best-smartphones-under-30000-price-amazon-flipkart-sale-deals-offer/ https://www.91mobiles.com/marathi/best-smartphones-under-30000-price-amazon-flipkart-sale-deals-offer/#respond Fri, 23 Sep 2022 09:16:47 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13397 सणासुदीच्या दिवसांच्या आधी बड्या ई-कॉमर्स साइट्सच्या सेल्स हे नवीन समीकरण झालं आहे. यामुळे ग्राहकांना सणासुदीची शॉपिंग करता येते. खासकरून स्मार्टफोन व अन्य गॅजेट्स या सेल्समध्ये मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध होतात. ई-कॉमर्स साइट्स Amazon आणि Flipkart वर सध्या त्यांची सेल्स सुरु आहेत. फ्लिपकार्टच्या Big Billion Days आणि अ‍ॅमेझॉनच्या Great Indian Festival Sale मध्ये अनेक शानदार ऑफर्स व […]

The post Best Smartphone Deals: आयफोनला मागे टाकणारा फोन स्वस्तात; अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सेलमध्ये ‘या’ फोन्सवर जबरदस्त ऑफर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सणासुदीच्या दिवसांच्या आधी बड्या ई-कॉमर्स साइट्सच्या सेल्स हे नवीन समीकरण झालं आहे. यामुळे ग्राहकांना सणासुदीची शॉपिंग करता येते. खासकरून स्मार्टफोन व अन्य गॅजेट्स या सेल्समध्ये मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध होतात. ई-कॉमर्स साइट्स Amazon आणि Flipkart वर सध्या त्यांची सेल्स सुरु आहेत. फ्लिपकार्टच्या Big Billion Days आणि अ‍ॅमेझॉनच्या Great Indian Festival Sale मध्ये अनेक शानदार ऑफर्स व डील्स मिळत आहे. मोबाइल फोन्सवर दमदार डिस्काउंट व कॅशबॅक दिला जात आहे. पुढे आम्ही best phones under Rs 30,000 म्हणजे 30,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणाऱ्या स्मार्टफोन्सच्या बेस्ट डील्सची माहिती दिली आहे.

OnePlus 10R 5G

Price – 32,999 रुपये
Deal Price – 29999 रुपये

OnePlus 10R Discount

OnePlus 10R स्मार्टफोन Amazon च्या फेस्टिवल सेलमध्ये 29999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या वनप्लस फोनमध्ये MediaTek Dimensity 8100-Max प्रोसेसर आणि 150W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि Android 12 OS मिळतो. वनप्लसच्या या फोनमध्ये 120Hz AMOLED डिस्प्ले, 93.4 टक्के स्क्रीन टू बॉडी रेश्यो, HDR10+ सपोर्ट, sRGB, Display P3 10 बिट कलर पॅनल, Corning Gorilla Glass 5 लेयर आणि 950 निट्स ब्राइटनेस देण्यात आली आहे. हे देखील वाचा: 5G Plans Price: 4G प्रमाणे मोफत मिळणार 5जी सर्व्हिस? बजेटमध्ये बसेल का पुढील महिन्यात येणारं 5G

Samsung Galaxy S20 FE

Price – 44,999 रुपये
Deal Price – 26,999 रुपये

Samsung Galaxy S20 FE and S21 FE 5G phone discount offer samsung smartphone deals

अ‍ॅमेझॉनवर हा सॅमसंगचा दमदार फोन देखील आता स्वस्तात मिळत आहे. स्मार्टफोन 6.5 इंचाच्या फुलएचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 120Hz रिफ्रेश रेटवर चालतो. प्रोसेसिंगसाठी सॅमसंग एक्सनॉस 990 चिपसेट देण्यात आला आहे. बॅक पॅनलवर 12 मेगापिक्सलचे मेन कॅमेरा, 12 मेगापिक्सलची वाइड अँगल लेन्स आणि 8 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स असलेला ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच यात 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये 25वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,500एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

Redmi K50i

Price – 25,000 रुपये
Deal Price – 19,999 रुपये

Redmi K50i Discount

Redmi K50i अ‍ॅमेझॉन इंडियाच्या सेलमध्ये 19,999 मध्ये विकत घेता येईल. AnTuTu स्कोरमध्ये आयफोनला मागे टाकण्यासाठी हा फोन लाँचच्या वेळी चर्चेत होता. शाओमीचा हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 8100 प्रोसेसर वर चालतो जो गेमिंगसाठी दमदार ऑप्शन आहे. फोनमध्ये 6.6-इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz, DC dimming आणि Dolby Vision ला सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये 64MP प्रायमरी कॅमेरा आणि 5080mAh ची बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंग मिळते.

iQOO 9 SE

Price – 33,990 रुपये
Deal Price – 20,990 रुपये

iQOO 9 SE Discount

आयकू 9एसई अ‍ॅमेझॉन सेलमध्ये फक्त 20,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या फोनमध्ये 6.62-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, 48MP प्रायमरी Sony IMX598 सेन्सर आणि OIS सपोर्ट मिळतो. फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे. प्रोसेसींगसाठी Qualcomm Snapdragon 888 चिपसेट मिळतो. हा फोन Android 11 वर आधारित Funtouch OS 12 कस्टम स्किनवर चालतो. फोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी आणि 66W फास्ट चार्जिंग मिळते. हे देखील वाचा: BSNL चा पैसा वसूल प्लॅन! 130 दिवस डेली Unlimited Data आणि फ्री कॉलिंग, जाणून घ्या सविस्तर

OnePlus Nord 2T 5G

Price – 28,999 रुपये
Deal Price – 26,499 रुपये

Amazon Great Freedom Festival सेलमध्ये हा वनप्लस स्मार्टफोन 26,499 रुपयांमध्ये मिळत आहे. स्मार्टफोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोनमध्ये 6.43-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. हा फोन मीडियाटेकच्या Dimensity 1300 प्रोसेसरवर चालतो. वनप्लसच्या या फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 2MP चा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे.

The post Best Smartphone Deals: आयफोनला मागे टाकणारा फोन स्वस्तात; अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सेलमध्ये ‘या’ फोन्सवर जबरदस्त ऑफर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/best-smartphones-under-30000-price-amazon-flipkart-sale-deals-offer/feed/ 0