5G पेक्षा 4G उत्तम; ‘या’ 5 कारणांमुळे नव्या नेटवर्कपासून तुम्ही देखील दूर राहाल

Disadvantages of 5G Technology: अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतीय टेलिकॉम कंपन्यांनी देशात 5G सेवा सुरु केली आहे. सध्या निवडक मोठ्या शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध आहे आणि लवकरच हिचा प्रसार भारतभर होईल. 5G अल्ट्रा-हाय इंटरनेट स्पीडच्या मदतीनं युजर्स सीमलेस 4K व्हिडीओ स्ट्रीमिंग, लो-लेटेंसी क्लाउड गेमिंग, आणि अनेक गोष्टी करू शकतील. परंतु तुम्हाला माहित आहे का 5G वापरण्याचे पण अनेक तोटे (cons of 5G technology) देखील आहेत. या तोट्यांची माहिती आम्ही या लेखात दिली आहे. हे वाचून तुम्हाला देखील 5G फोनवर फक्त 4G वापरण्याची इच्छा होईल.

5G वापरण्याचे तोटे

5g service issues in india

  • 5G ची मर्यादित उपलब्धता
  • 5G स्पीड स्थिर नाही
  • 5G मुळे बॅटरी संपते फोनही गरम होतो
  • 5G मुळे क्षणात संपतो डेटा
  • 5G जास्त वेळ असणार नाही मोफत

1. 5G ची मर्यादित उपलब्धता

5G Launch India 1st October PM Narendra Modi Airtel Jio Vi 5G Sim 5G Recharge Plan Price

Jio आणि Airtel सारख्या टेलीकॉम कंपन्यांनी आपली 5G सेवा भारतातील काही शहरांमध्ये सुरु केली आहे. परंतु वास्तवात 5G खूप कमी शहरांमध्ये उपलब्ध आहे त्यामुळे जरी तुमच्याकडे 5G फोन आणि सिम असलं तरी 5G तुम्ही भारतात सर्वच ठिकाणी वापरू शकत नाही. देशातील बहुतांश भागात 5G चे टॉवर उभे करण्यात आले नाहीत. हे देखील वाचा: BGMI Unban: PUBG च्या इंडिया व्हेरिएंटचं होणार दणक्यात पुनरागमन, लोकप्रिय युट्युबरनं केला दावा

2. 5G चा स्पीड स्थिर नाही

5G नेक्स्ट-जेन हाय-स्पीड इंटरनेट बद्दल बोलायचं झालं तर ते अजूनही स्वप्नच आहे. नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर एकाच वेळी मोठ्या प्रमाणात इंटरनेट युजर्स सांभाळू शकत नाही त्यामुळे डाउनलोड आणि अपलोड स्पीड घसरतो. काही ठिकाणी तुम्हाला सुपर-फास्ट स्पीड मिळू शकतो, तर अन्य ठिकाणी इंटरनेट 4G पेक्षा देखील वाइट स्पीड मिळतो.

3. 5G मुळे बॅटरी संपते

5g service issues in india

बराच वेळ 5G चा वापर केल्यास तुमच्या फोनची बॅटरी लवकरच संपते. याला 5जी मध्ये मिळणारा फास्ट स्पीड कारणीभूत आहे. 5G वापरत असताना मोबाइलची बॅटरी पाहता पाहता कमी होऊ लागते. 5G चा वापर करण्यासाठी अनेक युजर आपल्या मोबाइलमध्ये एआर/व्हिआर सारखेच हेव्ही सॉफ्टवेयर, गेम आणि अन्य अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करतात त्यामुळे बॅटरी जास्त संपते. तसेच फोन गरम होण्याचे प्रमाण देखील वाढते.

4. क्षणात संपतो डेटा

सध्याचे 4जी प्लॅन कमीत कमी 1GB किंवा 2GB डेली इंटरनेट डेटासह येतात, जे लिमिटेड व्हिडीओ स्ट्रीम करणाऱ्या युजर्ससाठी पुरेसे आहेत. परंतु 5Gच्या इंटरनेट स्पीड टेस्ट मधेच 1GB डेटा काही क्षणात संपत आहे. त्यामुळे 5जीवर 4K व्हिडीओ आणि चित्रपट डाउनलोड करण्याचा किंवा स्ट्रीमिंगचा प्रश्नच उरत नाही. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीची डोकेदुखी वाढवण्यासाठी Moto E22s ची एंट्री; अत्यंत कमी किंमतीत दमदार फीचर्स

5. 5G जास्त वेळ असणार नाही मोफत

Jio आणि Airtel सारख्या टेलीकॉम कंपन्या नवीन नेटवर्क वापरता यावं म्हणून अनलिमिटेड 5G डेटा देत आहेत. परंतु हे जास्त दिवस चालणार नाही, लवकरच 5G प्लॅनची घोषणा केली जाईल. तसेच 5G इंटरनेटचा वापर फक्त मेन प्लॅनमध्ये करता येतो. त्यामुळे जर मेन प्लॅनचा डेटा संपला तर तुम्हाला दुसऱ्या दिवशीची वाट बघावी लागेल कारण यात 5G डेटा व्हाउचर मिळणार नाहीत. तसेच लिलावात खर्च केलेली रक्कम परत मिळवण्यासाठी कंपन्या महागडे 5G प्लॅन्स आणू शकतात.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here