Mobile - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 18 May 2023 13:15:29 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 8,000 रुपयांच्या आत येणारे बेस्ट फोन्स, पाहा यादी https://www.91mobiles.com/marathi/best-phones-under-8000-rupees/ https://www.91mobiles.com/marathi/best-phones-under-8000-rupees/#respond Thu, 18 May 2023 13:15:29 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21000 स्मार्टफोन बाजारात सध्या खूप गर्दी झाली आहे. त्यामुळे आपल्याला हवे तसे हँडसेट निवडताना गोंधळायला होते. त्यातल्या त्यात एंट्री लेव्हल आणि बजेट सेगमेंटमध्ये तर स्मार्टफोन मॉडेल्सचा खच पडलेला आहे. ह्यातून योग्य स्मार्टफोन निवडणं कठीण काम आहे. परंतु तुमचं हे काम सोपं करण्यासाठी आम्ही आज अशा स्मार्टफोन्सची यादी घेऊन आलो आहोत जे 8000 रुपयांच्या बजेटमध्ये चांगले फीचर्स […]

The post 8,000 रुपयांच्या आत येणारे बेस्ट फोन्स, पाहा यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन बाजारात सध्या खूप गर्दी झाली आहे. त्यामुळे आपल्याला हवे तसे हँडसेट निवडताना गोंधळायला होते. त्यातल्या त्यात एंट्री लेव्हल आणि बजेट सेगमेंटमध्ये तर स्मार्टफोन मॉडेल्सचा खच पडलेला आहे. ह्यातून योग्य स्मार्टफोन निवडणं कठीण काम आहे. परंतु तुमचं हे काम सोपं करण्यासाठी आम्ही आज अशा स्मार्टफोन्सची यादी घेऊन आलो आहोत जे 8000 रुपयांच्या बजेटमध्ये चांगले फीचर्स देतात. या यादीत प्रत्येक ब्रँडचा एक स्मार्टफोन निवडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे तसेच हे हँडसेट गेल्या तीन महिन्यात बाजारात लाँच झाले आहेत. चला पाहूया यादी.

8,000 रुपयांच्या आत येणारे बेस्ट फोन्स

  1. Infinix Smart 7
  2. Tecno Spark Go 2023
  3. Moto E13 4GB RAM
  4. Samsung Galaxy M04
  5. Lava Yuva 2 Pro
  6. Itel P40 4GB RAM
  7. Nokia C12 Pro
  8. POCO C51

Infinix Smart 7

  • आकार : 6.6 इंच
  • प्रोसेसर : Unisoc SC9863A
  • किंमत : 7,299 रुपये

ह्या फोनमध्ये कंपनीनं ऑक्टा कोर प्रोसेसरसह Unisoc SC9863A चिपसेटचा वापर केला आहे. जोडीला 4 GB RAM आणि 64 GB स्टोरेज देण्यात आली आहे. फोनमध्ये 6.6 इंचाचा एचडी+ डिस्प्ले मिळतो जो एक IPS LCD पॅनल आहे. फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यात 13 MP चा मुख्य कॅमेरा आणि 0.3 MP चा सेकंडरी सेन्सर आहे. कंपनीनं फ्रंटला 5 MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. यातील 6000 mAh ची मोठी बॅटरी यूएसबी टाइप सी पोर्टच्या मदतीनं चार्ज करता येते.

Tecno Spark Go 2023

  • आकार : 6.56 इंच
  • प्रोसेसर : MediaTek Helio A22
  • किंमत : 7,999 रुपये

टेक्नो स्पार्क गो 2023 स्मार्टफोनला क्वॉड कोर प्रोसेसरसह MediaTek Helio A22 चिपसेटची ताकद देण्यात आली आहे. फोनमध्ये 4 GB RAM सह 64GB Storage स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन 6.56 इंचाच्या एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्लेसह बाजारात आला आहे. ह्यात 13 MP + 0.08 MP चा ड्युअल रियर कॅमेरा मिळतो. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5 MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. कंपनीनं 5000 mAh ची मोठी बॅटरी आणि यूएसबी टाइप सी पोर्ट दिला आहे.

Moto E13

  • आकार : 6.5 इंच
  • प्रोसेसर : Unisoc T606
  • किंमत : 7,925 रुपये

हा फोन Unisoc T606 चिपसेटसह बाजारात आला आहे. फोन 4 GB RAM आणि 64GB Storage ला सपोर्ट करतो. कंपनीनं यात 6.5 इंचाचा एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला आहे. फोनच्या मागे 13 MP चा मुख्य कॅमेरा एलईडी फ्लॅशसह येतो. तर फ्रंटला 5 MP चा सेन्सर आहे. फोनमध्ये टाइप सी चार्जिंग पोर्टसह 5000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

Samsung Galaxy M04

  • आकार : 6.5 इंच
  • प्रोसेसर : MediaTek Helio P35
  • किंमत : 7,977 रुपये

सॅमसंगचा हा फोन MediaTek Helio P35 प्रोसेसरला सपोर्ट करतो. कंपनीनं 4 GB RAM ची ताकद ह्यात दिली आहे, जोडीला 64GB Storage देखील मिळते. ह्यातील 6.5 इंचाचा पीएलएस एलसीडी डिस्प्ले एचडी+ रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. फोनच्या मागे 13 MP + 2 MP चा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, तर फ्रंटला 5 MP चा सेन्सर देण्यात आला आहे. फोनमधील 5000 mAh ची बॅटरी यूएसबी टाइप सी पोर्टनं चार्ज करता येते.

Lava Yuva 2 Pro

  • आकार : 6.5 इंच
  • प्रोसेसर : MediaTek Helio G37
  • किंमत : 7,999 रुपये

लावा युवा 2 प्रो मध्ये 6.5 इंचाचा एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन MediaTek Helio G37 चिपसेटवर चालतो. फोनमध्ये 4 GB RAM आणि 64GB Storage मिळते. मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 13 MP चा मुख्य कॅमेरा, 0.3 MP चा सेकंडरी सेन्सर आणि 0.3 MP चा तिसरा सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5 MP चा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी यूएसबी टाइप सी पोर्टसह 5000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

Itel P40

  • आकार : 6.5 इंच
  • प्रोसेसर : Unisoc SC9863A
  • किंमत : 7,899 रुपये

6000 mAh च्या बॅटरीसह येणारा हा ह्या यादीतील दुसरा स्मार्टफोन आहे. चार्जिंगसाठी ह्यात टाइप सी पोर्ट देण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी Unisoc SC9863A चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. हा फोन 4 GB RAM आणि 64GB Storage ला सपोर्ट करतो. कंपनीनं 6.6 इंचाचा एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देखील दिला आहे. कॅमेरा सेगमेंट पाहता 13 MP चा मुख्य कॅमेरा आणि 0.3 MP चा सेकंडरी सेन्सर मिळतो. तर फ्रंटला 5 MP चा कॅमेरा आहे.

Nokia C12 Pro

  • आकार : 6.3 इंच
  • प्रोसेसर : Unisoc SC9863A1
  • किंमत : 7,499 रुपये

Unisoc SC9863A1 प्रोसेसरसह येणारा हा फोन 3 GB RAM आणि 64GB Storage ला सपोर्ट करतो. कंपनीनं ह्यात 6.3 इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला आहे, ज्याचे रिजोल्यूशन एचडी+ आहे. फोनमध्ये 8 MP चा रियर आणि 5 MP चा फ्रंट कॅमेरा आहे. सोबत 4000 mAh ची बॅटरी देखील देण्यात आली आहे.

POCO C51

  • आकार : 6.52 इंच
  • प्रोसेसर : MediaTek Helio G36
  • किंमत : 7,249 रुपये

5000 mAh ची बॅटरी असलेला हा पोको फोन बजेट सेगमेंटमध्ये आला आहे. कंपनीनं यात MediaTek Helio G36 चिपसेटची पावर दिली आहे. हा फोन 4 GB RAM आणि 64GB Storage ला सपोर्ट करतो. कंपनीनं 6.52 इंचाचा एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देखील दिला आहे. फोनच्या मागे 8 MP + 0.08 MP चा कॅमेरा सेटअप आहे. तर फ्रंटला 5 MP चा सेन्सर मिळतो.

The post 8,000 रुपयांच्या आत येणारे बेस्ट फोन्स, पाहा यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/best-phones-under-8000-rupees/feed/ 0
सर्वात फास्ट चार्ज होणारे टॉप 10 स्मार्टफोन; झटक्यात होतात फुल चार्ज https://www.91mobiles.com/marathi/sarvat-fast-charge-honara-phone/ https://www.91mobiles.com/marathi/sarvat-fast-charge-honara-phone/#respond Sat, 15 Apr 2023 12:26:17 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20296 फोन मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांपासून टेक्नॉलॉजी वेगानं अपग्रेड होत आहे. खासकरून मोबाइल चार्जिंगच्या बाबती तरी हेच म्हणता येईल. आता मोबाइल फोन चार्ज करण्यासाठी तासंतास चार्जिंगवर फोन ठेवण्याची गरज नाही. सध्या मार्केटमध्ये अनेक असे स्मार्टफोन आहेत जे 10 मिनिटांत फुल चार्ज होतात. हो तुम्ही बरोबर वाचलंत! दहा मिनिटांत फोन 0 ते 100 टक्के चार्ज होत आहेत. […]

The post सर्वात फास्ट चार्ज होणारे टॉप 10 स्मार्टफोन; झटक्यात होतात फुल चार्ज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
फोन मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांपासून टेक्नॉलॉजी वेगानं अपग्रेड होत आहे. खासकरून मोबाइल चार्जिंगच्या बाबती तरी हेच म्हणता येईल. आता मोबाइल फोन चार्ज करण्यासाठी तासंतास चार्जिंगवर फोन ठेवण्याची गरज नाही. सध्या मार्केटमध्ये अनेक असे स्मार्टफोन आहेत जे 10 मिनिटांत फुल चार्ज होतात. हो तुम्ही बरोबर वाचलंत! दहा मिनिटांत फोन 0 ते 100 टक्के चार्ज होत आहेत. आज आम्ही तुम्हाला सर्वात फास्ट चार्जिंग असलेल्या टॉप 10 स्मार्टफोनची लिस्ट शेयर करत आहोत.

सर्वात फास्ट चार्जिंग असलेले स्मार्टफोन

  1. Realme GT3
  2. iQOO 11 Pro
  3. Infinix Zero Ultra
  4. ZTE nubia Red Magic 8 Pro+vOnePlus 10T
  5. Motorola Edge 40 ProvXiaomi Poco F4 GT
  6. Xiaomi 13 Pro
  7. Xiaomi Redmi Note 12 Pro+
  8. OnePlus 11

Realme GT3 240W

  • बॅटरी : 4600mAh
  • चार्जिंग : 240W
  • चार्जिंग टाइम : 10 मिनिटे
  • प्रोसेसर : Snapdragon 8+ Gen 1

Realme GT3 स्मार्टफोन 240W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह सादर करण्यात आला आहे. हा फोन फक्त दहा मिनिटांत फुल चार्ज होतो. तसेच कंपनीचा दावा आहे की GT3 फोन चार मिनिटांच्या चार्जिंगवर 0 ते 50 टक्के चार्ज होतो. हा फोन Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर, 16GB पर्यंतच्या रॅम, 1TB पर्यंतच्या स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. रियलमीच्या फ्लॅगशिप फोनमध्ये 6.74-इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले मिळतो, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz आहे. कॅमेरा सेटअप पाहता यात ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 50MP Sony IMX890 सेन्सर आहे.

iQOO 11 Pro

  • बॅटरी : 4700mAh
  • चार्ज : 200W
  • चार्जिंग टाइम : 10 मिनिटे
  • प्रोसेसर : Snapdragon 8 Gen 2

iQOO 11 Pro चे फीचर्स पाहता फोनमध्ये 6.78-इंचाचा E6 AMOLED Quad HD+ कर्व डिस्प्ले मिळतो, ज्याचा रिफ्रेश 120Hz आहे. हा फोन Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर, 16GB पर्यंत LPDDR5X RAM आणि 512GB पर्यंतच्या स्टोरेज ऑप्शनसह येतो. फोनमध्ये 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोन 4,700mAh ची बॅटरी आणि 200W फास्ट चार्जिंग सपोर्टसह लाँच करण्यात आला आहे.

Infinix Zero Ultra

  • बॅटरी : 4500mAh
  • चार्जिंग : 180W
  • चार्जिंग टाइम : 12 मिनिटे
  • प्रोसेसर : Dimensity 920

Infinix Zero Ultra स्मार्टफोनमध्ये 6.8-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट मिळतो. इनफिनिक्सच्या या फोनमध्ये MediaTek Dimensity 920 प्रोसेसर आणि Mali-G68 MC4 GPU देण्यात आला आहे. या फोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी आणि 180W थंडर चार्ज मिळतो. जोडीला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 200MP आणि फ्रंटला 32MP चा कॅमेरा सेन्सर मिळतो.

Nubia Red Magic 8 Pro+

  • बॅटरी : 5000mAh
  • प्रोसेसर : 165W
  • चार्जिंग टाइम : 14 मिनिटे
  • प्रोसेसर : Snapdragon 8 Gen 2

Nubia RedMagic 8 Pro Plus स्मार्टफोनमध्ये 6.8-इंचाचा Full HD+ OLED डिस्प्ले मिळतो. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 50MP चा आहे. तसेच फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 165W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

OnePlus 10T

  • बॅटरी : 4800mAh
  • प्रोसेसर : 150W
  • चार्जिंग टाइम : 18 मिनिटे
  • प्रोसेसर : Snapdragon 8+ Gen 1

OnePlus 10T स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा Full-HD+ 10-bit AMOLED डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. या फोनमध्ये Snapdragon 8+ Gen 1 चिपसेटसह 16GB पर्यंत रॅमचा सपोर्ट मिळतो. तसेच फोन 5000mAh बॅटरी आणि 150W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 50MP ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे.

Motorola Edge 40 Pro

  • बॅटरी : 4600mAh
  • प्रोसेसर : 125W
  • चार्जिंग टाइम : 23 मिनिटे
  • प्रोसेसर : Snapdragon 8 Gen 2

Motorola Edge 40 Pro मध्ये 6.67-इंचाचा pOLED पॅनल देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1,080 x 2,400 FHD+, रिफ्रेश रेट 165Hz आहे. या फोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर मिळतो. मोटोरोलाच्या या फोनमध्ये 50MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये 4,60mAh ची बॅटरी आणि 125W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.

Poco F4 GT

  • बॅटरी : 4700mAh
  • प्रोसेसर : 120W
  • चार्जिंग टाइम : 17 मिनिटे
  • प्रोसेसर : Snapdragon 8 Gen 1

POCO F4 GT स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या AMOLED पॅनलचा रिफ्रेश रेट 120Hz आणि रिजोल्यूशन 2400×1080 पिक्सल आहे. POCO F4 GT मध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर, 8GB/12GB रॅम आणि 128GB/256GB स्टोरेज मिळतो. यात 4,700mAh बॅटरी आणि 120W HyperCharge सपोर्ट मिळतो. पोकोच्या या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो.

Xiaomi 13 Pro

  • बॅटरी : 4820mAh
  • प्रोसेसर : 120W Hyper Charge
  • चार्जिंग टाइम : 19 मिनिटे
  • प्रोसेसर : Snapdragon 8 Gen 2

Xiaomi 13 Pro स्मार्टफोनमध्ये 6.73-इंचाचा 2K OLED डिस्प्ले पॅनल आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. शाओमीचा हा फ्लॅगशिप स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरसह येतो, ज्यात 12GB रॅम आणि 512GB स्टोरेजचा ऑप्शन देण्यात आला आहे. या फोनमध्ये 4,820mAh ची बॅटरी आणि 120W फास्ट चार्जचा सपोर्ट मिळतो. फोटोग्राफी पाहता फोन 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो.

Xiaomi Redmi Note 12 Pro+

  • बॅटरी : 5000 mAh
  • प्रोसेसर : 120W
  • चार्जिंग टाइम : 19 मिनिटे
  • प्रोसेसर : MediaTek Dimensity 1080

Redmi Note 12 Pro Plus स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा FHD+ Super AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 1080 प्रोसेसर मिळतो. शाओमीच्या फोनमध्ये 200MP चा प्रायमरी कॅमेरा मिळतो. फोनमध्ये 4,980mAh ची बॅटरी मिलती आहे.

OnePlus 11

  • बॅटरी : 5000mAh
  • प्रोसेसर : 100W
  • चार्जिंग टाइम : 25 मिनिटे
  • प्रोसेसर : Snapdragon 8 Gen 2

OnePlus 11 5G स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा QHD+ E4 2.75D फ्लॅक्सीबल कर्व OLED LTPO 3.0 डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन क्वॉलकॉमच्या Snapdragon 8 Gen2 प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. OnePlus 11 5G मध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो.

The post सर्वात फास्ट चार्ज होणारे टॉप 10 स्मार्टफोन; झटक्यात होतात फुल चार्ज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/sarvat-fast-charge-honara-phone/feed/ 0
15 हजारांच्या 8GB RAM ची पावर असणारे स्मार्टफोन, पाहा यादी https://www.91mobiles.com/marathi/8gb-ram-phones-under-15000-rupees/ https://www.91mobiles.com/marathi/8gb-ram-phones-under-15000-rupees/#respond Wed, 12 Apr 2023 12:49:06 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20235 स्मार्टफोन चालण्यासाठी रँडम अ‍ॅक्सेस मेमरी म्हणजे रॅम खूप आवश्यक आहे. या रॅममध्ये स्मार्टफोन ओएस, अ‍ॅप्स आणि डेटा जो आता वापरात आहे तो साठवून ठेवतो. त्यामुळे ही मेमरी जितकी जास्त तेवढे जास्त अ‍ॅप्स तुम्ही एकाच वेळी वापरू शकता. बऱ्याचदा जास्त रॅम फक्त महागड्या फोन्समध्ये मिळतो. परंतु आज आम्ही तुमच्यासाठी अशा फोन्सची यादी घेऊन आलो आहोत, जे […]

The post 15 हजारांच्या 8GB RAM ची पावर असणारे स्मार्टफोन, पाहा यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन चालण्यासाठी रँडम अ‍ॅक्सेस मेमरी म्हणजे रॅम खूप आवश्यक आहे. या रॅममध्ये स्मार्टफोन ओएस, अ‍ॅप्स आणि डेटा जो आता वापरात आहे तो साठवून ठेवतो. त्यामुळे ही मेमरी जितकी जास्त तेवढे जास्त अ‍ॅप्स तुम्ही एकाच वेळी वापरू शकता. बऱ्याचदा जास्त रॅम फक्त महागड्या फोन्समध्ये मिळतो. परंतु आज आम्ही तुमच्यासाठी अशा फोन्सची यादी घेऊन आलो आहोत, जे 15 हजारांच्या आत 8 जीबी रॅम देतात. चला पाहूया यादी.

15,000 रुपयांच्या आत 8जीबी रॅम देणारे स्मार्टफोन्स

  1. Infinix Hot 30i
  2. realme C55
  3. Tecno Pova 4
  4. Infinix Note 12 Turbo
  5. Infinix Hot 12 Pro
  6. Moto G32
  7. Xiaomi Redmi 10 Power

Infinix Hot 30i

  • स्टोरेज : 128जीबी
  • प्रोसेसर : MediaTek Helio G37
  • किंमत : 9,999 रुपये

Infinix Hot 30i स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी37 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन 8जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. कंपनीनं यात 6.6 इंचाचा एचडी+ डिस्प्ले दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात एलईडी फ्लॅशसह 50 एमपी + 2 एमपीचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. तर फ्रंटला 5 एमपीचा सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये 5000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

realme C55

  • स्टोरेज : 128जीबी
  • प्रोसेसर : MediaTek Helio G88
  • किंमत : 13,999 रुपये

realme C55 चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 6.72 इंचाच्या फुल एचडी+ डिस्प्लेसह बाजारात आला आहे. यात MediaTek Helio G88 चिपसेट मिळतो. जोडीला 8 जीबी रॅम 128 जीबीची स्टोरेज देखील आहे. फोनमध्ये 64 एमपी + 2 एमपीचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यातील सेल्फी कॅमेरा 8 एमपीचा सेन्सर आहे. फोनमध्ये 5000एमएएचची मोठी बॅटरी मिळते.

Tecno Pova 4

  • स्टोरेज : 128जीबी
  • प्रोसेसर : MediaTek Helio G99
  • किंमत : 11,999 रुपये

Tecno Pova 4 price in india will be 11999 know launch date and specifications

Tecno Pova 4 स्मार्टफोनमध्ये 6.44 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले मिळतो. कंपनीनं यात MediaTek Helio G99 चिपसेटचा वापर केला आहे. फोन 8 जीबी रॅम 128 जीबीची स्टोरेजसह विकत घेता येईल. फोटोग्राफीसाठी 50 एमपी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. तर फ्रंटला 8 एमपीचा सेल्फी सेन्सर आहे. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 6000एमएएचची बॅटरी मिळते.

Infinix Note 12 TURBO

  • स्टोरेज : 6.7 इंच
  • प्रोसेसर : MediaTek Helio G96
  • किंमत : 14,499 रुपये

मीडियाटेक हीलियो जी96 प्रोसेसरसह आलेल्या Infinix Note 12 TURBO स्मार्टफोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मिळते. कंपनीनं यात 6.7 इंचाचा मोठा फुल एचडी+ डिस्प्ले दिला आहे. फोनच्या मागे 50 एमपीचा मुख्य कॅमेरा आणि 2 एमपीचा सेकंडरी सेन्सर आहे. तर पुढे 16 एमपीचा सेल्फी शुटर मिळतो. यातील 5000एमएएचची बॅटरी 33 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Infinix Hot 12 Pro

  • स्टोरेज : 128जीबी
  • प्रोसेसर : Unisoc T616
  • किंमत : 12,999 रुपये

Infinix Note 12 स्मार्टफोनमध्ये 5000एमएएचची मोठी बॅटरी पावर बॅकअपसाठी मिळते. हा फोन Unisoc T616 प्रोसेसरवर चालतो. यात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मिळते. यातील डिस्प्लेचा आकार 6.6 इंच असून हा एक एचडी+ डिस्प्ले आहे. फोनच्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप आहे ज्यात 50 एमपीचा मुख्य कॅमेरा आणि डेप्थ सेन्सर मिळतो. तर फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे.

Moto G32

  • स्टोरेज : 128जीबी
  • प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 680
  • किंमत : 12,099 रुपये

Moto G32 स्मार्टफोनमध्ये 8 जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन 6.5 इंचाच्या फुल एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीनं यात क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसरची ताकद दिली आहे. फोनच्या मागे 50 एमपी + 8 एमपी + 2 एमपीचा ट्रिपल कॅमेरा सेटअप एलईडी फ्लॅशसह मिळतो. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 एमपीचा सेन्सर देण्यात आला आहे. यात 5000 एमएएचची मोठी बॅटरी मिळते.

Redmi 10 Power

  • स्टोरेज : 128जीबी
  • प्रोसेसर : Snapdragon 680
  • किंमत : 11,471 रुपये

Redmi 10 Power स्मार्टफोनमध्ये Snapdragon 680 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन 8 जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. कंपनीनं यात 6.71 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले दिला आहे, जो एक एलसीडी पॅनल आहे. फोटोग्राफीसाठी यात एलईडी फ्लॅशसह 50 एमपी + 2 एमपीचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. तर फ्रंटला 5 एमपीचा सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये 6000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post 15 हजारांच्या 8GB RAM ची पावर असणारे स्मार्टफोन, पाहा यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/8gb-ram-phones-under-15000-rupees/feed/ 0
15 हजारांच्या आत अ‍ॅमोलेड डिस्प्ले असलेले बेस्ट स्मार्टफोन; पाहा यादी https://www.91mobiles.com/marathi/best-amoled-display-smartphone-under-15000-rupees/ https://www.91mobiles.com/marathi/best-amoled-display-smartphone-under-15000-rupees/#respond Sat, 08 Apr 2023 13:28:22 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20126 स्मार्टफोन बाजारात सतत बदल होत असतात. नवीन फिचर आणि हार्डवेयर येतं तेव्हा महाग असतं परंतु कालांतराने ती टेक्नॉलॉजी स्वस्त होते आणि बजेटमध्ये बसू लागते. असंच काहीसं स्मार्टफोन डिस्प्ले बद्दल झालं आहे. मोबाइल डिस्प्ले पॅनलच्या प्रकारांमधील अ‍ॅमोलेड पॅनल गुणवत्तेच्या बाबतीत एलसीडी डिस्प्लेपेक्षा वरचढ मानला जातो. सुरुवातीला महागड्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये मिळणारी ही टेक्नॉलॉजी आता बजेट आणि मिडरेंज […]

The post 15 हजारांच्या आत अ‍ॅमोलेड डिस्प्ले असलेले बेस्ट स्मार्टफोन; पाहा यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन बाजारात सतत बदल होत असतात. नवीन फिचर आणि हार्डवेयर येतं तेव्हा महाग असतं परंतु कालांतराने ती टेक्नॉलॉजी स्वस्त होते आणि बजेटमध्ये बसू लागते. असंच काहीसं स्मार्टफोन डिस्प्ले बद्दल झालं आहे. मोबाइल डिस्प्ले पॅनलच्या प्रकारांमधील अ‍ॅमोलेड पॅनल गुणवत्तेच्या बाबतीत एलसीडी डिस्प्लेपेक्षा वरचढ मानला जातो. सुरुवातीला महागड्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये मिळणारी ही टेक्नॉलॉजी आता बजेट आणि मिडरेंज स्मार्टफोनमध्ये देखील दिसू लागली आहे. म्हणूनच आम्ही आज तुमच्यासाठी 15,000 रुपयांच्या आत अ‍ॅमोलेड डिस्प्ले देणाऱ्या स्मार्टफोन्सची यादी घेऊन आलो आहोत, चला पाहूया.

15,000 रुपयांच्या आत आमोलेड डिस्प्ले देणारे स्मार्टफोन्स

  1. Infinix Note 12 5G
  2. vivo T1 44W
  3. iQOO Z6 4G
  4. Infinix Note 12 Turbo
  5. Infinix Note 12
  6. Moto G42
  7. Infinix Note 12i 2022

Infinix Note 12 5G

  • आकार : 6.7 इंच
  • रिजोल्यूशन : 1080 x 2400 पिक्सल, फुल एचडी+
  • प्रोसेसर : MediaTek Dimensity 810
  • किंमत : 14,999

Infinix Note 12 5G स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक डिमेन्सिटी 810 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. कंपनीनं यात 6.7 इंचाचा फुल एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात एलईडी फ्लॅशसह 50 एमपी + 2 एमपीचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. तर फ्रंटला 16 एमपीचा सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये 5000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

vivo T1 44W

  • आकार : 6.44 इंच
  • रिजोल्यूशन : 1080 x 2400 पिक्सल, फुल एचडी+
  • प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 680
  • किंमत : 14,499 रुपयांपासून सुरु

5g-phone-under-15000

vivo T1 44W चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 6.44 इंचाच्या फुल एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह बाजारात आला आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट मिळतो. जोडीला 8 जीबी पर्यंत रॅम 128 जीबीची स्टोरेज देखील आहे. फोनमध्ये 50 एमपी + 2 एमपी + 2 एमपीचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यातील सेल्फी कॅमेरा 16 एमपीचा सेन्सर आहे. फोनमध्ये 5000एमएएचची मोठी बॅटरी मिळते.

iQOO Z6 4G

  • आकार : 6.44 इंच
  • रिजोल्यूशन : 1080 x 2400 पिक्सल, फुल एचडी+
  • प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 680
  • किंमत : 14,590 रुपयांपासून सुरु

iQOO Z6 4G स्मार्टफोनयामध्ये 6.44 इंचाचा फुल एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळतो. कंपनीनं यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 680 चिपसेटचा वापर केला आहे. फोन 8 जीबी पर्यंत रॅम 128 जीबीची स्टोरेजसह विकत घेता येईल. फोटोग्राफीसाठी 50 एमपी + 2 एमपी + 2 एमपीचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. तर फ्रंटला 16 एमपीचा सेल्फी सेन्सर आहे. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5000एमएएचची बॅटरी मिळते.

Infinix Note 12 TURBO

  • आकार : 6.7 इंच
  • रिजोल्यूशन : 1080 x 2400 पिक्सल, फुल एचडी+
  • प्रोसेसर : MediaTek Helio G96
  • किंमत : 13,999 रुपये

मीडियाटेक हीलियो जी96 प्रोसेसरसह आलेल्या Infinix Note 12 TURBO स्मार्टफोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मिळते. कंपनीनं यात 6.7 इंचाचा मोठा फुल एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला आहे. फोनच्या मागे 50 एमपीचा मुख्य कॅमेरा आणि 2 एमपीचा सेकंडरी सेन्सर आहे. तर पुढे 16 एमपीचा सेल्फी शुटर मिळतो. यातील 5000एमएएचची बॅटरी 33 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Infinix Note 12

  • आकार : 6.7 इंच
  • रिजोल्यूशन : 1080 x 2400 पिक्सल, फुल एचडी+
  • प्रोसेसर : MediaTek Helio G88
  • किंमत : 11,999 रुपयांपासून सुरु

Infinix Note 12 स्मार्टफोनमध्ये 5000एमएएचची मोठी बॅटरी पावर बॅकअपसाठी मिळते. हा फोन मीडियाटेक हीलियो जी88 प्रोसेसरवर चालतो. यात 6 जीबी पर्यंत रॅम आणि 128 जीबी पर्यंतची स्टोरेज मिळते. यातील डिस्प्लेचा आकार 6.7 इंच असून हा एक फुल एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे. फोनच्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप आहे ज्यात 50 एमपीचा मुख्य कॅमेरा आणि 2 एमपीचा सेकंडरी सेन्सर मिळतो. तर फ्रंटला 16 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे.

Moto G42

  • आकार : 6.47 इंच
  • रिजोल्यूशन : 1080 x 2400 पिक्सल, फुल एचडी+
  • प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 680
  • किंमत : 13,999 रुपये

Moto G42 स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन 6.47 इंचाच्या फुल एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीनं यात क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसरची ताकद दिली आहे. फोनच्या मागे 50 एमपी + 8 एमपी + 2 एमपीचा ट्रिपल कॅमेरा सेटअप एलईडी फ्लॅशसह मिळतो. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 एमपीचा सेन्सर देण्यात आला आहे. यातील 5000 एमएएचची बॅटरी 20 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Infinix Note 12i 2022

  • आकार : 6.7 इंच
  • रिजोल्यूशन : 1080 x 2400 पिक्सल, फुल एचडी+
  • प्रोसेसर : MediaTek Helio G85
  • किंमत : 9,999 रुपये

Infinix Note 12i स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी85 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. कंपनीनं यात 6.7 इंचाचा फुल एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला आहे, जो 90हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी यात एलईडी फ्लॅशसह 50 एमपी + 2 एमपीचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. तर फ्रंटला 8 एमपीचा सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये 5000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post 15 हजारांच्या आत अ‍ॅमोलेड डिस्प्ले असलेले बेस्ट स्मार्टफोन; पाहा यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/best-amoled-display-smartphone-under-15000-rupees/feed/ 0
सर्विस सेंटर मध्ये फोन देण्याआधी लक्षात ठेवा या 12 गोष्टी https://www.91mobiles.com/marathi/12-things-to-know-before-deposit-your-phone-to-service-center-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/12-things-to-know-before-deposit-your-phone-to-service-center-in-marathi/#respond Thu, 02 Aug 2018 09:17:46 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1498 तुमच्या बिघडलेल्या फोन मध्ये भरपुर खाजगी डेटा असतो आणि जर तो चुकीच्या हाताला लागला तर त्याचा गैरवापर होऊ शकतो.

The post सर्विस सेंटर मध्ये फोन देण्याआधी लक्षात ठेवा या 12 गोष्टी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
तुम्ही कितीही महाग स्मार्टफोन घेतला तरी तो कधी खराब होईल हे सांगता येत नाही. एक फोन हजारो कॉम्पोनेंट्सनी बनलेला असतो. त्यामुळे जर थोडा खराब झाला तर जास्त त्रास होतो. त्यानंतर सर्विस सेंटर मध्ये जाण्याव्यतिरिक्त पर्याय उरत नाही. मग तुम्ही फोन घेता आणि सर्विस सेंटर मध्ये जाता. पण असे करणे चुकीचे आहे कारण तुमचे थोडेसे दुर्लक्ष तुम्हाला घातक ठरू शकते. तुमच्या बिघडलेल्या फोन मध्ये भरपुर खाजगी डेटा असतो आणि जर तो चुकीच्या हाताला लागला तर त्याचा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे फोन सर्विस सेंटर मध्ये देण्याआधी काळजी घेतली पाहिजे.

1. फोन मधील डेटा तपासून घ्या
जर फोन सर्विस सेंटर मध्ये द्यायचा असेल तर सर्वात आधी फोन मधील डेटा नीट तपासून घ्या. त्यातून कोणत्या डेटाचा बॅकअप घ्यायचा आहे आणि कोणत्या डेटाचा बॅकअप घेण्याची गरज नाही ते ठरवा. ज्या डेटाचा बॅकअप घेण्याची गरज नाही तो लगेच फोन मधून डिलीट केल्यास तुमचा वेळ वाचेल.

2. जीमेल वर घ्या बॅकअप

एंडरॉयड फोन ची सर्वात मोठी खासियत ही आहे की यात जास्तीत जास्त डेटा चा तुम्ही जीमेल वर बॅकअप घेऊ शकता. सर्वात महत्त्वाचे कॉन्टॅक्ट असतात जे जीमेल सोबत सिंक होतात. तसेच अॅप डेटा आणि फोटो इत्यादींचा पण बॅकअप गूगल वर घेता येतो.

3. पीसी वर घ्या डाटा बॅकअप

लक्षात असू दे सर्विस सेंटर मध्ये फोन देताना सर्वात जास्त काळजी तुम्हाला डेटा बद्दल घ्यावी लागेल. काही डेटा जीमेल वर राहील पण म्यूजिक आणि वीडियो इत्यादी गूगल वर ठेऊ नये. त्यामुळे गूगल मेमरी कमी होऊ शकते. म्यूजिक किंवा वीडियो तुम्ही पीसी किंवा मेमरी कार्ड मध्ये ठेवा. माझ्या मते फोटो पण गूगल फोटो ऐवजी पीसी वर ठेवले तरी उत्तमच.

4. कॉल लॉग आणि मेसेज चा पण घ्या बॅकअप

अनेकांना आपली कॉल हिस्ट्री आणि मेसेज सोडू वाटत नाही. खासकरून मेसेज. यात अनेक महत्वाचे संवाद असतात. त्यासाठी तुम्ही एसएमएस बॅकअप एंड रिस्टोर आणि कॉल लॉग हिस्ट्री बॅकअप सारख्या अॅप ची मदत घेऊ शकता.

5. समस्यांची यादी बनवा

फोन मध्ये छोट्या छोट्या समस्या नेहमीच असतात. पण आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. जेव्हा मोठी समस्या येते तेव्हाच आपण सर्विस सेंटर मध्ये जातो. जर तुम्ही सर्विस सेंटर मध्ये फोन देत असाल तर सर्व समस्यांची यादी बनवा. त्यामुळे तुम्ही तिथे घेतल्यानंतर फोन बद्दल सविस्तर माहिती देऊ शकाल.

6. सिम आणि मेमरी कार्ड काढा

जेव्हा तुम्ही तुमचा फोन सर्विस सेंटर मध्ये द्याल तेव्हा मेमरी कार्ड आणि सिम काढायला विसरू नका. कारण यात तुमचा बराचसा डेटा असतो आणि त्याचा गैरवापर होऊ शकतो. इतकेच नव्हे तर गैरवापर न झाल्यास फॉर्मेट केला जाऊ शकतो ज्यामुळे डेटा नष्ट होईल.

7. फोन नीट तपासा
सर्विस सेंटर मध्ये फोन जमा करण्याआधी फोन नीट तपासा. स्क्रीन वर किती स्क्रॅच आहेत, बॉडी कशी आहे इत्यादी. कारण जर फोन तुटला, फुटला किंवा स्क्रॅच आला तर तुम्ही विचारू शकता. जमल्यास फोन चे एक दोन फोटो घ्या. बॅटरी काढल्यास त्यावर खुण करा त्यामुळे काही गडबड झाल्यास तुम्हाला समजेल.

8. डेटा करा डिलीट
फोन मधील डेटाचा बॅकअप घेतल्या नंतर आणि सिम व मेमरी कार्ड काढल्यानंतर फोन मधील सर्व डेटा डिलीट करा. यासाठी सर्वात सोप्पा उपाय म्हणजे फोन फॅक्टरी रिसेट करा किंवा हार्ड बूट करा.

9. आॅथराइज सेंटर मध्येच न्या
जर फोन वाॅरंटी मध्ये असेल तर मग इतर कोणत्याही सर्विस सेंटर मध्ये जाऊ नका. कारण जर एकदा फोन सर्विस सेंटर च्या बाहेर उघडाल गेला तर वाॅरंटी संपते. त्यामुळे आॅथराइज सर्विस सेंटर मध्ये जाण्याचा प्रयत्न करा. जरी फोन वाॅरंटी मध्ये नसला तरी आॅथराइज सर्विस सेंटर मध्ये जाणेच योग्य. जर दुसर्‍या थर्ड पार्टी सर्विस सेंटर मध्ये जात असाल तर तो विश्वासातला असावा.

10. खर्चाची चौकशी आधीच करावी
जर तुम्हाला फोन मध्ये काय बिघाड आहे हे माहीत असेल तर आधीच त्यासाठी लागणाऱ्या खर्चाची माहिती काढावी. आजकाल इंटरनेट वर याची माहिती असते. त्यामुळे तुम्ही सर्विस सेंटर मध्ये जाण्याआधी ही माहिती मिळवल्यास तुम्हाला धोका देता येणार नाही. इतकेच नव्हे तर पैसे पण वाचतील.

11. बिघाडाचे कारण विचारा
सर्विस सेंटर मध्ये फोन जमा करताना बिघाडची कारणे विचारा म्हणजे तुम्ही पुढे काळजी घेऊ शकाल. त्याचबरोबर लवकरात लवकर फोन परत मिळेल यासाठी प्रयत्न करा. कारण जेवढा वेळ फोन सर्विस सेंटर मध्ये राहिली तेवढी स्क्रॅच येण्याची आणि फोन खराब होण्याची शक्यता वाढते.

12. छोट्या समस्या स्वतः च ठीक कराव्या
लक्षात असू द्या बर्‍याचदा फोन मध्ये सॉफ्टवेयर ची समस्या असते आणि सॉफ्टवेयर ची समस्या सहज ठीक करता येते. तुम्ही आॅनलाइन वाचून किंवा यूट्यूब वर वीडियो बघून पण ठीक करू शकता. हो पण जर हार्डवेयर मधील बिघाड असेल तर फोन सर्विस सेंटर मध्ये घेऊन जा.

The post सर्विस सेंटर मध्ये फोन देण्याआधी लक्षात ठेवा या 12 गोष्टी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/12-things-to-know-before-deposit-your-phone-to-service-center-in-marathi/feed/ 0