सर्विस सेंटर मध्ये फोन देण्याआधी लक्षात ठेवा या 12 गोष्टी

तुम्ही कितीही महाग स्मार्टफोन घेतला तरी तो कधी खराब होईल हे सांगता येत नाही. एक फोन हजारो कॉम्पोनेंट्सनी बनलेला असतो. त्यामुळे जर थोडा खराब झाला तर जास्त त्रास होतो. त्यानंतर सर्विस सेंटर मध्ये जाण्याव्यतिरिक्त पर्याय उरत नाही. मग तुम्ही फोन घेता आणि सर्विस सेंटर मध्ये जाता. पण असे करणे चुकीचे आहे कारण तुमचे थोडेसे दुर्लक्ष तुम्हाला घातक ठरू शकते. तुमच्या बिघडलेल्या फोन मध्ये भरपुर खाजगी डेटा असतो आणि जर तो चुकीच्या हाताला लागला तर त्याचा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे फोन सर्विस सेंटर मध्ये देण्याआधी काळजी घेतली पाहिजे.

1. फोन मधील डेटा तपासून घ्या
जर फोन सर्विस सेंटर मध्ये द्यायचा असेल तर सर्वात आधी फोन मधील डेटा नीट तपासून घ्या. त्यातून कोणत्या डेटाचा बॅकअप घ्यायचा आहे आणि कोणत्या डेटाचा बॅकअप घेण्याची गरज नाही ते ठरवा. ज्या डेटाचा बॅकअप घेण्याची गरज नाही तो लगेच फोन मधून डिलीट केल्यास तुमचा वेळ वाचेल.

2. जीमेल वर घ्या बॅकअप

एंडरॉयड फोन ची सर्वात मोठी खासियत ही आहे की यात जास्तीत जास्त डेटा चा तुम्ही जीमेल वर बॅकअप घेऊ शकता. सर्वात महत्त्वाचे कॉन्टॅक्ट असतात जे जीमेल सोबत सिंक होतात. तसेच अॅप डेटा आणि फोटो इत्यादींचा पण बॅकअप गूगल वर घेता येतो.

3. पीसी वर घ्या डाटा बॅकअप

लक्षात असू दे सर्विस सेंटर मध्ये फोन देताना सर्वात जास्त काळजी तुम्हाला डेटा बद्दल घ्यावी लागेल. काही डेटा जीमेल वर राहील पण म्यूजिक आणि वीडियो इत्यादी गूगल वर ठेऊ नये. त्यामुळे गूगल मेमरी कमी होऊ शकते. म्यूजिक किंवा वीडियो तुम्ही पीसी किंवा मेमरी कार्ड मध्ये ठेवा. माझ्या मते फोटो पण गूगल फोटो ऐवजी पीसी वर ठेवले तरी उत्तमच.

4. कॉल लॉग आणि मेसेज चा पण घ्या बॅकअप

अनेकांना आपली कॉल हिस्ट्री आणि मेसेज सोडू वाटत नाही. खासकरून मेसेज. यात अनेक महत्वाचे संवाद असतात. त्यासाठी तुम्ही एसएमएस बॅकअप एंड रिस्टोर आणि कॉल लॉग हिस्ट्री बॅकअप सारख्या अॅप ची मदत घेऊ शकता.

5. समस्यांची यादी बनवा

फोन मध्ये छोट्या छोट्या समस्या नेहमीच असतात. पण आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. जेव्हा मोठी समस्या येते तेव्हाच आपण सर्विस सेंटर मध्ये जातो. जर तुम्ही सर्विस सेंटर मध्ये फोन देत असाल तर सर्व समस्यांची यादी बनवा. त्यामुळे तुम्ही तिथे घेतल्यानंतर फोन बद्दल सविस्तर माहिती देऊ शकाल.

6. सिम आणि मेमरी कार्ड काढा

जेव्हा तुम्ही तुमचा फोन सर्विस सेंटर मध्ये द्याल तेव्हा मेमरी कार्ड आणि सिम काढायला विसरू नका. कारण यात तुमचा बराचसा डेटा असतो आणि त्याचा गैरवापर होऊ शकतो. इतकेच नव्हे तर गैरवापर न झाल्यास फॉर्मेट केला जाऊ शकतो ज्यामुळे डेटा नष्ट होईल.

7. फोन नीट तपासा
सर्विस सेंटर मध्ये फोन जमा करण्याआधी फोन नीट तपासा. स्क्रीन वर किती स्क्रॅच आहेत, बॉडी कशी आहे इत्यादी. कारण जर फोन तुटला, फुटला किंवा स्क्रॅच आला तर तुम्ही विचारू शकता. जमल्यास फोन चे एक दोन फोटो घ्या. बॅटरी काढल्यास त्यावर खुण करा त्यामुळे काही गडबड झाल्यास तुम्हाला समजेल.

8. डेटा करा डिलीट
फोन मधील डेटाचा बॅकअप घेतल्या नंतर आणि सिम व मेमरी कार्ड काढल्यानंतर फोन मधील सर्व डेटा डिलीट करा. यासाठी सर्वात सोप्पा उपाय म्हणजे फोन फॅक्टरी रिसेट करा किंवा हार्ड बूट करा.

9. आॅथराइज सेंटर मध्येच न्या
जर फोन वाॅरंटी मध्ये असेल तर मग इतर कोणत्याही सर्विस सेंटर मध्ये जाऊ नका. कारण जर एकदा फोन सर्विस सेंटर च्या बाहेर उघडाल गेला तर वाॅरंटी संपते. त्यामुळे आॅथराइज सर्विस सेंटर मध्ये जाण्याचा प्रयत्न करा. जरी फोन वाॅरंटी मध्ये नसला तरी आॅथराइज सर्विस सेंटर मध्ये जाणेच योग्य. जर दुसर्‍या थर्ड पार्टी सर्विस सेंटर मध्ये जात असाल तर तो विश्वासातला असावा.

10. खर्चाची चौकशी आधीच करावी
जर तुम्हाला फोन मध्ये काय बिघाड आहे हे माहीत असेल तर आधीच त्यासाठी लागणाऱ्या खर्चाची माहिती काढावी. आजकाल इंटरनेट वर याची माहिती असते. त्यामुळे तुम्ही सर्विस सेंटर मध्ये जाण्याआधी ही माहिती मिळवल्यास तुम्हाला धोका देता येणार नाही. इतकेच नव्हे तर पैसे पण वाचतील.

11. बिघाडाचे कारण विचारा
सर्विस सेंटर मध्ये फोन जमा करताना बिघाडची कारणे विचारा म्हणजे तुम्ही पुढे काळजी घेऊ शकाल. त्याचबरोबर लवकरात लवकर फोन परत मिळेल यासाठी प्रयत्न करा. कारण जेवढा वेळ फोन सर्विस सेंटर मध्ये राहिली तेवढी स्क्रॅच येण्याची आणि फोन खराब होण्याची शक्यता वाढते.

12. छोट्या समस्या स्वतः च ठीक कराव्या
लक्षात असू द्या बर्‍याचदा फोन मध्ये सॉफ्टवेयर ची समस्या असते आणि सॉफ्टवेयर ची समस्या सहज ठीक करता येते. तुम्ही आॅनलाइन वाचून किंवा यूट्यूब वर वीडियो बघून पण ठीक करू शकता. हो पण जर हार्डवेयर मधील बिघाड असेल तर फोन सर्विस सेंटर मध्ये घेऊन जा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here