Moto E22 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 16 Sep 2022 12:47:22 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 रेडमी-रियलमी नव्हे तर Motorola नं लाँच केले दोन स्वस्त आणि मस्त फोन; इतकी आहे Moto E22 आणि Moto E22i ची किंमत https://www.91mobiles.com/marathi/low-budget-mobile-phone-motorola-moto-e22-and-moto-e22i-launched-know-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/low-budget-mobile-phone-motorola-moto-e22-and-moto-e22i-launched-know-price-specifications/#respond Sat, 17 Sep 2022 12:45:10 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13200 Motorola नं काही दिवसांपूर्वी भारतातील पहिला 200MP चा कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन प्रीमियम रेंजमध्ये विवो, शाओमी, सॅमसंग आणि वनप्लस सारख्या बड्या ब्रँड्सना टक्कर देईल. तर बजेट सेगमेंटमध्ये रेडमी आणि रियलमी सारख्या ब्रँड्सची डोकेदुखी वाढवण्यासाठी आज मोटोरोलानं आपल्या बजेट फ्रेंडली ‘ई सीरीज’ चा विस्तार करत दोन नवीन मोबाइल फोन सादर केले आहेत. […]

The post रेडमी-रियलमी नव्हे तर Motorola नं लाँच केले दोन स्वस्त आणि मस्त फोन; इतकी आहे Moto E22 आणि Moto E22i ची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola नं काही दिवसांपूर्वी भारतातील पहिला 200MP चा कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन प्रीमियम रेंजमध्ये विवो, शाओमी, सॅमसंग आणि वनप्लस सारख्या बड्या ब्रँड्सना टक्कर देईल. तर बजेट सेगमेंटमध्ये रेडमी आणि रियलमी सारख्या ब्रँड्सची डोकेदुखी वाढवण्यासाठी आज मोटोरोलानं आपल्या बजेट फ्रेंडली ‘ई सीरीज’ चा विस्तार करत दोन नवीन मोबाइल फोन सादर केले आहेत. कंपनीनं Moto e22 आणि Moto e22i बाजारात आणले आहेत.

जागतिक बाजारात आज लाँच झालेले Moto e22 आणि Moto e22i हे दोन्ही एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहेत ज्यांनी लो बजेटमध्ये एंट्री घेतली आहे. मोटो ई22 आणि मोटो ई22आय च्या प्राइस, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती आम्ही पुढे दिली आहे. दोन्ही मोटोरोला स्मार्टफोन सध्या पश्चिमात्य देशांमध्ये लाँच झाले आहेत आणि लवकरच हे भारतात देखील सेलसाठी उपलब्ध होऊ शकतात.

Moto E22 आणि Moto E22i Specifications

Low Budget Mobile Phone Motorola Moto E22 And Moto E22i Launched Know Price Specifications

हे दोन्ही मोटोरोला मोबाइल फोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर सादर झाले आहेत जे 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतात. स्मार्टफोन्सची स्क्रीन वॉटरड्रॉप नॉच स्टाइलसह येते, तसेच 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. दोन्ही मोटो फोन्सचे डायमेंशन 163.95 x 74.6 x 7.99 एमएम आणि वजन 172 ग्राम आहे. हे देखील वाचा: Motorola चा धमाका! भारतात लाँच केला मोठा डिस्प्ले असलेला स्वस्त टॅबलेट; इतकी आहे किंमत

Moto E22 माययूएक्स आधारित अँड्रॉइड 12 ओएसवर लाँच झाला आहे तर Moto E22i अँड्रॉइड 12 ‘गो एडिशन’ सह बाजारात आला आहे. दोन्ही स्मार्टफोन ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी37 चिपसेटवर चालतात. ग्राफिक्ससाठी मोबाइल फोन्समध्ये आयएमजी पावरवीआर जीई8320 जीपीयू देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी मोटो ई22 आणि ई22आय ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. बॅक पॅनलवर फ्लॅश लाइटसह 16 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सरसह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हे मोटोरोला मोबाइल फोन 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतात.

Motorola फोन ड्युअल सिम व 4जी सोबतच साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतात. पावर बॅकअपसाठी 4,020एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. मोटो ई22 स्मार्टफोन Crystal Blue आणि Astro Black कलरमध्ये लाँच झाला आहे. तर मोटो ई22आयची खरेदी Winter White आणि Graphite Gray कलरमध्ये करता येईल. हे देखील वाचा: 200MP Camera असलेला भारतातील पहिला फोन; पाहा बसतोय का तुमच्या बजेटमध्ये हा 5G Phone

Low Budget Mobile Phone Motorola Moto E22 And Moto E22i Launched Know Price Specifications

Moto E22 आणि Moto E22i Price

किंमत पाहता, मोटो ई22 आणि मोटो ई22आय दोन्ही स्मार्टफोन सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच झाले आहेत. 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेला Moto e22 स्मार्टफोन €139.99 मध्ये लाँच करण्यात आला आहे जे भारतीय चलनात 11,200 रुपयांच्या आसपास आहेत. तर Moto e22i स्मार्टफोनची किंमत €129.99 म्हणजे जवळपास 10,300 रुपये आहे.

The post रेडमी-रियलमी नव्हे तर Motorola नं लाँच केले दोन स्वस्त आणि मस्त फोन; इतकी आहे Moto E22 आणि Moto E22i ची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/low-budget-mobile-phone-motorola-moto-e22-and-moto-e22i-launched-know-price-specifications/feed/ 0
रेडमी-रियलमीला मोटोरोलाचा दणका! स्वस्त आणि मस्त Moto E22 ची माहिती लीक; असा दिसेल हँडसेट https://www.91mobiles.com/marathi/moto-e22-image-and-details-exclusive/ https://www.91mobiles.com/marathi/moto-e22-image-and-details-exclusive/#respond Mon, 12 Sep 2022 09:20:01 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13019 Motorola सध्या भारतीय बाजारात जास्त सक्रिय झाल्याचं दिसत आहे. कंपनी लवकरच भारतात जगातील सर्वात पहिला 200MP चा कॅमेरा असलेला स्मार्टफोन सादर करणार आहे. तर काही दिवसांपूर्वी मोटोरोलाचा बजेट फोन Moto E22 देखील काही सर्टिफिकेशन साइट्सवर दिसला होता, त्यामुळे लवकरच हा फोन बाजारात येणार आहे. तर आज 91मोबाइल्सला या फोनचे एक्सक्लूसिव्ह प्रेेस रेंडर मिळाले आहेत, ज्यामुळे […]

The post रेडमी-रियलमीला मोटोरोलाचा दणका! स्वस्त आणि मस्त Moto E22 ची माहिती लीक; असा दिसेल हँडसेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola सध्या भारतीय बाजारात जास्त सक्रिय झाल्याचं दिसत आहे. कंपनी लवकरच भारतात जगातील सर्वात पहिला 200MP चा कॅमेरा असलेला स्मार्टफोन सादर करणार आहे. तर काही दिवसांपूर्वी मोटोरोलाचा बजेट फोन Moto E22 देखील काही सर्टिफिकेशन साइट्सवर दिसला होता, त्यामुळे लवकरच हा फोन बाजारात येणार आहे. तर आज 91मोबाइल्सला या फोनचे एक्सक्लूसिव्ह प्रेेस रेंडर मिळाले आहेत, ज्यामुळे तुम्हाला फोनच्या डिजाइन आणि कलरची माहिती मिळेल.

91मोबाइल्सलाला ही माहिती भारतातील प्रमुख टिप्सर सुधांशु अंभोरनं दिली आहे. आम्हाला ज्या रेंडर इमेज मिळाल्या आहेत त्यात तुम्ही पाहू शकता की हा फोन डार्क ग्रे कलरचा आहे जो बॉक्स डिजाइनमध्ये सादर केला गेला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे आणि ज्यात फ्लॅश आणि AI कॅमेऱ्याची माहिती देण्यात आली आहे. हे देखील वाचा: OPPO करणार धमाका! 64MP कॅमेरा आणि 8GB रॅम असलेल्या OPPO F21s Pro Series ची लाँच देतं ठरली

फोनच्या फ्रंटला वॉटर ड्रॉप नॉच असलेली आहे. फोनच्या उजव्या पॅनलवर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन आहे तर दुसरीकडे SIM कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. सर्वात खास बाब म्हणजे या बजेट फोनमध्ये मागील पॅनलवर फिंगरप्रिंट स्कॅनर दिसत नाही, त्यामुळे फोनच्या पावर बटनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर असण्याची शक्यता आहे. फोनच्या वरच्या पॅनलमध्ये 3.5 mm ऑडियो जॅक आहे जिथे स्पष्ट अक्षरात Dolby Atmos असं लिहलेलं दिसत आहे. त्यामुळे आशा आहे की बजेट सेगमेंटमध्ये देखील डॉल्बी इंटीग्रेशन मिळेल.

Moto E22 चे स्पेसिफिकेशन

Moto E22 च्या स्पेसिफिकेशनची सध्यातरी जास्त माहिती समोर आली नाही. अलीकडेच हा फोन NBTC, EEC, आणि Wi-Fi Alliance सारख्या सर्टिफिकेशन साइट्सवर लिस्ट झाला होता. इथून बरीचशी माहिती उपलब्ध झाली आहे. NBTC वर मिळालेल्या माहितीनुसार हा फोन GSM, WCDMA आणि LTE नेटवर्कला सपोर्ट करतो. अर्थात यात 2G, 3G आणि 4G नेटवर्क सपोर्ट देखील असेल परंतु 5G मिळणार नाही. Wi-Fi Alliance सर्टिफिकेशननुसार फोनमध्ये तुम्हाला Android 12 सपोर्ट मिळेल. सध्यातरी यापेक्षा जास्त माहिती मिळाली नाही.

परंतु अलीकडे कंपनीनं Moto E22s युरोपमध्ये लाँच केला आहे ज्यात 6.5 इंचाचा 90hz रिफ्रेश रेट असलेली HD+ स्क्रीन देण्यात आली आहे. तसेच फोनमध्ये 16MP चा ड्युअल कॅमेरा आणि 5,000 mAh ची बॅटरी आहे. हा फोन MediaTek Helio G37 चिपसेटवर चालतो आणि नवीन फोनमध्ये देखील काहीसे असेच स्पेसीफाकेशन्स आणि फीचर्स बजेट सेगमेंटमध्ये दिले जाऊ शकतात. हे देखील वाचा: लकी नंबर, जन्मतारीख असलेला मोबाइल नंबर मिळवा फ्री; घरपोच Free VIP Mobile Number असलेलं सिम

भारतात येतोय Motorola चा 200 MP कॅमेरा फोन

काही दिवसांपूर्वी Motorola नं माहिती दिली आहे की कंपनी लवकरच Motorola Edge 30 Ultra भारतात लाँच केला आहे. हा जगातील पहिला फोन आहे ज्यात 200 MP चा कॅमेरा आहे. तसेच कंपनी Motorola Edge 30 Fusion देखील सादर करणार आहे. हे दोन्ही कंपनीचे फ्लॅगशिप फोन आहेत जे खूप शानदार स्पेसिफिकेशनसह लाँच होणार आहेत.

The post रेडमी-रियलमीला मोटोरोलाचा दणका! स्वस्त आणि मस्त Moto E22 ची माहिती लीक; असा दिसेल हँडसेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-e22-image-and-details-exclusive/feed/ 0