रेडमी-रियलमी नव्हे तर Motorola नं लाँच केले दोन स्वस्त आणि मस्त फोन; इतकी आहे Moto E22 आणि Moto E22i ची किंमत

Low Budget Mobile Phone Motorola Moto E22 And Moto E22i Launched Know Price Specifications

Motorola नं काही दिवसांपूर्वी भारतातील पहिला 200MP चा कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन प्रीमियम रेंजमध्ये विवो, शाओमी, सॅमसंग आणि वनप्लस सारख्या बड्या ब्रँड्सना टक्कर देईल. तर बजेट सेगमेंटमध्ये रेडमी आणि रियलमी सारख्या ब्रँड्सची डोकेदुखी वाढवण्यासाठी आज मोटोरोलानं आपल्या बजेट फ्रेंडली ‘ई सीरीज’ चा विस्तार करत दोन नवीन मोबाइल फोन सादर केले आहेत. कंपनीनं Moto e22 आणि Moto e22i बाजारात आणले आहेत.

जागतिक बाजारात आज लाँच झालेले Moto e22 आणि Moto e22i हे दोन्ही एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहेत ज्यांनी लो बजेटमध्ये एंट्री घेतली आहे. मोटो ई22 आणि मोटो ई22आय च्या प्राइस, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती आम्ही पुढे दिली आहे. दोन्ही मोटोरोला स्मार्टफोन सध्या पश्चिमात्य देशांमध्ये लाँच झाले आहेत आणि लवकरच हे भारतात देखील सेलसाठी उपलब्ध होऊ शकतात.

Moto E22 आणि Moto E22i Specifications

Low Budget Mobile Phone Motorola Moto E22 And Moto E22i Launched Know Price Specifications

हे दोन्ही मोटोरोला मोबाइल फोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर सादर झाले आहेत जे 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतात. स्मार्टफोन्सची स्क्रीन वॉटरड्रॉप नॉच स्टाइलसह येते, तसेच 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. दोन्ही मोटो फोन्सचे डायमेंशन 163.95 x 74.6 x 7.99 एमएम आणि वजन 172 ग्राम आहे. हे देखील वाचा: Motorola चा धमाका! भारतात लाँच केला मोठा डिस्प्ले असलेला स्वस्त टॅबलेट; इतकी आहे किंमत

Moto E22 माययूएक्स आधारित अँड्रॉइड 12 ओएसवर लाँच झाला आहे तर Moto E22i अँड्रॉइड 12 ‘गो एडिशन’ सह बाजारात आला आहे. दोन्ही स्मार्टफोन ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी37 चिपसेटवर चालतात. ग्राफिक्ससाठी मोबाइल फोन्समध्ये आयएमजी पावरवीआर जीई8320 जीपीयू देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी मोटो ई22 आणि ई22आय ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. बॅक पॅनलवर फ्लॅश लाइटसह 16 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सरसह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हे मोटोरोला मोबाइल फोन 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतात.

Motorola फोन ड्युअल सिम व 4जी सोबतच साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतात. पावर बॅकअपसाठी 4,020एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. मोटो ई22 स्मार्टफोन Crystal Blue आणि Astro Black कलरमध्ये लाँच झाला आहे. तर मोटो ई22आयची खरेदी Winter White आणि Graphite Gray कलरमध्ये करता येईल. हे देखील वाचा: 200MP Camera असलेला भारतातील पहिला फोन; पाहा बसतोय का तुमच्या बजेटमध्ये हा 5G Phone

Low Budget Mobile Phone Motorola Moto E22 And Moto E22i Launched Know Price Specifications

Moto E22 आणि Moto E22i Price

किंमत पाहता, मोटो ई22 आणि मोटो ई22आय दोन्ही स्मार्टफोन सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच झाले आहेत. 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेला Moto e22 स्मार्टफोन €139.99 मध्ये लाँच करण्यात आला आहे जे भारतीय चलनात 11,200 रुपयांच्या आसपास आहेत. तर Moto e22i स्मार्टफोनची किंमत €129.99 म्हणजे जवळपास 10,300 रुपये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here