दणकट प्रोसेसर आणि शानदार कॅमेरा; स्टायलिश लूकसह Moto Edge 30 Fusion ची भारतात एंट्री

50mp rear 32mp selfie camera phone Motorola Edge 30 Fusion launched know price specifications sale offer

Moto Edge 30 Fusion India Launch: Motorola नं भारतात जगातील पहिला 200MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन Moto Edge 30 Ultra सादर केला आहे. त्याचबरोबर कंपनीनं स्टायलिश Edge 30 Fusion देखील भारतीयांच्या भेटीला आणला आहे. Motorola चा हा लेटेस्ट स्मार्टफोन एक फ्लॅगशिप किलर मोबाइल म्हणून सादर केला गेला आहे. फोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेट वाले OLED डिस्प्ले, 50 मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरा आणि Snapdragon 888 Plus प्रोसेसर असे अनेक खास फीचर्स देण्यात आले आहेत. या लेखात आपण Moto Edge 30 Fusion च्या भारतीय किंमत आणि अन्य स्पेसिफिकेशन्सची माहिती घेणार आहोत.

Moto Edge 30 Fusion चे फीचर्स

  • 6.55-इंचाचा फुल-एचडी+ ओएलईडी डिस्प्ले
  • क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 888+ एसओसी
  • अँड्रॉइड 12 ऑपरेटिंग सिस्टम
  • 50एमपी + 13एमपी + 2एमपी ट्रिपल कॅमेरा
  • 32एमपी सेल्फी कॅमेरा
  • 4,400mAh बॅटरी, 68W फास्ट चार्जिंग

50mp rear 32mp selfie camera phone Motorola Edge 30 Fusion launched know price specifications sale offer

Moto Edge 30 Fusion specifications

Moto Edge 30 Fusion मध्ये 6.55-इंचाचा फुल-एचडी प्लस ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 144Hz रिफ्रेश रेट, HDR10+, 360Hz टच सॅम्पलिंग रेट, DC dimming, Corning Gorilla Glass 5 layer आणि पंच होल कट आउटसह बाजारात आला आहे. प्रोसेसिंगसाठी स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 888+ SoC देण्यात आली आहे, जोडीला ग्राफिक्ससाठी Adreno 660 GPU आहे. या हँडसेट मध्ये 8GB RAM आणि 128GB UFS 3.1storage मिळते. हे देखील वाचा: 200MP Camera असलेला भारतातील पहिला फोन; पाहा बसतोय का तुमच्या बजेटमध्ये हा 5G Phone

Moto Edge 30 Fusion च्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहेत, ज्यात f/1.8 अपर्चर आणि OIS सपोर्ट असलेला 50MP चा प्रायमरी सेन्सर, मॅक्रो ऑप्शनसह 13MP ची अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स आणि 2MP चा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी फ्रंटला 32MP चा शूटर मिळतो. फोनमध्ये 4,400mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 68W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोन Android 12 आधारित MyUX कस्टम स्किनवर चालते.

50mp rear 32mp selfie camera phone Motorola Edge 30 Fusion launched know price specifications sale offer

कनेक्टिव्हिटी ऑप्शन म्हणून यात 5जी एसए/एनएसए, ड्युअल 4जी वीओएलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ 5.2, जीपीएस, यूएसबी टाइप-सी आणि एनएफसीचा समावेश आहे. तसेच मोटो एज 30 फ्यूजन यूएसबी टाइप-सी ऑडियो, स्टीरियो स्पिकर आणि डॉल्बी अ‍ॅटमॉसला सपोर्ट करतो. सुरक्षेसाठी यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. धूळ आणि पाण्यापासून वाचण्यासाठी कंपनीनं आयपी52 रेटिंग दिली आहे. हे देखील वाचा: BGMI Unban In India: ‘जय पबजी!’ चा नारा पुन्हा घुमणार; BGMI फॅन्ससाठी आली खुशखबर

Moto Edge 30 Fusion Price

Moto Edge 30 Fusion चा एकच मॉडेल 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. या एकमेव मॉडेलची किंमत 42,999 रुपये ठेवण्यात आली आहे. लाँच ऑफर अंतगर्त हा स्मार्टफोन मर्यादित कालावधीसाठी 39,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच हा फोन कंपनीनं Cosmic Grey आणि Solar Gold कलर ऑप्शनमध्ये लाँच केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here