200MP Camera असलेला भारतातील पहिला फोन; पाहा बसतोय का तुमच्या बजेटमध्ये हा 5G Phone

world first 200MP camera phone Moto Edge 30 Ultra launched check price specifications sale details

Motorola Edge 30 Ultra 5G Mobile: Motorola नं भारतीय बाजारात आज आपले दोन नवीन 5G Phone लाँच केले आहेत. कंपनीद्वारे भारतात Moto Edge सीरीजमध्ये Moto Edge 30 Ultra आणि Moto Edge 30 Fusion सादर करण्यात आले आहेत. Motorola Edge Ultra 30 बद्दल बोलायचं झालं तर हा भारतातील सर्वात पहिला फोन आहे जो 200MP Camera (World’s first 200MP Camera Phone) सह बाजारात आला आहे. तसेच या फोनमध्ये Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर आणि 60 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देखील देण्यात आला आहे.

Moto Edge 30 Ultra Camera

सर्वप्रथम फोनच्या कॅमेरा सेग्मेंटबाबत जाणून घेऊया. मोटो एज 30 अल्ट्रा ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एफ/1.95 अपर्चर असलेला 200 मेगापिक्सलचा Samsung ISOCELL HP1 sensor देण्यात आला आहे. जोडीला बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स तसेच 12 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स देखील देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा मोटोरोला मोबाइल 60 मेगापिक्सलच्या OmniVision OV60A फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

world first 200MP camera phone Moto Edge 30 Ultra launched check price specifications sale details

Moto Edge 30 Ultra Specification

मोटो एज 30 अल्ट्रा 5जीचे अन्य फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 6.67 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो जो ओएलईडी पॅनलवर बनला आहे तसेच 144हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करतो. स्क्रीन गोरिल्ला ग्लास 5 नं प्रोटेक्ट करण्यात आली आहे ज्यात 1250निट्स ब्राइटनेस आणि 1500हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट सारखे फीचर्स मिळतात. हे देखील वाचा: BGMI Unban In India: ‘जय पबजी!’ चा नारा पुन्हा घुमणार; BGMI फॅन्ससाठी आली खुशखबर

Moto Edge 30 Ultra अँड्रॉइड 12 आधारित माययूएक्स 4.0 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी हा मोबाइल फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 प्लस जे़न 1 चिपसेटला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 4,610एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 125वॉट टर्बोपावर चार्जिंगसह 50वॉट वायरलेस चार्जिंग व 10वॉट रिवर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करते.

Moto Edge 30 Ultra ची किंमत आणि उपलब्धता

Moto Edge 30 Ultra चा एकमेव 8GB + 128GB व्हर्जन कंपनीनं 59,999 रुपयांमध्ये सादर केला आहे. लाँच ऑफर अंतगर्त हा फोन 54,999 रुपयांमध्ये मर्यादित कालावधीसाठी विकला जाईल. हा फोन Interstellar Black आणि Starlight White कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: सर्वात शक्तिशाली वनप्लस येतोय; शाओमी-सॅमसंगचं टेन्शन वाढवणार का OnePlus 11 Pro 5G?

फोन 22 सप्टेंबरला दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्ट ऑनलाइन आणि रिलायन्स डिजिटल आउटलेटसह प्रमुख ऑफलाइन स्टोरच्या माध्यमातून विकत घेता येईल. कंपनी 100 रुपयांचे 40 रिचार्ज व्हाउचर आणि 10,699 रुपयांपर्यंतच्या पार्टनर व्हाउचरच्या माध्यमातून 14,699 रुपयांपर्यंतचे Jio बेनिफिट्स देत आहे. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल नजीक असल्यामुळे ग्राहकांना बँक डिस्काउंट देखील दिला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here