Moto G60 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 24 Aug 2022 11:34:09 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 1-2 नव्हे तर ‘हे’ पाच फोन्स देत आहेत 20 हजारांच्या बजेटमध्ये 108MP चा शानदार कॅमेरा, पाहा यादी https://www.91mobiles.com/marathi/108mp-camera-mobile-phones-under-20000-rupees/ https://www.91mobiles.com/marathi/108mp-camera-mobile-phones-under-20000-rupees/#respond Wed, 24 Aug 2022 11:34:09 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12440 स्मार्टफोन विकत घेताना कॅमेऱ्याचा जास्त विचार केला जातो. ग्राहकांना चांगला कॅमेरा असलेला स्मार्टफोन हवा असतो. जास्त मेगापिक्सल म्हणजे जास्त चांगला कॅमेरा नव्हे, हे जरी खरं असलं तरी जास्त रिजोल्यूशनचे फायदे देखील आहेत. त्यामुळे तुम्ही देखील 108MP चा हाय रिजोल्यूशन असलेला कॅमेरा फोन शोधत असाल आणि बजेट कमी असेल तर चिंता नसावी. आज आम्ही तुम्हाला भारतीय […]

The post 1-2 नव्हे तर ‘हे’ पाच फोन्स देत आहेत 20 हजारांच्या बजेटमध्ये 108MP चा शानदार कॅमेरा, पाहा यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन विकत घेताना कॅमेऱ्याचा जास्त विचार केला जातो. ग्राहकांना चांगला कॅमेरा असलेला स्मार्टफोन हवा असतो. जास्त मेगापिक्सल म्हणजे जास्त चांगला कॅमेरा नव्हे, हे जरी खरं असलं तरी जास्त रिजोल्यूशनचे फायदे देखील आहेत. त्यामुळे तुम्ही देखील 108MP चा हाय रिजोल्यूशन असलेला कॅमेरा फोन शोधत असाल आणि बजेट कमी असेल तर चिंता नसावी. आज आम्ही तुम्हाला भारतीय बाजारात उपलब्ध असलेल्या स्मार्टफोन्सची माहिती देणार आहोत ज्यांची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी आहे आणि ज्यात 108MP चा प्रायमरी कॅमेरा मिळतो.

20 हजारांच्या बजेटमधील 108MP चा कॅमेरा असलेले फोन्स

Xiaomi Redmi Note 11 Pro Plus 5G

किंमत: 19,999 रुपये

Redmi Note 11 Pro+ 5G स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. शाओमीचा हा फोन Snapdragon 695 प्रोसेसरसह येतो. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. Redmi Note 11 Pro+ स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात प्रायमरी कॅमेरा म्हणून 108MP चा Samsung HM2 सेन्सर मिळतो. जोडीला 8MP ची अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 2MP ची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. फोनमध्ये 16MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. तसेच 5000mAh ची बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे.

Motorola Edge 20 Fusion

किंमत: 19,999 रुपये

Motorola Edge 20 Fusion स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा OLED डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे. मोटोरोलाच्या Edge 20 Fusion फोनमध्ये MediaTek Dimensity 800U प्रोसेसरची पावर आहे. हा फोन 5000mAh ची बॅटरी आणि 30W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 108MP च्या प्रायमरी कॅमेऱ्यासह 8MP च्या अल्ट्रा वाइड सेन्सर आणि 2MP च्या डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. या फोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Realme 9

किंमत: 16,999 रुपये

Realme 9 स्मार्टफोन 90Hz रिफ्रेश रेट असलेला 6.4-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले Corning Gorilla Glass 5 लेयर प्रोटेक्शनसह येतो, ज्यात पंच होल कटआउट मिळते. रियलमीच्या या फोनमध्ये Qualcomm चा Snapdragon 680 प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 5,000mAh ची बॅटरी आहे. रियलमी 9 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 108MP चा Samsung ISOCELL HM6 सेन्सर आहे, त्याचबरोबर 8MP ची अल्ट्रा वाइड लेन्स आणि 2MP ची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.

Moto G60

किंमत: 14,999 रुपये

Moto G60 स्मार्टफोनमध्ये 6.8-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 732G SoC प्रोसेसर मिळतो. मोटोरोलाच्या या फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी 20W फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा 108MP चा सेन्सर आहे, सोबत 8MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2MP डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. फोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो.

Infinix Note 12 Pro 5G

किंमत: 17,999 रुपये

Infinix Note 12 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा Full-HD+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळतो. प्रोसेसिंग पावरसाठी मीडियाटेकचा Dimensity 810 5G चिपसेट मिळतो. फोनमध्ये 5000mAh च्या बॅटरीसह 33W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळते. Infinix Note 12 5G स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात 108MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, जोडीला 2MP चा अल्ट्रा वाइड आणि एक AI लेन्स आहे. इनफिनिक्सच्या या फोनमध्ये 16MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

The post 1-2 नव्हे तर ‘हे’ पाच फोन्स देत आहेत 20 हजारांच्या बजेटमध्ये 108MP चा शानदार कॅमेरा, पाहा यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/108mp-camera-mobile-phones-under-20000-rupees/feed/ 0
Moto G60 स्मार्टफोन Snapdragon 732G चिपसेट, 108MP कॅमेरा आणि 6000mAh बॅटरीसह लॉन्च, जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/moto-g60-price-in-india-revealed-motorola-launched-this-smartphone-with-snapdragon-732g-and-6000mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/moto-g60-price-in-india-revealed-motorola-launched-this-smartphone-with-snapdragon-732g-and-6000mah-battery/#respond Tue, 20 Apr 2021 12:21:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10651 मोटोरोलाने भारतात आपल्या Moto G सीरीजचे दोन स्मार्टफोन Moto G60 आणि Moto G40 Fusion भारतात लॉन्च केले आहेत. मोटोरोलाचे दोन्ही स्मार्टफोन क्वालकॉम Snapdragon 732G चिपसेट, 6000mAh बॅटरी, 6GB रॅमसह सादर केले गेले आहेत. Moto G60 स्मार्टफोन कंपनीने 108 मेगापिक्सल प्राइमेरी कॅमेरा आणि 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेऱ्यासह सादर केले आहेत. इथे आम्ही तुम्हाला मोटोरोलाच्या लेटेस्ट Moto […]

The post Moto G60 स्मार्टफोन Snapdragon 732G चिपसेट, 108MP कॅमेरा आणि 6000mAh बॅटरीसह लॉन्च, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोटोरोलाने भारतात आपल्या Moto G सीरीजचे दोन स्मार्टफोन Moto G60 आणि Moto G40 Fusion भारतात लॉन्च केले आहेत. मोटोरोलाचे दोन्ही स्मार्टफोन क्वालकॉम Snapdragon 732G चिपसेट, 6000mAh बॅटरी, 6GB रॅमसह सादर केले गेले आहेत. Moto G60 स्मार्टफोन कंपनीने 108 मेगापिक्सल प्राइमेरी कॅमेरा आणि 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेऱ्यासह सादर केले आहेत. इथे आम्ही तुम्हाला मोटोरोलाच्या लेटेस्ट Moto G60 स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमतीबाबत सविस्तर सांगत आहोत. (Moto G60 price in India revealed Motorola launched this smartphone with Snapdragon 732g and 6000mah Battery)

Moto G60 : डिजाइन आणि डिस्प्ले

मोटोरोलाच्या लेटेस्ट स्मार्टफोन Moto G60 ची डिजाइन पाहता या फोनचा बॅक पॅनल पॉलीकार्बोनेटचा आहे, जो ग्लॉसी फिनिशसह येतो. Moto G60 स्मार्टफोन कंपनीच्या Moto G सीरीजच्या स्मार्टफोन्स सारखा आहे. या फोनमधील 6000mAh च्या बॅटरीमुळे हा फोन थोडा जाड आणि वजनदार बनतो. फोनच्या मागे चौकोनी कॅमेरा मॉड्यूल आणि फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Moto G40 Fusion स्मार्टफोन Snapdragon 732G SoC आणि 6000mAh सह लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

डिस्प्ले पाहता Moto G60 स्मार्टफोनमध्ये 6.82 इंचाचा मोठा Max Vision FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. तसेच मोटोरोलाचा हा स्मार्टफोन HDR10 सपोर्टसह सादर केला गेला आहे. या फोनमध्ये सेल्फी कॅमेरा सेंसरसाठी डिस्प्लेमध्ये पंच होल कटआउट देण्यात आला आहे.

Moto G60 : स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Moto G60 स्मार्टफोनमध्ये परफॉर्मन्ससाठी क्वालकॉमचा Snapdragon 732G चिपसेट देण्यात आला आहे. मोटोरोलाचा हा स्मार्टफोन सिंगल वेरिएंटमध्ये सादर केला गेला आहे, जो 6GB रॅम आणि 128 GB स्टोरेजसह सादर केला गेला आहे. माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून फोनची स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते. मोटोरोलाच्या या स्मार्टफोनमध्ये 6000mAh बॅटरीसह Quick Charge 4.0 सपोर्ट देण्यात आला आहे. मोटोरोलाचा हा स्मार्टफोन Android 11 वर चालतो.

हे देखील वाचा : OPPO A74 5G भारतात लाॅन्च, देशातील सर्वात स्वस्त 5जी फोन्समध्ये झाला समावेश

या फोनमध्ये हाइब्रिड 4G डुअल सिम स्लॉट, 3.5mm ऑडियो जॅक, Type C USB पोर्ट, Bluetooth 5.0, Wi-Fi 8, NFC, GPS, AGPS, LTEPP, SUPL,Glonass, Galileo सारखे फीचर देण्यात आले आहेत.

Moto G60 : कॅमेरा

Moto G60 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. फोनचा प्राइमेरी कॅमेरा 108 मेगापिक्सलचा आहे, सोबत 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा लेंस जी मॅक्रो फीचरसह येते. तसेच 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर पण देण्यात आला आहे. मोटोरोलाच्या या स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. कॅमेरा फीचर्स पाहता यात डुअल कॅप्चर मोड, नाइट विजन, पोर्टेट आणि AI शॉट ऑप्टिमाइजेशन, प्रो मोड, टाइमलॅप्स आणि स्लो मोशन, पॅनोरोमा सारखे कॅमेरा फीचर्स देण्यात आले आहेत.

Moto G60 : किंमत आणि विक्री डिटेल्स

Moto G60 स्मार्टफोन कंपनीने सिंगल वेरिएंटमध्ये लॉन्च केला आहे. Moto G60 स्मार्टफोनचा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल 18999 रुपयांमध्ये सादर केला गेला आहे. लॉन्च ऑफर पाहता ICICI बँकेच्या कार्डवर 1500 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. मोटोरोलाचा हा स्मार्टफोन विक्रीसाठी ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Flipkart वर विक्रीसाठी उपलब्ध होईल. Moto G60 स्मार्टफोन डायनॅमिक ग्रे आणि फॉरेस्टेड शॅम्पेन कलर ऑप्शनमध्ये सादर गेला आहे.

The post Moto G60 स्मार्टफोन Snapdragon 732G चिपसेट, 108MP कॅमेरा आणि 6000mAh बॅटरीसह लॉन्च, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-g60-price-in-india-revealed-motorola-launched-this-smartphone-with-snapdragon-732g-and-6000mah-battery/feed/ 0
Moto G60 आणि Moto G40 Fusion भारतात 20 एप्रिलला होतील लॉन्च, मिळेल 108MP कॅमेरा आणि 6,000mAh बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g60-and-moto-g40-fusion-india-launch-on-20th-april-108mp-camera-6000mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g60-and-moto-g40-fusion-india-launch-on-20th-april-108mp-camera-6000mah-battery/#respond Fri, 16 Apr 2021 12:55:59 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10610 मोटोरोला मोटो जी60 आणि मोटो जी40 फ्यूजन लुक आणि डिजाईनच्या बाबतीत एकसारखे आहेत.

The post Moto G60 आणि Moto G40 Fusion भारतात 20 एप्रिलला होतील लॉन्च, मिळेल 108MP कॅमेरा आणि 6,000mAh बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola ने अलीकडेच सांगितले होते कि कंपनी भारतात आपले दोन नवीन स्मार्टफोन आणण्याची तयारी करत आहे जे Moto G60 आणि Moto G40 Fusion नावाने भारतात लॉन्च केले जातील. तसेच आज ‘जी’ सीरीजमध्ये जोडल्या जाणाऱ्या या मोबाईल फोन्सची लॉन्च डेट पण समोर आली आहे. मोटो जी60 आणि मोटो जी40 फ्यूजन येत्या 20 एप्रिलला भारतात लॉन्च केले जातील. हा मोबाईल फोन 6,000एमएएचच्या पावरफुल बॅटरी आणि 108मेगापिक्सलच्या ताकदवान कॅमेऱ्याला सपोर्ट करतील. (Motorola Moto G60 and Moto G40 Fusion India launch on 20th April 108mp camera 6000mah battery)

Moto G60 आणि Moto G40 Fusion च्या लॉन्चची माहिती शॉपिंग साइट फ्लिपकार्टच्या माध्यमातून समोर आली आहे. फ्लिपकार्टवर मोटोरोलाच्या आगामी स्मार्टफोन्सचा प्रोडक्ट पेज बनवण्यात आला आहे ज्याच्या माध्यमातून घोषणा करण्यात आली आहे कि हे दोन्ही मोबाईल फोन 20 एप्रिल दुपारी 12 वाजता भारतात लॉन्च केले जातील. या प्रोडक्ट पेजवर मोटोरोला मोटो जी60 आणि मोटो जी40 फ्यूजनच्या फोटो सोबतच यांच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा पण करण्यात आला आहे त्यामुळे लॉन्चपूर्वी Moto G60 आणि Moto G40 Fusion च्या ताकदीचा अंदाज लागला आहे.

असा असेल लुक

मोटोरोला मोटो जी60 आणि मोटो जी40 फ्यूजन लुक आणि डिजाईनच्या बाबतीत एकसारखे आहेत. या दोन्ही स्मार्टफोन्सचा पंच होल डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे ज्यात होल स्क्रीनच्या वर मध्यभागी देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या तीन कडा तर बेजल लेस आहेत पण खाली चिन पार्ट आहे. फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात कॅमेरा सेंसर स्क्रीनच्या वर आलेला आहे आणि वर्टिकल शेपमध्ये आहे. फोनच्या बॅक पॅनलवर Moto लोगो आहे जो फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड असू शकतो. राईट पॅनलवर वाल्यूम रॉकर आणि पावर बटणसह एक एक्स्ट्रा बटण पण देण्यात आला आहे जो गुगल असिस्टंट बटण असू शकतो.

हे देखील वाचा : Realme 8 5G फोन 22 एप्रिलला होईल भारतात लॉन्च

असे असतील स्पेसिफिकेशन्स

मोटोरोलाने सांगितले आहे कि Moto G60 आणि Moto G40 Fusion 6.8 इंचाच्या मोठ्या एचडीआर स्क्रीनवर लॉन्च केले जातील जे 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हे दोन्ही मोबाईल फोन अँड्रॉइड 11 च्या स्टॉक वर्जनसह बाजारात येतील तसेच प्रोसेसिंगसाठी फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 732जी चिपसेट दिला जाईल. तसेच पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 6,000एमएएचची बॅटरी असल्याची पुष्टी देण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी हे मोबाईल फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतील. यातील Moto G60 च्या बॅक पॅनलवर 108 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसरसह 8 मेगापिक्सल वाइड अँगल + 8 मेगापिक्सल मॅक्रो लेंस दिली जाईल. तसेच Moto G40 Fusion च्या रियर कॅमेरा सेटअपमध्ये प्राइमरी सेंसर 64 मेगापिक्सलचा दिला जाईल. सेल्फीसाठी मोटो जी60 फोन 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.

The post Moto G60 आणि Moto G40 Fusion भारतात 20 एप्रिलला होतील लॉन्च, मिळेल 108MP कॅमेरा आणि 6,000mAh बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g60-and-moto-g40-fusion-india-launch-on-20th-april-108mp-camera-6000mah-battery/feed/ 0
Moto G60 आणि Moto G40 Fusion येत आहेत भारतात, लॉन्चपूर्वी बघा यांचे पावरफुल स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g60-and-g40-fusion-india-launch-soon-with-snapdragon-732g-soc/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g60-and-g40-fusion-india-launch-soon-with-snapdragon-732g-soc/#respond Mon, 12 Apr 2021 13:10:42 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10570 Moto G60 मध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असल्याचे लीकमध्ये समोर आले आहे. तसेच दुसरीकडे Moto G40 Fusion बद्दल सांगण्यात आले आहे कि हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल ज्यात प्राइमरी सेंसर 64 मेगापिक्सलचा असेल.

The post Moto G60 आणि Moto G40 Fusion येत आहेत भारतात, लॉन्चपूर्वी बघा यांचे पावरफुल स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola बाबत गेल्या आठवड्यातच एक बातमी आली होती कि लेनोवो अधिकृत हि कंपनी लवकरच भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत दोन नवीन मोबाईल फोन लॉन्च करणार आहे. लीकमध्ये सांगण्यात आले होते कि हे दोन्ही स्मार्टफोन कंपनीच्या ‘जी’ सीरीजमध्ये जोडले जातील ज्यातील एकाचे नाव Moto G100 असू शकते. आता या मोबाईल फोन्सबद्दल नवीन अपडेट आला आहे ज्यात दावा केला गेला आहे हे दोन्ही मोटोरोला फोन भारतात Moto G60 आणि Moto G40 Fusion नावाने लॉन्च केले जातील. (Motorola Moto G60 and G40 fusion India launch soon with Snapdragon 732G soc)

Moto G60 आणि Moto G40 Fusion च्या इंडिया लॉन्चची माहिती टिपस्टर मुकुल शर्माने शेयर केली आहे. विशेष म्हणजे याच टिपस्टरने मागे मोटोरोला भारतात नवीन फोन लॉन्च करणार आहे अशी बातमी दिली होती. तसेच आता मुकुलने फोन्सच्या नावाचा खुलासा केला आहे. मोटोरोला इंडियाने अजूनतरी आपल्या नवीन प्रोडक्ट्स व लॉन्चबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही पण लीकनुसार मोटो जी60 आणि मोटो जी40 फ्यूजन लवकरच भारतीय बाजारात येतील. आशा आहे कि एप्रिलच्या शेवटपर्यंत हे फोन भारतात उपलब्ध होतील.

असे असतील स्पेसिफिकेशन्स

फोन्सच्या नावांसोबत Moto G60 आणि Moto G40 Fusion चे अनेक महत्वाचे स्पेसिफिकेशन्स पण टिपस्टरने शेयर केले आहेत. टिप मिळाली आहे कि मोटोरोला मोटो जी60 आणि मोटो जी40 फ्यूजन दोन्ही स्मार्टफोन्स क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 732जी चिपसेटसह बाजारात येतील. तसेच लीकमध्ये सांगण्यात आले आहे कि मोटो जी60 मध्ये 108 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर दिला जाईल तसेच अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि मॅक्रो लेंस पण मिळेल.

Moto G60 मध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असल्याचे लीकमध्ये समोर आले आहे. तसेच दुसरीकडे Moto G40 Fusion बद्दल सांगण्यात आले आहे कि हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल ज्यात प्राइमरी सेंसर 64 मेगापिक्सलचा असेल. तसेच हा मोबाईल फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. या फोन्समध्ये 6.78 इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. तसेच पावर बॅकअपसाठी 6,000एमएएचची बॅटरी असल्याचे पण लीकमध्ये सांगण्यात आले आहे.

हे देखील वाचा : 6 जीबी रॅम आणि 5,000एमएएच बॅटरीसह लॉन्च झाला स्वस्त Vivo Y20s [G] स्मार्टफोन

Motorola ने आतापर्यंत भारतात आपले नवीन फोन लॉन्च करण्याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे Moto G60 आणि Moto G40 Fusion कधी देशात लॉन्च होतील यासाठी कोणतीही टाईमलाईन मिळाली नाही. आशा आहे कि मोटोरोला येत्या काही दिवसांत आपला नवीन लॉन्च टीज करायला सुरुवात करेल आणि पुन्हा फोनची लॉन्च डेट पण घोषित करेल.

The post Moto G60 आणि Moto G40 Fusion येत आहेत भारतात, लॉन्चपूर्वी बघा यांचे पावरफुल स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g60-and-g40-fusion-india-launch-soon-with-snapdragon-732g-soc/feed/ 0
Moto G60 मध्ये असेल 6,000एमएएच बॅटरी, 120हर्ट्ज डिस्प्ले आणि 108एमपी कॅमेरा, लवकरच होईल भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g60-120hz-display-108mp-camera-6000mah-battery-specs-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g60-120hz-display-108mp-camera-6000mah-battery-specs-leaked/#respond Mon, 22 Mar 2021 08:56:20 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10367 Moto G60 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळणार असल्याचे समोर आले आहे. रिपोर्टनुसार फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 108 मेगापिक्सलचा Samsung ISOCELL HM2 सेंसर देण्यात येईल

The post Moto G60 मध्ये असेल 6,000एमएएच बॅटरी, 120हर्ट्ज डिस्प्ले आणि 108एमपी कॅमेरा, लवकरच होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola संबंधित मोठी बातमी गेल्याच आठवड्यात समोर आली होती की कंपनी एका नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे जो 108 मेगापिक्सल कॅमेर्‍यासह लॉन्च होईल. या फोनचे कोडनेम Motorola Hanoip असल्याचे सांगण्यात आले होते जो इंडियन सर्टिफिकेशन्स साइट बीआईएसवर पण लिस्ट झाला आहे. तसेच आता या फोनचा नवीन अपडेट समोर आला आहे ज्यात डिवाईसचे नाव Moto G60 असल्याचे सांगण्यात आले आहे. फक्त नाव नाही तर नवीन रिपोर्टमध्ये मोटो जी60 स्मार्टफोनमध्ये 108एमपी कॅमेर्‍यासह 6,000एमएएच बॅटरी आणि 120हर्ट्ज डिस्प्ले असल्याचा पण खुलासा झाला आहे. (Motorola Moto G60 120hz display 108mp camera 6000mah battery Specs leaked)

Moto G60 ची बातमी एक्सडीए डेवलेपर्सने आपल्या रिपोर्टमध्ये प्रकाशित केले आहे. रिपोर्टमध्ये फोनचे तीन मॉडेल नंबर सांगण्यात आले आहे जो XT2135-1, XT-2135-2 आणि XT2147-1 आहेत. रिपोर्टनुसार मोटो जी60 स्मार्टफोन सर्वप्रथम लॅटिन अमेरिका आणि यूरोप मधील बाजारात लॉन्च केला जाईल. हा फोन एक फ्लॅगशिप डिवाईस असेल जो हाईएंड स्पेसिफिकेशन्ससह येईल. विशेष म्हणजे Moto G60 इंडिया लॉन्चचा रिपोर्ट पण समोर आला आहे परंतु ताज्या माहितीनुसार भारतात येणारा मॉडेल ग्लोबल मॉडलपेक्षा वेगळा असू शकतो. नवीन लीक मध्ये मोटो जी60 च्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा पण झाला आहे.

Moto G60 चे स्पेसिफिकेशन्स
एक्सडीए डेवलेपर्सच्या रिपोर्ट मध्ये दावा केला गेला आहे कि मोटो जी60 स्मार्टफोन 1080 x 2460 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.78 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे. Moto G60 चा स्क्रीन पॅनल एमोलेड असेल किंवा एलसीडी असेल हे समजले नाही पण रिपोर्टनुसार हा फोन 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेल्या डिस्प्लेला सपोर्ट करेल.

रिपोर्टनुसार हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये बाजारात येऊ शकतो. फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते तसेच दुसर्‍या वेरिएंटमध्ये 6 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज मिळू शकते. प्रोसेसिंगसाठी Moto G60 मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 732जी चिपसेट मिळू शकतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 6,000एमएएच ची बॅटरी असल्याचे समोर आले आहे.

Moto G60 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळणार असल्याचे समोर आले आहे. रिपोर्टनुसार फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 108 मेगापिक्सलचा Samsung ISOCELL HM2 सेंसर देण्यात येईल, त्यासोबत 16 मेगापिक्सलची OmniVision OV16A1Q अल्ट्रावाइड एंगल लेंस आणि 2 मेगापिक्सलचा OmniVision OV16A1Q सेंसर मिळेल. तसेच सेल्फीसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचे रिपोर्ट मध्ये समोर आले आहे.

रिपोर्टमध्ये उपरोक्त स्पेसिफिकेशन्स XT2135-1/2 मॉडेल असलेल्या मोटो जी60 चे असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच या फोनचा अजून एक मॉडेल XT2147-1 पण रिपोर्ट मध्ये समोर आला आहे ज्यात 64 मेगापिक्सल OmniVision प्राइमरी सेंसर असल्याची माहिती देण्यात आली आहे. रिपोर्टनुसार या मॉडेलच्या मोटोरोला फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाईल. त्यामुळे Moto G60 च्या लॉन्च व स्पेसिफिकेशन्स संबंधित इतर माहितीसाठी वाट बघावी लागेल.

The post Moto G60 मध्ये असेल 6,000एमएएच बॅटरी, 120हर्ट्ज डिस्प्ले आणि 108एमपी कॅमेरा, लवकरच होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g60-120hz-display-108mp-camera-6000mah-battery-specs-leaked/feed/ 0