Motorola संबंधित मोठी बातमी गेल्याच आठवड्यात समोर आली होती की कंपनी एका नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे जो 108 मेगापिक्सल कॅमेर्यासह लॉन्च होईल. या फोनचे कोडनेम Motorola Hanoip असल्याचे सांगण्यात आले होते जो इंडियन सर्टिफिकेशन्स साइट बीआईएसवर पण लिस्ट झाला आहे. तसेच आता या फोनचा नवीन अपडेट समोर आला आहे ज्यात डिवाईसचे नाव Moto G60 असल्याचे सांगण्यात आले आहे. फक्त नाव नाही तर नवीन रिपोर्टमध्ये मोटो जी60 स्मार्टफोनमध्ये 108एमपी कॅमेर्यासह 6,000एमएएच बॅटरी आणि 120हर्ट्ज डिस्प्ले असल्याचा पण खुलासा झाला आहे. (Motorola Moto G60 120hz display 108mp camera 6000mah battery Specs leaked)
Moto G60 ची बातमी एक्सडीए डेवलेपर्सने आपल्या रिपोर्टमध्ये प्रकाशित केले आहे. रिपोर्टमध्ये फोनचे तीन मॉडेल नंबर सांगण्यात आले आहे जो XT2135-1, XT-2135-2 आणि XT2147-1 आहेत. रिपोर्टनुसार मोटो जी60 स्मार्टफोन सर्वप्रथम लॅटिन अमेरिका आणि यूरोप मधील बाजारात लॉन्च केला जाईल. हा फोन एक फ्लॅगशिप डिवाईस असेल जो हाईएंड स्पेसिफिकेशन्ससह येईल. विशेष म्हणजे Moto G60 इंडिया लॉन्चचा रिपोर्ट पण समोर आला आहे परंतु ताज्या माहितीनुसार भारतात येणारा मॉडेल ग्लोबल मॉडलपेक्षा वेगळा असू शकतो. नवीन लीक मध्ये मोटो जी60 च्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा पण झाला आहे.
Moto G60 चे स्पेसिफिकेशन्स
एक्सडीए डेवलेपर्सच्या रिपोर्ट मध्ये दावा केला गेला आहे कि मोटो जी60 स्मार्टफोन 1080 x 2460 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.78 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे. Moto G60 चा स्क्रीन पॅनल एमोलेड असेल किंवा एलसीडी असेल हे समजले नाही पण रिपोर्टनुसार हा फोन 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेल्या डिस्प्लेला सपोर्ट करेल.
रिपोर्टनुसार हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये बाजारात येऊ शकतो. फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते तसेच दुसर्या वेरिएंटमध्ये 6 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज मिळू शकते. प्रोसेसिंगसाठी Moto G60 मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 732जी चिपसेट मिळू शकतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 6,000एमएएच ची बॅटरी असल्याचे समोर आले आहे.
Moto G60 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळणार असल्याचे समोर आले आहे. रिपोर्टनुसार फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 108 मेगापिक्सलचा Samsung ISOCELL HM2 सेंसर देण्यात येईल, त्यासोबत 16 मेगापिक्सलची OmniVision OV16A1Q अल्ट्रावाइड एंगल लेंस आणि 2 मेगापिक्सलचा OmniVision OV16A1Q सेंसर मिळेल. तसेच सेल्फीसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचे रिपोर्ट मध्ये समोर आले आहे.
रिपोर्टमध्ये उपरोक्त स्पेसिफिकेशन्स XT2135-1/2 मॉडेल असलेल्या मोटो जी60 चे असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच या फोनचा अजून एक मॉडेल XT2147-1 पण रिपोर्ट मध्ये समोर आला आहे ज्यात 64 मेगापिक्सल OmniVision प्राइमरी सेंसर असल्याची माहिती देण्यात आली आहे. रिपोर्टनुसार या मॉडेलच्या मोटोरोला फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाईल. त्यामुळे Moto G60 च्या लॉन्च व स्पेसिफिकेशन्स संबंधित इतर माहितीसाठी वाट बघावी लागेल.














