Moto G60 स्मार्टफोन Snapdragon 732G चिपसेट, 108MP कॅमेरा आणि 6000mAh बॅटरीसह लॉन्च, जाणून घ्या किंमत

मोटोरोलाने भारतात आपल्या Moto G सीरीजचे दोन स्मार्टफोन Moto G60 आणि Moto G40 Fusion भारतात लॉन्च केले आहेत. मोटोरोलाचे दोन्ही स्मार्टफोन क्वालकॉम Snapdragon 732G चिपसेट, 6000mAh बॅटरी, 6GB रॅमसह सादर केले गेले आहेत. Moto G60 स्मार्टफोन कंपनीने 108 मेगापिक्सल प्राइमेरी कॅमेरा आणि 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेऱ्यासह सादर केले आहेत. इथे आम्ही तुम्हाला मोटोरोलाच्या लेटेस्ट Moto G60 स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमतीबाबत सविस्तर सांगत आहोत. (Moto G60 price in India revealed Motorola launched this smartphone with Snapdragon 732g and 6000mah Battery)

Moto G60 : डिजाइन आणि डिस्प्ले

मोटोरोलाच्या लेटेस्ट स्मार्टफोन Moto G60 ची डिजाइन पाहता या फोनचा बॅक पॅनल पॉलीकार्बोनेटचा आहे, जो ग्लॉसी फिनिशसह येतो. Moto G60 स्मार्टफोन कंपनीच्या Moto G सीरीजच्या स्मार्टफोन्स सारखा आहे. या फोनमधील 6000mAh च्या बॅटरीमुळे हा फोन थोडा जाड आणि वजनदार बनतो. फोनच्या मागे चौकोनी कॅमेरा मॉड्यूल आणि फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Moto G40 Fusion स्मार्टफोन Snapdragon 732G SoC आणि 6000mAh सह लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

डिस्प्ले पाहता Moto G60 स्मार्टफोनमध्ये 6.82 इंचाचा मोठा Max Vision FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. तसेच मोटोरोलाचा हा स्मार्टफोन HDR10 सपोर्टसह सादर केला गेला आहे. या फोनमध्ये सेल्फी कॅमेरा सेंसरसाठी डिस्प्लेमध्ये पंच होल कटआउट देण्यात आला आहे.

Moto G60 : स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Moto G60 स्मार्टफोनमध्ये परफॉर्मन्ससाठी क्वालकॉमचा Snapdragon 732G चिपसेट देण्यात आला आहे. मोटोरोलाचा हा स्मार्टफोन सिंगल वेरिएंटमध्ये सादर केला गेला आहे, जो 6GB रॅम आणि 128 GB स्टोरेजसह सादर केला गेला आहे. माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून फोनची स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते. मोटोरोलाच्या या स्मार्टफोनमध्ये 6000mAh बॅटरीसह Quick Charge 4.0 सपोर्ट देण्यात आला आहे. मोटोरोलाचा हा स्मार्टफोन Android 11 वर चालतो.

हे देखील वाचा : OPPO A74 5G भारतात लाॅन्च, देशातील सर्वात स्वस्त 5जी फोन्समध्ये झाला समावेश

या फोनमध्ये हाइब्रिड 4G डुअल सिम स्लॉट, 3.5mm ऑडियो जॅक, Type C USB पोर्ट, Bluetooth 5.0, Wi-Fi 8, NFC, GPS, AGPS, LTEPP, SUPL,Glonass, Galileo सारखे फीचर देण्यात आले आहेत.

Moto G60 : कॅमेरा

Moto G60 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. फोनचा प्राइमेरी कॅमेरा 108 मेगापिक्सलचा आहे, सोबत 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा लेंस जी मॅक्रो फीचरसह येते. तसेच 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर पण देण्यात आला आहे. मोटोरोलाच्या या स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. कॅमेरा फीचर्स पाहता यात डुअल कॅप्चर मोड, नाइट विजन, पोर्टेट आणि AI शॉट ऑप्टिमाइजेशन, प्रो मोड, टाइमलॅप्स आणि स्लो मोशन, पॅनोरोमा सारखे कॅमेरा फीचर्स देण्यात आले आहेत.

Moto G60 : किंमत आणि विक्री डिटेल्स

Moto G60 स्मार्टफोन कंपनीने सिंगल वेरिएंटमध्ये लॉन्च केला आहे. Moto G60 स्मार्टफोनचा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल 18999 रुपयांमध्ये सादर केला गेला आहे. लॉन्च ऑफर पाहता ICICI बँकेच्या कार्डवर 1500 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. मोटोरोलाचा हा स्मार्टफोन विक्रीसाठी ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Flipkart वर विक्रीसाठी उपलब्ध होईल. Moto G60 स्मार्टफोन डायनॅमिक ग्रे आणि फॉरेस्टेड शॅम्पेन कलर ऑप्शनमध्ये सादर गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here