Moto X40 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Mar 2023 09:45:36 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Moto X40 जागतिक बाजारात Moto Edge 40 Pro नावानं करू शकतो एंट्री https://www.91mobiles.com/marathi/motorola-edge-40-pro-global-price-storage-and-colour-options-leaked-before-launch/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-edge-40-pro-global-price-storage-and-colour-options-leaked-before-launch/#respond Tue, 17 Jan 2023 06:33:30 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16944 गेल्यावर्षी चीनमध्ये Moto X40 लाँच केल्यानंतर मोटोरोला आता हा स्मार्टफोन जागतिक बाजारात लाँच करण्यासाठी तयार आहे. हा फोन भारतासह आंतरराष्ट्रीय ग्राहकांना Motorola Edge 40 Pro नावानं उपलब्ध होऊ शकतो. या डिवाइसमध्ये दर्जेदार स्पेसिफिकेशन्स आहेत आणि हा गेल्यावर्षी मार्चमध्ये आलेल्या Motorola Edge 30 Pro ची जागा घेऊ शकतो. आता नव्या रिपोर्ट्समधून Motorola Edge 40 Pro च्या […]

The post Moto X40 जागतिक बाजारात Moto Edge 40 Pro नावानं करू शकतो एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Motorola Edge 40 Pro च्या जागतिक मॉडेलची किंमत लीक
  • Motorola Edge 40 Pro जागतिक बाजारात ब्लॅक आणि ब्लू कलरमध्ये येणार
  • Motorola Edge 40 Pro गेल्यावर्षी चीनमध्ये Moto X40 नावानं लाँच झाला होता

गेल्यावर्षी चीनमध्ये Moto X40 लाँच केल्यानंतर मोटोरोला आता हा स्मार्टफोन जागतिक बाजारात लाँच करण्यासाठी तयार आहे. हा फोन भारतासह आंतरराष्ट्रीय ग्राहकांना Motorola Edge 40 Pro नावानं उपलब्ध होऊ शकतो. या डिवाइसमध्ये दर्जेदार स्पेसिफिकेशन्स आहेत आणि हा गेल्यावर्षी मार्चमध्ये आलेल्या Motorola Edge 30 Pro ची जागा घेऊ शकतो. आता नव्या रिपोर्ट्समधून Motorola Edge 40 Pro च्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती लीक झाली आहे ज्यात स्टोरेज, कलर ऑप्शन आणि युरोपियन बाजारातील किंमतीचा समावेश आहे.

Motorola Edge 40 Pro ची लीक किंमत आणि कलर ऑप्शन

रिपोर्ट्सनुसार Motorola Edge 40 Pro स्मार्टफोन युरोपात एकाच व्हेरिएंटमध्ये लाँच केला जाण्याची शक्यता आहे. या एकमेव मॉडेलमध्ये 12GB RAM आणि 256GB इंटरनल स्टोरेज मिळू शकते. त्याउलट चीनमध्ये लाँच झालेल्या Moto X40 स्मार्टफोनमध्ये 256GB व्हेरिएंटसह 8GB RAM सह 128GB स्टोरेज आणि 12GB RAM सह 512GB स्टोरेज देण्यात आली होती. हे देखील वाचा: बजेटमध्ये BGMI-PUBG साठी फोन हवा? 16 फेब्रुवारीला भारतात येतोय शानदार गेमिंग फोन iQOO Neo 7 5G

समोर आलेल्या लिक्समधून Motorola Edge 40 Pro च्या कलर व्हेरिएंटची देखील माहिती मिळाली आहे, त्यानुसार हा फोन Moto X40 प्रमाणे ब्लॅक आणि ब्लु कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होऊ शकतो. या स्मार्टफोनची युरोपिन बाजारातील किंमत 850 युरो (सुमारे 74,700 रुपये) असण्याची शक्यता आहे. परंतु Motorola Edge 40 Pro भारतात मात्र 60,000 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध होऊ शकतो, असा आमचा अंदाज आहे.

Motorola Edge 40 Pro चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

Motorola Edge 40 Pro स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा फुल-एचडी+ कर्व डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट 165Hz आहे आणि हा HDR10+ला सपोर्ट करू शकतो. मोटोरोलाचा हा स्मार्टफोन Android 13आधारित MyUI 5.0 वर चालू शकतो. Motorola Edge 40 Proस्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 SoC दिली जाऊ शकते.

Motorola Edge 40 Pro स्मार्टफोनमध्ये ड्युअल SIM 5G स्मार्टफोन Wi-Fi 6E आणि Bluetooth v5.3 सपोर्टसह सादर केला जाऊ शकतो. यात एनर्जी कंजम्शनसाठी MAXE टेक्नॉलॉजी तर तापमान कमी ठेवण्यासाठी 11-लेयर कूलिंग सिस्टम मिळू शकते. Motorola Edge 40 Pro मधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये ओआयएस सपोर्ट असलेला 50-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 50-मेगापिक्सलची वाइड अँगल लेन्स आणि 12-मेगापिक्सलचा टेलीफोटो सेन्सर दिला जाऊ शकतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 60MP चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

मोटोरोलाच्या या फोनमध्ये 4,600mAh ची बॅटरी आणि 125W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह दिली जाऊ शकते. Motorola चा दावा आहे की हा फोन फक्त 7 मिनिटांत 50 टक्के चार्ज होऊ शकतो. Motorola Edge 40 Pro स्मार्टफोनमध्ये 15W वायरलेस चार्जिंग आणि 15W रिवर्स चार्जिंग दिली जाऊ शकते. हे देखील वाचा: अशी संधी पुन्हा मिळणार नाही! Nothing Phone (1) वर सर्वात मोठा डिस्काउंट; जाणून घ्या ऑफर

The post Moto X40 जागतिक बाजारात Moto Edge 40 Pro नावानं करू शकतो एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-edge-40-pro-global-price-storage-and-colour-options-leaked-before-launch/feed/ 0
60MP फ्रंट कॅमेऱ्यासह फ्लॅगशिप Moto X40 लाँच; सोबत Moto G53 5G Phone ची देखील एंट्री https://www.91mobiles.com/marathi/moto-x40-and-moto-g53-5g-launched-check-price-details-and-specs/ https://www.91mobiles.com/marathi/moto-x40-and-moto-g53-5g-launched-check-price-details-and-specs/#respond Fri, 16 Dec 2022 05:16:30 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16050 मोटोरोलानं चीनमध्ये दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत ज्यात Moto X40 आणि Moto G53 5G स्मार्टफोनचा समावेश करण्यात आला आहे. X-सीरीजमधील स्मार्टफोन कंपनीचा नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे तर जी सीरिजचा मॉडेल बजेटयामध्ये सादर करण्यात आला आहे. फ्लॅगशिप Moto X40 मध्ये Snapdragon 8 Gen 2 SoC आणि 60MP कॅमेरा असे भन्नाट स्पेक्स मिळतात. तर 10 हजारांच्या रेंजमधील […]

The post 60MP फ्रंट कॅमेऱ्यासह फ्लॅगशिप Moto X40 लाँच; सोबत Moto G53 5G Phone ची देखील एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोटोरोलानं चीनमध्ये दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत ज्यात Moto X40 आणि Moto G53 5G स्मार्टफोनचा समावेश करण्यात आला आहे. X-सीरीजमधील स्मार्टफोन कंपनीचा नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे तर जी सीरिजचा मॉडेल बजेटयामध्ये सादर करण्यात आला आहे. फ्लॅगशिप Moto X40 मध्ये Snapdragon 8 Gen 2 SoC आणि 60MP कॅमेरा असे भन्नाट स्पेक्स मिळतात. तर 10 हजारांच्या रेंजमधील Moto G53 5G स्मार्टफोन 8GB रॅमसह बाजारात आला आहे. चला जाणून घेऊया या दोन्ही हँडसेटचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत.

मोटो एक्स40 चे स्पेसिफिकेशन्स

Moto X40 स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा फुल-एचडी+ कर्व डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 165Hz आहे आणि हा HDR10+ला सपोर्ट करतो. मोटोरोलाचा हा स्मार्टफोन Android 13आधारित MyUI 5.0 वर चालतो. Moto X40 स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 SoC देण्यात आला आहे. हा फोन 12GB पर्यंत LPPDR5x RAM आणि 512GB पर्यंत UFS 4.0 स्टोरेज ऑप्शनसह येतो. हे देखील वाचा: पावरफुल OnePlus 10T 5G वर 15,000 रुपयांपेक्षा जास्त सूट; पुन्हा मिळणार नाही अशी ऑफर

Moto X40 स्मार्टफोनमध्ये ड्युअल SIM 5G स्मार्टफोन Wi-Fi 6E आणि Bluetooth v5.3ला सपोर्टसह सादर करण्यात आला आहे. यात एनर्जी कंजम्शनसाठी MAXE टेक्नॉलॉजी तर तापमान कमी ठेवण्यासाठी 11-लेयर कूलिंग सिस्टम मिळते. Moto X40 मधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये ओआयएस सपोर्ट असलेला 50-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 50-मेगापिक्सलची वाइड अँगल लेन्स आणि 12-मेगापिक्सलचा टेलीफोटो सेन्सर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 60MP चा फोटन्ट कॅमेरा मिळतो.

मोटोरोलाच्या या फोनमध्ये 4,600mAh ची बॅटरी आणि 125W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. Motorola चा दावा आहे की हा फोन फक्त 7 मिनिटांत 50 टक्के चार्ज होतो. Moto X40 स्मार्टफोनमध्ये 15W वायरलेस चार्जिंग आणि 15W रिवर्स चार्जिंग देण्यात आली आहे.

मोटो जी53 5जी चे स्पेसिफिकेशन्स

Moto G53 स्मार्टफोनमध्ये 6.52-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये क्वॉलकॉमचा ऑक्टकोर चिपसेट देण्यात आला आहे. जोडीला 8GB RAM आणि 128GB storage मिळते, ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं वाढवता येते. हा Android 13 आधारित MyUX वर चालतो.

Moto G53 च्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP ची सेकंडरी लेन्स देण्यात आली आहे. तर फ्रंटला 8MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. Moto G53 मध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी 18W फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे. तर कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth, GPS आणि USB Type-C पोर्ट मिळतो. तर सिक्योरिटीसाठी कंपनीनं साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील दिला आहे. हे देखील वाचा: How To Youtube Shorts Videos: पाहा युट्युब शॉर्ट्स व्हिडीओ डाउनलोड करण्याच्या सर्वात सोप्या ट्रिक्स

मोटो एक्स40 व मोटो जी 53 प्राइस आणि उपलब्धता

Moto X40 स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत 3,399 युआन (सुमारे 40,400 रुपये) आहे, ज्यात 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते. तर 3,699 युआन (सुमारे 44,000 रुपये) मध्ये 8GB रॅम व 256GB स्टोरेज, 3,999 युआन (सुमारे 47,600 रुपये ) मध्ये 12GB व 256GB स्टोरेज मॉडेल आणि 4,299 युआन (सुमारे 51,100 रुपये) मध्ये 12GB रॅम व 512GB स्टोरेज मॉडेल मिळेल. हा फोन Black आणि Blue कलर ऑप्शनसह सादर करण्यात आला आहे.

Moto G53 5G स्मार्टफोनचे दोन मॉडेल चीनमध्ये सादर करण्यात आले आहेत. यातील बेस व्हेरिएंटची किंमत 899 युआन (सुमारे 10,700 रुपये) ठेवण्यात आली आहे, जो 4GB रॅम व 128GB स्टोरेजसह येतो. तर या स्मार्टफोनचा मोठा मॉडेल 1099 युआन (सुमारे 13,100 रुपये) मध्ये येतो, ज्यात 8GB रॅम व 128GB स्टोरेज मिळते.

The post 60MP फ्रंट कॅमेऱ्यासह फ्लॅगशिप Moto X40 लाँच; सोबत Moto G53 5G Phone ची देखील एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-x40-and-moto-g53-5g-launched-check-price-details-and-specs/feed/ 0
लेनोवोच्या अधिकाऱ्यांनी टीज केला Moto X40; सर्वप्रथम होऊ शकते चीनमध्ये एंट्री https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-x40-to-launch-in-december-with-snapdragon-8-gen-2-soc/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-x40-to-launch-in-december-with-snapdragon-8-gen-2-soc/#respond Wed, 30 Nov 2022 05:26:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15502 Motorola कंपनी आपल्या नव्या फ्लॅगशिप स्मार्टफोनवर काम करत आहे. हा मोटोरोला मोबाइल कंपनीच्या ‘एक्स’ सीरीजमध्ये जोडला जाईल तसेच Moto X40 नावानं लाँच होऊ शकतो. Lenovo executive Chen Jin नं मोटोरोला मोटो एक्स40 स्मार्टफोन ऑफिशियली टीज केला आहे आणि हिंट दिली आहे की हा मोबाइल फोन डिसेंबर 2022 मध्ये बाजारात येऊ शकतो. Moto X40 सर्वप्रथम चीनमध्ये […]

The post लेनोवोच्या अधिकाऱ्यांनी टीज केला Moto X40; सर्वप्रथम होऊ शकते चीनमध्ये एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola कंपनी आपल्या नव्या फ्लॅगशिप स्मार्टफोनवर काम करत आहे. हा मोटोरोला मोबाइल कंपनीच्या ‘एक्स’ सीरीजमध्ये जोडला जाईल तसेच Moto X40 नावानं लाँच होऊ शकतो. Lenovo executive Chen Jin नं मोटोरोला मोटो एक्स40 स्मार्टफोन ऑफिशियली टीज केला आहे आणि हिंट दिली आहे की हा मोबाइल फोन डिसेंबर 2022 मध्ये बाजारात येऊ शकतो. Moto X40 सर्वप्रथम चीनमध्ये लाँच होऊ शकतो नंतर दुसऱ्या देशांमध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो.

Moto X40 लाँच

मोटो एक्स40 बद्दल बातमी समोर आली आहे की हा मोबाइल फोन पुढील महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये चीनमध्ये लाँच केला जाऊ शकतो. लेनेवो एग्जीक्यूटिव्ह जिन यांनी मायक्रोब्लागिंग साइट वेईबोवर टीजर ईमेज शेयर केली आहे ज्यात फोनच्या नावाचा आणि लाँचचा खुलासा करण्यात आला आहे. या फोटोमध्ये फोनची झलक देखील दिसते तसेच मोटो एक्स40 ला मोबाइल फोन्सचा SUV असल्याचं सांगण्यात आलं आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की Moto X40 IP68 रेटिंगसह येईल त्यामुळे हा वॉटरप्रूफ बनेल. हे देखील वाचा: अरे वाह! रेडमीचा सर्वात स्वस्त 5G Phone झाला आणखी स्वस्त; डिस्काउंटसह 6GB रॅम आणि 50MP कॅमेरा

Moto X40 चे लीक स्पेसिफिकेशन्स

मोटोरोला एक्स40 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता आतापर्यंत समोर आलेल्या लीक्स व मीडिया रिपोर्ट्सनुसार हा मोबाइल फोन 1080 × 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या ओएलईडी डिस्प्लेवर लाँच केला जाऊ शकतो. फोनची स्क्रीन अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येऊ शकते. लीकनुसार या मोटोरोला मोबाइलचे डायमेंशन 161.3×73.9×8.5एमएम आणि वजन 196 ग्राम असू शकते.

Moto X40 मध्ये प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट असू शकतो. तसेच सर्टिफिकेशन साइट्स व रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की मोटोरोला मोटो एक्स40 18जीबी रॅमवर लाँच होऊ शकतो. हा फोनचा सर्वात मोठा मॉडेल असू शकतो, ज्यात 12जीबी रॅम व 8जीबी रॅम देखील दिला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन 512जीबी स्टोरेज, 256जीबी स्टोरेज तसेच 128जीबी स्टोरेजसह लाँच केला जाऊ शकतो. हे देखील वाचा: My Scheme Portal Online Process: खास तुमच्यासाठी कोणती सरकारी योजना आहे सांगेल ‘ही’ वेबसाइट, आताच करा चेक

फोटोग्राफीसाठी Motorola Moto X40 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळू शकतो. या कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 50 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स आणि 12 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर दिला जाऊ शकतो जो 4एक्स ऑप्टिकल झूमला सपोर्ट करू शकतो. तसेच पावर बॅकअपसाठी मोटो एक्स40 मध्ये 4,950एमएएच किंवा 4,450एमएएचची बॅटरी मिळू शकते. चीनमध्ये लाँच झाल्यावर Moto X40 स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये Moto Edge 40 Pro नावानं येण्याची शक्यता आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post लेनोवोच्या अधिकाऱ्यांनी टीज केला Moto X40; सर्वप्रथम होऊ शकते चीनमध्ये एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-x40-to-launch-in-december-with-snapdragon-8-gen-2-soc/feed/ 0