Nokia 3.1 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 22 Oct 2018 07:13:33 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 नोकिया ने ​आपल्या या स्मार्टफोन्सच्या किंमती केल्या कमी, 2,000 रुपयांपासून 13,000 रुपयांपर्यंत किंमती झाल्या कमी https://www.91mobiles.com/marathi/nokia-3-1-and-5-1-and-6-1-nokia-8-sirocco-price-cut-in-india-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-3-1-and-5-1-and-6-1-nokia-8-sirocco-price-cut-in-india-in-marathi/#respond Mon, 22 Oct 2018 07:13:33 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2573 नोकिया ने लोकांना आश्चर्यकारक धक्का देत आपल्या स्मार्टफोन्सच्या किंमतींमध्ये 13,000 रुपयांपर्यंतची कपात केली आहे.

The post नोकिया ने ​आपल्या या स्मार्टफोन्सच्या किंमती केल्या कमी, 2,000 रुपयांपासून 13,000 रुपयांपर्यंत किंमती झाल्या कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकिया एंडरॉयड मार्केट मध्ये जरी उशिरा आली असली तरी या ब्रांड प्रति मोबाईल यूजर्सच्या विश्वासामुळे नोकिया स्मार्टफोन थोड्याच कालावधीत हिट झाला आहे. नोकिया ने पण आपल्या यूजर्सची काळजी घेत चांगल्या बजेट मध्ये शानदार फीचर्स आणि दमदार स्पेसिफिकेशन्स असलेले स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. तसेच आता दिवाळीच्या निमित्ताने नोकिया फॅन्सना भेट देत कंपनी ने आपल्या स्मार्टफोन्सच्या किंमती मोठ्याप्रमाणावर कमी केल्या आहेत. नोकिया ने लोकांना आश्चर्यकारक धक्का देत आपल्या स्मार्टफोन्सच्या किंमतींमध्ये 13,000 रुपयांपर्यंतची कपात केली आहे.

नोकिया ने दिवाळीच्या निमित्ताने आपल्या बजेट स्मार्टफोन्स पासून फ्लॅगशिप स्मार्टफोन्स पर्यंतच्या किंमती कमी केल्या आहेत. या प्राइस कट मध्ये स्वस्त तसेच महाग फोन्सचा पण समावेश आहे. सर्वात आधी नोकियाच्या हाईएंड डिवाईस नोकिया 8 सिरोको बद्दल बोलूया तर हा फोन 49,999 रुपयांमध्ये भारतात लॉन्च झाला होता. पण दिवाळीच्या निम्मिताने झालेल्या प्राइस कट नंतर कंपनी या फोन वर थेट 13,000 रुपयांची सूट देत आहे. या मोठ्या प्राइस ड्रॉप नंतर नोकियाचा हा शानदार स्मार्टफोन 36,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

नोकियाच्या मीड रेंज स्मार्टफोन बद्दल बोलायचे तर कंपनी ने नोकिया 6.1 ची किंमत पण कमी केली आहे. इंडियन मार्केट मध्ये नोकिया 6.1 4 जीबी रॅम व 3जीबी रॅम च्या दोन वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. फोनचा 3जीबी वेरिएंट 2,000 रुपयांच्या प्राइस सह विकत घेता येईल. हा फोन आधी 15,499 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध हप्ता आता हा 13,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 17,499 रुपयांचा नोकिया 6.1 चा 4जीबी रॅम वेरिएंट 1,000 रुपयांनी कमी म्हणजे 16,499 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

नोकिया 5.1 कंपनी द्वारा 14,499 रुपयांमध्ये देशात लॉन्च करण्यात आला होता. किंमत कमी करताना कंपनी ने या फोन वर 1,500 रुपयांची सूट दिली आहे ज्यामुळे हा फोन 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 11,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेल्या नोकिया 3.1 पण 1,000 रुपयांच्या कपाती नंतर फक्त 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post नोकिया ने ​आपल्या या स्मार्टफोन्सच्या किंमती केल्या कमी, 2,000 रुपयांपासून 13,000 रुपयांपर्यंत किंमती झाल्या कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-3-1-and-5-1-and-6-1-nokia-8-sirocco-price-cut-in-india-in-marathi/feed/ 0
नोकिया ने भारतात लॉन्च केले तीन एंडरॉयड फोन, जाणून घ्या प्राईस, स्पेसिफिकेशन आणि फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-1-and-nokia-3-1-and-nokia-2-1-launched-in-india-feature-specifications-price-availability-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-1-and-nokia-3-1-and-nokia-2-1-launched-in-india-feature-specifications-price-availability-in-marathi/#respond Thu, 09 Aug 2018 12:50:44 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1656 नोकिया चे मालकी हक्क असणार्‍या एचएमडी ग्लोबल ने नोकिया 5.1 आणि नोकिया 2.1 सोबत नोकिया 3.1 पण नवीन अपडेट सह बाजारात आणला आहे.

The post नोकिया ने भारतात लॉन्च केले तीन एंडरॉयड फोन, जाणून घ्या प्राईस, स्पेसिफिकेशन आणि फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकिया ने काही दिवसांपूर्वी अंर्तराष्ट्रीय मंचावरून आपले तीन नवीन स्मार्टफोन नोकिया 5.1, नोकिया 3.1 आणि नोकिया 2.1 सादर केले होते. आज भारतातील नोकिया फॅन्सना शानदार भेट देत कंपनी ने हे तिन्ही फोन इंडियन मार्केट मध्ये पण लॉन्च केले आहेत. नोकिया चे मालकी हक्क असणार्‍या एचएमडी ग्लोबल ने नोकिया 5.1 आणि नोकिया 2.1 सोबत नोकिया 3.1 पण नवीन अपडेट सह बाजारात आणला आहे. शानदार बिल्ड क्वॉलिटी व लुक सह हे तिन्ही स्मार्टफोन वेगवेगळ्या बजेट मध्ये चांगले स्पेसिफिकेशन्स देतात. हे तिन्ही स्मार्टफोन्स 12 ऑगस्ट पासून आॅनलाईन शॉपिंग साइट्स सोबतच आॅफलाईन रिटेल स्टोर्स वरून पण विकत घेता येतील.

नोकिया 5.1
नोकिया 5.1 बद्दल बोलायचे तर हा फोन मेटल यूनिबॉडी डिजाइन मध्ये सादर करण्यात आला आहे. कंपनी ने एल्यूमिनियम 6000 सीरीजचा वापर केला आहे जो उत्कृष्ट बिल्ट क्वालिटी साठी ओळखला जातो. फोन 18:9 आसपेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 5.5-इंचाची आईपीएस स्क्रीन देण्यात आली आहे जी कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे.

नोकिया 5.1 एंडरॉयड ओरियो वर सादर करण्यात आला आहे जो 2.0गीगाहट्र्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलियो पी18 चिपसेट वर चालतो. कंपनी ने फोन मध्ये 3जीबी रॅम तसेच 32जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे. फोटोग्राफी साठी नोकिया 5.1 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत 16-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा तसेच 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोन मध्ये रियर ​फिंगर​प्रिंट सेंसर सह पावर बॅकअप साठी 3,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

नोकिया 5.1 कॉपर, टेंपर्ड ब्लू आणि ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये 14,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

नोकिया 2.1
नोकिया 2.1 कंपनी ने सादर केलेल्या सेकेंड जेनेरेशन चा सर्वात स्वस्त फोन आहे. या फोन मध्ये 5.5-इंचाची एचडी स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोन पण एंडरॉयड वन आधारित एंडरॉयड ओरियो वर सादर करण्यात आला आहे. त्याचबरोबर हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 425 चिपसेट वर चालतो. कंपनी ने या फोन मध्ये 1 जीबी रॅम दिला आहे. फोन मधील 8जीबी इंटरनल मेमरी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येईल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता नोकिया 2.1 च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सोबत 8-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी या फोन मध्ये 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. बेसिक कने​क्टिविटी फीचर्स सह नोकिया 2.1 मध्ये पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की हा फोन दोन दिवसांचा बॅटरी बॅकअप देऊ शकतो.

नोकिया 2.1 ब्लू/कॉपर, ग्रे/कॉपर आणि ग्रे/सिल्वर कलर वेरिएंट मध्ये 6,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

नोकिया 3.1
जुलै महिन्यात नोकिया ने भारतात नोकिया 3.1 लॉन्च केला होता. आज या फोन ची पावर वाढवत कंपनी ने फोनचा 3जीबी रॅम वेरिएंट पण बाजारत आणला आहे जो 32जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो. फोन मध्ये 18:9 आस्पेक्ट रेशिया वाला बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे जो ऐज एल्युमीनियम डिजाईन वर बनलेला आहे. फोन मध्ये 2.5डी कर्व्ड ​कोर्निंग गोरिल्ला ग्लास ने प्रोटेक्टेड 5.2-इंचाची एचडी+ स्क्रीन आहे.

नोकिया 3.1 पण एंडरॉयड वन आधारित एंडरॉयड ओरियो वर सादर करण्यात आला आहे जो 1.5गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक 6750 चिपसेट वर चालतो. फोटोग्राफी साठी फोन च्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी हा फोन 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो. नोकिया चा हा फोन एआर अॅप्सला सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअप साठी हा फोन 2,990 एमएएच च्या बॅटरी ला सपोर्ट करतो.

हा फोन ब्लू/कॉपर, ब्लॅक/क्रोम आणि व्हाईट/आयरन कलर वेरिएंट मध्ये 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post नोकिया ने भारतात लॉन्च केले तीन एंडरॉयड फोन, जाणून घ्या प्राईस, स्पेसिफिकेशन आणि फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-1-and-nokia-3-1-and-nokia-2-1-launched-in-india-feature-specifications-price-availability-in-marathi/feed/ 0
नोकिया ने भारतात लॉन्च केला नोकिया 3.1, बघा या स्वस्त फोन चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/nokia-3-1-launch-official-in-india-feature-specification-price-offers-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-3-1-launch-official-in-india-feature-specification-price-offers-in-marathi/#respond Thu, 19 Jul 2018 09:49:05 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1338 नोकिया 3.1 मध्ये शानदार लुक सोबत चांगले स्पेसिफिकेशन्स आहेत.

The post नोकिया ने भारतात लॉन्च केला नोकिया 3.1, बघा या स्वस्त फोन चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकिया ने मे महिन्यात आपल्या बजेट स्मार्टफोन नोकिया 3 ला अजून एडवांस करत फोन चा अपग्रेड मॉडेल नोकिया 3.1 अंर्तराष्ट्रीय मंचावर सादर केला होता. नोकिया ने नोकिया 3.1 सोबत नोकिया 5.1 आणि नोकिया 2.1 पण सादर केले होते. नोकिया 3.1 सादर करताना नोकिया ने दावा केला होता कि हा स्मार्टफोन आपल्या जुन्या वेरिएंट पेक्षा 50 टक्के अधिक फास्ट असेल. आज कंपनी ने हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला आहे.

नोकिया 3.1 मध्ये शानदार लुक सोबत चांगले स्पेसिफिकेशन्स आहेत. फोन मध्ये 18:9 आस्पेक्ट रेशिया वाला बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे जो ऐज एल्युमीनियम डिजाईन वर बनलेला आहे. नोकिया 3.1 5.2-इंचाच्या एचडी+ स्क्रीन सह सादर करण्यात आला आहे तसेच हा स्क्रॅच पासून वाचावा यासाठी 2.5डी कर्व्ड ​कोर्निंग गोरिल्ला ग्लास ने प्रोटेक्ट करण्यात आला आहे.

नोकिया 3.1 एंडरॉयड वन आधारित एंडरॉयड ओरियो सह सादर करण्यात आला आहे जो 1.5गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक 6750 चिपसेट वर चालतो. नोकिया कडून हा फोन 2 वेरिएंट मध्ये सादर करण्यात आला आहे. एक वेरिएंट 2जीबी रॅम सह 16जीबी मेमरी ला सपोर्ट करतो तर दुसर्‍या वेरिएंट मध्ये 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. दोन्ही वेरिएंट ची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 128जीबी पर्यंत वाढवता येईल.

फोटोग्राफी डिपार्टमेंट पाहता नोकिया 3.1 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह आॅटोफोकस टेक्नोलॉजी वाला 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला. तर सेल्फी साठी हा फोन 8-मेगापिक्सल च्या फ्रंट कॅमेरा ला सपोर्ट करतो. फोन मध्ये 3.5एमएम जॅक सोबत बेसिक कनेक्टिविटी फीचर्स पण देण्यात आले आहेत. नोकियाचा हा फोन एआर अॅप्स ला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 2,990 एमएएच ची बॅटरी आहे.

नोकिया 3.1 चा 2जीबी रॅम वेरिएंट भारतात 10,499 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन ब्लू/कॉपर, ब्लॅक/क्रोम आणि व्हाईट/आयरन कलर वेरिएंट मध्ये सादर करण्यात आला आहे जो येत्या 21 जुलै पासून देशात सेल साठी उपलब्ध होईल. पण फोन च्या 3जीबी रॅम वेरिएंट साठी अजूनही काही दिवसांची वाट बघावी लागेल. हा फोन आॅनलाईन प्लॅटफॉर्म पेटीएम आणि आॅफलाईन रिटेल स्टोर्स वरून पण विकत घेता येईल.

वोडाफोन आणि आइडिया कडून नोकिया 3.1 च्या यूजर्सना 149 रुपयांच्या पॅक वर 28 दिवसांसाठी रोज 1जीबी डाटा दिला जाईल. पेटीएम कडून या नवीन स्मार्टफोन च्या खरेदीवर 10 टक्क्यांचा कॅशबॅक दिला जात आहे. त्याचबरोबर पेटीएम आपल्या यूजर्सना 250 रूपयांची दोन फ्री मूवी टिकिटे पण देत आहे. नोकिया 3.1 वर आईसीआईसीआई बँक कार्ड धारकांना 5 टक्क्यांचा कॅशबॅक पण मिळेल.

The post नोकिया ने भारतात लॉन्च केला नोकिया 3.1, बघा या स्वस्त फोन चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-3-1-launch-official-in-india-feature-specification-price-offers-in-marathi/feed/ 0
नोकिया ने आणले तीन नवीन स्मार्टफोन नोकिया 2.1, नोकिया 3.1 आणि नोकिया 5.1, जाणून घ्या या फोन्स बद्दल सर्वकाही https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-1-nokia-3-1-nokia-2-1-launched-specification-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-1-nokia-3-1-nokia-2-1-launched-specification-in-marathi/#respond Wed, 30 May 2018 10:32:51 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=696 कंपनी चा दावा आहे की हे फोन्स जुन्या मॉडेल्स पेक्षा 50 टक्के वेगवान आहेत.

The post नोकिया ने आणले तीन नवीन स्मार्टफोन नोकिया 2.1, नोकिया 3.1 आणि नोकिया 5.1, जाणून घ्या या फोन्स बद्दल सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकिया मोबाइल चे मालकी हक्क असणारी कंपनी एचएमडी ग्लोबल ने काही दिवसांपूर्वी ही माहिती दिली होती की 29 मे ला एक इवेंट करणार आहे. लोकांना वाटत होते की या दिवशी नोकिया द्वारा एक्स सीरीज चा फोन प्रदर्शीत केला जाईल पण कंपनी ने तीन दूसरे डिवाइस लॉन्च केले आहेत जे बजट सेग्मेंट मधील आहेत. कंपनी ने मागच्या वर्षी लॉन्च झालेल्या नोकिया 2, नोकिया 3 आणि नोकिया 5 चे अपग्रेड वर्जन सादर केले आहेत ज्यांना नोकिया 2.1, नोकिया 3.1 आणि नोकिया 5.1 ही नावे देण्यात आली आहेत. कंपनी चा दावा आहे की हे फोन्स जुन्या मॉडेल्स पेक्षा 50 टक्के वेगवान आहेत.

नोकिया 2.1 पाहता या फोन मध्ये 5.5—इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे आणि हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 425 चिपसेट वर चालतो. फोन मध्ये 1जीबी रॅम आणि 8जीबी ची इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. सोबत मेमरी कार्ड सपोर्ट आहे. विशेष म्हणजे हा लेटेस्ट एंडरॉयड वर चालतो. नोकिया 2.1 एंडरॉयड ओरियो वर चालतो आणि याला पुढेही अपडेट मिळतील.

कॅमेरा पाहता नोकिया 2.1 मध्ये 8—मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी कॅमेरा 5—मेगापिक्सल चा आहे. तसेच पावर बॅकअप साठी 4,000 एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. कंपनी चा दावा आहे की हा फोन दोन दिवसांचा बॅटरी बॅकअप देण्यास सक्षम आहे.

आता नोकिया 3.1 वर येऊया. या फोन मध्ये तुम्हाला थोडी छोटी स्क्रीन मिळेल. कंपनी ने याला 5.2—इंचाच्या स्क्रीन सह सादर केले आहे. विशेष म्हणजे कंपनी ने यात बेजल लेस डिस्प्ले दिला आहे. कंपनी ने याला 18:9 आसपेक्ट रेशियो वाल्या स्क्रीन सह सादर केले आहे. तसेच यात 2.5डी कर्व्ड ग्लास चा वापर करण्यात आला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास ने प्रोटेक्टेड आहे.

नोकिया 3.1 मीडियाटेकट 6750 चिपसेट सह सादर केला गेला आहे आणि यात 2जीबी रॅम सह 16जीबी ची इंटरनल मेमरी आहे. तसेच याची एक वेरिएंट 3जीबी रॅम आणि 32जीबी मेमरी सह पण येतो. हा फोन एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.0 ओरियो वर चालतो आणि फोन मध्ये 2,990 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

तिसरा मॉडेल नोकिया 5.1 आहे जो यांमध्ये सर्वात पावरफुल आहे. हा फोन मेटल यूनिबॉडी डिजाइन मध्ये सादर करण्यात आला आहे. कंपनी ने एल्यूमिनियम 6000 सीरीज चा वापर केला आहे जो उत्तम बिल्ट क्वालिटी साठी ओळखला जातो. फोन मध्ये 5.5—इंचाचा आईपीएस डिसप्ले आहे आणि कंपनी ने यात 18:9 आसपेक्ट रेशियो वाली स्क्रीन दिली आहे जी कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 कोटेड आहे. हा फोन मीडियाटेक एमटी6755एस चिपसेट वर चालतो आणि फोन मध्ये 2गीगाहट्र्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे.

फोटोग्राफी साठी नोकिया 5.1 मध्ये 16—मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर 8 मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. हा फोन एंडरॉयड ओरियो वर चालतो आणि फोन मध्ये 3,000 एमएएच ची बॅटरी आहे.

The post नोकिया ने आणले तीन नवीन स्मार्टफोन नोकिया 2.1, नोकिया 3.1 आणि नोकिया 5.1, जाणून घ्या या फोन्स बद्दल सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-1-nokia-3-1-nokia-2-1-launched-specification-in-marathi/feed/ 0