नोकिया ने ​आपल्या या स्मार्टफोन्सच्या किंमती केल्या कमी, 2,000 रुपयांपासून 13,000 रुपयांपर्यंत किंमती झाल्या कमी

नोकिया एंडरॉयड मार्केट मध्ये जरी उशिरा आली असली तरी या ब्रांड प्रति मोबाईल यूजर्सच्या विश्वासामुळे नोकिया स्मार्टफोन थोड्याच कालावधीत हिट झाला आहे. नोकिया ने पण आपल्या यूजर्सची काळजी घेत चांगल्या बजेट मध्ये शानदार फीचर्स आणि दमदार स्पेसिफिकेशन्स असलेले स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. तसेच आता दिवाळीच्या निमित्ताने नोकिया फॅन्सना भेट देत कंपनी ने आपल्या स्मार्टफोन्सच्या किंमती मोठ्याप्रमाणावर कमी केल्या आहेत. नोकिया ने लोकांना आश्चर्यकारक धक्का देत आपल्या स्मार्टफोन्सच्या किंमतींमध्ये 13,000 रुपयांपर्यंतची कपात केली आहे.

नोकिया ने दिवाळीच्या निमित्ताने आपल्या बजेट स्मार्टफोन्स पासून फ्लॅगशिप स्मार्टफोन्स पर्यंतच्या किंमती कमी केल्या आहेत. या प्राइस कट मध्ये स्वस्त तसेच महाग फोन्सचा पण समावेश आहे. सर्वात आधी नोकियाच्या हाईएंड डिवाईस नोकिया 8 सिरोको बद्दल बोलूया तर हा फोन 49,999 रुपयांमध्ये भारतात लॉन्च झाला होता. पण दिवाळीच्या निम्मिताने झालेल्या प्राइस कट नंतर कंपनी या फोन वर थेट 13,000 रुपयांची सूट देत आहे. या मोठ्या प्राइस ड्रॉप नंतर नोकियाचा हा शानदार स्मार्टफोन 36,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

नोकियाच्या मीड रेंज स्मार्टफोन बद्दल बोलायचे तर कंपनी ने नोकिया 6.1 ची किंमत पण कमी केली आहे. इंडियन मार्केट मध्ये नोकिया 6.1 4 जीबी रॅम व 3जीबी रॅम च्या दोन वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. फोनचा 3जीबी वेरिएंट 2,000 रुपयांच्या प्राइस सह विकत घेता येईल. हा फोन आधी 15,499 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध हप्ता आता हा 13,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 17,499 रुपयांचा नोकिया 6.1 चा 4जीबी रॅम वेरिएंट 1,000 रुपयांनी कमी म्हणजे 16,499 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

नोकिया 5.1 कंपनी द्वारा 14,499 रुपयांमध्ये देशात लॉन्च करण्यात आला होता. किंमत कमी करताना कंपनी ने या फोन वर 1,500 रुपयांची सूट दिली आहे ज्यामुळे हा फोन 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 11,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेल्या नोकिया 3.1 पण 1,000 रुपयांच्या कपाती नंतर फक्त 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here