Nokia 3.4 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 10 Feb 2021 12:01:40 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Nokia 5.4 झाला भारतात लाॅन्च, स्पेसिफिकेशन्सच्या जीवावर देईल चीनी ब्रँड्सना टक्कर https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-4-officially-launched-in-india-price-specs-sale/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-4-officially-launched-in-india-price-specs-sale/#respond Wed, 10 Feb 2021 12:01:40 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9971 Nokia 5.4 कंपनीने पंच-होल डिस्प्ले डिजाईनवर लॉन्च केला आहे. फ्रंट पॅनलवर स्क्रीनच्या दोन्ही कडा साईड बेजलला जाऊन मिळतात तसेच खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे त्यावर Nokia ची ब्रँडिंग आहे.

The post Nokia 5.4 झाला भारतात लाॅन्च, स्पेसिफिकेशन्सच्या जीवावर देईल चीनी ब्रँड्सना टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ने आपल्या फॅन्सचा व्हॅलेंटाईन वीक खास बनवला आहे. कंपनीने मोबाईल युजर्सना भेट देत एकसाथ दोन नवीन मोबाईल फोन भारतात लाॅन्च केले आहेत ज्यांनी Nokia 3.4 आणि Nokia 5.4 नावाने भारतीय बाजारात एंट्री घेतली आहे. नोकिया ब्रँडचे मालकी हक्क असणाऱ्या टेक कंपनी एचएमडी ग्लोबलने हे दोन्ही स्मार्टफोन लो बजेट सेग्मेंट मध्ये सादर केले आहेत, यातील Nokia 5.4 ची किंमत 13,999 रुपयांपासून सुरु होत आहे तर Nokia 3.4 11,999 रुपयांमध्ये लाॅन्च केला आहे.

वेरिएंट व प्राइस

Nokia 5.4 भारतात दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लाॅन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. नोकिया 5.4 चा 4 जीबी + 64 जीबी वेरिएंट 13,999 रुपये तर 6 जीबी + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 15,499 रुपयांमध्ये बाजारात आला आहे जो Dusk आणि Polar Night कलर मध्ये 17 फेब्रुवारीपासून विक्रीसाठी उपलब्ब्ध होईल.

लुक व डिजाईन

Nokia 5.4 कंपनीने पंच-होल डिस्प्ले डिजाईनवर लॉन्च केला आहे. फ्रंट पॅनलवर स्क्रीनच्या दोन्ही कडा साईड बेजलला जाऊन मिळतात तसेच खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे त्यावर Nokia ची ब्रँडिंग आहे. डिस्प्लेच्या वर डावीकडे सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल आहे. फोनच्या बॅक पॅनलवर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो एका रिंग मध्ये आहे. या सेटअपच्या डावीकडे फ्लॅश लाईट आहे तसेच खालच्या बाजूला फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. बॅक पॅनलवर पण वर्टिकल शेप मध्ये ब्रँडचे नाव लिहिण्यात आले आहे.

फीचर व स्पेसिफिकेशन्स

Nokia 5.4 कंपनीने 6.39 इंचाच्या आयपीएस एलसीडी पंच-होल डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे जो एचडीप्लस रेज्ल्यूशनला सपोर्ट करतो. एचएमडी ग्लोबलने आपला हा नवीन स्मार्टफोन अँड्रॉइड 10 च्या स्टॉक वर्जनवर लॉन्च केला आहे जो लवकरच अँड्रॉइड 11 ओएसवर अपडेट होईल. तसेच प्रोसेसिंगसाठी नोकिया 5.4 मध्ये आक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Xiaomi आणि Realme ला टक्कर देण्यास आला Nokia 3.4 स्मार्टफोन, 11999 रुपयांमध्ये झाला लाॅन्च

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता नोकिया 5.4 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Nokia 5.4 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी नोकिया 5.4 मध्ये 10वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

The post Nokia 5.4 झाला भारतात लाॅन्च, स्पेसिफिकेशन्सच्या जीवावर देईल चीनी ब्रँड्सना टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-4-officially-launched-in-india-price-specs-sale/feed/ 0
Xiaomi आणि Realme ला टक्कर देण्यास आला Nokia 3.4 स्मार्टफोन, 11999 रुपयांमध्ये झाला लाॅन्च https://www.91mobiles.com/marathi/nokia-3-4-launched-in-india-price-specs-feature-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-3-4-launched-in-india-price-specs-feature-sale-offer/#respond Wed, 10 Feb 2021 11:49:57 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9969 नोकिया 3.4 अँड्रॉइड 11 रेडी अँड्रॉइड 10 वर लॉन्च झाला आहे. भारतीय बाजारात हा फोन 4 जीबी रॅमवर आला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

The post Xiaomi आणि Realme ला टक्कर देण्यास आला Nokia 3.4 स्मार्टफोन, 11999 रुपयांमध्ये झाला लाॅन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ने इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये आपला डाव टाकत दोन नवीन स्मार्टफोन Nokia 3.4 आणि Nokia 5.4 लाॅन्च केले आहेत. आकर्षक लुक आणि शानदार स्पेसिफिकेशन्स असलेल्या या दोन्ही मोबाईल फोन्सने लो बजेट सेग्मेंट मध्ये एंट्री घेतली आहे जिथे हा Xiaomi आणि Realme सारख्या चीनी कंपन्यांना चांगले आव्हान देईल. चला जाणून घेऊया Nokia 3.4 ची संपूर्ण माहिती.

लुक व डिजाईन

Nokia 3.4 बद्दल असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही कि या फोनच्या माध्यमातून कंपनीने कमी किंमतीत प्रीमियम लुक असलेला डिवायस लॉन्च केला आहे. नोकियाचा हा नवीन स्मार्टफोन पंच-होल डिस्प्ले डिजाईनवर सादर झाला आहे. फ्रंट पॅनलवर स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला चिन पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वर डावीकडे सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल देण्यात आला आहे.

नोकिया 3.4 च्या बॅक पॅनलवर एक राउंड सर्कल शेप आहे आणि यात फोनचे तीन कॅमेरा सेंसर आणि एक रियर कॅमेरा सेटअप आहे. हे चारही आब्जेक्ट रिंगवरच आहेत आणि तसेच याच्या मधील भाग खाली आहे. कॅमेरा सेटअपच्या खाली फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. फोनच्या साईड पॅनलवर पावर बटन आणि वॉल्यूम रॉकर सोबतच गुगल असिस्टंट शार्टकट बटन पण देण्यात आला आहे.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Nokia 3.4 कंपनीने 19.5:9 आस्पेक्ट रेशियोवर सादर केला आहे जो 720 x 1560 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.39 इंचाच्या एचडी+ पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. नोकिया 3.4 ची हि स्क्रीन 400nits ब्राइटनेसवर विजुअल क्वॉलिटी देते. नोकिया 3.4 चे डायमेंशन 160.97×75.99×8.7एमएम आणि वजन 180 ग्राम आहे. हा फोन Charcoal, Dusk, आणि Fjord कलर मध्ये लाॅन्च केला गेला आहे.

हे देखील वाचा : Nokia घेऊन येत आहे लो बजेट असलेला नवीन फ्लिप फोन Nokia 2720, चीनी कंपन्यांची करेल का सुट्टी?

नोकिया 3.4 अँड्रॉइड 11 रेडी अँड्रॉइड 10 वर लॉन्च झाला आहे. भारतीय बाजारात हा फोन 4 जीबी रॅमवर आला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 512 जीबीपर्यंत वाढवता येईल. तसेच प्रोसेसिंगसाठी नोकिया 3.4 मध्ये 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टा-कोर प्रोसेसरसह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 460 चिपसेट देण्यात आला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Nokia 3.4 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच नोकियाच्या या फोन मध्ये 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 5 मेगापिक्सलचा यूडब्ल्यू सेंसर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी नोकिया 3.4 स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : Nokia ने केला खुलासा, घेऊन येत आहे अफॉर्डेबल 5G स्मार्टफोन, भारताचे महत्व केले अधोरेखित

Nokia 3.4 रियल डुअल सिम फोन आहे ज्यात दोन सिम आणि एक मेमरी कार्ड एकसाथ वापरता येतात. 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी नोकिया 3.4 मध्ये 4,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 20 फेब्रुवारीपासून 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post Xiaomi आणि Realme ला टक्कर देण्यास आला Nokia 3.4 स्मार्टफोन, 11999 रुपयांमध्ये झाला लाॅन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-3-4-launched-in-india-price-specs-feature-sale-offer/feed/ 0
Nokia 5.4 होणार आहे भारतात लॉन्च, फ्लिपकार्टवर झाला लिस्ट, असे असतील स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-4-listed-on-flipkart-product-page-live-india-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-4-listed-on-flipkart-product-page-live-india-launch-soon/#respond Mon, 08 Feb 2021 11:33:30 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9926 नोकिया 5.4 बद्दल काही दिवसांपूर्वी आलेल्या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि येत्या 10 फेब्रुवारीला नोकिया 5.4 स्मार्टफोन भारतात लॉन्च केला जाऊ शकतो.

The post Nokia 5.4 होणार आहे भारतात लॉन्च, फ्लिपकार्टवर झाला लिस्ट, असे असतील स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ने गेल्या आठवड्यातच सांगितले होते कि कंपनी भारतात आपला नवीन स्मार्टफोन Nokia 3.4 घेऊन येण्याची तयारी करत आहे. नोकियाने हा फोन प्रोडक्ट पेज पण कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर लाईव केला होता जिथे नोकिया 3.4 फुल स्पेसिफिकेशन्ससह लिस्ट आहे. तसेच आता नोकियाने आपला अजून एक नवीन फोन Nokia 5.4 च्या भारतीय लॉन्चची घोषणा केली आहे. कंपनीने सांगितले आहे कि नोकिया 5.4 पण लवकरच भारतीय बाजारात लॉन्च होणार आणि शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर या फोनचे प्रोडक्ट पेज पण लाईव करण्यात आले आहे.

Nokia 5.4 चे प्रोडक्ट पेज शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर लाईव झाले आहे जिथे ‘कमिंग सून’ लिहिण्यात आले आहे. प्रोडक्ट पेजवर फोनच्या फोटोज आणि व्हिडीओजचा वापर केला गेला आहे आणि त्यांच्यामाध्यमातून फोन टीज केला गेला आहे. या पेजवर फोनच्या लॉन्च डेटची माहिती देण्यात आली नाही, पण आशा आहे कि येत्या काही दिवसांत Nokia 5.4 च्या भारतीय लॉन्चच्या तारखेची घोषणा पण करण्यात येईल. तसेच फ्लिपकार्ट लिस्टिंगवरून पण स्पष्ट झाले आहे कि नोकिया 5.4 या ई-कॉमर्स साइटवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Nokia 5.4

नोकिया 5.4 बद्दल काही दिवसांपूर्वी आलेल्या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि येत्या 10 फेब्रुवारीला नोकिया 5.4 स्मार्टफोन भारतात लॉन्च केला जाऊ शकतो. तर दुसऱ्या कंपनी द्वारे Nokia 3.4 स्मार्टफोन पण टीज केला जात आहे पण या फोनची लॉन्च डेट आतापर्यंत घोषित झाली नाही. अंदाज लावला जात आहे कि 10 फेब्रुवारीला नोकिया 5.4 सह नोकिया 3.4 पण लॉन्च केला जाऊ शकतो. त्यामुळे एचएमडी ग्लोबलद्वारे Nokia 5.4 आणि Nokia 3.4 च्या भारतीय लॉन्चची तारीख जाहीर करण्याची वाट बघितली जात आहे.

Nokia 5.4

नोकिया 5.4 ग्लोबल मार्केट 6.39 इंचाच्या एचडीप्लस आयपीएस एलसीडी पंच-होल डिस्प्लेसह लॉन्च केला गेला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड स्टॉक वर्जनसह लॉन्च झाला आहे जो आक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेटवर चालतो. आंतरराष्ट्रीय बाजारात हा फोन 4 जीबी रॅम आणि 6 जीबी रॅमसह लॉन्च झाला आहे.

फोटोग्राफीसाठी हा फोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Nokia 5.4 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 10वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 4,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

The post Nokia 5.4 होणार आहे भारतात लॉन्च, फ्लिपकार्टवर झाला लिस्ट, असे असतील स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-4-listed-on-flipkart-product-page-live-india-launch-soon/feed/ 0
Nokia 5.4 स्मार्टफोन 10 फेब्रुवारीला होईल भारतात लॉन्च, Nokia 3.4 ची पण होईल सोबत एंट्री https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-4-might-launch-in-india-on-10-february-with-nokia-3-dot-4-smartphone/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-4-might-launch-in-india-on-10-february-with-nokia-3-dot-4-smartphone/#respond Thu, 04 Feb 2021 13:29:30 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9900 Nokia 5.4 कंपनीने 6.39 इंचाच्या आयपीएस एलसीडी पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे जो एचडीप्लस रेज्ल्यूशनला सपोर्ट करतो.

The post Nokia 5.4 स्मार्टफोन 10 फेब्रुवारीला होईल भारतात लॉन्च, Nokia 3.4 ची पण होईल सोबत एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia इंडियाने कालच अधिकृतपणे माहिती दिली आहे कि कंपनी भारतात आपला नवीन स्मार्टफोन Nokia 3.4 लॉन्च करणार आहे. कंपनीने फोनचा लॉन्च टीज करत ‘कमिंग सून’ लिहले आहे. तर आज नोकिया संबंधित अजून एक मोठी बातमी समोर आली आहे ज्यात सांगण्यात आले आहे कि कंपनी Nokia 5.4 स्मार्टफोनच्या लॉन्चची पण तयारी करत आहे आणि येत्या 10 फेब्रुवारीला नोकिया 5.4 स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केला जाईल. त्यामुळे बोलले जात आहे कि Nokia 5.4 आणि Nokia 3.4 दोन्ही फोन 10 फेब्रुवारीला भारतात लॉन्च होतील.

Nokia 5.4 च्या भारतातील लॉन्चची माहिती गिजमोचायना वेबसाइटने दिली आहे. या वेबसाइटने आपल्या रिपोर्ट मध्ये सूत्रांच्या हवाल्याने बातमी देत सांगितले आहे कि येत्या 10 फेब्रुवारीला नोकिया 5.4 स्मार्टफोन भारतात लॉन्च केला जाईल म्हणजे कंपनी आज किंवा उद्या या फोनचा लॉन्च टीज करू शकते. तर दुसरीकडे रिपोर्ट मध्ये अंदाज वर्तवला जात आहे कि 10 फेब्रुवारीला नोकिया 5.4 सह Nokia 3.4 पण लॉन्च केला जाऊ शकतो. लक्षात असू द्या कि नोकिया 5.4 स्मार्टफोन डिसेंबर मध्ये यूरोपियन मार्केट मध्ये लॉन्च केला गेला आहे.

Nokia 5.4

Nokia 5.4 कंपनीने 6.39 इंचाच्या आयपीएस एलसीडी पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे जो एचडीप्लस रेज्ल्यूशनला सपोर्ट करतो. एचएमडी ग्लोबलने आपला हा नवीन स्मार्टफोन अँड्रॉइड 10 च्या स्टॉक वर्जन वर लॉन्च केला आहे जो लवकरच अँड्रॉइड 11 ओएस वर अपडेट होईल. प्रोसेसिंगसाठी नोकिया 5.4 मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : बजेट कॅटेगरी मधील Nokia 3.4 येत आहे भारतात, कंपनीने केला टीज

एचएमडी ग्लोबलने आंतरराष्ट्रीय बाजारात आपला फोन तीन वेरिएंट्स मध्ये सादर केला आहे ज्याचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज तसेच तिसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. ग्लोबल मार्केट मध्ये हा फोन Polar Night आणि Dusk कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता नोकिया 5.4 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्यासोबत 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : Nokia घेऊन येत आहे लो बजेट असलेला नवीन फ्लिप फोन Nokia 2720, चीनी कंपन्यांची करेल का सुट्टी?

Nokia 5.4 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी नोकिया 5.4 मध्ये 10वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 4,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

The post Nokia 5.4 स्मार्टफोन 10 फेब्रुवारीला होईल भारतात लॉन्च, Nokia 3.4 ची पण होईल सोबत एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-4-might-launch-in-india-on-10-february-with-nokia-3-dot-4-smartphone/feed/ 0
बजेट कॅटेगरी मधील Nokia 3.4 येत आहे भारतात, कंपनीने केला टीज https://www.91mobiles.com/marathi/nokia-3-4-india-launch-officially-teased/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-3-4-india-launch-officially-teased/#respond Wed, 03 Feb 2021 13:19:34 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9879 डिसेंबर मध्ये समोर आलेल्या एका रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि भारतात नोकिया 3.4 ची किंमत 11,999 रुपयांपासून सुरु होईल.

The post बजेट कॅटेगरी मधील Nokia 3.4 येत आहे भारतात, कंपनीने केला टीज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ने गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये ग्लोबल मार्केट मध्ये आपले दोन कमी किंमत असलेले स्वस्त स्मार्टफोन Nokia 3.4 आणि Nokia 2.4 सादर केले होते. या दोन्ही पैकी नोकिया 2.4 कंपनीने भारतात लॉन्च केला आहे. तर, आता कंपनीने अधिकृतपणे Nokia 3.4 चा इंडिया लॉन्च टीज करायला सुरवात केली आहे. आता कंपनीने या फोनच्या लॉन्च डेटबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. पण टीज केल्यामुळे अंदाज लावला जात आहे कि कंपनी पुढल्या महिन्यात हा फोन भारतीय बाजारात सादर करेल.

भारतात असेल हि किंमत

गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये समोर आलेल्या एका रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि भारतात नोकिया 3.4 ची किंमत 11,999 रुपयांपासून सुरु होईल. हि किंमत फोनच्या 3जीबी रॅम बेस मॉडेलची असेल. कंपनी फोन एकापेक्षा जास्त कॉन्फिगरेशन मध्ये लॉन्च करेल कि नाही हे अजून स्पष्ट झाले नाही.

हे देखील वाचा : Exclusive: लो बजेट OPPO A15s झाला अजून ताकदवान, कंपनीने लॉन्च केला 128GB स्टोरेज वेरिएंट

Nokia 3.4 चे स्पेसिफिकेशन्स

Nokia 3.4 कंपनीने 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 720 x 1560 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.39 इंचाच्या एचडी+ पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. नोकिया 3.4 ची हि स्क्रीन 400nits ब्राइटनेस वर विजुअल क्वॉलिटी देते. कंपनीने हा फोन अँड्रॉइड 10 वर लॉन्च केला आहे जो अँड्रॉइड 11 रेडी आहे. हा नवीन ओएस मार्केट मध्ये येताच नोकिया 3.4 अँड्रॉइड 11 वर अपडेट होईल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Nokia 3.4 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर नोकियाच्या या फोन मध्ये 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 5 मेगापिक्सलचा यूडब्ल्यू सेंसर आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी नोकिया 3.4 स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : iPhone सारख्या कॅमेऱ्यासह येत आहे OPPO Find X3 Pro, लॉन्चच्या आधी लीक झाली महत्वाची माहिती

Nokia 3.4 रियल डुअल सिम फोन आहे ज्यात दोन सिम आणि एक मेमरी कार्ड एकसाथ वापरता येतात. 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी नोकिया 3.4 मध्ये 4,000एमएएच ची बड़ी बॅटरी देण्यात आली आहे.

The post बजेट कॅटेगरी मधील Nokia 3.4 येत आहे भारतात, कंपनीने केला टीज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-3-4-india-launch-officially-teased/feed/ 0
स्वस्त Nokia 3.4 भारतात या महिन्यात होऊ शकतो लॉन्च, देईल का चीनी कंपन्यांना आव्हान? https://www.91mobiles.com/marathi/nokia-3-4-launching-in-india-in-mid-december-know-price-specification/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-3-4-launching-in-india-in-mid-december-know-price-specification/#respond Mon, 07 Dec 2020 14:02:53 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9200 Nokia 3.4 रियल डुअल सिम फोन आहे ज्यात दोन सिम आणि एक मेमरी कार्ड एकसाथ वापरता येतात.

The post स्वस्त Nokia 3.4 भारतात या महिन्यात होऊ शकतो लॉन्च, देईल का चीनी कंपन्यांना आव्हान? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ने सप्टेंबर मध्ये इंटरनेशनल मार्केट मध्ये आपले दोन स्वस्त स्मार्टफोन Nokia 3.4 आणि Nokia 2.4 सादर केले होते. यातील नोकिया 2.4 कंपनीने भारतात लॉन्च केला आहे. तसेच, आता बातमी समोर आली आहे कि HMD Global लवकरच भारतात आपला नवीन बजेट स्मार्टफोन Nokia 3.4 लॉन्च करण्याची प्लानिंग करत आहे. मिड-डिसेंबर मध्ये हा हँडसेट देशात सादर केला जाऊ शकतो, ज्याची माहिती एक मीडिया रिपोर्ट मध्ये समोर आली आहे.

नोकिया 3.4 फोन अँड्रॉइड 11 अपडेट आणि शानदार स्पेसिफिकेशन्स सह मार्केट मध्ये आला होता. हा फोन अंतर्राष्ट्रीय लॉन्च नंतर नोकियाच्या इंडियन वेबसाइट वर लिस्ट करण्यात आला होता. अनेक दिवस वेबसाइट वर राहिल्यानंतर आता असे वाटत आहे लवकरच हा फोन भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

Nokia 3.4 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Nokia 3.4 कंपनीने 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 720 x 1560 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.39 इंचाच्या एचडी+ पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. नोकिया 3.4 ची हि स्क्रीन 400nits ब्राइटनेस वर विजुअल क्वॉलिटी देते. कंपनीने हा फोन अँड्रॉइड 10 वर लॉन्च केला आहे जो अँड्रॉइड 11 रेडी आहे. हा नवीन ओएस मार्केट मध्ये येताच नोकिया 3.4 अँड्रॉइड 11 वर अपडेट होईल.

नोकिया 3.4 मध्ये प्रोसेसिंगसाठी 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 460 चिपसेट देण्यात आला आहे. अंर्तराष्ट्रीय बाजारात हा फोन तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे ज्यात सर्वात छोटा मॉडेल 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. तसेच नोकिया 3.4 च्या दुसऱ्या वेरिएंट मध्ये 3 जीबी रॅम सह 64 जीबी मेमरी आणि तिसऱ्या वेरिंएट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. तिन्ही वेरिएंट्स मध्ये मेमरी कार्डच्या माध्यमातून 512 जीबी पर्यंत वाढवता येईल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Nokia 3.4 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर नोकियाच्या या फोन मध्ये 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 5 मेगापिक्सलचा यूडब्ल्यू सेंसर आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी नोकिया 3.4 स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Nokia 3.4 रियल डुअल सिम फोन आहे ज्यात दोन सिम आणि एक मेमरी कार्ड एकसाथ वापरता येतात. 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी नोकिया 3.4 मध्ये 4,000एमएएच ची बड़ी बॅटरी देण्यात आली आहे. Nokia 3.4 ची बेस किंमत 159 यूरो म्हणजे 13,500 रुपयांच्या आसपास आहे जो Dusk, Fjord आणि Charcoal कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

The post स्वस्त Nokia 3.4 भारतात या महिन्यात होऊ शकतो लॉन्च, देईल का चीनी कंपन्यांना आव्हान? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-3-4-launching-in-india-in-mid-december-know-price-specification/feed/ 0
Nokia ने कंबर बांधली, नोव्हेंबर मध्ये लॉन्च होतील पावरफुल Nokia 9.3 PureView, Nokia 7.3 5G आणि Nokia 6.3 https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-3-pureview-7-3-5g-and-6-3-to-launch-in-november/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-3-pureview-7-3-5g-and-6-3-to-launch-in-november/#respond Mon, 28 Sep 2020 14:58:02 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8338 Nokia 9.3 PureView, Nokia 7.3 5G आणि Nokia 6.3 टेस्टिंगच्या शेवटच्या स्टेज वर पोहचले आहेत आणि ऑक्टोबरच्या सुरवातीला म्हणजे पुढल्या आठवड्यात यांचे प्रोडक्शन सुरु होऊ शतके.

The post Nokia ने कंबर बांधली, नोव्हेंबर मध्ये लॉन्च होतील पावरफुल Nokia 9.3 PureView, Nokia 7.3 5G आणि Nokia 6.3 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साल 2020 शेवटला येत असताना टेक कंपनी Nokia ची मूवमेंट पण टेक मार्केट मध्ये वाढताना दिसत आहे. गेल्या आठवड्यातच Nokia 8.3 5G ग्लोबल मार्केट मध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यासोबतच कंपनीने Nokia 3.4 आणि Nokia 2.4 अंर्तराष्ट्रीय बाजारात आणला होता जो इंडियन वेबसाइट वर पण लिस्ट झाला आहे. तसेच आता बातमी आली आहे कि कंपनी लवकरच Nokia 9.3 PureView, Nokia 7.3 5G आणि Nokia 6.3 स्मार्टफोन पण बाजारात घेऊन येणार आहे.

Nokia संबंधित मोठी बातमी समोर आली आहे कि कंपनी आपले तीन नवीन स्मार्टफोन मार्केट मध्ये आणण्याची तयारी करत आहे जे Nokia 9.3 PureView, Nokia 7.3 5G आणि Nokia 6.3 नावाने लॉन्च केला जाईल. एनपीयूने सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर सांगितले आहे कि HMD Global नोव्हेंबर मध्ये एक मोठ्या ईवेंटचे आयोजन करण्याचे प्लानिंग करत आहे आणि या ईवेंटच्या मंचावरून Nokia 9.3 PureView आणि Nokia 7.3 5G सारखे मोठे फोन लॉच केले जातील.

रिपोर्टनुसार नोकियाचे तीन नवीन स्मार्टफोन Nokia 9.3 PureView, Nokia 7.3 5G आणि Nokia 6.3 टेस्टिंगच्या शेवटच्या स्टेज वर पोहचले आहेत आणि ऑक्टोबरच्या सुरवातीला म्हणजे पुढल्या आठवड्यात यांचे प्रोडक्शन सुरु होऊ शतके. रिपोर्ट मध्ये असे पण सांगण्यात आले आहे कि कोरोना वायरस किंवा इतर कोणतीही अडचण आली नाही तर Nokia आपले हे तिन्ही स्मार्टफोन्स यावर्षी म्हणजे नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये जरूर लॉन्च करेल.

भारतात येत आहेत नवीन नोकिया फोन

गेल्या आठवड्यात अजून एक मीडिया रिपोर्ट समोर आला होता ज्यात सांगण्यात आले होते कि रिपोर्टनुसार Nokia 3.4 आणि Nokia 2.4 स्मार्टफोन पुढल्या किंवा त्यानंतर काही दिवसांनंतर ऑक्टोबरच्या सुरवातीलाच भारतात लॉन्च केले जातील. हे दोन्ही फोन्स मार्केट मध्ये आल्यानंतर कंपनी आपला हाईएंड डिवाईस Nokia 8.3 5G पण इंडियन मार्केट मध्ये आणू शकते. विशेष म्हणजे हा भारतात लॉन्च होणारा नोकियाचा पहिला 5जी फोन असेल. नोकिया 3.4, नोकिया 2.4 आणि नोकिया 8.3 5जी च्या लॉन्च डेट बाबत निश्चित काही सांगता येणार नाही.

Nokia 3.4

Nokia 3.4 कंपनीने 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 720 x 1560 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.39 इंचाच्या एचडी+ पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन अँड्रॉइड 10 वर लॉन्च केला आहे जो अँड्रॉइड 11 रेडी आहे. नोकिया 3.4 मध्ये प्रोसेसिंगसाठी 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 460 चिपसेट देण्यात आला आहे. अंर्तराष्ट्रीय बाजारात हा फोन 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज, 3 जीबी रॅम + 64 जीबी मेमरी आणि 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेजच्या तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे, ज्याची बेस किंमत 159 यूरो म्हणजे 13,500 रुपयांच्या जवळपास आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Nokia 3.4 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर नोकियाच्या या फोन मध्ये 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 5 मेगापिक्सलचा यूडब्ल्यू सेंसर आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी नोकिया 3.4 स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Nokia 3.4 मध्ये सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन पावर बॅकअपसाठी 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. हा फोन Dusk, Fjord आणि Charcoal कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

Nokia 2.4

नोकिया 2.4 मध्ये 20:9 आस्पेक्ट रेशियो असलेला 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. अँड्रॉइड 10 ओएस सह हा फोन मीडियाटेक हीलियो पी22 चिपसेट वर चालतो. अंर्तराष्ट्रीय मार्केट मध्ये हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे. नोकिया 2.4 चा बेस वेरिएंट 2 जीबी रॅम सह 32 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच दुसऱ्या वेरिएंट मध्ये 3 जीबी रॅम सह 64 जीबी ची मेमरी देण्यात आली आहे. Nokia 2.4 ची बेस किंमत 119 यूरो म्हणजे 10,000 रुपयांच्या असपास आहे.

फोटोग्राफीसाठी नोकिया 2.4 च्या बॅक पॅनल वर एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे तसेच सेल्फीसाठी हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. डुअल सिम, 3.5एमएम जॅक, एनएफसी व 4जी वोएलटीई सोबतच सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 4,500एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. हा फोन पण Dusk, Fjord आणि Charcoal कलर मध्ये लॉन्च झाला आहे.

The post Nokia ने कंबर बांधली, नोव्हेंबर मध्ये लॉन्च होतील पावरफुल Nokia 9.3 PureView, Nokia 7.3 5G आणि Nokia 6.3 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-3-pureview-7-3-5g-and-6-3-to-launch-in-november/feed/ 0
Nokia ने लॉन्च केला शानदार स्वस्त स्मार्टफोन Nokia 2.4, चीनी कंपन्यांना देईल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/nokia-2-4-launched-in-low-budget-feature-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-2-4-launched-in-low-budget-feature-specs-price-sale/#respond Wed, 23 Sep 2020 14:28:15 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8277 Nokia 2.4 कंपनीने अँड्रॉइड 10 ओएस वर सादर केला आहे जो अँड्रॉइड 11 रेडी आहे.

The post Nokia ने लॉन्च केला शानदार स्वस्त स्मार्टफोन Nokia 2.4, चीनी कंपन्यांना देईल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ने आज टेक मार्केट मध्ये आपली दावेदारी सादर करत एक साथ अनेक नवीन स्मार्ट प्रोडक्ट बाजारात आणले आहेत. कंपनीने Nokia 8.3 ग्लोबल मार्केट मध्ये उपलब्ध केला आहे सोबतच Nokia 3.4 आणि Nokia 2.4 टेक मंचावर लॉन्च करण्यात आले आहेत. हे दोन्ही मोबाईल कमी किंमतीत सादर करण्यात आले आहेत. नोकिया 2.4 पाहता हा फोन मोठी बॅटरी आणि लेटेस्ट अँड्रॉइड 11 च्या अपेडट सह बाजारात आला आहे.

Nokia 2.4

नोकिया 2.4 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन को 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट आहे. या भागावर Nokia ची ब्रँडिंग आहे. स्क्रीनच्या वरच्या बाजूला वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे.

Nokia 2.4 कंपनीने अँड्रॉइड 10 ओएस वर सादर केला आहे जो अँड्रॉइड 11 रेडी आहे. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर मीडियाटेक हीलियो पी22 चिपसेट देण्यात आला आहे. अंर्तराष्ट्रीय मार्केट मध्ये हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे. नोकिया 2.4 चा बेस वेरिएंट 2 जीबी रॅम सह 32 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 3 जीबी रॅम सह 64 जीबी मेमरी देण्यात आली आहे. हे दोन्ही वेरिएंट 512 जीबी पर्यंतच्या माइक्रोएसडी कार्डला सपोर्ट करतात.

फोटोग्राफीसाठी नोकिया 2.4 च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो मधोमध शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये फ्लॅश लाईट सह एफ/2.2 अपर्चर असलेली 13 मेगापिक्सलची प्राइमरी 5पी लेंस देण्यात आली आहे त्यासोबतच 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या 3पी फ्रंट लेंसला सपोर्ट करतो.

फोटो मध्ये नोकिया 2.4 चा रियर पॅनल वर थोडा रग्ड वाटत आहे जो कदाचित ऑरा डिजाईन वर बनलेला असू शकतो. रियर कॅमेरा सेटअपच्या खाली फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. Nokia 2.3 मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर नव्हता, तो फोन फक्त फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करत होता. फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आला आहे तसेच डाव्या पॅनल वर अजून एक बटन आहे. आशा आहे कि हा गूगल असिस्टेंट बटन असू शकतो.

Nokia 2.4 रियर डुअल सिम फोन आहे ज्यात दोन नॅनो सिम आणि एक माइक्रोएसडी कार्ड एकसाथ वापरता येतो. हा फोन 3.5एमएम जॅक, एनएफसी व अन्य बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. कंपनीने या फोन मध्ये गूगल असिस्टेंट का शार्टकट बटन पण देण्यात आला आहे.

सिक्योरिटीसाठी Nokia 2.4 च्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी नोकिया 2.4 कंपनीने 4,500एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह बाजारात आला आहे. हा फोन ओटीजी फीचर सह येतो ज्यामुळे रिवर्स चार्ज पण करता येते. Nokia 2.4 ची बेस किंमत 119 यूरो म्हणजे 10,000 रुपयांच्या आसपास आहे जो Dusk, Fjord आणि Charcoal कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

The post Nokia ने लॉन्च केला शानदार स्वस्त स्मार्टफोन Nokia 2.4, चीनी कंपन्यांना देईल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-2-4-launched-in-low-budget-feature-specs-price-sale/feed/ 0
अँड्रॉइड 11 सह Nokia 3.4 लॉन्च, यात आहे 4जीबी रॅम, 4000एमएएच बॅटरी आणि 6.39 इंचाचा पंच-होल डिस्प्ले https://www.91mobiles.com/marathi/nokia-3-4-officially-launched-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-3-4-officially-launched-specs-price-sale/#respond Wed, 23 Sep 2020 14:04:32 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8274 Nokia 3.4 रियल डुअल सिम फोन आहे ज्यात दोन सिम आणि एक मेमरी कार्ड एकसाथ वापरता येतात.

The post अँड्रॉइड 11 सह Nokia 3.4 लॉन्च, यात आहे 4जीबी रॅम, 4000एमएएच बॅटरी आणि 6.39 इंचाचा पंच-होल डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ब्रँडचे मालकी हक्क असणारी टेक कंपनी HMD Global ने आज टेक मार्केट मध्ये ताकदीचे प्रदर्शन करत अनेक नवीन नोकिया प्रोडक्ट्स व डिवाईस लॉन्च केले आहेत. एकीकडे कंपनीने नोकियाचा पावरफुल फ्लॅगशिप फोन Nokia 8.3 ग्लोबल मार्केट मध्ये विक्रीसाठी सादर केला आहे. तर सोबतच Nokia 3.4 आणि Nokia 2.4 सारखे नवीन आणि शानदार स्मार्टफोन्स पण टेक मंचावर सादर केले आहेत. इथे आपण नवीन Nokia 3.4 स्मार्टफोन बद्दल जाणून घेऊया.

लुक व डिजाईन

Nokia 3.4 बद्दल असे बोलणे चुकीचे ठरणार नाही या फोनच्या माध्यमातून कंपनीने कमी किंमतीत प्रीमियम लुक असलेला डिवाईस लॉन्च केला आहे. नोकियाचा हा नवीन स्मार्टफोन पंच-होल डिस्प्ले डिजाईन वर सादर झाला आहे. फ्रंट पॅनल वर स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला चिन पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला डावीकडे सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल देण्यात आला आहे.

नोकिया 3.4 च्या मागे एका वर्तुळाकारात तीन कॅमेरा सेंसर आणि एक रियर कॅमेरा सेटअप आहे. या चारही गोष्टी रिंग वरच आहेत आणि मधला भाग रिकामा आहे. कॅमेरा सेटअपच्या खाली फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. फोनच्या साईड पॅनल वर पावर बटन आणि वॉल्यूम रॉकर सोबतच गूगल असिस्टेंट शार्टकट बटन पण देण्यात आला आहे.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Nokia 3.4 कंपनीने 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 720 x 1560 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.39 इंचाच्या एचडी+ पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. नोकिया 3.4 ची हि स्क्रीन 400nits ब्राइटनेस वर विजुअल क्वॉलिटी देते. कंपनीने हा फोन अँड्रॉइड 10 वर लॉन्च केला आहे जो अँड्रॉइड 11 रेडी आहे. हा नवीन ओएस मार्केट मध्ये येताच नोकिया 3.4 अँड्रॉइड 11 वर अपडेट होईल.

नोकिया 3.4 मध्ये प्रोसेसिंगसाठी 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 460 चिपसेट देण्यात आला आहे. अंर्तराष्ट्रीय बाजारात हा फोन तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे ज्यात सर्वात छोटा मॉडेल 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. तसेच नोकिया 3.4 च्या दुसऱ्या वेरिएंट मध्ये 3 जीबी रॅम सह 64 जीबी मेमरी आणि तिसऱ्या वेरिंएट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. तिन्ही वेरिएंट्स मध्ये मेमरी कार्डच्या माध्यमातून 512 जीबी पर्यंत वाढवता येईल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Nokia 3.4 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर नोकियाच्या या फोन मध्ये 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 5 मेगापिक्सलचा यूडब्ल्यू सेंसर आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी नोकिया 3.4 स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Nokia 3.4 रियल डुअल सिम फोन आहे ज्यात दोन सिम आणि एक मेमरी कार्ड एकसाथ वापरता येतात. 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी नोकिया 3.4 मध्ये 4,000एमएएच ची बड़ी बॅटरी देण्यात आली आहे. Nokia 3.4 ची बेस किंमत 159 यूरो म्हणजे 13,500 रुपयांच्या आसपास आहे जो Dusk, Fjord आणि Charcoal कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

The post अँड्रॉइड 11 सह Nokia 3.4 लॉन्च, यात आहे 4जीबी रॅम, 4000एमएएच बॅटरी आणि 6.39 इंचाचा पंच-होल डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-3-4-officially-launched-specs-price-sale/feed/ 0
22 सप्टेंबरला आहे Nokia चा मोठा ईवेंट, लॉन्च होऊ शकतात Nokia 3.4, Nokia 7.3 आणि Nokia 9.3 PureView https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-3-pureview-smartphone-might-launch-on-22-september-hmd-global-event/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-3-pureview-smartphone-might-launch-on-22-september-hmd-global-event/#respond Tue, 15 Sep 2020 14:51:38 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8168 22 September ला फ्लॅगशिप सेग्मेंट मधील Nokia 7.3 आणि 9.3 PureView सोबत लो बजेट स्मार्टफोन Nokia 3.4 आणि Nokia 2.4 पण अधिकृतपणे लॉन्च केले जाऊ शकतात.

The post 22 सप्टेंबरला आहे Nokia चा मोठा ईवेंट, लॉन्च होऊ शकतात Nokia 3.4, Nokia 7.3 आणि Nokia 9.3 PureView first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
HMD Global च्या बॅनर अंतर्गत स्मार्टफोन बनवत असलेल्या टेक ब्रँड Nokia बाबत गेल्या काही आठवड्यांपासून अनेक लीक्स समोर आले आहेत ज्यात कंपनीच्या वेगवेगळ्या स्मार्टफोन्सचा उल्लेख झाला आहे. या लीक्स मध्ये बजेट स्मार्टफोन Nokia 3.4 आणि Nokia 2.4 पासून Nokia 7.3 आणि 9.3 PureView सारख्या हाईएंड डिवाईसेजचे नाव पण समोर आले आहे. काल नोकियाने एक मोठी घोषणा करून संपूर्ण टेक विश्वाचे आपल्याकडे वेधले आहे. कंपनीने सांगितले आहे कि येत्या 22 सप्टेंबरला Nokia चा एक मोठा ईवेंट आयोजित केला जाईल, ज्यात ब्रँडचे नवीन प्रोडक्ट्स सादर केले जातील.

Nokia ने सांगितले आहे कि 22 सप्टेंबरला लॉन्च ईवेंटच्या माध्यमातून कंपनी आपले नवीन प्रोडक्ट्स टेक मार्केट मध्ये आणेल, पण हे प्रोडक्ट्स कोणते असतील याची माहिती अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. आशा आहे कि यादिवशी फ्लॅगशिप सेग्मेंट मधील Nokia 7.3 आणि 9.3 PureView सोबत लो बजेट स्मार्टफोन Nokia 3.4 आणि Nokia 2.4 पण अधिकृतपणे लॉन्च केले जाऊ शकतात. नोकियाचा हा लॉन्च ईवेंट भारतीय वेळेनुसार संध्यकाळी 8:30 PM वाजता सुरु होईल जो नोकियाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर लाईव बघता येईल.

Nokia 9.3 PureView

Nokia 9.3 PureView बद्दल बोलले जात आहे कि हा फोन बेजल लेस डिजाईन वर बनेल तसेच फ्रंट पॅनल वर डिस्प्ले चारही बाजूंना कडेशी जोडलेला असेल. फोन मध्ये कोणतीही नॉच नसेल पण सेल्फी कॅमेऱ्यासाठी यात पंच-होल डिजाईन दिली जाईल. फोटो मध्ये फोनचा बॅक पॅनल वर कर्व्ड दिसत आहे ज्या वर वर्तुळाकार क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आहे. या सकुर्लर रिंगच्या खाली फ्लॅश लाईट आहे.

नोकिया 9.3 प्योरव्यू च्या रियर पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर नाही. इथे खाली वर्टिकल शेप मध्ये Nokia ची ब्रँडिंग आहे. तसेच फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटन दिसत आहे. अशा आहे कि हा फोन साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करेल. फोनच्या लोवर पॅनल वर यूएसबी पोर्ट सह 3.5एमएम जॅक पण मिळू शकतो.

Nokia 9.3 PureView बद्दल बोलले जात आहे कि हा फोन ओएलईडी डिस्प्ले वर लॉन्च केला जाऊ शकतो जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. लीकनुसार फोनच्या कॅमेरा सेटअप मध्ये 108 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा मिळेल जो सॅमसंग सेंसर असेल. तसेच 64 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा दिला जाईल. नोकियाचा हा फोन पण कार्ल जेसिस लेंस इफेक्ट सह लॉन्च केला जाईल.

नोकिया 9.3 प्योरव्यू बद्दल आशा व्यक्त केली जात आहे कि हा स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट वर लॉन्च केला जाईल. अशा आहे कि हा फोन 8 जीबी रॅमला सपोर्ट करेल. कदाचित नोकिया आपला फोन एकापेक्षा जास्त वेरिएंट्स मध्ये बाजारात आणेल याची शक्यता नाकारता येत नाही. फोनच्या इतर स्पेसिफिकेशन्स किंवा लॉन्च संबंधित नवीन माहिती मिळताच वाचकांपर्यंत पोचवली जाईल.

The post 22 सप्टेंबरला आहे Nokia चा मोठा ईवेंट, लॉन्च होऊ शकतात Nokia 3.4, Nokia 7.3 आणि Nokia 9.3 PureView first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-9-3-pureview-smartphone-might-launch-on-22-september-hmd-global-event/feed/ 0