Nokia 5.4 होणार आहे भारतात लॉन्च, फ्लिपकार्टवर झाला लिस्ट, असे असतील स्पेसिफिकेशन्स

Nokia ने गेल्या आठवड्यातच सांगितले होते कि कंपनी भारतात आपला नवीन स्मार्टफोन Nokia 3.4 घेऊन येण्याची तयारी करत आहे. नोकियाने हा फोन प्रोडक्ट पेज पण कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर लाईव केला होता जिथे नोकिया 3.4 फुल स्पेसिफिकेशन्ससह लिस्ट आहे. तसेच आता नोकियाने आपला अजून एक नवीन फोन Nokia 5.4 च्या भारतीय लॉन्चची घोषणा केली आहे. कंपनीने सांगितले आहे कि नोकिया 5.4 पण लवकरच भारतीय बाजारात लॉन्च होणार आणि शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर या फोनचे प्रोडक्ट पेज पण लाईव करण्यात आले आहे.

Nokia 5.4 चे प्रोडक्ट पेज शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर लाईव झाले आहे जिथे ‘कमिंग सून’ लिहिण्यात आले आहे. प्रोडक्ट पेजवर फोनच्या फोटोज आणि व्हिडीओजचा वापर केला गेला आहे आणि त्यांच्यामाध्यमातून फोन टीज केला गेला आहे. या पेजवर फोनच्या लॉन्च डेटची माहिती देण्यात आली नाही, पण आशा आहे कि येत्या काही दिवसांत Nokia 5.4 च्या भारतीय लॉन्चच्या तारखेची घोषणा पण करण्यात येईल. तसेच फ्लिपकार्ट लिस्टिंगवरून पण स्पष्ट झाले आहे कि नोकिया 5.4 या ई-कॉमर्स साइटवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Nokia 5.4

नोकिया 5.4 बद्दल काही दिवसांपूर्वी आलेल्या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि येत्या 10 फेब्रुवारीला नोकिया 5.4 स्मार्टफोन भारतात लॉन्च केला जाऊ शकतो. तर दुसऱ्या कंपनी द्वारे Nokia 3.4 स्मार्टफोन पण टीज केला जात आहे पण या फोनची लॉन्च डेट आतापर्यंत घोषित झाली नाही. अंदाज लावला जात आहे कि 10 फेब्रुवारीला नोकिया 5.4 सह नोकिया 3.4 पण लॉन्च केला जाऊ शकतो. त्यामुळे एचएमडी ग्लोबलद्वारे Nokia 5.4 आणि Nokia 3.4 च्या भारतीय लॉन्चची तारीख जाहीर करण्याची वाट बघितली जात आहे.

Nokia 5.4

नोकिया 5.4 ग्लोबल मार्केट 6.39 इंचाच्या एचडीप्लस आयपीएस एलसीडी पंच-होल डिस्प्लेसह लॉन्च केला गेला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड स्टॉक वर्जनसह लॉन्च झाला आहे जो आक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेटवर चालतो. आंतरराष्ट्रीय बाजारात हा फोन 4 जीबी रॅम आणि 6 जीबी रॅमसह लॉन्च झाला आहे.

फोटोग्राफीसाठी हा फोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Nokia 5.4 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 10वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 4,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here