Exclusive: लो बजेट OPPO A15s झाला अजून ताकदवान, कंपनीने लॉन्च केला 128GB स्टोरेज वेरिएंट

OPPO ने गेल्यावर्षी डिसेंबर मध्ये आपला लो बजेट स्मार्टफोन OPPO A15s लॉन्च केला होता. वॉटरड्रॉ़प नॉच डिस्प्ले आणि 4230mAh बॅटरी असलेला हा स्मार्टफोन फक्त एकच वेरिएंट (4GB रॅम व 64GB स्टोरेज) मध्ये आला होता. पण, नवीन वर्षात कंपनीने या फोन जास्त ताकद देत 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरीएंट सादर केला आहे. 91मोबाईल्सला ऑफलाइन सोर्सद्वारे हि एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे कि कंपनीने ओपो ए15एस चा ताकदवान वेरिएंट भारतात सादर केला आहे. फोन कंपनीच्या ऑफिशियल साइटवर लिस्ट झाला नाही. पण आशा आहे कि डिवाइस लवकरच ऑनलाइन उपलब्ध होईल.

किंमत

Oppo A15s च्या 4GB रॅम व 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 11,490 रुपये आहे. तर 4GB रॅम व 128GB वेरिएंट कंपनीने 12,490 रुपयांमध्ये सादर केला आहे. सध्या आमच्याकडे फोनच्या उपलब्धतेबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.

हे देखील वाचा : OPPO F19 आणि F19 Pro च्या भारतातातील एंट्रीचा मार्ग मोकळा!, जाणून घ्या कधी होतील लॉन्च

स्पेसिफिकेशन्स

Oppo A15s चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.52-इंचाचा 720p एलसीडी डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच सह देण्यात आला आहे. तसेच यात स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 89 टक्के आहे. स्मार्टफोन ऑक्टा-कोर मीडियाटेक पी35 प्रोसेसर सह येतो. हँडसेट मध्ये प्रोसेसरला पावर देण्यासाठी 4जीबी की रॅम आणि 64/128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 256जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी Oppo A15s मध्ये 13MP चा मेन कॅमेरा, 2MP चा मॅक्रो कॅमेरा आणि 2MP चा डेप्थ सेंसिंग कॅमेरा मागे देण्यात आला आहे. हे तिन्ही सेंसर चौकोनी आकारत देण्यात आले आहेत. कॅमेरा सेटअप दिसायला Oppo F17 Pro प्रमाणेच आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Oppo A15s मध्ये 8MP चा कॅमेरा नॉच मध्ये देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : 6GB रॅम आणि 5,000mAh बॅटरीसह आला 5G फोन OPPO A55, जाणून घ्या याची खासियत

Oppo A15s मध्ये पावर बॅकअपसाठी 4230mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट सह येते. हि फास्ट-चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येते. कनेक्टिविटीसाठी फोन मध्ये वाय-फाय, ब्लूटूथ आणि जीपीएस सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. स्मार्टफोन अँड्रॉइड 10 सह कलरओएस 7.2 च्या स्किन वर चालतो. ओपो ए15एस च्या मागे फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर आहे.

ओपो ए15एस व्हिडीओ

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here