OLA Electric Bike - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 13:25:57 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 फक्त स्कूटर नव्हे आता Ola ची Electric Bike देखील येणार; लाँच पूर्वीच जाणून घ्या किंमत, रेंज आणि फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/ola-three-electric-bikes-launch-soon-in-india-know-range-price/ https://www.91mobiles.com/marathi/ola-three-electric-bikes-launch-soon-in-india-know-range-price/#respond Mon, 06 Feb 2023 06:36:49 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17510 ओला इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात सादर केल्यानंतर भाविश अग्रवाल यांची कंपनी आता आपली इलेक्ट्रिक बाइक सादर करण्यासाठी तयार आहे. भारतीय टिपस्टर योगेश बराडनं 91mobiles ला दिलेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या फीचर्स आणि रेंजसह तीन ओला इलेक्ट्रिक बाइक लाँच केल्या जातील. कंपनी ई-बाइक्स ओला ‘आउट ऑफ द वर्ल्ड’, ओला परफॉर्मॅक्स आणि ओला रेंजर नावानं सादर करणार आहे. ‘आउट […]

The post फक्त स्कूटर नव्हे आता Ola ची Electric Bike देखील येणार; लाँच पूर्वीच जाणून घ्या किंमत, रेंज आणि फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Ola electric bikes लवकरच भारतात सादर केल्या जातील.
  • Ola ‘Out of the World’, Ola Peformax, आणि Ola Ranger सादर करेल.
  • Ola ‘Out of the World’ ची किंमत Rs 1,50,000 च्या आसपास असेल.

ओला इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात सादर केल्यानंतर भाविश अग्रवाल यांची कंपनी आता आपली इलेक्ट्रिक बाइक सादर करण्यासाठी तयार आहे. भारतीय टिपस्टर योगेश बराडनं 91mobiles ला दिलेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या फीचर्स आणि रेंजसह तीन ओला इलेक्ट्रिक बाइक लाँच केल्या जातील. कंपनी ई-बाइक्स ओला ‘आउट ऑफ द वर्ल्ड’, ओला परफॉर्मॅक्स आणि ओला रेंजर नावानं सादर करणार आहे. ‘आउट ऑफ द वर्ल्ड’ ही ओला इलेक्ट्रिक बाइक तिन्ही मॉडेल्स पेडी सर्वात प्रीमियम असेल, ज्यात सर्वात जास्त रेंज आणि 100 किमी ताशीपेक्षा जास्तीचा टॉप स्पीड असेल.

OLA Electric Bike

इलेक्ट्रिक बाइकची किंमत 85,000 रुपये इतकी कमी असू शकते, परंतु बराडनं दावा केला आहे की ही बातमी लीक म्हणता येईल त्यामुळे वास्तविक किंमत वेगळी असू शकते. चला जाणून घेऊया आगामी इलेक्ट्रिक बाइक्सची रेंज, टॉप स्पीड आणि अंदाजे किंमत. हे देखील वाचा: काय सांगता! 8 हजारांच्या आत आली हटके इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जमध्ये धावते इतकी

Ola Electric Bikes Specifications and Price

Ola Out of the World: ओला ‘आउट ऑफ द वर्ल्ड’ पाहता एकदा चार्ज केल्यावर 174 किलोमीटर अंतर धावेल. या इलेक्ट्रिक बाइकचा टॉप स्पीड 110 किमी असण्याची शक्यता आहे. या मॉडेलचा फक्त एकच व्हेरिएंट बाजारात येईल. याची किंमत जवळपास 1,50,000 रुपये असू शकते. या ई-बाइकमध्ये ADAS असेल.

Ola Peformax: ओला परफॉर्मॅक्सचे तीन व्हेरिएंट्स मिड-रेंजमध्ये येतील. यातील एंट्री-लेव्हल व्हेरिएंट मध्ये 91 किमी रेंज आणि ताशी 93 किमीचा टॉप स्पीड मिळेल. तसेच या व्हेरिएंटची किंमत 1,05,000 रुपये असू शकते. या मॉडेलचा दुसरा व्हेरिएंट 133 किमी रेंज आणि ताशी 95 किमीचा टॉप स्पीड मिळेल. याची किंमत 1,15,000 रुपयांच्या आसपास असू शकते. टॉप/प्रीमियम ओला परफॉर्मॅक्स व्हेरिएंटमध्ये 174 किमी रेंज आणि ताशी 95 किमी टॉप स्पीड मिळेल. तसेच प्राइस 1,25,000 रुपये असू शकते.

Ola Ranger: ओला रेंजर लाइनअपमधील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक बाइक असेल. हिची किंमत 85,000 रुपयांपासून सुरु होईल आणि 1,05,000 रुपयांपर्यंत जाईल. ही बाइक देखील तीन व्हेरिएंटमध्ये येईल, ज्यात बेस व्हेरिएंटवर 80 किमी रेंज आणि ताशी 91 किमी टॉप स्पीड मिळेल. मिड व्हेरिएंट, 95,000 रुपयांमध्ये 117 किमी रेंज आणि ताशी 91 किमीचा टॉप स्पीड देईल. तर प्रीमियम व्हेरिएंटमध्ये 153 किमी रेंज आणि ताशी 91 किमी टॉप स्पीड मिळेल. हे देखील वाचा: Suzuki भारतात सादर करणार Electric Scooter; जाणून घ्या कधी येईल तुमच्या हातात

ओला इलेक्ट्रिक बाइक्सच्या लाँच डेट बाबत कोणतीही ऑफिशियल माहिती समोर आली नाही. परंतु कंपनीनं 9 फेब्रुवारीला काहीतरी मोठं होण्याची माहिती दिली आहे. बराडनुसार कंपनी आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक कारची डिजाइन दाखवणार आहे.

The post फक्त स्कूटर नव्हे आता Ola ची Electric Bike देखील येणार; लाँच पूर्वीच जाणून घ्या किंमत, रेंज आणि फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/ola-three-electric-bikes-launch-soon-in-india-know-range-price/feed/ 0
स्कूटर नव्हे आता येऊ शकते Ola Electric Bike! सीईओनी केलं ट्विट https://www.91mobiles.com/marathi/ola-electric-bike-launch-soon-in-india-bhavish-aggarwal-confirmed/ https://www.91mobiles.com/marathi/ola-electric-bike-launch-soon-in-india-bhavish-aggarwal-confirmed/#respond Mon, 14 Nov 2022 07:21:58 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14907 OLA Electric सध्या देशातील सर्वात मोठी टू-व्हीलर इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी आहे. अलीकडेच कंपनीनं आपली आगामी इलेक्ट्रिक कारची (OLA Electric Car) माहिती दिली होती. तसेच ही अपकमिंग ई-कार सोशल मीडियाच्या माध्यमातून टीज देखील करण्यात आली होती. आता कंपनी अजून एका सेगमेंटमध्ये आपला हात अजमवण्याची तयारी करत असल्याचं समोर आलं आहे. कंपनीनं खुलासा केला आहे की ओला […]

The post स्कूटर नव्हे आता येऊ शकते Ola Electric Bike! सीईओनी केलं ट्विट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OLA Electric सध्या देशातील सर्वात मोठी टू-व्हीलर इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी आहे. अलीकडेच कंपनीनं आपली आगामी इलेक्ट्रिक कारची (OLA Electric Car) माहिती दिली होती. तसेच ही अपकमिंग ई-कार सोशल मीडियाच्या माध्यमातून टीज देखील करण्यात आली होती. आता कंपनी अजून एका सेगमेंटमध्ये आपला हात अजमवण्याची तयारी करत असल्याचं समोर आलं आहे. कंपनीनं खुलासा केला आहे की ओला लवकरच आपली OLA Electric Bike घेऊन येत आहे, जिच्यावर काम केलं जात आहे. कंपनीचे सीईओ Bhavish Aggarwal यांनी स्वतः याची माहिती सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. ओला द्वारे वर्षी 2023 मध्ये मार्च पर्यंत (Holi 2023) ला नवीन इलेक्ट्रिक बाइक सादर केली जाऊ शकते, अशी आशा ही बातमी आल्यापासून व्यक्त केली जात आहे.

CEO नं केलं ट्विट

ओला इलेक्ट्रिकचे सह-संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याविषयी माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करून सांगितलं की कंपनी लवकरच इलेक्ट्रिक बाइक सादर करू शकतेतसेच त्यांनी सोशल मीडियावरच पोलच्या माध्यमातून लोकांकडून त्यांच्या प्रतिक्रिया देखील मागवल्या आहेत. सध्या ई-बाइकची लाँच डेट आणि इतर कोणत्याही फीचर्स, डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली नाही. हे देखील वाचा: 16 नोव्हेंबरला लाँच होईल स्वस्त आणि मस्त 5जी फोन; असे असतील OPPO A1 Pro चे स्पेसिफिकेशन्स

OLA स्पोर्ट्स बाइक होऊ शकते लाँच

आपल्या ई-बाइकची घोषणा करताना भाविश अग्रवाल यांनी लोकांना विचारले की त्यांना स्पोर्ट्स, क्रूजर, अ‍ॅडवेंचर आणि कॅफे रेसर पैकी कोणतंही बाइक जास्त आवडते. यातील सर्वाधिक 47.1 टक्के वोट स्पोर्ट्स बाइकला मिळाले आहेत. त्यानंतर दुसऱ्या नंबरवर क्रूजर बाइक आहे जिला आतापर्यंत 27.7 टक्के वोट मिळाले आहेत. तिसऱ्या नंबरवर 15.1 टक्के वोटसह अ‍ॅडवेंचर आणि 10.1 टक्के वोटसह शेवटच्या स्थानी कॅफे रेसर बाइक आहे. त्यामुळे लोकांच्या आवडीचा विचार केल्यास कंपनी ओला स्पोर्ट्स बाइक सादर करू शकते. हे देखील वाचा: Vivo ला टक्कर देण्यासाठी येतायत OPPO Reno 9, Reno 9 Pro आणि Reno 9 Pro Plus; लाँचपूर्वीच माहिती लीक

वर सांगितल्याप्रमाणे कंपनीनं बाइकची डिजाइन कशी असेल, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु कंपनीच्या डिजाइन ऑप्शन्सवरून स्पष्ट झालं आहे की आगामी बाइक स्पोर्ट्स बाइक, क्रूजर बाइक, अ‍ॅडवेंचर मोटरसायकल किंवा कॅफे रेसर डिजाइनसह सादर केली जाऊ शकते. त्यातही महत्वाची बाब म्हणजे ओलाची इलेक्ट्रिक बाइक येत आहे हे स्पष्ट झालं आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post स्कूटर नव्हे आता येऊ शकते Ola Electric Bike! सीईओनी केलं ट्विट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/ola-electric-bike-launch-soon-in-india-bhavish-aggarwal-confirmed/feed/ 0