फक्त स्कूटर नव्हे आता Ola ची Electric Bike देखील येणार; लाँच पूर्वीच जाणून घ्या किंमत, रेंज आणि फीचर्स

Highlights

  • Ola electric bikes लवकरच भारतात सादर केल्या जातील.
  • Ola ‘Out of the World’, Ola Peformax, आणि Ola Ranger सादर करेल.
  • Ola ‘Out of the World’ ची किंमत Rs 1,50,000 च्या आसपास असेल.

ओला इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात सादर केल्यानंतर भाविश अग्रवाल यांची कंपनी आता आपली इलेक्ट्रिक बाइक सादर करण्यासाठी तयार आहे. भारतीय टिपस्टर योगेश बराडनं 91mobiles ला दिलेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या फीचर्स आणि रेंजसह तीन ओला इलेक्ट्रिक बाइक लाँच केल्या जातील. कंपनी ई-बाइक्स ओला ‘आउट ऑफ द वर्ल्ड’, ओला परफॉर्मॅक्स आणि ओला रेंजर नावानं सादर करणार आहे. ‘आउट ऑफ द वर्ल्ड’ ही ओला इलेक्ट्रिक बाइक तिन्ही मॉडेल्स पेडी सर्वात प्रीमियम असेल, ज्यात सर्वात जास्त रेंज आणि 100 किमी ताशीपेक्षा जास्तीचा टॉप स्पीड असेल.

OLA Electric Bike

इलेक्ट्रिक बाइकची किंमत 85,000 रुपये इतकी कमी असू शकते, परंतु बराडनं दावा केला आहे की ही बातमी लीक म्हणता येईल त्यामुळे वास्तविक किंमत वेगळी असू शकते. चला जाणून घेऊया आगामी इलेक्ट्रिक बाइक्सची रेंज, टॉप स्पीड आणि अंदाजे किंमत. हे देखील वाचा: काय सांगता! 8 हजारांच्या आत आली हटके इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जमध्ये धावते इतकी

Ola Electric Bikes Specifications and Price

Ola Out of the World: ओला ‘आउट ऑफ द वर्ल्ड’ पाहता एकदा चार्ज केल्यावर 174 किलोमीटर अंतर धावेल. या इलेक्ट्रिक बाइकचा टॉप स्पीड 110 किमी असण्याची शक्यता आहे. या मॉडेलचा फक्त एकच व्हेरिएंट बाजारात येईल. याची किंमत जवळपास 1,50,000 रुपये असू शकते. या ई-बाइकमध्ये ADAS असेल.

Ola Peformax: ओला परफॉर्मॅक्सचे तीन व्हेरिएंट्स मिड-रेंजमध्ये येतील. यातील एंट्री-लेव्हल व्हेरिएंट मध्ये 91 किमी रेंज आणि ताशी 93 किमीचा टॉप स्पीड मिळेल. तसेच या व्हेरिएंटची किंमत 1,05,000 रुपये असू शकते. या मॉडेलचा दुसरा व्हेरिएंट 133 किमी रेंज आणि ताशी 95 किमीचा टॉप स्पीड मिळेल. याची किंमत 1,15,000 रुपयांच्या आसपास असू शकते. टॉप/प्रीमियम ओला परफॉर्मॅक्स व्हेरिएंटमध्ये 174 किमी रेंज आणि ताशी 95 किमी टॉप स्पीड मिळेल. तसेच प्राइस 1,25,000 रुपये असू शकते.

Ola Ranger: ओला रेंजर लाइनअपमधील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक बाइक असेल. हिची किंमत 85,000 रुपयांपासून सुरु होईल आणि 1,05,000 रुपयांपर्यंत जाईल. ही बाइक देखील तीन व्हेरिएंटमध्ये येईल, ज्यात बेस व्हेरिएंटवर 80 किमी रेंज आणि ताशी 91 किमी टॉप स्पीड मिळेल. मिड व्हेरिएंट, 95,000 रुपयांमध्ये 117 किमी रेंज आणि ताशी 91 किमीचा टॉप स्पीड देईल. तर प्रीमियम व्हेरिएंटमध्ये 153 किमी रेंज आणि ताशी 91 किमी टॉप स्पीड मिळेल. हे देखील वाचा: Suzuki भारतात सादर करणार Electric Scooter; जाणून घ्या कधी येईल तुमच्या हातात

ओला इलेक्ट्रिक बाइक्सच्या लाँच डेट बाबत कोणतीही ऑफिशियल माहिती समोर आली नाही. परंतु कंपनीनं 9 फेब्रुवारीला काहीतरी मोठं होण्याची माहिती दिली आहे. बराडनुसार कंपनी आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक कारची डिजाइन दाखवणार आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here