स्कूटर नव्हे आता येऊ शकते Ola Electric Bike! सीईओनी केलं ट्विट

OLA Electric सध्या देशातील सर्वात मोठी टू-व्हीलर इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी आहे. अलीकडेच कंपनीनं आपली आगामी इलेक्ट्रिक कारची (OLA Electric Car) माहिती दिली होती. तसेच ही अपकमिंग ई-कार सोशल मीडियाच्या माध्यमातून टीज देखील करण्यात आली होती. आता कंपनी अजून एका सेगमेंटमध्ये आपला हात अजमवण्याची तयारी करत असल्याचं समोर आलं आहे. कंपनीनं खुलासा केला आहे की ओला लवकरच आपली OLA Electric Bike घेऊन येत आहे, जिच्यावर काम केलं जात आहे. कंपनीचे सीईओ Bhavish Aggarwal यांनी स्वतः याची माहिती सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. ओला द्वारे वर्षी 2023 मध्ये मार्च पर्यंत (Holi 2023) ला नवीन इलेक्ट्रिक बाइक सादर केली जाऊ शकते, अशी आशा ही बातमी आल्यापासून व्यक्त केली जात आहे.

CEO नं केलं ट्विट

ओला इलेक्ट्रिकचे सह-संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याविषयी माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करून सांगितलं की कंपनी लवकरच इलेक्ट्रिक बाइक सादर करू शकतेतसेच त्यांनी सोशल मीडियावरच पोलच्या माध्यमातून लोकांकडून त्यांच्या प्रतिक्रिया देखील मागवल्या आहेत. सध्या ई-बाइकची लाँच डेट आणि इतर कोणत्याही फीचर्स, डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली नाही. हे देखील वाचा: 16 नोव्हेंबरला लाँच होईल स्वस्त आणि मस्त 5जी फोन; असे असतील OPPO A1 Pro चे स्पेसिफिकेशन्स

OLA स्पोर्ट्स बाइक होऊ शकते लाँच

आपल्या ई-बाइकची घोषणा करताना भाविश अग्रवाल यांनी लोकांना विचारले की त्यांना स्पोर्ट्स, क्रूजर, अ‍ॅडवेंचर आणि कॅफे रेसर पैकी कोणतंही बाइक जास्त आवडते. यातील सर्वाधिक 47.1 टक्के वोट स्पोर्ट्स बाइकला मिळाले आहेत. त्यानंतर दुसऱ्या नंबरवर क्रूजर बाइक आहे जिला आतापर्यंत 27.7 टक्के वोट मिळाले आहेत. तिसऱ्या नंबरवर 15.1 टक्के वोटसह अ‍ॅडवेंचर आणि 10.1 टक्के वोटसह शेवटच्या स्थानी कॅफे रेसर बाइक आहे. त्यामुळे लोकांच्या आवडीचा विचार केल्यास कंपनी ओला स्पोर्ट्स बाइक सादर करू शकते. हे देखील वाचा: Vivo ला टक्कर देण्यासाठी येतायत OPPO Reno 9, Reno 9 Pro आणि Reno 9 Pro Plus; लाँचपूर्वीच माहिती लीक

वर सांगितल्याप्रमाणे कंपनीनं बाइकची डिजाइन कशी असेल, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु कंपनीच्या डिजाइन ऑप्शन्सवरून स्पष्ट झालं आहे की आगामी बाइक स्पोर्ट्स बाइक, क्रूजर बाइक, अ‍ॅडवेंचर मोटरसायकल किंवा कॅफे रेसर डिजाइनसह सादर केली जाऊ शकते. त्यातही महत्वाची बाब म्हणजे ओलाची इलेक्ट्रिक बाइक येत आहे हे स्पष्ट झालं आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here