OPPO Reno 9, Reno 9 Pro आणि Reno 9 Pro Plus ची माहिती लाँचपूर्वीच लीक

oppo-reno-9-reno-9-pro-reno-9-pro-plus-launch-to-compete-with-vivo-v27

OPPO आणि Vivo मधील स्पर्धा जगजाहीर आहे. काही दिवसांपूर्वी Vivo V27 सीरीजची माहिती आली होती. तर आता ओप्पो रेनो 9 सीरीजबद्दल एका मोठा लीक समोर आला आहे. त्यानुसार हे फोन्स कंपनी या महिन्याच्या अखेरीस चीनमध्ये लाँच करू शकते. भारतीय लाँचची माहिती नसली तरी त्यानंतर काही दिवसांनी भारतात देखील हे उपलब्ध होऊ शकतात. मिळालेल्या माहितीनुसार OPPO Reno 9, Reno 9 Pro आणि Reno 9 Pro Plus कंपनी 6.7 इंचाच्या मोठ्या स्क्रीनसह सादर करू शकते.

OPPO Reno 9 सीरीजचे लीक स्पेसिफिकेशन

लीकनुसार, OPPO Reno 9 स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 778G चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो. चिपसेट नवीन नसला तरी मिड रेंजमध्ये खूप पावरफुल मानला जातो. तसेच पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये तुम्हाला 4,500mAh ची बॅटरी 67W फास्ट चार्जिंगसह मिळू शकते. हे देखील वाचा: 5G Mobile Phones: 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारे सर्वात बेस्ट 5G Phone; किंमत कमी फीचर्स भरपूर

oppo-reno-9-reno-9-pro-reno-9-pro-plus-launch-to-compete-with-vivo-v27

फोनचे कॅमेरा फीचर्स पाहता कंपनी हा 64MP च्या मेन कॅमेऱ्यासह सादर करू शकते. याआधी ओप्पो रेनो 8 सीरीजमध्ये देखील असाच सेटअप मिळाला होता. तसेच फोनचा दुसरा सेन्सर 2 मेगापिक्सलचा असू शकतो. यात ड्युअल सेन्सर असेल की ट्रिपल याबाबत सध्या जास्त माहिती मिळाली नाही.

OPPO Reno 9 Pro पाहता कंपनी हा MediaTek Dimensity 8100-Max चिपसेटसह सादर करू शकते. या फोनमध्ये पण तुम्हाला 67W फास्ट चार्जिंगसह 4,500mAh ची बॅटरी मिळू शकते. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये तुम्हाला ड्युअल कॅमेरा मिळू शकतो. फोनचा मेन सेन्सर 50MP चा असू शकतो आणि कंपनी यात Sony IMX890 सेन्सरचा वापर करू शकते. तसेच 8MP सेकंडरी कॅमेरा दिला जाऊ शकतो, हा अल्ट्रा वाइड सेन्सर असू शकतो.

राहिला प्रश्न OPPO Reno 9 Pro+ चा तर हा सर्वात शक्तिशाली फोन असू शकतो आणि यात तुम्हाला Qualcomm चा फ्लॅगशिप चिपसेट Snapdragon 8 Plus Gen1 मिळू शकतो. पावर बॅकअपसाठी यात 4,700mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते जी 80W फास्ट चार्जिंगसह येऊ शकते. हा फोन कंपनी ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह सादर करू शकते. फोनचा मेन सेन्सर 50MP चा असू शकतो जो Sony IMX890 सेन्सरसह येऊ शकतो. तसेच 8MP चा सेकंडरी आणि 2MP तीसर सेन्सर मिळू शकतो. या मॉडेलमध्ये तुम्हाला ओआयएस सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे. हे देखील वाचा: घर बसल्या मिळावा Airtel 5G सिम, काही स्टेप्समध्ये काम फत्ते

तिन्ही मॉडेल OPPO Reno 9, Reno 9 Pro आणि Reno 9 Pro प्लस मध्ये तुम्हाला 6.7-inch फुल एचडी प्लस रेजल्युशनसह OLED स्क्रीन मिळू शकते. कंपनी यात कर्व्ड डिस्प्ले देऊ शकते. विशेष म्हणजे यावेळी ओप्पो 120 हर्ट्ज स्क्रीन रिफ्रेश रेटसह 10-bit कलर पॅनलचा वापर करू शकते. तसेच अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि 32MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here