Suzuki भारतात सादर करणार Electric Scooter; जाणून घ्या कधी येईल तुमच्या हातात

Highlights

  • Suzuki भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर 2025 मध्ये सादर करेल.
  • कंपनी 2030 पर्यंत आठ नवीन इलेक्ट्रिक टू व्हिलर्स सादर करणार आहे.
  • Suzuki electric scooter मिड साइज ईव्ही असेल.

Suzuki नं घोषणा केली आहे की कंपनी भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर 2025 मध्ये सादर करेल. कंपनीच्या मते ही इलेक्ट्रिक स्कूटर शाळेत, ऑफिस आणि बाजारात जाणाऱ्या लोकांसाठी सादर केली जाईल. 2030 पर्यंत भारतात 8 इलेक्ट्रिक टू व्हीलर व्हेइकल्स सादर करण्याची कंपनीची योजना आहे. होंडा नंतर भारतीय बाजारात ईव्ही प्लॅन्सची घोषणा करणारी Suzuki दुसरी जापनीज कंपनी बनली आहे.

Suzuki भारतात आणणार electric scooter

सुझुकीनं ग्लोबल प्रेस रिलीजच्या माध्यमातून सांगितले की Suzuki Motorcycle India 2025 मध्ये देशात आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे. ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर रोजच्या प्रवासासाठी टू व्हीलर वापरणाऱ्या लोकांसाठी सादर केली जाईल. प्रेस रिलीजमध्ये जरी कंपनीनं या इलेक्ट्रिक वाहनांचा उल्लेख मोटरसायकल म्हणून केला असाल तरी ही टू व्हीलर एक स्कूटर असण्याची शक्यता जास्त आहे, असा अंदाज कंपनीनं सांगितलेल्या टार्गेट ऑडियन्सवरून लावला जात आहे. हे देखील वाचा: Honda Activa Electric लाँच बद्दल खुद्द CEO नी केला खुलासा; लवकरच येणार इलेक्ट्रिक स्कूटर

सुझुकी आपली बर्गमॅन मॅक्सि स्कूटरचा इलेक्ट्रिक अवतार बाजारात घेऊन येऊ शकते, जिची टेस्टिंग गेली कित्येक दिवस सुरु आहे. बर्गमॅन इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर आधारित एक मिड साइज इलेक्ट्रिक स्कूटर देखील कंपनी बाजारात घेऊन येऊ शकते. गेली दोन वर्ष Suzuki आपल्या बर्गमॅन इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मची टेस्टिंग करत आहे आणि ही इलेक्ट्रिक स्कूटर अनेकदा टेस्टिंग दरम्यान रस्त्यांवर दिसली आहे.

या जापनीज टू व्हीलर निर्मात्या कंपनीनं आपल्या भविष्यातील योजनांची माहिती देखील प्रेस रिलीजमधून दिली आहे. त्यानुसार कंपनी भारतात एकूण 8 नवीन इलेक्ट्रिक टू व्हीलर व्हेइकल्स सादर करणार आहे, ज्या 2030 पर्यंत भारतीयांच्या भेटीला येतील. कंपनीच्या मते आर्थिक वर्ष 2030 पर्यंत कंपनीची भारतातील 25 टक्के लाइनअप इलेक्ट्रिक व्हेइकल्सनी भरलेली असलेलं. तसेच सुझुकी मोठ्या प्रमाणावर कार्बन न्यूटरल फ्युएलचा वापर निर्णय बाइक्सवर काम करत आहे.

होंडा असो किंवा सुझुकी या दोन्ही जापनीज कंपन्या कम्युटर्ससाठी इलेक्ट्रिक स्कूटर सादर करणाऱ्याला प्राधान्य देत आहेत. दोन्ही कंपन्या स्पोर्टी किंवा हाय परफॉर्मन्स देणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर सादर करण्याची योजना बनवत नाहीत. त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर शहरातल्या शहरात प्रवास करण्यासाठी बनल्या असल्याचं दिसत आहे. हे देखील वाचा: एकदा चार्ज केल्यावर 150 किलोमीटर धावणारी भन्नाट इलेक्ट्रिक स्कूटर; सामान ठेवण्यासाठी भरपूर जागा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here