Ola S1 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 07 Oct 2022 12:24:04 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 येत आहे ‘या’ कंपनीची स्वस्त आणि मस्त इलेक्ट्रिक स्कूटी, जाणून घ्या किती असेल किंमत https://www.91mobiles.com/marathi/affordable-electric-scooter-ola-s1-to-launch-in-india-on-diwali-report/ https://www.91mobiles.com/marathi/affordable-electric-scooter-ola-s1-to-launch-in-india-on-diwali-report/#respond Sat, 08 Oct 2022 04:22:54 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13788 OLA Electric Scooter: इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपनी Ola Electric भारतात लवकरच आपली सर्वात किफायतशीर इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याची योजना बनवत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार दिवाळीपूर्वी कंपनी नवीन इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात सादर करू शकते. ओलाकडून सादर केली जाणारी नवीन स्कूटर कंपनीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर असू शकते. अलीकडेच Ola CEO Bhavish Aggarwal यांनी आपल्या ट्विटमध्ये हिंट […]

The post येत आहे ‘या’ कंपनीची स्वस्त आणि मस्त इलेक्ट्रिक स्कूटी, जाणून घ्या किती असेल किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OLA Electric Scooter: इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपनी Ola Electric भारतात लवकरच आपली सर्वात किफायतशीर इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याची योजना बनवत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार दिवाळीपूर्वी कंपनी नवीन इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात सादर करू शकते. ओलाकडून सादर केली जाणारी नवीन स्कूटर कंपनीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर असू शकते. अलीकडेच Ola CEO Bhavish Aggarwal यांनी आपल्या ट्विटमध्ये हिंट दिली आहे की भारतात लवकरच एक नवीन प्रोडक्ट लाँच होणार आहे.

Affordable Ola S1 electric scooter

Bhavish Aggarwal यांनी ट्विट करून माहिती दिली आहे की या महिन्याच्या अखेरपर्यंत नवीन लाँच होणार आहे. अग्रवाल यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “या महिन्यात आम्ही लाँचसाठी काहीतरी मोठं करण्याची योजना बनवत आहोत! #EndICEAge क्रांतीला कमीत कमी 2 वर्षांनी वेगवान करेल. खरंच उत्साहित आहे.” तसेच , Car And Bike वेबसाइटच्या एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की कंपनी Ola S1 स्कूटरचा एक नवा, जास्त किफायतशीर व्हर्जन लाँच करण्याची योजना बनवत आहे. हे देखील वाचा: मोटोरोलानं लाँच केला 10499 रुपयांचा स्वस्त मोबाइल; 50MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी

Affordable Ola S1 electric scooter price

कार आणि बाइकच्या रिपोर्टमध्ये सूत्रोंनुसार सांगण्यात आलं आहे की नवीन किफायतशीर ओला एस 1 स्कूटरची किंमत 80,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते, जी बाजारात सर्वात लोकप्रिय पेट्रोल स्कूटर इतकी आहे. ओला नवीन व्हेरिएंटमध्ये एस1 आणि एस1 प्रो पेक्षा जास्त फीचर देऊ शकते, अशी देखील चर्चा आहे. आधीप्रमाणे, नवीन ओला इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीच्या मूवओएस प्लॅटफॉर्मवर चालेल.

OLA S1 Electric Scooter

Ola S1 भारतात 99,999 रुपये (एक्स-शोरूम) च्या किंमतीत लाँच करण्यात आली होती. ही 5.5kW मोटरसह 8.5kw पीक पावरला सपोर्ट करते. ओलाची इलेक्ट्रिक स्कूटर 141 किमी पर्यंत रेंज आणि ताशी 95 किमी चा टॉप स्पीड देते. ओला एस1 देखील होम चार्जरद्वारे फक्त 5 तासांमध्ये चार्ज होते. Ola S1 मध्ये 3kWh चा बॅटरी पॅक आहे जो स्कूटरला पावर देतो. तसेच ही स्कूटर ओलाच्या मूवओएस प्लॅटफॉर्मवर चालते जो म्यूजिक प्लेबॅक, नेव्हिगेशन, एक कंपेनियन अ‍ॅप आणि रिवर्स मोड सारख्या सुविधा देतो. तसेच ओला दिवाळीच्या वेळेस ओला एस1 मध्ये मूवओएस 3.0 अपडेट देणार आहे.

नवरात्रीच्या निमित्ताने ओला स्कूटर्सची विक्री वाढली

ओलानं अलीकडेच घोषणा केली होती की सप्टेंबर 2022 मध्ये नवरात्री दरम्यान कंपनीनं प्रत्येक मिनिटाला एक इलेक्ट्रिक स्कूटर विकली आहे. कंपनीनं म्हटलं आहे की या उत्सवाच्या दिवसांमध्ये विक्री चार पट वाढली आहे. Vahan च्या आकडेवारीनुसार सप्टेंबरमध्ये कंपनीनं 9,364 यूनिट्सची विक्री केली. हे देखील वाचा: Jio 5G Plan Price: जियो 5जी टॅरिफ प्लॅनसाठी किती पैसे द्यावे लागणार आणि किती मिळणार 5G Data, जाणून घ्या

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठीला Facebook वर फॉलो करा.

The post येत आहे ‘या’ कंपनीची स्वस्त आणि मस्त इलेक्ट्रिक स्कूटी, जाणून घ्या किती असेल किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/affordable-electric-scooter-ola-s1-to-launch-in-india-on-diwali-report/feed/ 0
499 रुपयांमध्ये बुक करा OLA ची स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर; आता मिळणार 131 किलोमीटरची रेंज https://www.91mobiles.com/marathi/131km-range-ola-s1-electric-scooter-india-launch-price-booking-sale/ https://www.91mobiles.com/marathi/131km-range-ola-s1-electric-scooter-india-launch-price-booking-sale/#respond Tue, 16 Aug 2022 12:43:08 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12250 Ola Electric नं स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आपली Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर भारतात रि-लाँच केली आहे. कंपनीनं ही बॅटरी असलेली स्कूटी Mission Electric 2022 event अंतगर्त सादर केली आहे. तसेच Ola electric car देखील टीज केली आहे. कंपनीनं घोषणा केली आहे की साल 2024 मध्ये कार लाँच केली जाईल. इतकंच नव्हे तर कंपनीनं Ola S1 […]

The post 499 रुपयांमध्ये बुक करा OLA ची स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर; आता मिळणार 131 किलोमीटरची रेंज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Ola Electric नं स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आपली Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर भारतात रि-लाँच केली आहे. कंपनीनं ही बॅटरी असलेली स्कूटी Mission Electric 2022 event अंतगर्त सादर केली आहे. तसेच Ola electric car देखील टीज केली आहे. कंपनीनं घोषणा केली आहे की साल 2024 मध्ये कार लाँच केली जाईल. इतकंच नव्हे तर कंपनीनं Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर limited edition Khaki shade मध्ये सादर केली आहे, जिचेज्याची फक्त 1,947 यूनिटच विकले जातील. चला जाणून घेऊया Ola Electric (ओला इलेक्ट्रिक) S1 इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत आणि सेलबद्दल संपूर्ण माहिती.

Ola S1 Electric Scooter Price, Sale आणि Booking

Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर 99,000 रुपयांच्या आरंभिक एक्स-शोरूम किंमतीत लाँच करण्यात आली आहे. ही स्कूटर 15 ते 31 ऑगस्ट दरम्यान 499 रुपयांमध्ये बुकिंगसाठी कंपनीच्या साइट आणि Ola Electric app वर उपलब्ध होईल. कंपनीनुसार नवीन Ola Electric S1 इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी 7 सप्टेंबरपासून सुरु होईल. ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी सांगितलं आहे की अर्ली अ‍ॅक्सेस परचेज विंडो 1 सप्टेंबरला उघडेल.

Ola S1 ची warranty

ओला कडे ओला एस1 इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी फायनान्सचा ऑप्शन देखील आहे. त्याअंतर्गत ईएमआय 2,999 रुपयांपासून सुरु होईल आणि बँकिंग पार्टनरकडून फीमध्ये सूट मिळेल. तसेच ओला पाच वर्षांपर्यंत एक्सटेंडेड वॉरंटी देखील देत आहे. वॉरंटी बॅटरी, मोटर आणि अन्य सर्व कव्हर करेल. जुने Ola S1 Pro युजर्स देखील ही वॉरंटी विकत घेऊन शकतील.

Ola S1 की रेंज, स्पेसिफिकेशन्स, कलर आणि डिजाइन

ओला एस1 ची डिजाइन ओला एस1 प्रो सारखी आणि त्याच प्लॅटफॉर्मवर बनवण्यात आली आहे. ही रेड, जेट ब्लॅक, पोर्सिलेन व्हाइट, नियो मिंट आणि लिक्विड सिल्व्हर अशा पाच रंगात आली आहे. तसेच यात ओला एस1 प्रो प्रमाणे मूवओएस सॉफ्टवेयर आहे आणि ज्याला भविष्यातील सर्व अपडेट्स मिळतील, ज्यात मूवओएस 3.0 चा देखील समावेश आहे, जो यंदा दिवाळीनंतर लाँच होईल.

Ola S1 Pro च्या 3.97kWh च्या तुलनेत Ola S1 ची बॅटरी क्षमता 3kWh आहे. ओला एस1 ची एआरएआय-प्रमाणित रेंज 131 किमी आहे. इको मोड मध्ये 128 किमी, सामान्य मोड मध्ये 101 किमी आणि स्पोर्ट्स मोड मध्ये 90 किमी ची रेंज ग्राहकांना मिळेल. कंपनीचा दावा आहे की Ola S1 मध्ये 95kmph चा टॉप स्पीड मिळतो. तसेच यात म्युजिक, नेव्हिगेशन, साथी अ‍ॅप आणि रिवर्स मोड सारखे फिचर देखील मिळतात.

तुम्हाला माहित असेल की Ola S1 गेल्यावर्षी 15 ऑगस्ट, 2021 रोजी लाँच करण्यात आली होती. परंतु यंदा जानेवारीत काही कारणास्तव ही बंद करण्यात आली होती. आता रि-लाँचनंतर पुन्हा एकदा या स्कूटरची टक्कर बजाज चेतक, टीव्हीएस आयक्यूब सारख्या प्रतिस्पर्ध्यांशी होईल.

The post 499 रुपयांमध्ये बुक करा OLA ची स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर; आता मिळणार 131 किलोमीटरची रेंज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/131km-range-ola-s1-electric-scooter-india-launch-price-booking-sale/feed/ 0