येत आहे ‘या’ कंपनीची स्वस्त आणि मस्त इलेक्ट्रिक स्कूटी, जाणून घ्या किती असेल किंमत

OLA Electric Scooter: इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपनी Ola Electric भारतात लवकरच आपली सर्वात किफायतशीर इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याची योजना बनवत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार दिवाळीपूर्वी कंपनी नवीन इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात सादर करू शकते. ओलाकडून सादर केली जाणारी नवीन स्कूटर कंपनीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर असू शकते. अलीकडेच Ola CEO Bhavish Aggarwal यांनी आपल्या ट्विटमध्ये हिंट दिली आहे की भारतात लवकरच एक नवीन प्रोडक्ट लाँच होणार आहे.

Affordable Ola S1 electric scooter

Bhavish Aggarwal यांनी ट्विट करून माहिती दिली आहे की या महिन्याच्या अखेरपर्यंत नवीन लाँच होणार आहे. अग्रवाल यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “या महिन्यात आम्ही लाँचसाठी काहीतरी मोठं करण्याची योजना बनवत आहोत! #EndICEAge क्रांतीला कमीत कमी 2 वर्षांनी वेगवान करेल. खरंच उत्साहित आहे.” तसेच , Car And Bike वेबसाइटच्या एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की कंपनी Ola S1 स्कूटरचा एक नवा, जास्त किफायतशीर व्हर्जन लाँच करण्याची योजना बनवत आहे. हे देखील वाचा: मोटोरोलानं लाँच केला 10499 रुपयांचा स्वस्त मोबाइल; 50MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी

Affordable Ola S1 electric scooter price

कार आणि बाइकच्या रिपोर्टमध्ये सूत्रोंनुसार सांगण्यात आलं आहे की नवीन किफायतशीर ओला एस 1 स्कूटरची किंमत 80,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते, जी बाजारात सर्वात लोकप्रिय पेट्रोल स्कूटर इतकी आहे. ओला नवीन व्हेरिएंटमध्ये एस1 आणि एस1 प्रो पेक्षा जास्त फीचर देऊ शकते, अशी देखील चर्चा आहे. आधीप्रमाणे, नवीन ओला इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीच्या मूवओएस प्लॅटफॉर्मवर चालेल.

OLA S1 Electric Scooter

Ola S1 भारतात 99,999 रुपये (एक्स-शोरूम) च्या किंमतीत लाँच करण्यात आली होती. ही 5.5kW मोटरसह 8.5kw पीक पावरला सपोर्ट करते. ओलाची इलेक्ट्रिक स्कूटर 141 किमी पर्यंत रेंज आणि ताशी 95 किमी चा टॉप स्पीड देते. ओला एस1 देखील होम चार्जरद्वारे फक्त 5 तासांमध्ये चार्ज होते. Ola S1 मध्ये 3kWh चा बॅटरी पॅक आहे जो स्कूटरला पावर देतो. तसेच ही स्कूटर ओलाच्या मूवओएस प्लॅटफॉर्मवर चालते जो म्यूजिक प्लेबॅक, नेव्हिगेशन, एक कंपेनियन अ‍ॅप आणि रिवर्स मोड सारख्या सुविधा देतो. तसेच ओला दिवाळीच्या वेळेस ओला एस1 मध्ये मूवओएस 3.0 अपडेट देणार आहे.

नवरात्रीच्या निमित्ताने ओला स्कूटर्सची विक्री वाढली

ओलानं अलीकडेच घोषणा केली होती की सप्टेंबर 2022 मध्ये नवरात्री दरम्यान कंपनीनं प्रत्येक मिनिटाला एक इलेक्ट्रिक स्कूटर विकली आहे. कंपनीनं म्हटलं आहे की या उत्सवाच्या दिवसांमध्ये विक्री चार पट वाढली आहे. Vahan च्या आकडेवारीनुसार सप्टेंबरमध्ये कंपनीनं 9,364 यूनिट्सची विक्री केली. हे देखील वाचा: Jio 5G Plan Price: जियो 5जी टॅरिफ प्लॅनसाठी किती पैसे द्यावे लागणार आणि किती मिळणार 5G Data, जाणून घ्या

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठीला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here