मोटोरोलानं लाँच केला 10499 रुपयांचा स्वस्त मोबाइल; 50MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी

50MP Camera 5000mAh Battery Phone Moto E32 Launch In India Price Sale Flipkart

Moto E32 Launch In India: भारतात Motorola नं आपल्या E सीरीजचा विस्तार करत नवीन स्मार्टफोन Moto E32 लाँच केला आहे. Motorola च्या E-सीरीजमध्ये सादर करण्यात आलेल्या बजेट स्मार्टफोनची किंमत 10,000 रुपयांच्या आसपास ठेवण्यात आली आहे. भारतात जरी हा हँडसेट आता आला असला तरी कंपनीनं हा यावर्षीच्या सुरुवातीला युरोपमध्ये लाँच केला होता, परंतु भारतात हा थोड्या वेगळ्या स्पेसिफिकेशनसह लाँच करण्यात आला आहे. कमी किंमत असून देखील कंपनीनं या फोनमध्ये अनेक पावरफुल फीचर्स दिले आहेत, ज्यात 90Hz डिस्प्ले, मीडियाटेक हीलियो G37 चिपसेट, 50-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 5000mAh च्या मोठ्या बॅटरीचा समावेश आहे.

Moto E32 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Motorola च्या Moto E32 स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.5 इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशनन HD+ 720×1,600 पिक्सल आणि 90Hz रिफ्रेश रेट आहे. तसेच Moto E32 मध्ये Helio G37 चिपसेट आहे. फोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. हे देखील वाचा: Jio 5G Plan Price: जियो 5जी टॅरिफ प्लॅनसाठी किती पैसे द्यावे लागणार आणि किती मिळणार 5G Data, जाणून घ्या

50MP Camera 5000mAh Battery Phone Moto E32 Launch In India Price Sale Flipkart

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल-कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 50-मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी यात फ्रंटला 8 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. फ्रंट आणि रियर दोन्ही कॅमेरे 30fps फुल एचडी व्हिडीओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतात.

50MP Camera 5000mAh Battery Phone Moto E32 Launch In India Price Sale Flipkart

पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 10W चार्जिंगसह 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी हँडसेटमध्ये ड्युअल 4जी वीओएलटीई, वाय-फाय 802.11एसी, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, मायक्रोएसडी कार्ड स्लॉट, यूएसबी-सी पोर्ट, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि 3.5 एमएम ऑडियो जॅक असे ऑप्शन मिळतात. इतकेच नव्हे तर फोन Android 12 OS आधारित Motorola च्या My UX वर चालतो. हे देखील वाचा: असं असावं नशीब! फ्लिपकार्टवर ऑर्डर केला होता स्वस्त मोबाइल, त्याऐवजी मिळाला नवाकोरा iPhone 14

50MP Camera 5000mAh Battery Phone Moto E32 Launch In India Price Sale Flipkart

Moto E32 Price आणि Sale

Moto E32 सिंगल व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. डिवाइसच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हर्जनची किंमत 10,499 रुपये ठेवण्यात आली आहे. या नव्या मोटोरोला बजेट स्मार्टफोनची विक्री ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टच्या माध्यमातून केली जाईल. कंपनीनं Moto E32 स्मार्टफोन आर्कटिक ब्लू आणि इको ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये भारतात सादर केला आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठीला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here