OnePlus Nord 2T - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 07 Mar 2023 07:16:33 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OPPO Reno 8 की OnePlus Nord 2T 5G; एकसारखी किंमत असलेल्या दोन्हींपैकी कोणता फोन आहे दमदार? https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-8-vs-oneplus-nord-2t-5g-india-price-specs-comparison/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-8-vs-oneplus-nord-2t-5g-india-price-specs-comparison/#respond Tue, 19 Jul 2022 12:38:23 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11544 OPPO Reno8 series अखेरीस भारतात लाँच करण्यात आला आहे. OPPO नं भारतात OPPO Reno 8 5G आणि OPPO Reno 8 Pro 5G स्मार्टफोन सादर केले आहेत. या दोन्ही स्मार्टफोन्सना भारतातील स्पर्धेचा सामना करावा लागणार आहे. यातील Reno8 स्मार्टफोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स पाहता काही दिवसांपूर्वी लाँच झालेला OnePlus Nord 2T या डिवाइसला चांगली टक्कर देत […]

The post OPPO Reno 8 की OnePlus Nord 2T 5G; एकसारखी किंमत असलेल्या दोन्हींपैकी कोणता फोन आहे दमदार? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO Reno8 series अखेरीस भारतात लाँच करण्यात आला आहे. OPPO नं भारतात OPPO Reno 8 5G आणि OPPO Reno 8 Pro 5G स्मार्टफोन सादर केले आहेत. या दोन्ही स्मार्टफोन्सना भारतातील स्पर्धेचा सामना करावा लागणार आहे. यातील Reno8 स्मार्टफोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स पाहता काही दिवसांपूर्वी लाँच झालेला OnePlus Nord 2T या डिवाइसला चांगली टक्कर देत आहे. त्यामुळे जर तुम्हाला Reno8 घ्यावा की वनप्लस नॉर्ड 2टी घ्यावा असा प्रश्न पडला असेल, पुढे आम्ही दोन्ही फोन्सच्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची तुलना केली आहे. यातून चित्र स्पष्ट होईल.

OPPO Reno 8 5G vs OnePlus Nord 2T 5G: price in India

OPPO Reno 8 5G शिमर गोल्ड आणि शिमर ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आहे. हा फोन एकच स्टोरेज ऑप्शनमध्ये उपलब्ध झाला. डिवाइसच्या 8GB रॅम व 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 29,990 रुपये आहे.

दुसरीकडे OnePlus Nord 2T 5G दोन व्हेरिएंटमध्ये येतो. बेस मॉडेलमध्ये 8GB रॅमसह 128GB स्टोरेज देण्यात आली आहे आणि याची किंमत 28,999 रुपये आहे. तर 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसाठी 33,999 रुपये मोजावे लागतील.

Design

OPPO Reno 8 स्मार्टफोन खूप स्टायलिश डिजाइनसह बाजारात आला आहे. फोनच्या फ्रंटला चारही बाजूंना बेजल लेस डिजाइन देण्यात आली आहे. तसेच टॉप लेफ्ट कॉर्नरला पंच होल कॅमेरा आहे. फोनच्या मागे असलेल्या कॅमेरा मॉड्यूलमध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या उजवीकडे पावर बटन व डावीकडे वॉल्यूम बटन आहेत. तसेच बॉटमला टाइप-सी चार्जिंग पोर्ट आणि स्पिकर ग्रिल मिळते.

वनप्लस नॉर्ड 2टी प्लास्टिक मिड-फ्रेमसह एक ग्लास सँडविच डिजाइनसह येतो. फोनच्या मागे सिल्की-स्मूद ग्लास आणि फ्रंटला गोरिल्ला ग्लासची सुरक्षा आहे. मागे ट्रिपल लेन्स असलेला मोठा कॅमेरा मॉड्यूल आहे. OnePlus Nord 2T मध्ये कोणतीही फॅन्सी LED नाही. त्याऐवजी यात Apple iPhones प्रमाणे एक अलर्ट स्लायडर आहे. तसेच फोनमध्ये ड्युअल सिम स्लॉटचा ऑप्शन पण मिळतो. हा फोन झेड फॉग आणि ग्रे शॅडो रंगात विकत घेता येईल.

Processor, RAM, and Storage

OPPO Reno8 मध्ये MediaTek Dimensity 1300 चिपसेटदही टाकडे देण्यात आली हा फोन अँड्रॉइड 12 बेस्ड कलरओएस 12.1 वर चालतो. तसेच फोनमध्ये 8GB रॅम आणि 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे.

OnePlus Nord 2T स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोर MediaTek Dimensity 1300 प्रोसेसर आणि Mali G77 GPU देण्यात आला आहे. या फोनमध्ये 12GB पर्यंत LPDDR4X RAM आणि 256GB पर्यंतची UFS3.1 स्टोरेज मिळते.

Display

OPPO Reno8 मध्ये 6.43-inch FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्लेचा स्क्रीन टू-बॉडी रेशियो 90.8 टक्के आहे. हा डिस्प्ले नेटफ्लिक्स आणि अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ द्वारे एचडी सर्टिफाईड आहे. तसेच हा एक SGS Eye Care Display आहे.

नॉर्ड 2 टीसाठी मध्ये कंपनीनं नॉर्ड 2 पॅनलचा उपयोग केला आहे. यात 90Hz रिफ्रेश रेट आणि HDR सर्टिफिकेशन सह 6.43-इंचाचा फुल HD + AMOLED पॅनल देण्यात आला आहे.

Camera

OPPO Reno8 मध्ये MariSilicon X हा वेगळा चिपसेट खास फोटोग्राफीसाठी देण्यात आला आहे. फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 50MP Sony IMX766 प्रायमरी, 2MP चा B&W सेन्सर, आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP चा Sony IMX709 शूटर मिळतो.

दूसरीकडे OnePlus Nord 2T 5G मध्ये देखील ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे ज्यात प्रायमरी कॅमेरा OIS, EIS सपोर्ट असलेला 50MP Sony IMX766 सेन्सर f/18 अपर्चरसह देण्यात आला आहे. सोबतीला 8MP ची अल्ट्रावाईड अँगल लेन्स आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर आहे. फ्रंटला AI सेल्फीसाठी 32MP Sony IMX615 सेल्फी शूटर आहे.

Battery and Connectivity

दोन्ही फोनमध्ये 4,500mAh battery देण्यात आली आहे. तसेच दोन्ही फोन 80W SUPERVOOC चार्जिंगला सपोर्ट करतात. ओप्पोनं मात्र दावा केला आहे की, OPPO Reno8 फोन फक्त 28 मिनिटांत फुल चार्ज होईल.

OPPO Reno 8 मध्ये 5G, 4G+, 4G, 3G आणि 2G नेटवर्क सपोर्ट आहे. तसेच यात Bluetooth v5.3 आणि Bluetooth Low Energy (BLE) चा सपोर्ट देखील मिळतो. OnePlus Nord 2T 5G मध्ये ड्युअल-बँड 4G आणि 5G सपोर्ट, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.2, GPS आणि डेटा ट्रांसफरसाठी USB टाइप-C पोर्ट देण्यात आला आहे.

The post OPPO Reno 8 की OnePlus Nord 2T 5G; एकसारखी किंमत असलेल्या दोन्हींपैकी कोणता फोन आहे दमदार? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-8-vs-oneplus-nord-2t-5g-india-price-specs-comparison/feed/ 0
Nothing Phone (1) ला विसरा! तेच फीचर्स मिळवा स्वस्तात; हे 5 फोन देत आहेत टक्कर https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-1-top-5-alternatives-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-1-top-5-alternatives-in-india/#respond Wed, 13 Jul 2022 13:25:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11372 कित्येक दिवस चर्चेत असलेला Nothing Phone (1) स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. जेव्हपासून कार्ल पेई यांनी वनप्लस सोडून नथिंगची स्थापना केली आहे तेव्हापासून या मोबाईलची वाट बघितली जात होती. आता हा फोन भारतासह जगभरात लाँच झाला आहे. Nothing Phone (1) मध्ये एक युनिक डिजाईन देण्यात आली आहे. कंपनीनं पारदर्शक बॅक पॅनलवर एलईडी लाईट्स देऊन […]

The post Nothing Phone (1) ला विसरा! तेच फीचर्स मिळवा स्वस्तात; हे 5 फोन देत आहेत टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
कित्येक दिवस चर्चेत असलेला Nothing Phone (1) स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. जेव्हपासून कार्ल पेई यांनी वनप्लस सोडून नथिंगची स्थापना केली आहे तेव्हापासून या मोबाईलची वाट बघितली जात होती. आता हा फोन भारतासह जगभरात लाँच झाला आहे. Nothing Phone (1) मध्ये एक युनिक डिजाईन देण्यात आली आहे. कंपनीनं पारदर्शक बॅक पॅनलवर एलईडी लाईट्स देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच कंपनीच्या नथिंग ओएसचे कौतुक देखील केलं जात आहे. परंतु स्मार्टफोनचे अन्य स्पेसिफिकेशन अन्य अँड्रॉइड स्मार्टफोन सारखेच आहेत. भारतात अनेक डिवाइस आहेत जे Nothing Phone (1) ला टक्कर देऊ शकतात ज्यांची माहिती आम्ही या लेखात दिली आहे. परंतु त्याआधी Nothing Phone (1) ची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

Nothing Phone (1) चे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

फोनमध्ये 6.55 इंचाचा OLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. HDR10+ला सपोर्ट करणारा डिस्प्ले कोर्निंग गोरिल्ला ग्लासच्या कोटिंगसह येतो. यात क्वॉलकॉम Snapdragon 778G+ प्रोसेसरची टाकडे देण्यात आली आहे. फोनमध्ये अँड्रॉइड 12 सह नथिंग युआयची लेयरिंग देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 50 एमपीचे दोन सेन्सर आहेत. तर फ्रंटला 16MP चा सेल्फी शुटर मिळतो. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 4,500 एमएएचची बॅटरी मिळते जी 45 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Nothing Phone (1) स्मार्टफोनचे तीन व्हेरिएंट भारतीयांच्या भेटीला आले आहेत. बेस व्हेरिएंटमध्ये 8GB रॅम व 128GB स्टोरेज मिळते ज्याची किंमत 32,999 रुपये आहे. तर 8GB रॅम व 256GB स्टोरेज मॉडेल 35,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 12GB रॅम व 256GB स्टोरेज असलेला टॉप एन्ड मॉडेल 38,999 रुपयांमध्ये तुमचा होईल. लाँच ऑफर अंतर्गत हे तीन मॉडेल 1000 रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध होतील.

हे 5 फोन देतात Nothing Phone (1) ला टक्कर

  • OnePlus Nord 2T 5G
  • POCO F4 5G
  • iQOO Neo 6 5G
  • Samsung Galaxy M53 5G
  • Motorola Edge 30

OnePlus Nord 2T

OnePlus Nord 2T 5G

नथिंग ब्रँडचे फाउंडर कार्ल पेई हे वनप्लसचे देखील सहसंस्थापक आहेत. त्यामुळे त्यांच्या नव्या ब्रँडची सर्वात मोठी टक्कर वनप्लसशी आहे. 30 हजार रुपयांच्या बजेटमध्ये वनप्लस नॉर्ड 2टी 5जी नथिंग फोनला टक्कर देत आहे. Nord 2T मध्ये तुम्हाला 6.43 इंचाचा फुल एचडी+ AMOLED डिस्प्ले आहे, जो 90Hz स्क्रीन रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीनं हा MediaTek Dimensity 1300 प्रोसेसरसह सादर केला आहे. फोनमध्ये 12 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंत मेमरी मिळते. फोटोग्राफीसाठी 50MP + 8MP + 2MP चा ट्रिपल रियर कॅमेरा आहे. तर फ्रंटला 32MP चा सेल्फी कॅमेरा आहे. हा फोन 4500mAh च्या बॅटरीसह येतो. या फोनची किंमत 28,999 रुपयांपासून सुरु होते.

POCO F4 5G

Nothing Phone (1) ला शाओमीच्या सब-ब्रँड पोकोकडून 30 हजारांच्या बजेटमध्ये चांगली टक्कर मिळते. POCO F4 5G स्मार्टफोन फ्लॅगशिप ग्रेड Snapdragon 870 प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. जो स्टेबल, हीटिंग समस्या नसलेला चिपसेट आहे. फोनमध्ये ऑक्टा कोर प्रोसेसर 3.2GHz क्लॉक स्पीडसह देण्यात आला आहे. फोनमध्ये 6.67 इंचाचा AMOLED डिस्प्ले 120Hz स्क्रीन रिफ्रेश रेटसह मिळतो. फोनच्या मागे 64MP + 8MP + 2MP चा ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. सेल्फीसाठी 20 MP चा सेन्सर आहे. पावर बॅकअपसाठी 4500mAh ची बॅटरी मिळते. या फोनचा बेस व्हेरिएंट 27,999 रुपयांमध्ये फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल.

iQOO Neo 6 5G

या बजेटमध्ये iQOO Neo 6 5G देखील एक शानदार डिवाइस आहे जो Nothing Phone (1) साठी पर्याय ठरवू शकतो. हा फोन Snapdragon 870 प्रोसेसरवर चालतो आणि यात 8GB रॅमसह 128 जीबी स्टोरेज मिळते. यातील 6.62 इंचाची आमोलेड स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. या फोनमध्ये 4700 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे आणि ही 80 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्टसह येते. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 64MP + 8MP + 2MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. 29,999 रुपयांमध्ये फोनचा 8GB रॅम व्हेरिएंट अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध आहे.

Samsung Galaxy M53 5G

जर तुम्ही या प्राईस रेंजमध्ये सॅमसंगचा पर्याय शोधत असाल तर Galaxy M53 5G चा विचार करू शकता. या फोनमध्ये 6.7 इंचाचा Super AMOLED Plus डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. कंपनीनं हा MediaTek Dimensity 900 प्रोसेसरसह सादर केला आहे. सोबतीला 8GB रॅम पर्यंत आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन क्वॉड कॅमेरा सेटअपसह येतो. यात 108MP च्या मेन कॅमेऱ्यासह 8MP चा वाईड अँगल, 2MP चा डेप्थ आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर मिळतो. कंपनीनं यात 5000mAh ची बॅटरी दिली आहे. 26499 रुपयांमध्ये या फोनचा बेस व्हेरिएंट सॅमसंगच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

Motorola Edge 30

या बजेटमध्ये मोटोरोलाचा देखील हा फोन खूप चांगला आहे आणि नथिंग फोन 1 च्या ऐवजी Motorola Edge 30 चा चार्ट करता येईल. या फोनमध्ये 6.5 इंचाचा P-OLED डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेटसह दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात 50MP च्या मेन कॅमेऱ्यासह 50MP चा वाईड अँगल आणि 2MP चा डेप्थ सेन्सर मिळतो. तर 32MP चा फ्रंट कॅमेरा सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी वापरता येतो. पावर बॅकअपसाठी 4020mAh ची बॅटरी मिळते, जी 33वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीनं हा फोन Snapdragon 778G Plus प्रोसेसरसह सादर केला आहे आणि जो प्रोसेसर नथिंग फोनमध्ये देखील आहे. फ्लिपकार्टवरून हा फोन 27,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post Nothing Phone (1) ला विसरा! तेच फीचर्स मिळवा स्वस्तात; हे 5 फोन देत आहेत टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-1-top-5-alternatives-in-india/feed/ 0
12GB रॅम असलेल्या दमदार OnePlus Nord 2T चा पहिला सेल https://www.91mobiles.com/marathi/12gb-ram-phone-oneplus-nord-2t-first-sale-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/12gb-ram-phone-oneplus-nord-2t-first-sale-in-india/#respond Tue, 05 Jul 2022 06:54:47 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11117 OnePlus Nord 2T स्मार्टफोन पहिल्याच सेलमध्ये डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे.

The post 12GB रॅम असलेल्या दमदार OnePlus Nord 2T चा पहिला सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OnePlus Nord 2T स्मार्टफोन गेल्या आठवड्यात भारतीयांच्या भेटीला आला होता. 90Hz AMOLED डिस्प्ले, 32MP सेल्फी कॅमेरा, 12GB RAM आणि 4500mAh ची बॅटरी असलेल्या या हँडसेटची विक्री आजपासून सुरु होणार आहे. कंपनीनं OnePlus Nord 2T स्मार्टफोन भारतात मिड बजेट असलेल्या ग्राहकांसाठी सादर केला आहे. या फोनमध्ये वनप्लसचे जबरदस्त फीचर्स मिळतात तसेच किंमतही कमी ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे पहिल्याच सेलमध्ये OnePlus Nord 2T स्मार्टफोन डिस्काउंटसह विकत घेता येईल. पुढे आम्ही या OnePlus Nord 2T स्मार्टफोनची भारतीय किंमत, लाँच ऑफर, स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्सची माहिती दिली आहे.

OnePlus Nord 2T स्मार्टफोनची किंमत आणि ऑफर्स

OnePlus Nord 2T स्मार्टफोनची विक्री आज, 5 जुलैला दुपारी 12:00 वाजता ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon आणि OnePlus स्टोरवर सुरु होईल. लाँच ऑफर अंतर्गत ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवर ग्राहकांना 1500 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. तसेच डेबिट कार्डवरून EMI ऑप्शन निवडल्यास देखील डिस्काउंट मिळेल.

OnePlus Nord 2T स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट भारतात लाँच करण्यात आले आहेत. यातील फोनचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असेलल्या बेस व्हेरिएंटची किंमत 28,999 रुपये आहे. तर 12GB रॅम व 256GB स्टोरेज असलेला टॉप व्हेरिएंट 33,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

OnePlus Nord 2T चे स्पेसिफिकेशन्स

OnePlus Nord 2T स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट असलेला 6.43-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन Full HD+ आहे. सुरक्षेसाठीसाठी स्क्रीनला Corning Gorilla Glass 5 ची कोटिंग देण्यात आली आहे. वनप्लसच्या या फोनमध्ये अलर्ट स्लाइडर देण्यात आला आहे. त्याचबरोबर इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरची सुरक्षा मिळते. फोनमध्ये X-अ‍ॅक्सिस लीनियर मोटर, 4×4 MIMO, 5G, 4G LTE, Bluetooth 5.2, ड्युअल बँड Wi-Fi, NFC, आणि ड्युअल रियर स्टीरियो स्पिकर देखील मिळतो.

वनप्लसच्या या फोनमध्ये MediaTek चा Dimensity 1300 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये 12GB पर्यंतचा LPDDR4X RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज मिळते. वनप्लसचा हा फोन अँड्रॉइड 12 आधारित OxygenOS 12 वर चालतो. OnePlus Nord 2T स्मार्टफोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी आणि 80W SUPERVOOC चार्ज सपोर्टसह देण्यात आली आहे.

OnePlus Nord 2T स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 50MP चा Sony IMX766 प्रायमरी कॅमेरा सेन्सर OIS सपोर्टसह देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोनमध्ये 8MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP ची मोनो लेन्स मिळते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP चा Sony IMX615 कॅमेरा मिळतो.

The post 12GB रॅम असलेल्या दमदार OnePlus Nord 2T चा पहिला सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/12gb-ram-phone-oneplus-nord-2t-first-sale-in-india/feed/ 0
वनप्लसचा आणखी एक स्वस्त स्मार्टफोन भारतात; 50MP कॅमेरा, 80W फास्ट चार्जसह OnePlus Nord 2T ची एंट्री https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-2t-launched-in-india-know-price-specification-and-more/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-2t-launched-in-india-know-price-specification-and-more/#respond Fri, 01 Jul 2022 09:53:33 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11046 OnePlus Nord 2T 5G स्मार्टफोन MediaTek Dimensity प्रोसेसर, Android 12 आणि आमोलेड डिस्प्लेसह भारतात आला आहे.

The post वनप्लसचा आणखी एक स्वस्त स्मार्टफोन भारतात; 50MP कॅमेरा, 80W फास्ट चार्जसह OnePlus Nord 2T ची एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OnePlus नं आपल्या किफायतशीर नॉर्ड सीरिजचा विस्तार केला आहे. जागतिक बाजारात लाँच झालेल्या OnePlus Nord 2T स्मार्टफोनची भारतात एंट्री झाली आहे. कंपनीचे चाहते गेले कित्येक दिवस या मिडरेंज स्मार्टफोनची वाट पाहत होते. हा फोन गेल्यावर्षी लाँच झालेल्या Nord 2 ची जागा घेईल. OnePlus Nord 2T 5G मध्ये मीडियाटेकचा Dimensity 1300 प्रोसेसर देण्यात आला आहे.

OnePlus Nord 2T चे स्पेसिफिकेशन्स

OnePlus Nord 2T स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट असलेला 6.43-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन Full HD+ आहे. सुरक्षेसाठीसाठी स्क्रीनला Corning Gorilla Glass 5 ची कोटिंग देण्यात आली आहे. वनप्लसच्या या फोनमध्ये अलर्ट स्लाइडर देण्यात आला आहे. त्याचबरोबर इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरची सुरक्षा मिळते. फोनमध्ये X-अ‍ॅक्सिस लीनियर मोटर, 4×4 MIMO, 5G, 4G LTE, Bluetooth 5.2, ड्युअल बँड Wi-Fi, NFC, आणि ड्युअल रियर स्टीरियो स्पिकर देखील मिळतो.

वनप्लसच्या या फोनमध्ये MediaTek चा Dimensity 1300 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये 12GB पर्यंतचा LPDDR4X RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज मिळते. वनप्लसचा हा फोन अँड्रॉइड 12 आधारित OxygenOS 12 वर चालतो. OnePlus Nord 2T स्मार्टफोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी आणि 80W SUPERVOOC चार्ज सपोर्टसह देण्यात आली आहे.

OnePlus Nord 2T स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 50MP चा Sony IMX766 प्रायमरी कॅमेरा सेन्सर OIS सपोर्टसह देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोनमध्ये 8MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP ची मोनो लेन्स मिळते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP चा Sony IMX615 कॅमेरा मिळतो.

OnePlus Nord 2T 5G ची किंमत

OnePlus Nord 2T स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट भारतात लाँच करण्यात आले आहेत, ज्यात 8GB RAM + 256GB आणि 12GB RAM + 256GB व्हेरिएंटचा समावेश आहे. यातील 8GB RAM ची किंमत 28,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 12GB RAM मॉडेल 33,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. खरेदीसाठी आयसीआयसीआय बँकेच्या कार्डचा वापर केल्यास 1,500 रुपयांची सूट मिळेल. हा फोन 5 जुलै पासून Amazon, OnePlus.in, आणि OnePlus च्या स्टोरवर ग्रे शॅडो आणि झेड फॉग कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल.

The post वनप्लसचा आणखी एक स्वस्त स्मार्टफोन भारतात; 50MP कॅमेरा, 80W फास्ट चार्जसह OnePlus Nord 2T ची एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-2t-launched-in-india-know-price-specification-and-more/feed/ 0