12GB रॅम असलेल्या दमदार OnePlus Nord 2T चा पहिला सेल

OnePlus Nord 2T स्मार्टफोन गेल्या आठवड्यात भारतीयांच्या भेटीला आला होता. 90Hz AMOLED डिस्प्ले, 32MP सेल्फी कॅमेरा, 12GB RAM आणि 4500mAh ची बॅटरी असलेल्या या हँडसेटची विक्री आजपासून सुरु होणार आहे. कंपनीनं OnePlus Nord 2T स्मार्टफोन भारतात मिड बजेट असलेल्या ग्राहकांसाठी सादर केला आहे. या फोनमध्ये वनप्लसचे जबरदस्त फीचर्स मिळतात तसेच किंमतही कमी ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे पहिल्याच सेलमध्ये OnePlus Nord 2T स्मार्टफोन डिस्काउंटसह विकत घेता येईल. पुढे आम्ही या OnePlus Nord 2T स्मार्टफोनची भारतीय किंमत, लाँच ऑफर, स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्सची माहिती दिली आहे.

OnePlus Nord 2T स्मार्टफोनची किंमत आणि ऑफर्स

OnePlus Nord 2T स्मार्टफोनची विक्री आज, 5 जुलैला दुपारी 12:00 वाजता ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon आणि OnePlus स्टोरवर सुरु होईल. लाँच ऑफर अंतर्गत ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवर ग्राहकांना 1500 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. तसेच डेबिट कार्डवरून EMI ऑप्शन निवडल्यास देखील डिस्काउंट मिळेल.

OnePlus Nord 2T स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट भारतात लाँच करण्यात आले आहेत. यातील फोनचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असेलल्या बेस व्हेरिएंटची किंमत 28,999 रुपये आहे. तर 12GB रॅम व 256GB स्टोरेज असलेला टॉप व्हेरिएंट 33,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

OnePlus Nord 2T चे स्पेसिफिकेशन्स

OnePlus Nord 2T स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट असलेला 6.43-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन Full HD+ आहे. सुरक्षेसाठीसाठी स्क्रीनला Corning Gorilla Glass 5 ची कोटिंग देण्यात आली आहे. वनप्लसच्या या फोनमध्ये अलर्ट स्लाइडर देण्यात आला आहे. त्याचबरोबर इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरची सुरक्षा मिळते. फोनमध्ये X-अ‍ॅक्सिस लीनियर मोटर, 4×4 MIMO, 5G, 4G LTE, Bluetooth 5.2, ड्युअल बँड Wi-Fi, NFC, आणि ड्युअल रियर स्टीरियो स्पिकर देखील मिळतो.

वनप्लसच्या या फोनमध्ये MediaTek चा Dimensity 1300 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये 12GB पर्यंतचा LPDDR4X RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज मिळते. वनप्लसचा हा फोन अँड्रॉइड 12 आधारित OxygenOS 12 वर चालतो. OnePlus Nord 2T स्मार्टफोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी आणि 80W SUPERVOOC चार्ज सपोर्टसह देण्यात आली आहे.

OnePlus Nord 2T स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 50MP चा Sony IMX766 प्रायमरी कॅमेरा सेन्सर OIS सपोर्टसह देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोनमध्ये 8MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP ची मोनो लेन्स मिळते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP चा Sony IMX615 कॅमेरा मिळतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here