Online Fraud - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 31 Mar 2023 12:22:17 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 ऑनलाईन फसवणूक आणि Cyber Crime ची तक्रार पोलीस स्टेशनला न जात कशी करायची? जाणून घ्या https://www.91mobiles.com/marathi/how-to-file-online-complaint-for-cyber-crime-in-india-know-process-step-by-step/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-file-online-complaint-for-cyber-crime-in-india-know-process-step-by-step/#respond Sun, 02 Apr 2023 03:30:23 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12403 भारतात इंटरनेटचा वापर वेगानं वाढत आहे. स्वस्त डेटा आणि स्मार्टफोन्समुळे सर्व सामान्य जनता ऑनलाईन येऊ लागली आहे. फक्त सोशल मीडिया आणि करमणूक नव्हे तर बँकेचे व्यवहार आणि पैसे व महत्वाच्या कागदपत्रांची देवाण घेवाण देखील ऑनलाईन होऊ लागली आहे. परंतु ऑनलाइन या ऑनलाईन विश्वात सायबर गुन्हे आणि फ्रॉड्सची संख्या देखील वाढत आहे. Facebook-Instagram सारख्या सोशल मीडिया […]

The post ऑनलाईन फसवणूक आणि Cyber Crime ची तक्रार पोलीस स्टेशनला न जात कशी करायची? जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतात इंटरनेटचा वापर वेगानं वाढत आहे. स्वस्त डेटा आणि स्मार्टफोन्समुळे सर्व सामान्य जनता ऑनलाईन येऊ लागली आहे. फक्त सोशल मीडिया आणि करमणूक नव्हे तर बँकेचे व्यवहार आणि पैसे व महत्वाच्या कागदपत्रांची देवाण घेवाण देखील ऑनलाईन होऊ लागली आहे. परंतु ऑनलाइन या ऑनलाईन विश्वात सायबर गुन्हे आणि फ्रॉड्सची संख्या देखील वाढत आहे. Facebook-Instagram सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपासून डिजिटल पेमेंट व ऑनलाईन शॉपिंग इत्यादी बाबतीत Cyber Crime च्या घटना समोर येत आहेत.

काही मिनिटांच्या फोन कॉल आणि एखादं अ‍ॅप मोबाइलमध्ये डाउनलोड केल्यानं लोकांच्या बँक अकाऊंटमधून पैसे चोरले जात आहेत. मध्यमवर्गीय कुटुंब आणि भोळे लोक अशा सायबर गुन्ह्यांना जास्त बळी पडतात. आज आम्ही आमच्या वाचकांना सायबर गुन्ह्याला बळी पडल्यावर त्याची तक्रार ऑनलाईन कशी करायची, याची माहिती देणार आहोत. हे देखील वाचा: तुमचा Xiaomi फोन बनावट तर नाही ना? फसवणूक होण्याआधी अशी करून घ्या खात्री

Cyber Crime ची ऑनलाइन तक्रार कशी करायची

1. सर्वप्रथम राष्ट्रीय सायबर गुन्हे रिपोर्टिंग पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाइटवर जा, यासाठी cybercrime.gov.in वर क्लिक करा.

2. इथे पोर्टल संबंधित माहिती सोबतच युजरला विचारले जाईल की त्यांच्याद्वारे दिलेली सर्व माहिती योग्य आहे. ते मान्य करून पुढे जा.

3. इथे Report Cyber Crime Related to Women/Child आणि Report Other Cyber Crime चे दोन ऑप्शन आहेत. तुम्हाला जी तक्रार कार्याची आहे त्यावर क्लिक करा.

4. फसवणूक, फिशिंग, हॅकिंग व फ्रॉड सारख्या घटना ‘अदर सायबर क्राइम’ अंतगर्त येतात. त्यावर क्लिक केल्यावर मोबाइल नंबरसह अन्य माहिती द्यावी लागेल.

5. तर दुसरीकडे ‘सायबर क्राइम रिलेटेड टू विमेन/चिल्ड्रेन’ मध्ये पॉर्नोग्राफी, ऑनलाइन बुलिंग आणि Sexually Explicit कंटेंटचा समावेश आहे, ज्यांची तक्रार या सेग्मेंट अंतगर्त नोंदवता येईल.

6. इथे Report Anonymously आणि Report And Track दोन ऑप्शन देण्यात आले आहेत. ज्यात तुमची तुमची ओळख लपवून देखील सायबर क्राइमची तक्रार करता येते. गरजेनुसार युजर्स एका ऑप्शनची निवड करू शकतात. हे देखील वाचा: गोगल गायीच्या स्पिडनं चालू आहे का Jio चं इंटरनेट? ‘ही’ सेटिंग बदलताच मिळेल रॉकेट स्पीड

7. क्राइम कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर आरोपीचं नाव, जागा आणि पूर्वे मागितले जातील. सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर नंतर तक्रार सबमिट करा.

8. सायबर क्राइम रिपोर्ट केल्यानंतर एका यूनिक नंबरच्या स्वरूपात कम्प्लेंट आयडी दिला जाईल. या नंबरच्या माध्यमातून नंतर तुमची तक्रार ट्रॅक करता येईल.

अशी करा तक्रार ट्रॅक

9. तक्रार नोंदवल्यानंतर तिचं स्टेटस चेक करण्यासाठी आणि ट्रॅक करण्यासाठी सर्वप्रथम पोर्टलवर लॉग-इन करावं लागेल. त्यानंतर Report And Track बटनवर क्लिक करा.

10. इथे आधीचा कम्प्लेंट आयडी मागितला जाईल जो रिकाम्या जागी भरावा लागेल, त्यामुळे राष्ट्रीय सायबर गुन्हे रिपोर्टिंग पोर्टलद्वारे करण्यात आलेल्या कारवाईची माहिती समोर येईल.

हे पोर्टल थेट भारत सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत येतं. याचा उद्देश पोलीस स्टेशनला न जाता ऑनलाइन पद्धतीनं गुन्हे नोंदवणं आहे. इथे तुमची ओळख न सांगता देखील तक्रार करता येते. तसेच अन्य माहिती किंवा मदतीसाठी भारत सरकारच्या विभागाद्वारे जारी टोल फ्री नंबर ‘155260’ वर संपर्क देखील केला जाऊ शकतो.

The post ऑनलाईन फसवणूक आणि Cyber Crime ची तक्रार पोलीस स्टेशनला न जात कशी करायची? जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-file-online-complaint-for-cyber-crime-in-india-know-process-step-by-step/feed/ 0
स्वस्त कर्ज घेणे पडेल महागात, खोट्या कॉलपासून सावधान, मिनिटांत रिकामे होऊ शकते बॅंक अकाउंट https://www.91mobiles.com/marathi/sbi-alert-fake-call-loan-offer-sbi-loan-finance-ltd/ https://www.91mobiles.com/marathi/sbi-alert-fake-call-loan-offer-sbi-loan-finance-ltd/#respond Wed, 21 Apr 2021 13:20:11 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10665 SBI ने ट्वीट करून म्हटले आहे कि SBI Loan Finance Ltd नावाने जर तुम्हाला कोणताही फोन कॉल आला तर लक्षात ठेवा कि हा एक फसवा कॉल असू शकतो कारण SBI Loan Finance Ltd चा बँकेशी कोणताही संबंध नाही.

The post स्वस्त कर्ज घेणे पडेल महागात, खोट्या कॉलपासून सावधान, मिनिटांत रिकामे होऊ शकते बॅंक अकाउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Hello सर, मी अमक्या तमक्या बँकेतून बोलत आहे. आम्ही तुम्हाला लाखाचे कर्ज मिनिटांत देऊ आणि तेही अगदी कमी व्याजासह. असा फोन कॉल आयुष्यात एकदातरी तुमच्याकडे नक्की आला असेल, पण तुम्हाला माहित आहे का हा एक फसवणुकीचा नवीन प्रकार पण आहे. कारण सायबर गुन्हेगार Loan Offer घेऊन तुमच्याशी संपर्क साधतात. तसेच कॉल दरम्यान तुम्हाला त्यांच्या जाळ्यात ओढून महत्वाची आणि खाजगी माहिती मिळवून लाखोंचा गंडा घालतात. अश्याच फ्रॉडचा उल्लेख करत एसबीआयने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना सावध केले आहे. (SBI alert fake call loan offer SBI Loan Finance LTD)

SBI ने जारी केला अलर्ट

आपल्या ग्राहकांच्या काळजीपोटी SBI ने ट्वीट करून म्हटले आहे कि SBI Loan Finance Ltd नावाने जर तुम्हाला कोणताही फोन कॉल आला तर लक्षात ठेवा कि हा एक फसवा कॉल असू शकतो कारण SBI Loan Finance Ltd चा बँकेशी कोणताही संबंध नाही. तुम्हाला कॉल करणारी व्यक्ती तुम्हाला लोन ऑफर करू शकते आणि तुम्हाला शिकार बनवू शकते. बॅंकने ट्वीटमध्ये सांगितले आहे कि हि फसवणूक असू शकते. SBI Loan Finance Ltd नावाच्या कोणत्याही कंपनीचा बँकेशी कोणताही संबंध नाही.

माहिती देऊ नका

लोन देण्याच्या नावाखाली हॅकर्स तुम्हाला तुमचे नाव, पत्ता पॅन नंबर, आधार नंबर इत्यादी विचारतात, ज्याच्या माध्यमातून ते तुमचे बॅंक अकाउंट रिकामे करतात. बऱ्याचदा बँकेच्या नावाने कोणी कॉल केला कि आपण कोणताही तपास न करता त्या व्यक्तीला आपली खाजगी माहिती शेयर करतो. असे करू नये. बॅंक कधीच तुमच्याकडे ओटीपी, पिन आणि पर्सनल डिटेल मागत नाही.

ऑनलाइन फसवणुकीत अडकल्यास कुठे तक्रार करावी

SBI ने ऑफिशियल ट्विटर अकाउंटवर शेयर केलेल्या माहितीनुसार, बॅंकने सांगितले आहे कि जर तुमची फसवणूक झाली तर cybercrime.gov.in वर किंवा स्थानिक पोलीस स्टेशनला सायबर क्राइमची माहिती द्या. अश्या प्रकरणात तक्रार गुन्हा झाल्यानंतर जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर करावी.

असे वाचावा स्वतःला बॅंकिंग फ्रॉडपासून

-वेळोवेळी आपल्या बँकेच्या अकाउंटचा पासवर्ड बदलत रहा.

-कधीही फोन, ईमेल किंवा एसएमएसच्या माध्यमातून आपली गोपनीय माहिती शेयर करू नका.

-बँकेत जाऊन किंवा बँकेच्या ऑफिशियल वेबसाइटवर माहिती करा.

-व्हाट्सअ‍ॅपवर येणाऱ्या कोणत्याही मेसेजमधील लिंक क्लिक करू नका.

The post स्वस्त कर्ज घेणे पडेल महागात, खोट्या कॉलपासून सावधान, मिनिटांत रिकामे होऊ शकते बॅंक अकाउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/sbi-alert-fake-call-loan-offer-sbi-loan-finance-ltd/feed/ 0
KBC च्या नावावर होत आहे फसवणूक, या नंबर पासून सावधान रहा, एक WhatsApp कॉल करेल अकाउंट रिकामे https://www.91mobiles.com/marathi/kbc-lottery-prize-winner-fraud-whatsapp-call/ https://www.91mobiles.com/marathi/kbc-lottery-prize-winner-fraud-whatsapp-call/#respond Fri, 17 Jul 2020 09:56:12 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7664 पैसे कधी आणि कसे त्यांना मिळतील तर तेव्हा कॉलर म्हणाला कि बक्षिसाची रक्कम मिळवण्यासाठी खुशबूला बॅंक टू बॅंक ट्रांसफर रिसीट मिळवावी लागेल आणि त्यासाठी सांगिलेल्या बॅंक अकाउंट मध्ये 15,000 रुपये भरावे लागतील.

The post KBC च्या नावावर होत आहे फसवणूक, या नंबर पासून सावधान रहा, एक WhatsApp कॉल करेल अकाउंट रिकामे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
कौन बनेगा करोड़पतिचे नाव तर प्रत्येक भारतीयाला माहित आहे. फक्त हा गेम शो नाही तर हा होस्ट करणारे बॉलीवुडचे शंहशाह अमिताभ बच्चन हे पण लोकांना तेवढेच आवडतात. हा कार्यक्रम बघत असताना तुमच्या मनात पण आले असेल कि, ‘मी पण केबीसी च्या या स्टेज वर गेलो तर’. पण तुम्हाला माहित आहे का तुमच्या याच स्वप्नाचा आणि पैसे जिकंण्याच्या इच्छेचा काही लोक फायदा घेत आहेत. देशात ‘कौन बनेगा करोड़पति’ च्या नावावर लोकांना फ्रॉड WhatsApp कॉल केला जात आहे ज्यात सामान्य लोक अडकत आहेत. पुढे आम्ही KBC फ्रॉडच्या अश्याच एका घटनेची माहिती दिली आहे आणि सोबतच तो नंबर पण सांगितलं आहे ज्या पासून तुम्हाला स्वतःला आणि आपल्या कुटुंबियांना वाचवायचे आहे.

KBC च्या नावावर चालू असलेल्या फ्रॉड लोकांच्या टीमने यावेळी खुशबू नावाच्या एका युवतीला आपल्यात जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला आहे आणि या तरुणीने हि घटना 91मोबाईल्सला सांगितली आहे. खुशबू दिल्लीच्या एका खाजगी दवाखान्यात काम करते. गुरुवारी ती आपल्या घरच्या कामात व्यस्त होती आणि दुपारी 1 वाजताच्या आसपास तिला एका Unknown नंबर वरून WhatsApp कॉल आला. हा नंबर 6196397823 असा होता. आपल्या व्यवसायामुळे खुशबूने नंबर सेव नसतानाही तो कॉल रिसीव केला.

फोन उचलल्यानंतर कॉलर बोलला कि तो KBC म्हणजे कौन बनेगा करोड़पति मधून बोलत आहे आणि एक लकी ड्रा मध्ये खुशबूच्या नंबर वर बक्षिस लागले आहे. खुशबूने जेव्हा विचारले कि तिचा नंबर केबीसी कडे कसा गेला तेव्हा त्याने उत्तर दिले कि, केबीसी टीमने हजारो नंबर्स मधून एक ड्रा काढला होता ज्यात फक्त खुशबूचा नंबर निवडण्यात आला आणि या लकी ड्रा मध्ये खुशबूच्या नंबर वर 25,00,000 रुपयांचे बक्षीस लागले आहे.

25 लाख मिळवण्यासाठी द्यावे लागतील 15,000 रुपये

एकतर अनोळखी नंबर आणि KBC लकी ड्रा मध्ये 25 लाखांचे बक्षीस ऐकून खुशबूला विश्वास बसला कि हा एक फ्रॉड कॉल आहे पण तरीही तिने याच्या तळाशी जाण्याचा निर्णय घेतला. बक्षीस जिंकल्याचा आनंद व्यक्त करत खुशबूने विचारले कि हे पैसे कधी आणि कसे त्यांना मिळतील तर तेव्हा कॉलर म्हणाला कि बक्षिसाची रक्कम मिळवण्यासाठी खुशबूला बॅंक टू बॅंक ट्रांसफर रिसीट मिळवावी लागेल आणि त्यासाठी सांगिलेल्या बॅंक अकाउंट मध्ये 15,000 रुपये भरावे लागतील. खुशबूला शब्द देण्यात आला आहे कि हा ट्रांसफर चार्ज तिला 25 लाखांसोबत परत दिला जाईल.

कॉल रेकॉर्डिंगचे नाव काढताच समोर आले सत्य

तरुणीने 15,000 रुपये भरण्यासाठी होकार दिला आणि कोणत्या अकाउंट मध्ये पैसे टाकायचे आहेत हे विचारले. KBC टीमने अकाउंट नंबर सांगायला सुरवात करताच खुशबू म्हणाली कि, ती नंबर लिहू शकणार नाही म्हणून ती कॉल रेकॉर्डिंग ऑन करत आहे. रेकॉर्डिंग होत असल्याचे ऐकताच कॉलरला समजले कि त्याचे भांडे फुटले आहे आणि रागात काही अपशब्द वापरून फोन स्वतः कट केला.

इथे आम्हाला आमच्या वाचकांना सांगायचे आहे कि अनेक साधे भोळे लोक आणि वयोवृद्ध लोक अशाप्रकारच्या फसवणुकीला बळी पडतात. अशी फसवणूक करणारे लोक तुम्हाला बॅंक अकाउंट मध्ये पैसे जमा करण्यासाठी सांगतीलच असे नाही. बऱ्याचदा असे मेसेजेस पाठवले जातात ज्यात काही लिंक्स दिलेल्या असतात आहेत आणि या लिंक्स वर क्लिक केल्यावर तुमचा फोन हॅक होऊ शकतो आणि बॅंक अकाउंट मधून पैसे पण जाऊ शकतात. 91मोबाईल्स मराठी आपल्या वाचकांना सल्ला देत आहे कि अशाप्रकारच्या कॉल करणाऱ्या लोकांच्या फसवणुकीला बळी पडू नका आणि आपल्या कुटुंबियांना पण अश्या फ्रॉड्सची माहिती द्या.

The post KBC च्या नावावर होत आहे फसवणूक, या नंबर पासून सावधान रहा, एक WhatsApp कॉल करेल अकाउंट रिकामे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/kbc-lottery-prize-winner-fraud-whatsapp-call/feed/ 0
ऑनलाइन फसवणुकीची अजून एक शिकार, अमेझॉनवरून मागवला होता Xiaomi Redmi 7, फोन न मिळताच दाखवला Delivered https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7-online-fraud-fake-delivery-by-amazon-india/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7-online-fraud-fake-delivery-by-amazon-india/#respond Tue, 03 Dec 2019 18:59:25 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5955 प्रकरण तेव्हा वाढले जेव्हा अमेझॉनने स्पष्ट म्हटले कि त्यांनी फोन डिलीवर केला आहे आणि ते याबाबतीत कोणतीही मदत करू शकत नाहीत.

The post ऑनलाइन फसवणुकीची अजून एक शिकार, अमेझॉनवरून मागवला होता Xiaomi Redmi 7, फोन न मिळताच दाखवला Delivered first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
कालच एक बातमी समोर आली होती ज्यात ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून 27,500 रुपयांचा कॅमेरा मागवणाऱ्या व्यक्तीच्या बॉक्स मध्ये विटा डिलीवर केल्या गेल्या. ऑनलाइन फसवणुकीची शिकार हा व्यक्ती अजूनही आपल्या महाग प्रोडक्टची वाट बघत आहे, कि कधी कंपनी त्याचा कॅमेरा देईल. असेच अजून एक प्रकरण प्रकाशात आले आहे ज्यात शॉपिंग साइट अमेझॉन वरून Xiaomi Redmi 7 स्मार्टफोन मागितल्यावर तरुणाचे पैसे तर कट केले पण फोन त्याच्याकडे डिलीवरच झाला नाही. प्रकरण तेव्हा वाढले जेव्हा अमेझॉनने स्पष्ट म्हटले कि त्यांनी फोन डिलीवर केला आहे आणि ते याबाबतीत कोणतीही मदत करू शकत नाहीत.

बदलत्या काळात आणि ट्रेंडसह चालताना काहीजण आपल्या कमाईचा काही भाग फक्त इंटरनेट कनेक्शनद्वारे असे लोकांना देतात ज्यांच्यबद्दल त्यांना माहित नसते. पैसे देऊन सामान्य माणूस आपला हक्क मिळण्याची वाट बघत असतो परंतु ना त्याचे सामान मिळते ना त्याचे पैसे. अशीच फसवणूक झाली आहे हरियाणा मधील हिसार जिल्ह्यातील प्रवीण कुमार सोबत.

Xiaomi Redmi 7 विकत घेणे पडले महाग

प्रवीण कुमार याने Xiaomi चा लो बजेट स्मार्टफोन Redmi 7 अमेझॉन वरून विकत घेतला होता. Xiaomi Redmi 7 च्या सेल मध्ये प्रवीणने प्रीपेड पेमेंट करून अमेझॉन वर फोन ऑर्डर केला होता. फोन विकत घेताना प्रवीणने 5,399 रुपये दिले होते. पेमेंट झाल्यावर अमेझॉन कडून ऑर्डर यशस्वी झाल्याचा मेसेज आला आणि डिलीवरीची तारीख सांगण्यात आली. प्रवीण कुमारने Xiaomi Redmi 7 चा 32जीबी स्टोरेज वेरिएंट 3 ऑक्टोबरला ऑर्डर केला होता जो 9 ऑक्टोबरला डिलीवरी होणार होता.

एक दिवस आधीच आला ‘Phone Delivered’ चा मेसेज

नवीन Xiaomi Redmi 7 फोन 9 ऑक्टोबरला डिलीवर होणार होता, पण एक दिवस आधीच म्हणजे 8 ऑक्टोबरला प्रवीणला ईमेल आला कि, ‘तुमचा फोन यशस्वीरीत्या डिलीवर झाला आहे.’ हा मेसेज पाहून प्रवीणला धक्का बसला आणि त्याने अमेझॉन इंडियाच्या कस्टमर केयर नंबर वर कॉल केला. अमेझॉनने सांगितले कि, ‘हा मेल चुकून पाठवला गेला आहे. प्रतीक्षा करा, तुमचा फोन 10 ऑक्टोबरला डिलीवर केला जाईल.’

मेल चुकून सेंड झालेला सांगून अमेझॉनने दोन दिवसानंतर फोन डिलीवर करणार असल्याचे सांगितले. पण जेव्हा सांगितलेल्या तारखेला पण Xiaomi Redmi 7 फोन आला नाही तेव्हा ग्राहकाने पुन्हा अमेझॉनला फोन केला आणि तेव्हा ते म्हणाले कि, ’14 ऑक्टोबर पर्यंत प्रतीक्षा करा, आम्ही प्रकरणाची चौकशी करू.’ पण 14 ऑक्टोबरला अमेझॉनने काबुल केले कि प्रवीणचा फोन ‘हरवला’ आहे तसेच कंपनी 18 ऑक्टोबर पर्यंत त्याचे पैसे परत देईल.

मिळाली फक्त तारीख पे तारीख

फोन ऑर्डर केल्यानंतर दोन आठवडे होऊनही जेव्हा 18 ऑक्टोबरला पैसे परत मिळाले नाहीत तेव्हा प्रवीणने अमेझॉनला पुन्हा फोन लावला. यावेळी त्याला सांगण्यात आले कि, ‘तुम्हाला चुकीची माहिती देण्यात आली आहे, तुमचे पैसे 23 ऑक्टोबर पर्यंत तुमच्या अकाउंट मध्ये क्रेडिट होतील.’ पैशांची वाट बघण्यात 23 ऑक्टोबरचा दिवस गेला आणि मग प्रवीणने 24 ऑक्टोबरला पुन्हा अमेझॉनला कॉल केला. पण यावेळी अमेझॉनचे उत्तर होते कि, ‘तुमचा फोन 8 ऑक्टोबरलाच डिलीवर केला गेला आहे.’

अमेझॉनने प्रवीण कुमारला उद्धटपणे उत्तर दिले कि तुमचा फोन आम्ही डिलीवर केला आहे आणि आमच्याकडे डिलीवर डिटेल्स सोबतच तुमची सही पण आहे. प्रवीणला पहिला झटका या गोष्टीचा लागला कि त्याचे पैसे पाण्यात गेले आहेत, तर दुसरा झटका फोन न मिळता अमेझॉनकडे त्याची सही जाण्याचा लागला. तसेच जेव्हा अमेझॉनला सही दाखवण्यास सांगण्यात आले तेच कंपनीला स्पष्ट नकार दिला.

Xiaomi भारतातील सर्वात मोठा स्मार्टफोन ब्रांड आहे आणि Amazon इंडियन ई-कॉमर्स क्षेत्रातील मोठी कंपनी. Xiaomi स्मार्टफोन डिलीवरीच्या नावावर कंपनीच्या नाकाखाली रॅकेट चालू आहे, याची माहिती क्वचितच स्वतः Xiaomi ला असेल. पण Amazon ने असे प्रकरण गांभीर्याने न घेणे कंपनीप्रति नकरात्मक विचार करण्यास भाग पाडते तसेच ऑनलाइन शॉपिंगच्या नावाखाली होत असलेल्या अश्या फसवणुकीमुळे सामान्यांच्या खिश्याला कात्री लागते. Xiaomi Redmi 7 ऑर्डर करणाऱ्या प्रवीण कुमारने Amazon द्वारा करण्यात आलेल्या या फसवणुकीच्या विरोधात ग्राहक न्यायालयात केस दाखल केली आहे.

प्रथमदर्शनी हे प्रकरण स्थानिक गडबडीचे वाटते. पण तरीही या प्रकरणी अमेझॉनच्या उत्तराची वाट बघितली जात आहे, जे मिळताच दुसरी बाजू पण अपडेट केली जाईल.

The post ऑनलाइन फसवणुकीची अजून एक शिकार, अमेझॉनवरून मागवला होता Xiaomi Redmi 7, फोन न मिळताच दाखवला Delivered first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7-online-fraud-fake-delivery-by-amazon-india/feed/ 0