स्वस्त कर्ज घेणे पडेल महागात, खोट्या कॉलपासून सावधान, मिनिटांत रिकामे होऊ शकते बॅंक अकाउंट

hacker

Hello सर, मी अमक्या तमक्या बँकेतून बोलत आहे. आम्ही तुम्हाला लाखाचे कर्ज मिनिटांत देऊ आणि तेही अगदी कमी व्याजासह. असा फोन कॉल आयुष्यात एकदातरी तुमच्याकडे नक्की आला असेल, पण तुम्हाला माहित आहे का हा एक फसवणुकीचा नवीन प्रकार पण आहे. कारण सायबर गुन्हेगार Loan Offer घेऊन तुमच्याशी संपर्क साधतात. तसेच कॉल दरम्यान तुम्हाला त्यांच्या जाळ्यात ओढून महत्वाची आणि खाजगी माहिती मिळवून लाखोंचा गंडा घालतात. अश्याच फ्रॉडचा उल्लेख करत एसबीआयने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना सावध केले आहे. (SBI alert fake call loan offer SBI Loan Finance LTD)

SBI ने जारी केला अलर्ट

आपल्या ग्राहकांच्या काळजीपोटी SBI ने ट्वीट करून म्हटले आहे कि SBI Loan Finance Ltd नावाने जर तुम्हाला कोणताही फोन कॉल आला तर लक्षात ठेवा कि हा एक फसवा कॉल असू शकतो कारण SBI Loan Finance Ltd चा बँकेशी कोणताही संबंध नाही. तुम्हाला कॉल करणारी व्यक्ती तुम्हाला लोन ऑफर करू शकते आणि तुम्हाला शिकार बनवू शकते. बॅंकने ट्वीटमध्ये सांगितले आहे कि हि फसवणूक असू शकते. SBI Loan Finance Ltd नावाच्या कोणत्याही कंपनीचा बँकेशी कोणताही संबंध नाही.

माहिती देऊ नका

लोन देण्याच्या नावाखाली हॅकर्स तुम्हाला तुमचे नाव, पत्ता पॅन नंबर, आधार नंबर इत्यादी विचारतात, ज्याच्या माध्यमातून ते तुमचे बॅंक अकाउंट रिकामे करतात. बऱ्याचदा बँकेच्या नावाने कोणी कॉल केला कि आपण कोणताही तपास न करता त्या व्यक्तीला आपली खाजगी माहिती शेयर करतो. असे करू नये. बॅंक कधीच तुमच्याकडे ओटीपी, पिन आणि पर्सनल डिटेल मागत नाही.

ऑनलाइन फसवणुकीत अडकल्यास कुठे तक्रार करावी

SBI ने ऑफिशियल ट्विटर अकाउंटवर शेयर केलेल्या माहितीनुसार, बॅंकने सांगितले आहे कि जर तुमची फसवणूक झाली तर cybercrime.gov.in वर किंवा स्थानिक पोलीस स्टेशनला सायबर क्राइमची माहिती द्या. अश्या प्रकरणात तक्रार गुन्हा झाल्यानंतर जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर करावी.

असे वाचावा स्वतःला बॅंकिंग फ्रॉडपासून

-वेळोवेळी आपल्या बँकेच्या अकाउंटचा पासवर्ड बदलत रहा.

-कधीही फोन, ईमेल किंवा एसएमएसच्या माध्यमातून आपली गोपनीय माहिती शेयर करू नका.

-बँकेत जाऊन किंवा बँकेच्या ऑफिशियल वेबसाइटवर माहिती करा.

-व्हाट्सअ‍ॅपवर येणाऱ्या कोणत्याही मेसेजमधील लिंक क्लिक करू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here