OPPO A55 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 23 Aug 2022 08:56:34 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 इतक्या स्वस्तात मिळणार नाही 6GB RAM असलेला Oppo स्मार्टफोन; स्टायलिश फोन झाला खूप स्वस्त https://www.91mobiles.com/marathi/5000mah-battery-6gb-ram-oppo-a55-price-cut-know-new-selling-price-specification/ https://www.91mobiles.com/marathi/5000mah-battery-6gb-ram-oppo-a55-price-cut-know-new-selling-price-specification/#respond Tue, 23 Aug 2022 08:56:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12393 दिवसेंदिवस देशातील महागाई वाढत आहे परंतु जर तुम्ही एक नवीन Mobile Phone विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आली आहे. OPPO नं आपल्या एका मिड रेंज बजेट स्मार्टफोन OPPO A55 स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. 91मोबाइल्सला या फोनमधील Price Drop ची माहिती ऑफलाइन रिटेल स्टोर्सकडून मिळाली आहे. जर तुम्ही एक नवीन फोन […]

The post इतक्या स्वस्तात मिळणार नाही 6GB RAM असलेला Oppo स्मार्टफोन; स्टायलिश फोन झाला खूप स्वस्त first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
दिवसेंदिवस देशातील महागाई वाढत आहे परंतु जर तुम्ही एक नवीन Mobile Phone विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आली आहे. OPPO नं आपल्या एका मिड रेंज बजेट स्मार्टफोन OPPO A55 स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. 91मोबाइल्सला या फोनमधील Price Drop ची माहिती ऑफलाइन रिटेल स्टोर्सकडून मिळाली आहे. जर तुम्ही एक नवीन फोन घेऊ इच्छित असाल तर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, MediaTek Helio G35 प्रोसेसर आणि 5000 mAh ची बॅटरी असलेला हा Oppo Phone विकत घेता येईल. पुढे आम्ही तुम्हाला फोनच्या नवीन किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती दिली आहे.

OPPO A55 ची नवीन किंमत

Oppo A55 स्मार्टफोनचे दोन रॅम व स्टोरेज व्हेरिएंट भारतात खरेदीसाठी उपलब्ध आहेत. परंतु कंपनीनं डिवाइसच्या 6GB रॅम व 128GB स्टोरेजच्या किंमतीत कंपनीनं कपात केली आहे. हा व्हेरिएंट आता 14,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. आधी या फोनची किंमत 17,990 रुपये होती. फोन कंपनीची साइट आणि अ‍ॅमेझॉन इंडियावर 17,490 रुपयांमध्ये विकला जात आहे. हे देखील वाचा: फक्त 16,999 रुपयांमध्ये मिळतोय 8GB रॅम आणि 128GB मेमरी असलेला OPPO फोन

Oppo A55 चे स्पेसिफिकेशन्स

OPPO A55 स्मार्टफोन 6.5-इंचाच्या LCD पॅनलसह सादर केला आहे, ज्याचे रिजोल्यूशन HD+ (720 x 1,600 पिक्सल) आहे. हा डिस्प्ले 60Hz रिफ्रेश रेट आणि 120Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या डिस्प्लेची मॅक्सिमम ब्राइटनेस 550nits इतकी आहे. हा डिस्प्ले ओप्पोनं NEG T2X-1 शील्ड प्रोटेक्शनसह सादर करण्यात आला आहे. ओप्पोच्या या स्मार्टफोनचा स्क्रीन टू बॉडी रेश्यो 89.2 टक्के आहे.

OPPO A55 स्मार्टफोन कंपनीनं मीडियाटेकच्या Helio G35 चिपसेटसह सादर केला आहे. जोडीला 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. Oppo A55 स्मार्टफोनमध्ये AI फेस लॉक आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा मिळते. तर कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये ड्युअल 4G VoLTE, Wi-Fi 5, Bluetooth 5.0, GPS, USB Type C आणि 3.5mm हेडफोन जॅक मिळतो. हे देखील वाचा: Oppo नं केली केली कमाल! 13GB रॅमसह लाँच केला भन्नाट स्मार्टफोन; 4,500mAh बॅटरीसह मिळतेय 33W फास्ट चार्जिंग

Oppo A55 स्मार्टफोनच्या फ्रंटला 16-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. तसेच फोनच्या रियर पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 50 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा, जोडीला 2-मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 2 मेगापिक्सलची मोनो कॅमेरा लेन्स आहे. बॅक पॅनलवर LED फ्लॅश देखील देण्यात आला आहे. फोनमध्ये नाइट प्लस, पोर्टेट मोड आणि सेल्फीसाठी स्क्रीन फ्लॅश सारखे फीचर देण्यात आले आहेत. Oppo A55 स्मार्टफोन अँड्रॉइड 11 वर आधारित Color OS 7.2 वर चालतो.

The post इतक्या स्वस्तात मिळणार नाही 6GB RAM असलेला Oppo स्मार्टफोन; स्टायलिश फोन झाला खूप स्वस्त first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5000mah-battery-6gb-ram-oppo-a55-price-cut-know-new-selling-price-specification/feed/ 0
6GB रॅम आणि 5,000mAh बॅटरीसह आला 5G फोन OPPO A55, जाणून घ्या याची खासियत https://www.91mobiles.com/marathi/oppo-a55-5g-launched-with-dimensity-700-soc-5000mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a55-5g-launched-with-dimensity-700-soc-5000mah-battery/#respond Mon, 25 Jan 2021 12:33:11 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9765 ओपो A55 5G चीन मध्ये CNY 1,599 (जवळपास 18,000 रुपये) मध्ये सादर केला गेला आहे.

The post 6GB रॅम आणि 5,000mAh बॅटरीसह आला 5G फोन OPPO A55, जाणून घ्या याची खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक विश्वात 5G कडे युजर्सचा वाढता कल पाहता सर्व कंपन्यांमध्ये स्वस्त 5जी फोन सादर करण्याची स्पर्धा सुरु झाली आहे. या स्पर्धेत पुढे जात चीनी कंपनी ओपोने आपला नवीन OPPO A55 5G फोन सादर केला आहे. हा नवीन स्मार्टफोन कंपनीने आपल्या घरच्या मार्केट मध्ये आणला आहे. वाटरड्रॉप-स्टाइल नॉचसह आलेला हा फोन इतर मार्केट मध्ये सादर करण्याबाबत सध्यातरी कोणतीही माहिती मिळाली नाही. पण आशा आहे कि कंपनी लवकरच भारतासह आशियातील मार्केट मध्ये हा फोन सादर केला जाऊ शकतो.

दमदार कॅमेरा

ओपो A55 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यात f / 2.2 अपर्चर असलेला 13-मेगापिक्सलचा मुख्य सेंसर, f / 2.4 अपर्चर असलेला 2-मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आणि अतिरिक्त 2-मेगापिक्सलचा पोर्ट्रेट कॅमेरा देण्यात आला आहे जो f / 2.4 अपर्चर सह येतो. रियर कॅमेरा मोड्स पाहता यात नाइट सीन, प्रोफेशनल, पॅनोरमिक, पोर्ट्रेट, टाइम-लॅप्स, स्लो मोशन, सुपर टेक्स्ट, अल्ट्रा-क्लियर आणि खूप काही आहे. फोन 10x डिजिटल झूम पर्यंत सपोर्ट करतो. फ्रंटला, यात f / 2.0 अपर्चर असलेला 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. सेल्फी कॅमेरा शूटिंग मोड मध्ये पॅनोरमा, पोर्ट्रेट, नाइट सीन, टाइम-लॅप्स, एआय आयडी फोटो आणि इत्यादी आहे.

Oppo A55 मीडियाटेक डाइमेंशन 700 SoC वर चालतो.

हे देखील वाचा : OPPO F19 आणि F19 Pro च्या भारतातातील एंट्रीचा मार्ग मोकळा!, जाणून घ्या कधी होतील लॉन्च

शानदार डिस्प्ले

यात एक 6.5-इंचाची HD + (720×1,600 पिक्सल) एलसीडी आहे ज्यात एक वॉटरड्रॉप-स्टाइल नॉच आहे. फोन मध्ये 88.7 स्क्रीन-टू-बॉडी रेशियो, 60 हर्ट्ज रिफ्रेश रेट, 71 टक्के एनटीएसआर कलर, 269ppi पिक्सल डेंसिटी आणि पीक ब्राइटनेस 480 एनआईटी आहे.

प्रोसेसिंग पावर

फोन मीडियाटेक डाइमेंशन 700 SoC वर चालतो. हा प्रोसेसर 5G-सपोर्ट सह 6nm प्रोसेस टेक्नोलॉजी वर आधारित आहे आणि यात ARM Cortex-A78 कोरचा समावेश आहे. तसेच यात 6GB RAM आहे. स्टोरेज (1TB पर्यंत) वाढवण्याच्या पर्यायासह इंटरनल स्टोरेज मध्ये 128GB देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : भारतातील पहिला 1000+ चिपसेट असलेला 5G फोन OPPO Reno5 Pro लॉन्च, आला 65वॉट फास्ट चार्जिंगसह

Oppo A55 5G चीन मध्ये CNY 1,599 (जवळपास 18,000 रुपये) मध्ये सादर केला गेला आहे.

बॅटरी आणि कनेक्टिविटी फीचर्स

Oppo A55 5G पॅक मध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि कनेक्टिविटी ऑप्शन मध्ये 3.5 मिमी ऑडियो जॅक, वाय-फाय 5 (802.11ac), ब्लूटूथ v5.1, आणि यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे. फोनचे डाइमेंशन 163.9×75.7×8.4mm आहे आणि याचे वजन 186 ग्राम आहे. फोन मध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर पण आहे. तसेच फोन अँड्रॉइड 11 वर चालतो.

किंमत

ओपो A55 5G चीन मध्ये CNY 1,599 (जवळपास 18,000 रुपये) मध्ये सादर केला गेला आहे. फोन ब्रिस्क ब्लू आणि रिदम ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये आला आहे. हा फोन JD.com सह चीन मध्ये अनेक ऑनलाइन वेबसाइट वर विकला जाईल.

The post 6GB रॅम आणि 5,000mAh बॅटरीसह आला 5G फोन OPPO A55, जाणून घ्या याची खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a55-5g-launched-with-dimensity-700-soc-5000mah-battery/feed/ 0