जर तुम्ही मिड सेग्मेंटमध्ये एक असा फोन शोधत असाल ज्यात 8GB रॅमसह जास्त मेमरी आणि चांगला प्रोसेसर आहे तर तुम्हाला आता चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही OPPO A96 स्मार्टफोनची निवड करू शकता. हा फोन मोठी स्क्रीन, जास्त मेमरी आणि शानदार प्रोसेसरसह येतो. तसेच आता कंपनीनं या फोनच्या किंमतीत कपात केली आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन आता 16,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. या फोनमध्ये 8GB रॅमसह 128GB इंटरनल स्टोरेज मिळते. तसेच OPPO A96 स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या Snapdragon 680 प्रोसेसरवर चालतो जो मिड सेगमेंटचा एक चांगला प्रोसेसर आहे.
OPPO A96 ची किंमत
OPPO ची किंमत 18,999 रुपये होती परंतु कंपनीनं 19 ऑगस्टपासून या फोनच्या किंमतीत 1,000 रुपयांची कपात केल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे हा फोन 17,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच ग्राहकांना आणखी खुश करत कंपनीनं बँक ऑफरची देखील घोषणा केली आहे. या शानदार स्मार्टफोन 1,000 रुपयांची बँक ऑफर मिळत आहे. त्यामुळे तुम्ही हा फोन 16,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. जी OPPO A96 स्मार्टफोनसाठी एक चांगली डील म्हणता येईल. हे देखील वाचा: या फोन समोर वनप्लस देखील टिकणार नाही; 5100mAh बॅटरी आणि शक्तिशाली प्रोसेसरसह Lenovo Legion Y70 लाँच
OPPO A96 चे स्पेसिफिकेशन
OPPO A96 चे स्पेसिफिकेशन पाहता या फोनमध्ये तुम्हाला 6.59 इंचाची स्क्रीन मिळेल. कंपनीनं फुल HD+ डिस्प्लेचा वापर केला आहे जो 90Hz स्क्रीन रिफ्रेश रेटसह येतो. हा फोन 600 निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. यात Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसरची पावर देण्यात आली आहे, ज्याचा मॅक्सिमम क्लॉक स्पीड 2.4Ghz आहे. जोडीला 8GB रॅम व 128GB स्टोरेज मिळते. फोनमध्ये मेमरी कार्डला सपोर्ट देखील आहे. हे देखील वाचा: Oppo नं केली केली कमाल! 13GB रॅमसह लाँच केला भन्नाट स्मार्टफोन; 4,500mAh बॅटरीसह मिळतेय 33W फास्ट चार्जिंग
फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 50MP चा मेन कॅमेरा देण्यात आला आहे जो वाइड अँगल सपोर्टसह येतो. तसेच 2MP चा डेप्थ कॅमेरा मिळतो. फोनमध्ये 16 एमपी चा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन 5,000mAh ची बॅटरीसह येतो आणि कंपनीनं 33W वूक टेक्नॉलॉजी सपोर्ट असलेला फास्ट चार्जर दिला आहे जो सेल्स पॅकसह उपलब्ध आहे. सिक्योरिटीसाठी यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर मिळतो.