दिवसेंदिवस देशातील महागाई वाढत आहे परंतु जर तुम्ही एक नवीन Mobile Phone विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आली आहे. OPPO नं आपल्या एका मिड रेंज बजेट स्मार्टफोन OPPO A55 स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. 91मोबाइल्सला या फोनमधील Price Drop ची माहिती ऑफलाइन रिटेल स्टोर्सकडून मिळाली आहे. जर तुम्ही एक नवीन फोन घेऊ इच्छित असाल तर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, MediaTek Helio G35 प्रोसेसर आणि 5000 mAh ची बॅटरी असलेला हा Oppo Phone विकत घेता येईल. पुढे आम्ही तुम्हाला फोनच्या नवीन किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती दिली आहे.
OPPO A55 ची नवीन किंमत
Oppo A55 स्मार्टफोनचे दोन रॅम व स्टोरेज व्हेरिएंट भारतात खरेदीसाठी उपलब्ध आहेत. परंतु कंपनीनं डिवाइसच्या 6GB रॅम व 128GB स्टोरेजच्या किंमतीत कंपनीनं कपात केली आहे. हा व्हेरिएंट आता 14,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. आधी या फोनची किंमत 17,990 रुपये होती. फोन कंपनीची साइट आणि अॅमेझॉन इंडियावर 17,490 रुपयांमध्ये विकला जात आहे. हे देखील वाचा: फक्त 16,999 रुपयांमध्ये मिळतोय 8GB रॅम आणि 128GB मेमरी असलेला OPPO फोन
Oppo A55 चे स्पेसिफिकेशन्स
OPPO A55 स्मार्टफोन 6.5-इंचाच्या LCD पॅनलसह सादर केला आहे, ज्याचे रिजोल्यूशन HD+ (720 x 1,600 पिक्सल) आहे. हा डिस्प्ले 60Hz रिफ्रेश रेट आणि 120Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या डिस्प्लेची मॅक्सिमम ब्राइटनेस 550nits इतकी आहे. हा डिस्प्ले ओप्पोनं NEG T2X-1 शील्ड प्रोटेक्शनसह सादर करण्यात आला आहे. ओप्पोच्या या स्मार्टफोनचा स्क्रीन टू बॉडी रेश्यो 89.2 टक्के आहे.
OPPO A55 स्मार्टफोन कंपनीनं मीडियाटेकच्या Helio G35 चिपसेटसह सादर केला आहे. जोडीला 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. Oppo A55 स्मार्टफोनमध्ये AI फेस लॉक आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा मिळते. तर कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये ड्युअल 4G VoLTE, Wi-Fi 5, Bluetooth 5.0, GPS, USB Type C आणि 3.5mm हेडफोन जॅक मिळतो. हे देखील वाचा: Oppo नं केली केली कमाल! 13GB रॅमसह लाँच केला भन्नाट स्मार्टफोन; 4,500mAh बॅटरीसह मिळतेय 33W फास्ट चार्जिंग
Oppo A55 स्मार्टफोनच्या फ्रंटला 16-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. तसेच फोनच्या रियर पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 50 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा, जोडीला 2-मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 2 मेगापिक्सलची मोनो कॅमेरा लेन्स आहे. बॅक पॅनलवर LED फ्लॅश देखील देण्यात आला आहे. फोनमध्ये नाइट प्लस, पोर्टेट मोड आणि सेल्फीसाठी स्क्रीन फ्लॅश सारखे फीचर देण्यात आले आहेत. Oppo A55 स्मार्टफोन अँड्रॉइड 11 वर आधारित Color OS 7.2 वर चालतो.