Oppo नं केली केली कमाल! 13GB रॅमसह लाँच केला भन्नाट स्मार्टफोन; 4,500mAh बॅटरीसह मिळतेय 33W फास्ट चार्जिंग

Oppo आपल्या Reno लाइनअपमध्ये फ्लॅगशिप ग्रेड स्मार्टफोन सादर करत असते. आता यात कंपनीनं एका 4G स्मार्टफोनचा समावेश केला आहे. Oppo Reno8 4G स्मार्टफोन आता इंडोनेशियामध्ये लाँच करण्यात आला आहे. कंपनीनं या सीरिजमधील दोन स्मार्टफोन भारतात लाँच केली आहेत परंतु ओप्पोनं सध्यातरी स्मार्टफोनच्या भारतीय लाँचबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. ओप्पो भारतात रेनो 8 सीरीजचे 5G स्मार्टफोन लाँच केले आहेत. Oppo Reno8 4G स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या Snapdragon 680 प्रोसेसर आणि 8GB रॅमसह सादर केला आहे. पुढे आम्ही तुम्हाला Oppo Reno8 4G स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स, फिचर्स आणि किंमतीची सविस्तर माहिती दिली आहे.

Oppo Reno8 4G चे स्पेसिफिकेशन्स

Oppo Reno8 4G स्मार्टफोनमध्ये 6.43-इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले फुल HD+ रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. तसेच याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे, त्यामुळे फोन वापरताना स्मूद वाटतो. या फोनमध्ये पंच होल कटआउट देण्यात आलं आहे, ज्यात 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे. जो सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी शानदार क्वॉलिटी देऊ शकतो. फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 64MP च्या प्रायमरी कॅमेऱ्यासह 2MP चा डेप्थ आणि मोनोक्रोम कॅमेरा सेन्सर आहे. हे देखील वाचा: आता नाही मिळणार OPPO आणि OnePlus चे स्मार्टफोन्स; ‘या’ देशात पूर्णपणे बॅन झाले हे दोन्ही चीनी ब्रँड

कंपनीनं या स्मार्टफोनला प्रोसेसिंग पावर देखील तगडी दिली आहे. ओप्पोच्या या फोनमध्ये Qualcomm चा Snapdragon 680 4G चिपसेट देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळते. हा फोन 5GB व्हर्च्युअल रॅमला सपोर्ट करतो. त्यामुळे गरज पडल्यास तुम्ही 13GB RAM ची ताकद मिळवू शकता. त्याचबरोबर फोनची स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉटची सोय देखील करण्यात आली आहे.

ओप्पोच्या या फोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी मिळते. ही बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोन Android 12 आधारित लेटेस्ट ColorOS वर चालतो, जी ओप्पोची कस्टम स्किन आहे. सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. या ड्युअल सिम 4G फोनमध्ये बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात, यात 3.5mm ऑडियो पोर्टचा समावेश देखील आहे. हे देखील वाचा: 64MP कॅमेरा, 66W चार्जिंग, 4830mAh बॅटरीसह आला Vivo V25 Pro; Xiaomi-Oppo ची करणार सुट्टी

Oppo Reno8 4G ची किंमत

Oppo Reno8 4G स्मार्टफोन सध्या इंडोनेशियामध्ये लाँच करण्यात आला आहे. हँडसेटचा एकच व्हेरिएंट बाजारात आला आहे. या स्मार्टफोनचा 8GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट IDR 4,999,000 (सुमारे 27,000 रुपये) मध्ये सादर करण्यात आला आहे. हा 4G मॉडेल भारतात कधी येईल याची कोणतीही अधिकृत माहिती कंपनीनं दिली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here