OPPO Find X6 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 22 Mar 2023 06:10:47 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 50MP+50MP+50MP! पावरफुल कॅमेरा सेटअपसह OPPO Find X6 लाँच, पाहा स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-x6-launched-in-china-know-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-x6-launched-in-china-know-price-specifications/#respond Wed, 22 Mar 2023 06:10:47 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19630 ओप्पोनं टेक मंचावर आपल्या टेक्नॉलॉजीचं शक्तिप्रदर्शन करत फाइंड एक्स6 सीरीज सादर केली आहे. सीरीज अंतगर्त OPPO Find X6 आणि OPPO Find X6 Pro स्मार्टफोन लाँच झाले आहेत जे शानदार कॅमेरा सिस्टमसह मार्केटमध्ये आले आहेत. सीरीजचा वॅनिला मॉडेल फाइंड एक्स6 50MP+50MP+50MP आशा ट्रिपल कॅमेरा सेटअपसह लाँच झाला आहे, ज्याची माहिती पुढे देण्यात आली आहे. ओप्पो फाइंड […]

The post 50MP+50MP+50MP! पावरफुल कॅमेरा सेटअपसह OPPO Find X6 लाँच, पाहा स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OPPO Find X6 आणि OPPO Find X6 Pro स्मार्टफोन लाँच झाले आहेत.
  • ओप्पो फाइंड एक्स6 सीरीज सध्या चीनी बाजारात आली आहे.
  • नवीन फाइंड एक्स सीरीजमध्ये ओप्पोनं कॅमेरा सिस्टमवर लक्ष दिलं आहे.

ओप्पोनं टेक मंचावर आपल्या टेक्नॉलॉजीचं शक्तिप्रदर्शन करत फाइंड एक्स6 सीरीज सादर केली आहे. सीरीज अंतगर्त OPPO Find X6 आणि OPPO Find X6 Pro स्मार्टफोन लाँच झाले आहेत जे शानदार कॅमेरा सिस्टमसह मार्केटमध्ये आले आहेत. सीरीजचा वॅनिला मॉडेल फाइंड एक्स6 50MP+50MP+50MP आशा ट्रिपल कॅमेरा सेटअपसह लाँच झाला आहे, ज्याची माहिती पुढे देण्यात आली आहे.

ओप्पो फाइंड एक्स6 चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.74″ 1.5K AMOLED display
  • MediaTek Dimensity 9200
  • 50MP+50MP+50MP Camera
  • 32MP Selfie Sensor
  • 80W SuperVOOC Charging
  • 4,800mAh battery

OPPO Find X6 स्मार्टफोन 2772 x 1240 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.74 इंचाच्या 1.5के डिस्प्लेसह लाँच झाला आहे. ही फोन स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करते. फोन स्क्रीनवर 1450निट्स ब्राइटनेस, एचडीआर10+ आणि 1440हर्ट्ज पीडब्ल्यूएम डिमिंग सारखे फीचर्स मिळतात तसेच गोरिल्ला ग्लास विक्टसची सुरक्षा देण्यात आली आहे. हे देखील वाचा: Airtel ने लाँच केले 3 पोस्टपेड प्लॅन, किंमत 599 रुपयांपासून सुरु

ओप्पो फाइंड एक्स6 अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो कलरओएस 13.1 सह मिलकर चालतो. प्रोसेसिंगसाठी या मोबाइल फोनमध्ये 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक डिमेनसिटी 9200 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 3.05गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. हा फोन LPDDR5X RAM आणि UFS 4.0 storage टेक्नॉलॉजीवर चालतो.

OPPO Find X6 ट्रिपल रियर सेटअपसह लाँच झाला आहे. तसेच बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50MP Sony IMX890 प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला एफ/2.0 अपर्चर असलेली 50MP Samsung S5KJN1 अल्ट्रावाइड अँगल लेन्स आणि एफ/2.6 अपर्चर असलेली 50MP periscope telephoto आहे. फोनमध्ये फ्रंट पॅनलवर एफ/2.4 अपर्चर असलेला 32MP Sony IMX709 RGBW सेन्सर देण्यात आला आहे.

पावर बॅकअपसाठी ओप्पो फाइंड एक्स6 स्मार्टफोन 4,800एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो जी 80वॉट सुपरवूक फास्ट चार्ज टेक्नॉलॉजीसह येते. सिक्योरिटीसाठी या ओप्पो मोबाइलमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. हा फोन ड्युअल सिम, एनएफसी व अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचरला सपोर्ट करतो. OPPO Find X6 स्मार्टफोन IP64 सर्टिफाइड आहे. हे देखील वाचा: 16GB RAM आणि शक्तिशाली प्रोसेसरसह OPPO Find X6 Pro ची एंट्री, जोडीला 100W fast charging

ओप्पो फाइंड एक्स6 ची किंमत

OPPO Find X6 चीनमध्ये दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. बेस मॉडेलमध्ये 12जीबी रॅम + 256जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची प्राइस 4499 yuan म्हणजे भारतीय करंसीनुसार 53,999 रुपयांच्या आसपास आहे. तसेच मोठा व्हेरिएंट 16जीबी रॅम + 512जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो आणि याची किंमत 4999 yuan म्हणजे 59,999 रुपयांच्या आसपास आहे. हा फोन Feiquan Green, Starry Black आणि Snow Mountain Gold कलरमध्ये सादर करण्यात आला आहे.

The post 50MP+50MP+50MP! पावरफुल कॅमेरा सेटअपसह OPPO Find X6 लाँच, पाहा स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-x6-launched-in-china-know-price-specifications/feed/ 0
16GB RAM आणि शक्तिशाली प्रोसेसरसह OPPO Find X6 Pro ची एंट्री, जोडीला 100W fast charging https://www.91mobiles.com/marathi/16gb-ram-smartphone-oppo-find-x6-pro-launched-with-snapdragon-8-gen-2/ https://www.91mobiles.com/marathi/16gb-ram-smartphone-oppo-find-x6-pro-launched-with-snapdragon-8-gen-2/#respond Wed, 22 Mar 2023 05:41:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19623 OPPO FInd X6 Series ऑफिशियल झाला आहे आणि कंपनीनं दोन शक्तिशाली पावरफुल स्मार्टफोन OPPO Find X6 आणि OPPO Find X6 Pro लाँच केले आहेत. हे दोन्ही मोबाइल फोन सर्वप्रथम चीनच्या बाजारात आले आहेत जे येत्या काही दिवसांत इतर मार्केट्समध्ये एंट्री करतील. सीरीजचा ‘प्रो’ मॉडेल 16GB RAM, Qualcomm Snapdragon 8 Gen 2 चिपसेट, 50MP Triple Rear […]

The post 16GB RAM आणि शक्तिशाली प्रोसेसरसह OPPO Find X6 Pro ची एंट्री, जोडीला 100W fast charging first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • ओप्पो फाइंड एक्स6 सीरीज चीनमध्ये लाँच झाली आहे.
  • सीरीजमध्ये OPPO Find X6 आणि X6 Pro चा समावेश आहे.
  • फाइंड एक्स6 प्रो Snapdragon 8 Gen 2 सर्पोटेड आहे.

OPPO FInd X6 Series ऑफिशियल झाला आहे आणि कंपनीनं दोन शक्तिशाली पावरफुल स्मार्टफोन OPPO Find X6 आणि OPPO Find X6 Pro लाँच केले आहेत. हे दोन्ही मोबाइल फोन सर्वप्रथम चीनच्या बाजारात आले आहेत जे येत्या काही दिवसांत इतर मार्केट्समध्ये एंट्री करतील. सीरीजचा ‘प्रो’ मॉडेल 16GB RAM, Qualcomm Snapdragon 8 Gen 2 चिपसेट, 50MP Triple Rear आणि 32MP Selfie Camera ला सपोर्ट करतो ज्याची माहिती पुढे देण्यात आली आहे.

ओप्पो एक्स6 प्रोची किंमत

OPPO Find X6 Pro तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. यातील 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 5999 yuan (जवळपास 72,000 रुपये), 16GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 6499 yuan (जवळपास 78,000 रुपये) आणि 16GB + 512GB व्हेरिएंटची किंमत 6999 yuan (जवळपास 84,000 रुपये) आहे. चीनमध्ये हा फोन Cloud Black (Glass), Feiquan Green (Glass) आणि Desert Silver Moon (Leather) कलरमध्ये आला आहे.

ओप्पो फाइंड एक्स6 प्रो चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.82″ QHD+ AMOLED display
  • 16GB RAM + 512GB Storage
  • Qualcomm Snapdragon 8 Gen 2
  • 50MP+50MP+50MP Camera
  • 32MP Selfie Sensor
  • 50W Qi wireless charging
  • 100W SuperVOOC fast charging

OPPO Find X6 Pro स्मार्टफोन 3168 × 1440 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.82 इंचाच्या क्वॉड एचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. फोन स्क्रीन एलटीपीओ अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. हा ओप्पो मोबाइल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येतो ज्याला कोर्निग गोरिल्ला ग्लास विक्टसची सुरक्षा देण्यात आली आहे.

ओप्पो फाइंड एक्स6 प्रो 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटवर लाँच करण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये एड्रेनो 740 जीपीयू आहे. हा फोन LPDDR5X RAM आणि UFS 4.0 storage वर चालतो. ओप्पोचा हा फोन अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो कलरओएस 13.1 सह चालतो.

फोटोग्राफीसाठी OPPO Find X6 Pro मध्ये ट्रिपल रियर देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.75 अपर्चर असलेला 50MP Sony IMX989 प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर असलेल्या 50MP Sony IMX890 अल्ट्रावाइड अँगल लेन्स आणि एफ/2.6 अपर्चर असलेल्या 50MP Sony IMX890 पेरिस्कोप सेन्सरसह चालतो. फोनमध्ये फ्रंट पॅनलवर एफ/2.4 अपर्चर असलेला 32MP Sony IMX709 RGBW सेन्सर देण्यात आला आहे.

OPPO Find X6 Pro स्मार्टफोन 5,000एमएएच बॅटरीसह लाँच झाला आहे. बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी यात 100वॉट सुपरवूक फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. तसेच हा मोबाइल फोन 50वॉट क्युआय वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजीला देखील सपोर्ट करतो. कंपनीनं फाइंड एक्स6 प्रोमध्ये रिवर्स चार्जिंगचा सपोर्ट देखील दिला आहे.

The post 16GB RAM आणि शक्तिशाली प्रोसेसरसह OPPO Find X6 Pro ची एंट्री, जोडीला 100W fast charging first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/16gb-ram-smartphone-oppo-find-x6-pro-launched-with-snapdragon-8-gen-2/feed/ 0
21 मार्चला लाँच होईल OPPO Find X6 सीरीज, प्रोमो पोस्टरमधून डिजाइनचा खुलासा https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-x6-series-launch-date-confirmed-march-21-in-china/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-x6-series-launch-date-confirmed-march-21-in-china/#respond Thu, 16 Mar 2023 10:33:11 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19555 OPPO Find X6 सीरीजच्या स्मार्टफोन्स बद्दल गेले कित्येक दिवस अफवा येत आहेत. परंतु आता ब्रँडनं आपल्या लेटेस्ट फ्लॅगशिप सीरीज फोनच्या लाँच डेटची घोषणा केली आहे. कंपनीनं चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून माहिती दिली आहे की ओप्पो फाईंड एक्स6 याच महिन्यात 21 मार्च 2023 ला लाँच केली जाईल. परंतु ग्लोबल लाँच बद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. […]

The post 21 मार्चला लाँच होईल OPPO Find X6 सीरीज, प्रोमो पोस्टरमधून डिजाइनचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • कंपनीनं OPPO Find X6 सीरीजची लाँच डेट ऑफिशियल करण्यात आली आहे.
  • सीरीजमध्ये 21 मार्चला OPPO Find X6 आणि Find X6 Pro सादर केला जाऊ शकतो.
  • OPPO च्या प्रोमोशनल पोस्टरमधून फोनची डिजाइन समोर आली आहे.

OPPO Find X6 सीरीजच्या स्मार्टफोन्स बद्दल गेले कित्येक दिवस अफवा येत आहेत. परंतु आता ब्रँडनं आपल्या लेटेस्ट फ्लॅगशिप सीरीज फोनच्या लाँच डेटची घोषणा केली आहे. कंपनीनं चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून माहिती दिली आहे की ओप्पो फाईंड एक्स6 याच महिन्यात 21 मार्च 2023 ला लाँच केली जाईल. परंतु ग्लोबल लाँच बद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आशा आहे की चीन व्यतिरिक्त इतर देशांमध्ये देखील ही फोन सीरिज दाखल होईल.

OPPO Find X6 सीरिजमधील फोन

प्रमोशनल पोस्टरनुसार ओप्पो फाईंड एक्स6 सीरीज 21 मार्चला दुपारी 14:00 वाजता स्थानिक वेळेनुसार (11:30 AM IST) चीनमध्ये लाँच होईल. कंपनीनं अधिकृतपणे माहिती दिली नाही परंतु फोनसह ओप्पो पॅड 2 देखील लाँच होऊ शकतो. OPPO Find X6 सीरीजमध्ये OPPO Find X6, OPPO Find X6 Pro आणि OPPO Find X6 Lite हे फोन्स येऊ शकतात. लाँच तारीख सांगताना OPPO नं OPPO Find X6 सीरीजचा पोस्टर आणि व्हिडीओ देखील जारी केला आहे, ज्यातून डिवाइसची डिजाइन समजली आहे. हे देखील वाचा: Samsung Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G भारतात लाँच; जाणून घ्या किंमत

पोस्टरमध्ये पेरिस्कोप कॅमेऱ्याचा स्लॉट स्पष्ट दिसत आहे जो 100x पर्यंतच्या झूम सपोर्टसह बाजारात येऊ शकतो. त्याचबरोबर डिवाइसच्या कॅमेरा मॉड्यूलमध्ये चहूबाजूला एक मोठा रिंग असेल. डिवाइसच्या मागे लेदर सारखा मॅटेरियल दिसत आहे. एक प्रमोशनल व्हिडीओमध्ये कॅमेरा मॉड्यूलच्या मध्यभागी हॅसलब्लेड ब्रँडिंग दिसत आहे. तसेच ब्रँडनं एक प्रमोशनल व्हिडीओच्या माध्यमातून डिवाइसची नाइट फोटोग्राफी क्षमता टीज केली आहे. ओप्पो फाईंड एक्स6 प्रो फक्त चांगले मून शॉट्स नव्हे तर शॉटमधील इतर वस्तू आणि माणसांकडे देखील सामान लक्ष देईल. हे देखील वाचा: UIDAI नं दिली खुशखबर, 14 जून पर्यंत ऑनलाइन आधार अपडेटसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही

ओप्पो फाईंड एक्स6 प्रो स्पेसिफिकेशन्स (लीक)

OPPO Find X6 Pro मध्ये 6.8-इंच 2K 120Hz रिफ्रेश रेटसह AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. तसेच डिवाइस स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसर, 16GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेजसह बाजारात येण्याची शक्यता आहे. यात 50MP + 50MP + 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 32MP सेल्फी स्नॅपर मिळू शकतो. डिवाइसमध्ये USB टाइप-सी चार्जिंग पोर्ट आणि 100W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh ची बॅटरी असू शकते.

The post 21 मार्चला लाँच होईल OPPO Find X6 सीरीज, प्रोमो पोस्टरमधून डिजाइनचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-x6-series-launch-date-confirmed-march-21-in-china/feed/ 0