16GB RAM आणि शक्तिशाली प्रोसेसरसह OPPO Find X6 Pro ची एंट्री, जोडीला 100W fast charging

Highlights

  • ओप्पो फाइंड एक्स6 सीरीज चीनमध्ये लाँच झाली आहे.
  • सीरीजमध्ये OPPO Find X6 आणि X6 Pro चा समावेश आहे.
  • फाइंड एक्स6 प्रो Snapdragon 8 Gen 2 सर्पोटेड आहे.

OPPO FInd X6 Series ऑफिशियल झाला आहे आणि कंपनीनं दोन शक्तिशाली पावरफुल स्मार्टफोन OPPO Find X6 आणि OPPO Find X6 Pro लाँच केले आहेत. हे दोन्ही मोबाइल फोन सर्वप्रथम चीनच्या बाजारात आले आहेत जे येत्या काही दिवसांत इतर मार्केट्समध्ये एंट्री करतील. सीरीजचा ‘प्रो’ मॉडेल 16GB RAM, Qualcomm Snapdragon 8 Gen 2 चिपसेट, 50MP Triple Rear आणि 32MP Selfie Camera ला सपोर्ट करतो ज्याची माहिती पुढे देण्यात आली आहे.

ओप्पो एक्स6 प्रोची किंमत

OPPO Find X6 Pro तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. यातील 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 5999 yuan (जवळपास 72,000 रुपये), 16GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 6499 yuan (जवळपास 78,000 रुपये) आणि 16GB + 512GB व्हेरिएंटची किंमत 6999 yuan (जवळपास 84,000 रुपये) आहे. चीनमध्ये हा फोन Cloud Black (Glass), Feiquan Green (Glass) आणि Desert Silver Moon (Leather) कलरमध्ये आला आहे.

ओप्पो फाइंड एक्स6 प्रो चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.82″ QHD+ AMOLED display
  • 16GB RAM + 512GB Storage
  • Qualcomm Snapdragon 8 Gen 2
  • 50MP+50MP+50MP Camera
  • 32MP Selfie Sensor
  • 50W Qi wireless charging
  • 100W SuperVOOC fast charging

OPPO Find X6 Pro स्मार्टफोन 3168 × 1440 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.82 इंचाच्या क्वॉड एचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. फोन स्क्रीन एलटीपीओ अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. हा ओप्पो मोबाइल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येतो ज्याला कोर्निग गोरिल्ला ग्लास विक्टसची सुरक्षा देण्यात आली आहे.

ओप्पो फाइंड एक्स6 प्रो 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटवर लाँच करण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये एड्रेनो 740 जीपीयू आहे. हा फोन LPDDR5X RAM आणि UFS 4.0 storage वर चालतो. ओप्पोचा हा फोन अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो कलरओएस 13.1 सह चालतो.

फोटोग्राफीसाठी OPPO Find X6 Pro मध्ये ट्रिपल रियर देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.75 अपर्चर असलेला 50MP Sony IMX989 प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर असलेल्या 50MP Sony IMX890 अल्ट्रावाइड अँगल लेन्स आणि एफ/2.6 अपर्चर असलेल्या 50MP Sony IMX890 पेरिस्कोप सेन्सरसह चालतो. फोनमध्ये फ्रंट पॅनलवर एफ/2.4 अपर्चर असलेला 32MP Sony IMX709 RGBW सेन्सर देण्यात आला आहे.

OPPO Find X6 Pro स्मार्टफोन 5,000एमएएच बॅटरीसह लाँच झाला आहे. बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी यात 100वॉट सुपरवूक फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. तसेच हा मोबाइल फोन 50वॉट क्युआय वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजीला देखील सपोर्ट करतो. कंपनीनं फाइंड एक्स6 प्रोमध्ये रिवर्स चार्जिंगचा सपोर्ट देखील दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here