Airtel ने लाँच केले 3 पोस्टपेड प्लॅन, किंमत 599 रुपयांपासून सुरु

Highlights

  • एयरटेलनं 599 रुपये, 799 रुपये आणि 998 रुपये के पोस्टपेड प्लॅन सादर केला आहे.
  • प्लॅन्समध्ये अनलिमिटेड कॉलिंग, एसएमएस आणि ओटीटी बेनिफिट्स मिळत आहेत.
  • कंपनीनं Rs 799 आणि Rs 998 चा प्लॅन एयरटेल ब्लॅक सेगमेंटमध्ये सादर केला आहे.

रिलायन्स जियोनं सादर केलेल्या पोस्टपेड प्लॅन नंतर आता भारती एयरटेलनं देखील आपले नवीन पोस्टपेड फॅमिली प्लॅन सादर केले आहेत, ज्यांची किंमत 599 रुपये, 799 रुपये आणि 998 रुपये आहे. हे तिन्ही प्लॅन कंपनीनं आपल्या वेबसाइटवर लिस्ट केले आहेत. तसेच सर्व प्लॅन्समध्ये युजर्सना इंटरनेट डेटा व्यतिरिक्त ओटीटी प्लॅटफॉर्मचं फ्री सब्सक्रिप्शन, कॉलिंग आणि एसएमएस सारखे फायदे दिले जात आहेत.

एयरटेलचा 599 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

नवीन 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये 100 फ्री SMS आणि अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा रोलओव्हर बेनिफिटसह एकूण 75GB डेटा दरमहा मिळतो. तसेच युजर्सना 6 महिन्यांचं Amazon Prime सब्सक्रिप्शन, 1 वर्षाचं Disney+ Hotstar Mobile सब्सक्रिप्शन, फ्री हँडसेट प्रोटेक्शन प्लॅन देखील दिला जात आहे. इतकेच नव्हे तर प्लॅनमध्ये रेग्युलर कनेक्शनसह अनलिमिटेड कॉलिंगसह एक फ्री अ‍ॅड-ऑन कनेक्शन देखील घेता येईल. हे देखील वाचा: फक्त 6,999 रुपयांमध्ये Nokia C12 Pro लाँच; 7 हजारांच्या आत Realme आणि Redmi ला मिळणार टक्कर

एयरटेलचा 799 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

799 रुपयांच्या एयरटेल ब्लॅक प्लॅनमध्ये अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलसह एकूण कुल 105GB डेटा दिला जात आहे. प्लॅनमध्ये एसएमएससह अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ, डिज्नी प्लस हॉटस्टार आणि एयरटेल एक्स्ट्रीमसह एकूण 12 (शेमारू, इरोस नाऊ, सोनीलिव्ह, लायंसगेट, अल्ट्रा, होइचोई आणि अन्य) पेक्षा जास्त ओटीटी अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस दिला जात आहे. हे देखील वाचा: 6,000mAh Battery आणि 80W Fast Charging सह iQOO Z7x लाँच, पाहा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

एयरटेलचा 998 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

998 रुपयांच्या एयरटेल ब्लॅक प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉल आणि 105GB डेटासह एक लँडलाइन कनेक्शन आणि 40 Mbps स्पीड असलेलं ब्रॉडबँड कनेक्शन मिळत आहे. यात अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ, डिज्नी प्लस हॉटस्टार आणि एयरटेल एक्स्ट्री अ‍ॅप समवेत एकूण 12 अ‍ॅपचा अ‍ॅक्सेस मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here