OPPO Reno 10 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 24 May 2023 08:20:58 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OPPO रेनो 10 सीरीज लाँच! Reno 10, Reno 10 Pro आणि Reno 10 Pro+ ची बाजारात एंट्री https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-10-and-reno-10-pro-launched-in-china-price-features-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-10-and-reno-10-pro-launched-in-china-price-features-specifications/#respond Wed, 24 May 2023 08:20:05 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21150 ओप्पोनं आज आपली रेनो 10 सीरीज जगासमोर ठेवत तीन नवीन मोबाइल फोन चीनमध्ये सादर केले आहेत. कंपनीनं OPPO Reno 10, Reno 10 Pro आणि Reno 10 Pro+ स्मार्टफोन लाँच केले आहेत जे स्टाईलिश डिजाइन आणि शानदार स्पेसिफिकेशन्ससह बाजारात आले आहेत. पुढे तुम्ही ह्या सीरीजची संपूर्ण माहिती वाचू शकता. ओप्पो रेनो 10 सीरीजची किंमत OPPO Reno […]

The post OPPO रेनो 10 सीरीज लाँच! Reno 10, Reno 10 Pro आणि Reno 10 Pro+ ची बाजारात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OPPO Reno 10 सीरिजची किंमत 29 हजारांपासून सुरु होते.
  • ही सीरिज लवकरच भारतात देखील येऊ शकते.
  • सीरिजमध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

ओप्पोनं आज आपली रेनो 10 सीरीज जगासमोर ठेवत तीन नवीन मोबाइल फोन चीनमध्ये सादर केले आहेत. कंपनीनं OPPO Reno 10, Reno 10 Pro आणि Reno 10 Pro+ स्मार्टफोन लाँच केले आहेत जे स्टाईलिश डिजाइन आणि शानदार स्पेसिफिकेशन्ससह बाजारात आले आहेत. पुढे तुम्ही ह्या सीरीजची संपूर्ण माहिती वाचू शकता.

ओप्पो रेनो 10 सीरीजची किंमत

OPPO Reno 10 5G

  • 8GB RAM + 256GB Storage = 2499 युआन (जवळपास 29,290 रुपये)
  • 12GB RAM + 256GB Storage = 2799 युआन (जवळपास 32,900 रुपये)
  • 12GB RAM + 512GB Storage = 2999 युआन (जवळपास 35,999 रुपये)

OPPO Reno 10 Pro

  • 16GB RAM + 256GB Storage = 3499 युआन (जवळपास 41,000 रुपये)
  • 16GB RAM + 256GB Storage = 3899 युआन (जवळपास 45,000 रुपये)

OPPO Reno 10 Pro+

  • 16GB RAM + 256GB Storage = 3800 युआन (जवळपास 45,000 रुपये)
  • 16GB RAM + 512GB Storage = 4299 युआन (जवळपास 50,000 रुपये)

ओप्पो रेनो 10 सीरीजचे स्पेसिफिकेशन्स

OPPO Reno 10 5G

  • प्रोसेसर : ओप्पो रेनो 10 5जी फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच झाला आहे जो 2.4गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो. अँड्रॉइड 13 सह हा फोन कलरओएस 13.1 वर चालतो.
  • स्क्रीन : OPPO Reno 10 मध्ये 2412 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.7 इंचाचा फुलएचडी+ कर्व्ड ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो 120हर्ट्झ रिफ्रेश रेट तथा 240हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह आला आहे.
  • सेल्फी कॅमेरा : सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ओप्पो रेनो 10 5जी फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे जो एफ/2.4 अपर्चरवर चालतो. ही 90° एफओव्ही असलेली 5पी लेन्स आहे जी ऑटो फोकस मोडसह येते.
  • रियर कॅमेरा : बॅक पॅनलवर एफ/1.7 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलची प्रायमरी लेन्स देण्यात आली आहे जी एफ/2.0 अपर्चर असलेली 32 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स तसेच एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या वाइड अँगल लेन्ससह येतो.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 4,600एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 80वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.

OPPO Reno 10 Pro 5G

  • प्रोसेसर : ओप्पो रेनो 10 प्रो मीडियाटेक डायमेन्सिटी 8200 ऑक्टाकोर प्रोसेसरवर सादर करण्यात आला आहे जो 3.1गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो. ह्यात अँड्रॉइड 13 आधारित कलरओएस 13.1 मिळते.
  • स्क्रीन : OPPO Reno 10 Pro स्मार्टफोन 2772 × 1240 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.74 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेवर लाँच झाला आहे. ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेटवर चालते. ह्या फोनमध्ये पण इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो.
  • सेल्फी कॅमेरा : या फोनचा फ्रंट कॅमेरा वॅनिला मॉडेल सारखा आहे. रेनो 10 प्रो मध्ये पण एफ/2.4 अपर्चर असलेला 32एमपी सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे जो 90° फिल्ड ऑफ व्यू देतो.
  • रियर कॅमेरा : ह्याच्या ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये ओआयएस फीचर असलेला एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलची प्रायमरी लेन्स + एफ/2.0 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सल टेलीफोटो लेन्स + एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सल वाइड अँगल लेन्स मिळते.
  • बॅटरी : फोनचा बॅटरी सेग्मेंटही रेनो 10 सारखा आहे. ह्यात पावर बॅकअपसाठी 4,600एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 100W SuperVOOC 2.0 टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.

OPPO Reno 10 Pro+ 5G

  • प्रोसेसर : हा फोन अँड्रॉइड 13 आधारित कलरओएस 13.1 वर लाँच झाला आहे ज्यात 2.995गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर प्रोसेस करणारा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जेन1 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन क्वॉलकॉम एड्रेनो 730 जीपीयूला सपोर्ट करतो.
  • स्क्रीन : या फोनमध्ये 2772 × 1240 पिक्सल रिजोल्यूशन असलेली 6.74 इंचाची फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे जी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येते. हा कर्व्ड अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे जो 120हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेटवर चालते. हा मोबाइल फोन 1400निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो.
  • सेल्फी कॅमेरा : OPPO Reno 10 Pro+ मध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी एफ/2.4 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे जो ओआयएस फीचरसह चालतो.
  • रियर कॅमेरा : फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो ओआयएस टेक्नॉलॉजीसह येतो. ह्याच्या रियर कॅमेरा सेटअपमध्ये एफ/2.5 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स आणि एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेन्स आहे.
  • बॅटरी : ओप्पो रेनो 10 प्रो प्लस मध्ये पावर बॅकअपसाठी 4,700एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येतो जी मिनिटांत हा फुल चार्ज करू शकते.

The post OPPO रेनो 10 सीरीज लाँच! Reno 10, Reno 10 Pro आणि Reno 10 Pro+ ची बाजारात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-10-and-reno-10-pro-launched-in-china-price-features-specifications/feed/ 0
OPPO Reno 10 Pro आणि Reno 10 Pro+ भारतीय वेबसाइटवर लिस्ट; लवकरच होऊ शकतात लाँच https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-10-pro-plus-spotted-on-bis-india-launch-imminent/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-10-pro-plus-spotted-on-bis-india-launch-imminent/#respond Fri, 12 May 2023 06:29:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20839 ओप्पो रेनो 10 सीरीज लवकरच चीनमध्ये लाँच होणार आहे आणि नंतर अन्य बाजारांमध्ये येऊ शकते. या लाइनअपमध्ये वॅनिला रेनो 10, रेनो 10 प्रो आणि रेनो 10 प्रो + असे तीन मॉडेल सादर केले जाऊ शकतात. आता ह्या सीरीजचे दोन फोन रेनो 10 प्रो आणि रेनो 10 प्रो + मॉडेल नंबर CPH2525 आणि CPH2521 सह BIS […]

The post OPPO Reno 10 Pro आणि Reno 10 Pro+ भारतीय वेबसाइटवर लिस्ट; लवकरच होऊ शकतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OPPO Reno 10 Pro आणि Reno 10 Pro+ च्या लाँच डेटची घोषणा अद्याप झाली नाही.
  • दोन्ही फोन अनुक्रमे CPH2525 आणि CPH2521 मॉडेल नंबरसह BIS वर दिसले आहेत.
  • ब्रँड रेनो 9 रेनोच्या ऐवजी 10 सीरीज थेट भारतात लाँच करू शकतो.

ओप्पो रेनो 10 सीरीज लवकरच चीनमध्ये लाँच होणार आहे आणि नंतर अन्य बाजारांमध्ये येऊ शकते. या लाइनअपमध्ये वॅनिला रेनो 10, रेनो 10 प्रो आणि रेनो 10 प्रो + असे तीन मॉडेल सादर केले जाऊ शकतात. आता ह्या सीरीजचे दोन फोन रेनो 10 प्रो आणि रेनो 10 प्रो + मॉडेल नंबर CPH2525 आणि CPH2521 सह BIS सर्टिफिकेशनवर दिसले आहेत. MySmartPrice द्वारे स्पॉट केलेल्या BIS सर्टिफिकेशनवरून समजलं आहे की ब्रँड रेनो 9 ऐवजी रेनो 10 सीरीज लाँच करू शकते.

OPPO Reno 10 Pro आणि Reno 10 Pro Plus ची लीक माहिती

भारतात लाँच होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी BIS सर्टिफिकेशन आवश्यक आहे. मॉडेल नंबर व्यतिरिक्त बीआयएस सर्टिफिकेशनवरून फोनबाबत आणि कोणतीही माहिती समोर आली नाही. सर्टिफिकेशनवरून माहिती मिळाली आहे लवकरच हे फोन्स भारतात लाँच केले जाऊ शकतात. याआधी रेनो 10 प्रो आणि रेनो 10 प्रो+ को TDRA सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसले होते. हे देखील वाचा: 2 हजारांनी स्वस्त झाला Redmi 11 Prime, जाणून घ्या नवीन किंमत

ओप्पो रेनो 10 सीरीजचे स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • 6.7” AMOLED Display
  • 50MP Triple Rear Camera
  • 32MP Selfie Camera
  • 100W Fast Charging

फोनचे स्पेसिफिकेशन्स सध्या गुलदस्त्यात आहेत, परंतु MySmartPrice च्या रिपोर्टमध्ये Reno 10 Pro 5G चे 5K डिजाइन रेंडर शेयर करण्यात आले आहेत. ज्यातून समजलं आहे की हँडसेटमध्ये 6.7 इंचाचा कर्व्ड AMOLED डिस्प्ले आहे जो टॉप सेंटरमध्ये पंच-होल कटआउटसह येईल.

रेनो 10 प्रो + मध्ये देखील प्रो मॉडेलप्रमाणे डिजाइन मिळू शकते आणि ह्यात 120Hz रिफ्रेश रेटसह 6.74-इंचाचा कर्व AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. रियर कॅमेरा सेटअपमध्ये OIS सह 50MP Sony IMX890 मुख्य कॅमेरा, 8MP Sony IMX355 अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 64MP पेरिस्कोप लेन्सचा समावेश केला जाऊ शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. हे देखील वाचा: लाँचपूर्वीच लीक झाली OPPO F23 5G ची किंमत, 15 मेला येईल भारतात

गीकबेंच लिस्टिंगनुसार, रेनो 10 प्रो+ 5जी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 प्रोसेसरसह तर रेनो 10 प्रो मीडियाटेक डायमेन्सिटी 8200 चिपसेटसह येऊ शकतो. तसेच रेनो 10 प्रो+ मध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज मिळू शकते. तर रेनो 10 प्रो 12GB पर्यंत रॅमसह सादर केला जाऊ शकतो. रेनो 10 सीरीजचे फोन अँड्रॉइड 13-आधारित ColorOS 13 वर चालतील. डिवाइसमध्ये 100W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह 4700mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.

The post OPPO Reno 10 Pro आणि Reno 10 Pro+ भारतीय वेबसाइटवर लिस्ट; लवकरच होऊ शकतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-10-pro-plus-spotted-on-bis-india-launch-imminent/feed/ 0