2 हजारांनी स्वस्त झाला Redmi 11 Prime, जाणून घ्या नवीन किंमत

Highlights

  • ह्याच्या सर्व मेमरी व्हेरिएंट्सची किंमत कमी झाली आहे.
  • फोनची नवीन किंमत 10,999 रुपयांपासून सुरु होते.
  • Redmi 11 Prime मध्ये 4जीबी रॅम आणि 6जीबी रॅम मिळतो.

शाओमी सबब्रँड रेडमीनं गेल्यावर्षी लो बजेट स्मार्टफोन Redmi 11 Prime भारतात लाँच केला होता. हा मोबाइल 12,999 रुपयांच्या बेस किंमतीत सेलसाठी उपलब्ध झाला होता जो आता आणखी स्वस्त करण्यात आला आहे. कंपनीनं याची किंमत थेट 2,000 रुपयांनी कमी केली आहे तसेच हा प्राइस कट रेडमी 11 प्राइमच्या सर्व मेमरी व्हेरिएंट्सवर आज 11 मे पासून लागू झाला आहे.

रेडमी 11 प्राइमची जुनी किंमत

  • 4GB RAM + 64GB Memory = 12,999 रुपये
  • 6GB RAM + 128GB Memory = 14,999 रुपये

रेडमी 11 प्राइमची नवीन किंमत

  • 4GB RAM + 64GB Memory = 10,999 रुपये
  • 6GB RAM + 128GB Memory = 12,999 रुपये

रेडमी 11 प्राइमचे स्पेसिफिकेशन्स

  • MediaTeK Helio G99
  • LPDDR4x RAM/UFS 2.2 Memory

Redmi 11 Prime 4G फोन आहे जो 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या मीडियाटेक हीलियो जी99 ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. हा प्रोसेसर 2.2गीगहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालू शकतो. या रेडमी फोनमध्ये अँड्रॉइड 12 ओएस आधारित मीयुआय मिळतो.

  • 6.58″ FHD+ Display
  • 90Hz Refresh Rate

रेडमी 11 प्राइममध्ये 6.58 इंचाची आयपीएस इनसेल स्क्रीन देण्यात आली आहे. वॉटरड्रॉप नॉच स्टाईल असलेला हा डिस्प्ले फुलएचडी+ रिजोल्यूशनला सपोर्ट करतो तसेच 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करतो.

  • 50MP Rear Camera
  • 8MP Front Camera

फोटोग्राफीसाठी हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ह्याच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सल पोर्टरेट सेन्सरसह चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.

  • 18W 5,000mAh Battery
  • 5W Reverse charging

पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी हा फोन 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो तसेच रेडमीनं आपला हा फोन 5वॉट रिवर्स चार्जिंग टेक्नॉलॉजीसह सादर केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here