OPPO रेनो 10 सीरीज लाँच! Reno 10, Reno 10 Pro आणि Reno 10 Pro+ ची बाजारात एंट्री

Highlights

  • OPPO Reno 10 सीरिजची किंमत 29 हजारांपासून सुरु होते.
  • ही सीरिज लवकरच भारतात देखील येऊ शकते.
  • सीरिजमध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

ओप्पोनं आज आपली रेनो 10 सीरीज जगासमोर ठेवत तीन नवीन मोबाइल फोन चीनमध्ये सादर केले आहेत. कंपनीनं OPPO Reno 10, Reno 10 Pro आणि Reno 10 Pro+ स्मार्टफोन लाँच केले आहेत जे स्टाईलिश डिजाइन आणि शानदार स्पेसिफिकेशन्ससह बाजारात आले आहेत. पुढे तुम्ही ह्या सीरीजची संपूर्ण माहिती वाचू शकता.

ओप्पो रेनो 10 सीरीजची किंमत

OPPO Reno 10 5G

  • 8GB RAM + 256GB Storage = 2499 युआन (जवळपास 29,290 रुपये)
  • 12GB RAM + 256GB Storage = 2799 युआन (जवळपास 32,900 रुपये)
  • 12GB RAM + 512GB Storage = 2999 युआन (जवळपास 35,999 रुपये)

OPPO Reno 10 Pro

  • 16GB RAM + 256GB Storage = 3499 युआन (जवळपास 41,000 रुपये)
  • 16GB RAM + 256GB Storage = 3899 युआन (जवळपास 45,000 रुपये)

OPPO Reno 10 Pro+

  • 16GB RAM + 256GB Storage = 3800 युआन (जवळपास 45,000 रुपये)
  • 16GB RAM + 512GB Storage = 4299 युआन (जवळपास 50,000 रुपये)

ओप्पो रेनो 10 सीरीजचे स्पेसिफिकेशन्स

OPPO Reno 10 5G

  • प्रोसेसर : ओप्पो रेनो 10 5जी फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच झाला आहे जो 2.4गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो. अँड्रॉइड 13 सह हा फोन कलरओएस 13.1 वर चालतो.
  • स्क्रीन : OPPO Reno 10 मध्ये 2412 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.7 इंचाचा फुलएचडी+ कर्व्ड ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो 120हर्ट्झ रिफ्रेश रेट तथा 240हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह आला आहे.
  • सेल्फी कॅमेरा : सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ओप्पो रेनो 10 5जी फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे जो एफ/2.4 अपर्चरवर चालतो. ही 90° एफओव्ही असलेली 5पी लेन्स आहे जी ऑटो फोकस मोडसह येते.
  • रियर कॅमेरा : बॅक पॅनलवर एफ/1.7 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलची प्रायमरी लेन्स देण्यात आली आहे जी एफ/2.0 अपर्चर असलेली 32 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स तसेच एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या वाइड अँगल लेन्ससह येतो.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 4,600एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 80वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.

OPPO Reno 10 Pro 5G

  • प्रोसेसर : ओप्पो रेनो 10 प्रो मीडियाटेक डायमेन्सिटी 8200 ऑक्टाकोर प्रोसेसरवर सादर करण्यात आला आहे जो 3.1गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो. ह्यात अँड्रॉइड 13 आधारित कलरओएस 13.1 मिळते.
  • स्क्रीन : OPPO Reno 10 Pro स्मार्टफोन 2772 × 1240 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.74 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेवर लाँच झाला आहे. ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेटवर चालते. ह्या फोनमध्ये पण इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो.
  • सेल्फी कॅमेरा : या फोनचा फ्रंट कॅमेरा वॅनिला मॉडेल सारखा आहे. रेनो 10 प्रो मध्ये पण एफ/2.4 अपर्चर असलेला 32एमपी सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे जो 90° फिल्ड ऑफ व्यू देतो.
  • रियर कॅमेरा : ह्याच्या ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये ओआयएस फीचर असलेला एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलची प्रायमरी लेन्स + एफ/2.0 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सल टेलीफोटो लेन्स + एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सल वाइड अँगल लेन्स मिळते.
  • बॅटरी : फोनचा बॅटरी सेग्मेंटही रेनो 10 सारखा आहे. ह्यात पावर बॅकअपसाठी 4,600एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 100W SuperVOOC 2.0 टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.

OPPO Reno 10 Pro+ 5G

  • प्रोसेसर : हा फोन अँड्रॉइड 13 आधारित कलरओएस 13.1 वर लाँच झाला आहे ज्यात 2.995गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर प्रोसेस करणारा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जेन1 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन क्वॉलकॉम एड्रेनो 730 जीपीयूला सपोर्ट करतो.
  • स्क्रीन : या फोनमध्ये 2772 × 1240 पिक्सल रिजोल्यूशन असलेली 6.74 इंचाची फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे जी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येते. हा कर्व्ड अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे जो 120हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेटवर चालते. हा मोबाइल फोन 1400निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो.
  • सेल्फी कॅमेरा : OPPO Reno 10 Pro+ मध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी एफ/2.4 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे जो ओआयएस फीचरसह चालतो.
  • रियर कॅमेरा : फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो ओआयएस टेक्नॉलॉजीसह येतो. ह्याच्या रियर कॅमेरा सेटअपमध्ये एफ/2.5 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स आणि एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेन्स आहे.
  • बॅटरी : ओप्पो रेनो 10 प्रो प्लस मध्ये पावर बॅकअपसाठी 4,700एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येतो जी मिनिटांत हा फुल चार्ज करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here