OPPO Reno 10 Pro आणि Reno 10 Pro+ भारतीय वेबसाइटवर लिस्ट; लवकरच होऊ शकतात लाँच

Highlights

  • OPPO Reno 10 Pro आणि Reno 10 Pro+ च्या लाँच डेटची घोषणा अद्याप झाली नाही.
  • दोन्ही फोन अनुक्रमे CPH2525 आणि CPH2521 मॉडेल नंबरसह BIS वर दिसले आहेत.
  • ब्रँड रेनो 9 रेनोच्या ऐवजी 10 सीरीज थेट भारतात लाँच करू शकतो.

ओप्पो रेनो 10 सीरीज लवकरच चीनमध्ये लाँच होणार आहे आणि नंतर अन्य बाजारांमध्ये येऊ शकते. या लाइनअपमध्ये वॅनिला रेनो 10, रेनो 10 प्रो आणि रेनो 10 प्रो + असे तीन मॉडेल सादर केले जाऊ शकतात. आता ह्या सीरीजचे दोन फोन रेनो 10 प्रो आणि रेनो 10 प्रो + मॉडेल नंबर CPH2525 आणि CPH2521 सह BIS सर्टिफिकेशनवर दिसले आहेत. MySmartPrice द्वारे स्पॉट केलेल्या BIS सर्टिफिकेशनवरून समजलं आहे की ब्रँड रेनो 9 ऐवजी रेनो 10 सीरीज लाँच करू शकते.

OPPO Reno 10 Pro आणि Reno 10 Pro Plus ची लीक माहिती

भारतात लाँच होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी BIS सर्टिफिकेशन आवश्यक आहे. मॉडेल नंबर व्यतिरिक्त बीआयएस सर्टिफिकेशनवरून फोनबाबत आणि कोणतीही माहिती समोर आली नाही. सर्टिफिकेशनवरून माहिती मिळाली आहे लवकरच हे फोन्स भारतात लाँच केले जाऊ शकतात. याआधी रेनो 10 प्रो आणि रेनो 10 प्रो+ को TDRA सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसले होते. हे देखील वाचा: 2 हजारांनी स्वस्त झाला Redmi 11 Prime, जाणून घ्या नवीन किंमत

ओप्पो रेनो 10 सीरीजचे स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • 6.7” AMOLED Display
  • 50MP Triple Rear Camera
  • 32MP Selfie Camera
  • 100W Fast Charging

फोनचे स्पेसिफिकेशन्स सध्या गुलदस्त्यात आहेत, परंतु MySmartPrice च्या रिपोर्टमध्ये Reno 10 Pro 5G चे 5K डिजाइन रेंडर शेयर करण्यात आले आहेत. ज्यातून समजलं आहे की हँडसेटमध्ये 6.7 इंचाचा कर्व्ड AMOLED डिस्प्ले आहे जो टॉप सेंटरमध्ये पंच-होल कटआउटसह येईल.

रेनो 10 प्रो + मध्ये देखील प्रो मॉडेलप्रमाणे डिजाइन मिळू शकते आणि ह्यात 120Hz रिफ्रेश रेटसह 6.74-इंचाचा कर्व AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. रियर कॅमेरा सेटअपमध्ये OIS सह 50MP Sony IMX890 मुख्य कॅमेरा, 8MP Sony IMX355 अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 64MP पेरिस्कोप लेन्सचा समावेश केला जाऊ शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. हे देखील वाचा: लाँचपूर्वीच लीक झाली OPPO F23 5G ची किंमत, 15 मेला येईल भारतात

गीकबेंच लिस्टिंगनुसार, रेनो 10 प्रो+ 5जी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 प्रोसेसरसह तर रेनो 10 प्रो मीडियाटेक डायमेन्सिटी 8200 चिपसेटसह येऊ शकतो. तसेच रेनो 10 प्रो+ मध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज मिळू शकते. तर रेनो 10 प्रो 12GB पर्यंत रॅमसह सादर केला जाऊ शकतो. रेनो 10 सीरीजचे फोन अँड्रॉइड 13-आधारित ColorOS 13 वर चालतील. डिवाइसमध्ये 100W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह 4700mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here