लाँचपूर्वीच लीक झाली OPPO F23 5G ची किंमत, 15 मेला येईल भारतात

Highlights

  • ओप्पो एफ23 5जी ची किंमत 23,999 रुपये असू शकते.
  • हा 8GB RAM + 256GB Storage सह येऊ शकतो.
  • भारतात हा फोन 15 मेला लाँच केला जाईल.

OPPO F23 5G फोन येत्या 15 मेला भारतात लाँच केला जाईल. हा फोन कंपनी सतत टीज करत आहे तसेच ओप्पो इंडिया वेबसाइटवर ह्याचे प्रोडक्ट पेज देखील लाइव्ह करण्यात आलं आहे. तसेच आता फोन बाजारात येण्यापूर्वीच ह्याच्या किंमतीचा खुलासा देखील झाला आहे. ओप्पो एफ23 5जी प्राइसची माहिती लीकमध्ये समोर आली आहे जी तुम्ही पुढे वाचू शकता.

ओप्पो एफ23 5जी फोनची भारतीय किंमत

लीकमध्ये समोर आलेल्या डिटेल्सनुसार, OPPO F23 5G फोनची किंमत 23,999 रुपये असू शकते. हा फोन 15 मेला भारतात लाँच होईल तसेच लीकमध्ये सांगण्यात आलं आहे की ह्या ओप्पो मोबाइलची विक्री देशात 18 मेपासून सुरु होईल. एफ23 5जी ऑनलाईन शॉपिंग साइट्स सोबतच ऑफलाइन रिटेल स्टोर्सवरून देखील विकत घेता येईल. हे देखील वाचा: 2 हजारांनी स्वस्त झाला Redmi 11 Prime, जाणून घ्या नवीन किंमत

ओप्पो एफ23 5जी फोनचे स्पेसिफिकेशन्स

  • 6.72″ FHD+ Display
  • 120Hz Refresh Rate

कंपनीनं लाइव्ह केलेल्या फोनच्या प्रोडक्ट पेजवरून समजलं आहे की हा पंच-होल स्टाइल स्क्रीनसह लाँच केला जाईल. ही 6.72 इंचाची फुलएचडी+ स्क्रीन असेल जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल.

  • 8GB Virtual RAM
  • Qualcomm Snapdragon 695

प्रोसेसिंगसाठी ओप्पो एफ23 5जी मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाईल. OPPO F23 5G 8जीबी वचुर्अल रॅमला सपोर्ट करेल. ही टेक्नॉलॉजी फोनमधील 8जीबी रॅमसह मिळून एफ23 5जी 16जीबी रॅमची पावर देईल. हा फोन 256जीबी स्टोरेजसह लाँच होईल.

  • 64MP Rear Camera
  • 32MP Selfie Camera

ओप्पोनं अजूनतरी एफ23 5जीच्या कॅमेरा सेग्मेंटची माहिती दिली नाही परंतु लीक्स पाहता, ह्याच्या बॅक पॅनलवर 64 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सलची मोनोक्रोम लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मायक्रो लेन्स मिळू शकते. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी एफ23 5जी मध्ये 32एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. हे देखील वाचा: 8 हजारांपेक्षा कमी किंमतीत लाँच झाला नवीन मोबाइल फोन Nokia C22; पाहा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

  • 67W SUPERVOOC
  • 5,000mAh Battery

कंपनीनं खुलासा केला आहे की हा ओप्पो मोबाइल 5,000एमएएच बॅटरीसह लाँच होईल. तसेच मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी हा मोबाइल फोन 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह सादर केला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here