OPPO Reno 3 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 17 Mar 2020 12:41:01 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 44MP सेल्फी कॅमेरा आणि 8GB रॅम सह आला OPPO Reno 3, जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-3-4g-global-variant-8gb-ram-44mp-selfie-camera-price-specifications-features/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-3-4g-global-variant-8gb-ram-44mp-selfie-camera-price-specifications-features/#respond Tue, 17 Mar 2020 12:41:01 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6815 Oppo Reno 3 4G वेरिएंट CNY 3,399 (जवळपास 35,900 रुपये) मध्ये सादर केला गेला आहे.

The post 44MP सेल्फी कॅमेरा आणि 8GB रॅम सह आला OPPO Reno 3, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने या महिन्याच्या सुरवातीला भारतात आपली ‘रेनो सीरीज’ वाढवत OPPO Reno 3 Pro लॉन्च केला होता ज्यात डुअल पंच-होल डिस्प्ले देण्यात आला होता. आता कंपनीने रेनो 3 स्मार्टफोन अंर्तराष्ट्रीय बाजारात सादर केला आहे जो 4G वेरिएंट मध्ये येतो. याआधी कंपनीने चीन मध्ये या डिवाइसचा 5जी वेरिएंट सादर केला आहे.

किंमत

रेनो 3 चा एकच वर्जन 128GB स्टोरेज सह सादर केला गेला आहे. Oppo Reno 3 4G वेरिएंट CNY 3,399 (जवळपास 35,900 रुपये) मध्ये सादर केला गेला आहे. फोन सध्या ओप्पो श्रीलंकाच्या वेबसाइट वर लिस्टेड आहे. डिवाइस Auroral Blue आणि Midnight Black कलर ऑप्शन मध्ये आला आहे. अजूनही हा डिवाइस भारतात लॉन्च होईल अशी माहिती समोर आली नाही.

स्पेसिफिकेशन्स

OPPO Reno 3 कंपनीने वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. डिवाइस मध्ये 20:9 आस्पेक्ट रेशियो आणि 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.4 इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच हा फोन एंडरॉयड 10 आधारित असेल जो कलरओएस 7 वर चालतो.

रेनो 3 फोनचा ग्लोबल मॉडेल मीडियाटेकच्या हीलियो पी90 चिपसेट वर लॉन्च केला गेला आहे. तसेच फोन मध्ये 8 जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी देण्यात आली आहे. फोटोग्राफी बद्दल बोलायचे तर OPPO Reno 3 चीन मध्ये 32 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च केला गेला होता. पण ग्लोबली हा 44 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा सपोर्ट सह सादर केला गेला आहे. तसेच रेनो 3 मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

OPPO Reno 3 च्या बॅक पॅनल वर 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे, त्यासोबत 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा मोनो सेंसर मिळेल. तसेच पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 30W VOOC 4.0 फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4025एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

कनेक्टिविटी ऑप्शनसाठी फोन मध्ये 4जी एलटीई, वाई-फाई, ब्लूटूथ वी 05, जीपीएस / ए-जीपीएस, यूएसबी चा समावेश आहे. याचा आकार 160.2×73.3×7.9 मिमी आणि वजन 170 ग्राम आहे.

The post 44MP सेल्फी कॅमेरा आणि 8GB रॅम सह आला OPPO Reno 3, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-3-4g-global-variant-8gb-ram-44mp-selfie-camera-price-specifications-features/feed/ 0
16 मार्चला ग्लोबली लॉन्च होईल 44एमपी सेल्फी कॅमेरा असलेला OPPO Reno 3 https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-3-global-launch-on-16-march-44mp-selfie-camera-specs-leaked-price/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-3-global-launch-on-16-march-44mp-selfie-camera-specs-leaked-price/#respond Thu, 12 Mar 2020 13:46:59 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6776 OPPO Reno 3 आतापर्यंत फक्त चीनी बाजारात लॉन्च झाला आहे आणि अंर्तराष्ट्रीय बाजारात येणारा रेनो 3 फोन चीनी मॉडेलच्या तुलनेत स्पेसिफिकेशन्स पण वेगळे असतील.

The post 16 मार्चला ग्लोबली लॉन्च होईल 44एमपी सेल्फी कॅमेरा असलेला OPPO Reno 3 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने या महिन्याच्या सुरवातीला भारतात आपली ‘रेनो सीरीज’ वाढवत OPPO Reno 3 Pro लॉन्च केला होता ज्याने डुअल पंच-होल डिस्प्ले सह एंट्री घेतली होती. भारतात सीरीजचा फक्त प्रो मॉडेल आला होता. आता बातमी येत आहे कि ओपो ग्लोबल मंचावर OPPO Reno 3 स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. हा स्मार्टफोन वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल तसेच कंपनी येत्या 16 मार्चला रेनो 3 स्मार्टफोन अंर्तराष्ट्रीय बाजारात सादर करेल.

OPPO Reno 3 च्या लॉन्चची माहिती कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून दिली आहे. कंपनीने पोस्ट केली आहे कि ओपो येत्या 16 मार्चला रेनो सीरीजचा नवीन डिवाईस OPPO Reno 3 ग्लोबली लॉन्च करेल. 16 मार्चला ऑफिशियल झाल्यानंतर रेनो 3 स्मार्टफोन वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या बाजारांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. OPPO Reno 3 आतापर्यंत फक्त चीनी बाजारात लॉन्च झाला आहे आणि अंर्तराष्ट्रीय बाजारात येणारा रेनो 3 फोन चीनी मॉडेलच्या तुलनेत स्पेसिफिकेशन्स पण वेगळे असतील.

ओपो रेनो 3

OPPO Reno 3 वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. फोन बद्दल बोलले जात आहे कि रेनो 3 चा ग्लोबल मॉडेल 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला जाईल तसेच फोन मध्ये 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.4 इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले मिळेल. हा फोन एंडरॉयड 10 आधारित असेल जो कलरओएस 7 वर चालेल.

रेनो 3 बाबत बोलले जात आहे कि फोनचा ग्लोबल मॉडेल मीडियाटेकच्या हीलियो पी90 चिपसेट वर लॉन्च केला जाऊ शकतो. फोन मध्ये 8 जीबी रॅम असू शकतो. OPPO Reno 3 चीन मध्ये 32 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च केला गेला होता. चर्चा अशी आहे कि या फोनचा ग्लोबल मॉडेल 44 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. त्याचबरोबर रेनो 3 मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल.

OPPO Reno 3 च्या बॅक पॅनल वर 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाऊ शकतो. सोबत 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा मोनो सेंसर असू शकतो. पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 30W VOOC 4.0 फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4025एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते. टीजर मध्ये ओपो रेनो 3 चा Aurora Blue कलर समोर आला आहे तसेच फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्ससाठी 16 मार्चची वाट बघितली जात आहे.

OPPO Reno 3 Pro

भारतात लॉन्च झालेल्या ओपो रेनो 3 प्रो बद्दल बोलायचे तर हा फोन भारतीय बाजारात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम देण्यात आला आहे ज्या सोबत 128 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. तसेच रेनो 3 प्रो चा दुसरा वेरिएंट 8 जीबी रॅम सह 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. OPPO Reno 3 Pro चा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 29,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे तर फोनचा 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 32,990 रुपयांमध्ये बाजारात आला आहे.

The post 16 मार्चला ग्लोबली लॉन्च होईल 44एमपी सेल्फी कॅमेरा असलेला OPPO Reno 3 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-3-global-launch-on-16-march-44mp-selfie-camera-specs-leaked-price/feed/ 0
Exclusive: 44MP फ्रंट कॅमेरा आणि Helio P90 SoC सह येईल OPPO Reno 3 चा ग्लोबल वेरिएंट https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-3-global-variant-44mp-front-camera-8gb-ram-4025mah-battery-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-3-global-variant-44mp-front-camera-8gb-ram-4025mah-battery-launch-soon/#respond Wed, 11 Mar 2020 13:04:33 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6761 91mobiles ला टिपस्टर ईशान अग्रवाल कडून Reno 3 च्या ग्लोबल वेरिएंटच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे.

The post Exclusive: 44MP फ्रंट कॅमेरा आणि Helio P90 SoC सह येईल OPPO Reno 3 चा ग्लोबल वेरिएंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO Reno 3 ग्लोबल वेरिएंट कंपनी द्वारे लवकरच चीनच्या बाहेर लॉन्च केला जाऊ शकतो. कंपनीने आपल्या घरच्या मार्केट चीन मध्ये Reno 3 आणि Reno 3 Pro लॉन्च केले आहेत. तसेच कंपनीने रेनो 3 प्रो भारतात पण लॉन्च केला होता. आता 91mobiles ला टिपस्टर ईशान अग्रवाल कडून Reno 3 च्या ग्लोबल वेरिएंटच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे.

OPPO Reno 3 चे स्पेसिफिकेशन्स

OPPO Reno 3 ग्लोबल मॉडेल मध्ये नॉच सह 6.4-इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले दिला जाईल. तसेच स्मार्टफोन मीडियाटेक हीलियो पी90 चिपसेटे सह येईल जो 5G कनेक्टिविटीला सपोर्ट करतो. डिवाइस मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप असेल, ज्यात 48MP प्राइमरी सेंसर f/1.8, 13MP टेलीफोटो सेंसर f/2.4, 8MP अल्ट्रा-वाइड f/2.4, आणि 2MP मोनो सेंसर f/2.4 असेल. फोनच्या मागे डुअल-एलईडी फ्लॅश सह 4K वीडियो रेकॉर्डिंग आणि हाइब्रिड जूम असेल.

OPPO Reno 3 च्या फ्रंटला 32MP पासून 44MP चा सेंसर असण्याची शक्यता आहे. Reno 3 Pro भारतात 44एमपी कॅमेरा सेंसर सह सादर केला गेला होता जो जगातील पहिला फोन आहे, ज्यात 44-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पण Reno 3 मध्ये सिंगल 44MP सेल्फी कॅमेरा असेल.

Oppo Reno 3 मध्ये पावर बॅकअपसाठी 4,025mAh ची बॅटरी असेल. तसेच फोन मध्ये एंडरॉयड 10-बेस्ड कलरओएस 7, 8GB रॅम आणि 128GB की इंटरनल स्टोरेज असेल. तसेच स्मार्टफोन मध्ये एमोलेड डिस्प्ले इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येईल. रेनो 3 चा ग्लोबल वेरिएंट तीन कलर ऑप्शन Sky White, Midnight Black आणि Aurora Blue मध्ये सादर केला जाईल. तसेच फोन 160.2 x 73.3 x 8mm साइज आणि वजन 170 ग्राम सह येईल.

किंमत

OPPO Reno 3 च्या ग्लोबल वेरिएंटची किंमत लॉन्चच्या वेळी अधिकृतपणे समोर येईल. तसेच फोन अधिकृतपणे तौर लॉन्च केला जाईल याची अजूनतरी कोणतीही माहिती समोर आली नाही. OPPO Reno 3 Pro कंपनीने अलीकडेच 29,990 रुपयांमध्ये लॉन्च केला होता.

The post Exclusive: 44MP फ्रंट कॅमेरा आणि Helio P90 SoC सह येईल OPPO Reno 3 चा ग्लोबल वेरिएंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-3-global-variant-44mp-front-camera-8gb-ram-4025mah-battery-launch-soon/feed/ 0
OPPO Reno 3 आणि OPPO Reno 3 Pro आले बाजारात, बघा या पावरफुल स्मार्टफोन्सच्या किंमती https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-3-pro-5g-officially-launched-price-specifications-sale/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-3-pro-5g-officially-launched-price-specifications-sale/#respond Thu, 26 Dec 2019 13:35:46 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6127 Reno 3 सीरीजचे हे दोन्ही डिवाईस OPPO चे 5G स्मार्टफोन आहेत जे शानदार लुक सोबत पावरफुल स्पेसिफिकेशन्स सह येतात

The post OPPO Reno 3 आणि OPPO Reno 3 Pro आले बाजारात, बघा या पावरफुल स्मार्टफोन्सच्या किंमती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
दीर्घ प्रतीक्षेनंतर आज OPPO च्या ‘रेनो सीरीज’ चे नवीन स्मार्टफोन्स टेक मार्केट मध्ये आले आहेत. काही दिवसांपूर्वी OPPO च्या अधिकृत चीनी वेबसाइट वर ऑफिशियल झाल्यानंतर आज OPPO Reno 3 आणि Reno 3 Pro स्मार्टफोन बाजारात आले आहेत. OPPO ने आज चीन मध्ये ईवेंटचे आयोजन करून हे दोन्ही स्मार्टफोन्स विक्री साठी मार्केट मध्ये सादर केले आहेत. Reno 3 सीरीजचे हे दोन्ही डिवाईस OPPO चे 5G स्मार्टफोन आहेत जे शानदार लुक सोबत पावरफुल स्पेसिफिकेशन्स सह येतात. चला नजर टाकूया OPPO Reno 3 आणि Reno 3 Pro स्मार्टफोन वर

OPPO Reno 3 Pro

रेनो 3 प्रो बद्दल बोलायचे तर हा स्मार्टफोन पंच-होल डिजाईन सह लॉन्च केला गेला आहे. या फोन मध्ये फुलव्यू बेजल लेस कर्व्ड स्क्रीन देण्यात आली आहे जी उजव्या आणि डाव्याबाजूने बॅक पॅनलकडे वळली आहे. तसेच पंच-होल डिस्प्लेच्या डावीकडे वर आहे. Oppo Reno 3 Pro चा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 92:1 आहे तसेच हा स्मार्टफोन 6.5 इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट सह येते.

Oppo Reno 3 Pro चे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन एंडरॉयड 10 आधारित कलर ओएस 7 वर लॉन्च झाला आहे जो 2.4 गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 765जी चिपसेट वर चालतो. फोटाग्राफी सेग्मेंट पाहता हा फोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 48 मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स586 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे.

त्याचबरोबर रियर कॅमेरा सेटअप मध्ये 13 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलचा ब्लॅक एंड व्हाईट सेंसर आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी Oppo Reno 3 Pro 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअप साठी या स्मार्टफोन मध्ये VOOC 4.0 टेक्नॉलॉजी असलेली 4,025 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

OPPO Reno 3

Oppo Reno 3 कंपनीने वॉटरड्रॉप नॉच सह सादर केला आहे. कंपनीने हा फोन 6.4 इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले सह आणला आहे जो इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. Oppo Reno 3 एंडरॉयड 10 ओएस सह मीडियाटेकच्या डामेनसिटी 1000एल चिपसेट वर चालतो. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Oppo Reno 3 पण क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर सेल्फी साठी या फोन मध्ये पण 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. Oppo Reno 3 पावर बॅकअप साठी VOOC 4.0 आणि 30वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 4,025 एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.

वेरिएंट्स व किंमत

Oppo Reno 3 Pro दोन वेरिएंट्स मध्ये आला आहे. फोनच्या एका वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम + 128 जीबी मेमरी तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. फोनच्या 8 जीबी रॅम वेरिएंटची किंमत 3999 युआन (जवळपास 40,500 रुपये) आणि 12 जीबी रॅम वेरिएंटची किंमत 4499 युआन (जवळपास 45,600 रुपये) आहे.

त्याचप्रमाणे Oppo Reno 3 चा बेस वेरिएंट 8 जीबी रॅम सह 128 जीबी स्टोरेज आणि दूसरा वेरिएंट 12 जीबी रॅम मेमरी सह 128 जीबी इंटरनल मेमरीला सपोर्ट करतो. फोनचा 8 जीबी रॅम वेरिएंट 3399 युआन (जवळपास 35,500 रुपये) तर 12 जीबी रॅम वेरिएंट 3699 युआन (जवळपास 37,500 रुपये) मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोन Sunrise impression, Moon night black, Blue starry night आणि Misty white कलर मध्ये विकत घेता येईल.

The post OPPO Reno 3 आणि OPPO Reno 3 Pro आले बाजारात, बघा या पावरफुल स्मार्टफोन्सच्या किंमती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-3-pro-5g-officially-launched-price-specifications-sale/feed/ 0
क्वाड कॅमेरा आणि 12 जीबी रॅम असलेला OPPO Reno 3 5G व Reno 3 Pro 5G 26 डिसेंबरला होतील लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno3-5g-and-reno3-pro-5g-with-quad-rear-cameras-to-be-announced-on-december-26/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno3-5g-and-reno3-pro-5g-with-quad-rear-cameras-to-be-announced-on-december-26/#respond Wed, 11 Dec 2019 08:44:26 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6028 Oppo ने चीनच्या सोशल साइट वीबो वर एक वीडियो टीजर जारी केला आहे, ज्यात Oppo Reno 3 5G ची लॉन्च डेट 26 डिसेंबर सांगण्यात आली आहे.

The post क्वाड कॅमेरा आणि 12 जीबी रॅम असलेला OPPO Reno 3 5G व Reno 3 Pro 5G 26 डिसेंबरला होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Oppo Reno 3 सीरीज बद्दल अनेक दिवसांपासून माहिती व लीक समोर येत आहेत. अलीकडेच Reno 3 Pro 5G स्मार्टफोनचे काही रेंडर (ग्राफिक्सने बनवलेले फोटोज) पण समोर आले होते ज्यावरून फोनच्या डिजाइन आणि प्रमुख स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली होती. तर आता हि सीरीज कंपनी अधिकृतपणे 26 डिसेंबरला सादर करेल. याची माहिती स्वतः कंपनीने दिली आहे.

Oppo ने चीनच्या सोशल साइट वीबो वर एक वीडियो टीजर जारी केला आहे, ज्यात Oppo Reno 3 5G ची लॉन्च डेट 26 डिसेंबर सांगण्यात आली आहे. या वीडियो मध्ये डेट आणि वेळेव्यतिरिक्त इतर माहिती देण्यात आलेली नाही.

Oppo Reno 3 Pro 5जी चे स्पेसिफिकेशन्स

Oppo Reno 3 Pro 5जी मध्ये 6.5 इंचाचा फुल-एचडी+ (1080×2400 पिक्सल) एमोलेड डिस्प्ले असू शकतो. तसेच फोनच्या डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशियो 20:9 असू शकतो. टेना वर समोर आलेल्या फोटोज नुसार डिवाइस मध्ये होल-पंच डिजाइन आणि घुमावदार कडा असतील. टेना लिस्टिंग वरून असे समजले आहे कि अपकमिंग Oppo फोन मध्ये 2.4 गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 765जी प्रोसेसर दिला जाऊ शकतो. तसेच डिवाइस मध्ये 4025एमएएच ची बॅटरी असेल.

इतकेच नाही तर लीकनुसार Reno 3 Pro मध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते. सध्या स्पष्ट झाले नाही कि या फोनचे किती रॅम आणि स्टोरेज वेरिएंट येतील. फोटोग्राफी साठी फोन मध्ये मागे चार कॅमेरा असू शकतात, ज्यात 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर, 13 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर असेल.

टेना लिस्टिंग मध्ये 8 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलच्या कॅमेरा सेंसरचा पण उल्लेख केला गेला आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पण असू शकतो. डिवाइस मध्ये सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असू शकतो. तसेच या फोन मध्ये Android 10 ऑपरेटिंग सिस्टम असण्याची शक्यता आहे.

Oppo Reno 3 5G चे स्पेसिफिकेशन्स

OPPO Reno 3 5G चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 6.5 इंचाच्या ओएलईडी डिस्प्ले सपोर्ट सह येईल. तसेच यातील स्क्रीन 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. तसेच फोन मध्ये 30वॉट फास्ट चार्जिंग असलेली बॅटरी असल्याचे समोर आले आहे. लीक नुसार OPPO Reno 3 मध्ये 12 जीबी रॅम मेमरी दिली जाईल तसेच हा स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या नवीन चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 765G वर चालेल.

तसेच फोटोग्राफीसाठी फोन मध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर मिळेल. त्याचबरोबर Reno 3 मध्ये 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा, 13 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा सेंसर पण दिला जाऊ शकतो.

सोर्स

वीडियो

The post क्वाड कॅमेरा आणि 12 जीबी रॅम असलेला OPPO Reno 3 5G व Reno 3 Pro 5G 26 डिसेंबरला होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno3-5g-and-reno3-pro-5g-with-quad-rear-cameras-to-be-announced-on-december-26/feed/ 0
60 एमपी कॅमेऱ्यासह लॉन्च होऊ शकतो OPPO Reno 3 https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-3-might-launch-with-60mp-camera-sensor-specifications-feature/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-3-might-launch-with-60mp-camera-sensor-specifications-feature/#respond Thu, 07 Nov 2019 13:48:14 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5713 सर्वात खास बाब अशी कि यात 5जी सपोर्ट असू शकतो, 2020 मध्ये OPPO Reno 3 तुम्हाला बाजारात मिळेल.

The post 60 एमपी कॅमेऱ्यासह लॉन्च होऊ शकतो OPPO Reno 3 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
यावर्षीच्या सुरवातीला ओपोने आपल्या नवीन रेनो सीरीजची सुरवात केली होती. कंपनीने आधी रेनो मॉडेल आणला होता आणि नंतर भारतीय बाजारात रेनो 2 सीरीज अंतर्गत एक साथ तीन फोन लॉन्च केले. तर आता कंपनी Reno 3 ची तयारी करत आहे. हि बातमी अजून भारतातून आली नाही. चीन मध्ये या फोन मॉडेलचे स्पेसिफिकेशन लीक केले गेले आहेत. चीनी सर्टिफिकेशन साइट वीबो वर या फोनचे स्पेसिफिकेशन शेयर केले आहेत ज्यात डिस्प्ले डिजाइन पासून कॅमेऱ्यापर्यंतची माहिती आहे. पण या स्पेसिफिकेशंसची अधिकृत माहिती कंपनीने दिली नाही पण रूमर मध्ये आले आहेत.

OPPO Reno 3 स्पेसिफिकेशन

दिलेल्या माहिती नुसार ओपो रेनो 3 मध्ये 6.5 इंचाची फुल एचडी+ स्क्रीन मिळेल. कंपनी एमोलेड डिस्प्लेचा वापर करू शकते. खास बाब अशी कि यावेळी कंपनी 90 हट्र्ज डिस्प्लेचा वापर करू शकते. तसेच दुसऱ्या रेनो फोन प्रमाणे यात पण तुम्हाला इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर मिळू शकतो.

रेनो आणि रेनो 2 मॉडेल मध्ये शार्कफिन सेल्फी कॅमेरा दिसला होता पण अजूनतरी OPPO Reno 3 बद्दल अशी माहिती मिळाली नाही. लीक स्पेसिफिकेशन मध्ये माहिती देण्यात आली आहे कि क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 735 चिपसेट मिळू शकतो. याआधी रेनो मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 आणि Reno 2 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 730जी प्रोसेसर देण्यात आला होता.

स्टोरेज पाहता OPPO Reno 3 मध्ये तुम्हाला डीडीआर4एक्स रॅम आर्किटेक्चर असलेला 8 जीबी रॅम मिळू शकते. तसेच 128जीबी आणि 256जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते.

OPPO Reno 3 चे कॅमेरा सेंसर्स

बातमीनुसार या फोन मध्ये तुम्हाला क्वाड कॅमेरा सेटअप मिळू शकतो जो नुकत्याच लॉन्च झालेल्या ओपोच्या फोन मध्ये दिसला आहे. OPPO Reno 3 चा मुख्य कॅमेरा सेंसर 60 मेगापिक्सलचा असू शकतो. तसेच सपोर्टिव सेंसर्स 8 मेगापिक्सल, 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचे असू शकतात. सेल्फी बद्दल बोलायचे तर हा फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्यासह येऊ शकतो.

OPPO Reno 3 ची बॅटरी

पावर बॅकअप साठी या फोन मध्ये तुम्हाला 4,500 एमएएच ची बॅटरी असेल. सोबतच 30 वॉट चा फास्ट चार्जर ज्याला ओपो ने वूक चार्जरचे नाव दिले आहे तो मिळू शकतो. सर्वात खास बाब अशी कि यात 5जी सपोर्ट असू शकतो. राहिला प्रश्न बाजारात येण्याचा तर 2020 मध्ये OPPO Reno 3 तुम्हाला बाजारात मिळेल.

The post 60 एमपी कॅमेऱ्यासह लॉन्च होऊ शकतो OPPO Reno 3 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-3-might-launch-with-60mp-camera-sensor-specifications-feature/feed/ 0