44MP सेल्फी कॅमेरा आणि 8GB रॅम सह आला OPPO Reno 3, जाणून घ्या किंमत

OPPO ने या महिन्याच्या सुरवातीला भारतात आपली ‘रेनो सीरीज’ वाढवत OPPO Reno 3 Pro लॉन्च केला होता ज्यात डुअल पंच-होल डिस्प्ले देण्यात आला होता. आता कंपनीने रेनो 3 स्मार्टफोन अंर्तराष्ट्रीय बाजारात सादर केला आहे जो 4G वेरिएंट मध्ये येतो. याआधी कंपनीने चीन मध्ये या डिवाइसचा 5जी वेरिएंट सादर केला आहे.

किंमत

रेनो 3 चा एकच वर्जन 128GB स्टोरेज सह सादर केला गेला आहे. Oppo Reno 3 4G वेरिएंट CNY 3,399 (जवळपास 35,900 रुपये) मध्ये सादर केला गेला आहे. फोन सध्या ओप्पो श्रीलंकाच्या वेबसाइट वर लिस्टेड आहे. डिवाइस Auroral Blue आणि Midnight Black कलर ऑप्शन मध्ये आला आहे. अजूनही हा डिवाइस भारतात लॉन्च होईल अशी माहिती समोर आली नाही.

स्पेसिफिकेशन्स

OPPO Reno 3 कंपनीने वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. डिवाइस मध्ये 20:9 आस्पेक्ट रेशियो आणि 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.4 इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच हा फोन एंडरॉयड 10 आधारित असेल जो कलरओएस 7 वर चालतो.

रेनो 3 फोनचा ग्लोबल मॉडेल मीडियाटेकच्या हीलियो पी90 चिपसेट वर लॉन्च केला गेला आहे. तसेच फोन मध्ये 8 जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी देण्यात आली आहे. फोटोग्राफी बद्दल बोलायचे तर OPPO Reno 3 चीन मध्ये 32 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च केला गेला होता. पण ग्लोबली हा 44 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा सपोर्ट सह सादर केला गेला आहे. तसेच रेनो 3 मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

OPPO Reno 3 च्या बॅक पॅनल वर 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे, त्यासोबत 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा मोनो सेंसर मिळेल. तसेच पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 30W VOOC 4.0 फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4025एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

कनेक्टिविटी ऑप्शनसाठी फोन मध्ये 4जी एलटीई, वाई-फाई, ब्लूटूथ वी 05, जीपीएस / ए-जीपीएस, यूएसबी चा समावेश आहे. याचा आकार 160.2×73.3×7.9 मिमी आणि वजन 170 ग्राम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here