क्वाड कॅमेरा आणि 12 जीबी रॅम असलेला OPPO Reno 3 5G व Reno 3 Pro 5G 26 डिसेंबरला होतील लॉन्च

Oppo Reno 3 सीरीज बद्दल अनेक दिवसांपासून माहिती व लीक समोर येत आहेत. अलीकडेच Reno 3 Pro 5G स्मार्टफोनचे काही रेंडर (ग्राफिक्सने बनवलेले फोटोज) पण समोर आले होते ज्यावरून फोनच्या डिजाइन आणि प्रमुख स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली होती. तर आता हि सीरीज कंपनी अधिकृतपणे 26 डिसेंबरला सादर करेल. याची माहिती स्वतः कंपनीने दिली आहे.

Oppo ने चीनच्या सोशल साइट वीबो वर एक वीडियो टीजर जारी केला आहे, ज्यात Oppo Reno 3 5G ची लॉन्च डेट 26 डिसेंबर सांगण्यात आली आहे. या वीडियो मध्ये डेट आणि वेळेव्यतिरिक्त इतर माहिती देण्यात आलेली नाही.

Oppo Reno 3 Pro 5जी चे स्पेसिफिकेशन्स

Oppo Reno 3 Pro 5जी मध्ये 6.5 इंचाचा फुल-एचडी+ (1080×2400 पिक्सल) एमोलेड डिस्प्ले असू शकतो. तसेच फोनच्या डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशियो 20:9 असू शकतो. टेना वर समोर आलेल्या फोटोज नुसार डिवाइस मध्ये होल-पंच डिजाइन आणि घुमावदार कडा असतील. टेना लिस्टिंग वरून असे समजले आहे कि अपकमिंग Oppo फोन मध्ये 2.4 गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 765जी प्रोसेसर दिला जाऊ शकतो. तसेच डिवाइस मध्ये 4025एमएएच ची बॅटरी असेल.

इतकेच नाही तर लीकनुसार Reno 3 Pro मध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते. सध्या स्पष्ट झाले नाही कि या फोनचे किती रॅम आणि स्टोरेज वेरिएंट येतील. फोटोग्राफी साठी फोन मध्ये मागे चार कॅमेरा असू शकतात, ज्यात 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर, 13 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर असेल.

टेना लिस्टिंग मध्ये 8 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलच्या कॅमेरा सेंसरचा पण उल्लेख केला गेला आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पण असू शकतो. डिवाइस मध्ये सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असू शकतो. तसेच या फोन मध्ये Android 10 ऑपरेटिंग सिस्टम असण्याची शक्यता आहे.

Oppo Reno 3 5G चे स्पेसिफिकेशन्स

OPPO Reno 3 5G चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 6.5 इंचाच्या ओएलईडी डिस्प्ले सपोर्ट सह येईल. तसेच यातील स्क्रीन 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. तसेच फोन मध्ये 30वॉट फास्ट चार्जिंग असलेली बॅटरी असल्याचे समोर आले आहे. लीक नुसार OPPO Reno 3 मध्ये 12 जीबी रॅम मेमरी दिली जाईल तसेच हा स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या नवीन चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 765G वर चालेल.

तसेच फोटोग्राफीसाठी फोन मध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर मिळेल. त्याचबरोबर Reno 3 मध्ये 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा, 13 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा सेंसर पण दिला जाऊ शकतो.

सोर्स

वीडियो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here