16 मार्चला ग्लोबली लॉन्च होईल 44एमपी सेल्फी कॅमेरा असलेला OPPO Reno 3

OPPO ने या महिन्याच्या सुरवातीला भारतात आपली ‘रेनो सीरीज’ वाढवत OPPO Reno 3 Pro लॉन्च केला होता ज्याने डुअल पंच-होल डिस्प्ले सह एंट्री घेतली होती. भारतात सीरीजचा फक्त प्रो मॉडेल आला होता. आता बातमी येत आहे कि ओपो ग्लोबल मंचावर OPPO Reno 3 स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. हा स्मार्टफोन वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल तसेच कंपनी येत्या 16 मार्चला रेनो 3 स्मार्टफोन अंर्तराष्ट्रीय बाजारात सादर करेल.

OPPO Reno 3 च्या लॉन्चची माहिती कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून दिली आहे. कंपनीने पोस्ट केली आहे कि ओपो येत्या 16 मार्चला रेनो सीरीजचा नवीन डिवाईस OPPO Reno 3 ग्लोबली लॉन्च करेल. 16 मार्चला ऑफिशियल झाल्यानंतर रेनो 3 स्मार्टफोन वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या बाजारांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. OPPO Reno 3 आतापर्यंत फक्त चीनी बाजारात लॉन्च झाला आहे आणि अंर्तराष्ट्रीय बाजारात येणारा रेनो 3 फोन चीनी मॉडेलच्या तुलनेत स्पेसिफिकेशन्स पण वेगळे असतील.

ओपो रेनो 3

OPPO Reno 3 वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. फोन बद्दल बोलले जात आहे कि रेनो 3 चा ग्लोबल मॉडेल 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला जाईल तसेच फोन मध्ये 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.4 इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले मिळेल. हा फोन एंडरॉयड 10 आधारित असेल जो कलरओएस 7 वर चालेल.

रेनो 3 बाबत बोलले जात आहे कि फोनचा ग्लोबल मॉडेल मीडियाटेकच्या हीलियो पी90 चिपसेट वर लॉन्च केला जाऊ शकतो. फोन मध्ये 8 जीबी रॅम असू शकतो. OPPO Reno 3 चीन मध्ये 32 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च केला गेला होता. चर्चा अशी आहे कि या फोनचा ग्लोबल मॉडेल 44 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. त्याचबरोबर रेनो 3 मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल.

OPPO Reno 3 च्या बॅक पॅनल वर 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाऊ शकतो. सोबत 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा मोनो सेंसर असू शकतो. पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 30W VOOC 4.0 फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4025एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते. टीजर मध्ये ओपो रेनो 3 चा Aurora Blue कलर समोर आला आहे तसेच फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्ससाठी 16 मार्चची वाट बघितली जात आहे.

OPPO Reno 3 Pro

भारतात लॉन्च झालेल्या ओपो रेनो 3 प्रो बद्दल बोलायचे तर हा फोन भारतीय बाजारात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम देण्यात आला आहे ज्या सोबत 128 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. तसेच रेनो 3 प्रो चा दुसरा वेरिएंट 8 जीबी रॅम सह 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. OPPO Reno 3 Pro चा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 29,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे तर फोनचा 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 32,990 रुपयांमध्ये बाजारात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here