Oppo Reno - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 64 MP कॅमेरा, 8 GB रॅम आणि 256 GB मेमरी सह झाला लॉन्च Oppo Reno 3 Pro, जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-3-pro-64mp-8gb-ram-256gb-storage-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-3-pro-64mp-8gb-ram-256gb-storage-price-sale/#respond Mon, 02 Mar 2020 12:12:20 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6713 OPPO Reno 3 Pro चा 8जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज वेरीएंट कंपनीने 29,990 रुपये आणि 8जीबी रॅम व 256जीबी स्टोरेज वेरिएंट 32,990 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे.

The post 64 MP कॅमेरा, 8 GB रॅम आणि 256 GB मेमरी सह झाला लॉन्च Oppo Reno 3 Pro, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Oppo Reno 3 Pro आज भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. हा फोन आधी चीन मध्ये लॉन्च केला गेला आहे. पण स्पेसिफिकेशन्स आणि लुकच्या बाबतीत भारतात लॉन्च झालेला रेनो 3 प्रो खूप वेगळा आहे. लॉन्चच्या आधीच कपंनीने फोनचे अनेक फीचर्स समोर ठेवले होते. तर आता फोनची किंमत आणि इतर फीचर्सची माहिती समोर आली आहे.

डिजाइन

सर्वात आधी OPPO Reno 3 Pro च्या लुक आणि डिजाइन बद्दल बोलायचे तर हा स्मार्टफोन डुअल पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे. चीन मध्ये हा फोन सिंगल पंच-होल वर लॉन्च झाला होता. हा फोन बेजल लेस डिजाईन सह येईल ज्याच्या तीन कडा पूर्णपणे बॉडी पार्टशी मिळतात आणि खालच्या बाजूला बारीकसा बॉडी पार्ट दिला जाईल. फोन डिस्प्लेच्या वर डावीकडे दोन असतील आणि यात फोनचे दोन सेल्फी कॅमेरे आहेत.

OPPO Reno 3 Pro चा रियर पॅनल पाहता यात क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो वर उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत, ज्या सोबत फ्लॅश लाईट आहे. इस कॅमेरा सेटअप मध्ये कॅमेरा सेंसरची माहिती लिहिण्यात आली आहे. रेनो 3 प्रो च्या बॅक पॅनल वर खालच्या बाजूला OPPO ची ब्रॅण्डिंग आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर सोबतच पावर बटन देण्यात आला आहे. तसेच OPPO Reno 3 Pro च्या खालच्या पॅनल वर मधोमध यूएसबी पोर्ट आहे ज्याच्या उजवीकडे स्पीकर आणि डावीकडे 3.5एमएम जॅक देण्यात आला आहे.

किंमत आणि सेल डिटेल

OPPO Reno 3 Pro चा 8जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज वेरीएंट कंपनीने 29,990 रुपये आणि 8जीबी रॅम व 256जीबी स्टोरेज वेरिएंट 32,990 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. ओपो रेनो 3 प्रो च्या 8जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज वेरिएंटची विक्री 6 मार्च पासून फ्लिपकार्ट आणि अमेझॉन इंडिया सोबत ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर केली जाईल.

तसेच फोन विकत घेतल्यास कंपनी कडून एचडीएफसी आणि आईसीआईसीआई कार्ड धारकांनासोबतच आरबीएल क्रेडिट कार्ड व येस बॅंक क्रेडिट कार्ड यूजर्सना 10 टक्के कॅशबॅक दिला जाईल.

स्पेसिफिकेशन्स

रेनो 3 प्रो चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.4 इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले डुअल पंच होल सह देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये 8GB रॅम सोबतच 128GB आणि 256GB ची स्टोरेज देण्यात आली आहे. सोबतच फोन मध्ये मीडियाटेक P95 चिपसेट देण्यात आला आहे. ओपो रेनो 3 प्रो डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो.

दमदार कॅमेरा

फोनच्या मागे क्वाड रियर कॅमेरा सेटअप मध्ये प्राइमरी कॅमेरा 64 मेगापिक्सल आणि 13 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस असेल. तसेच मागे 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड-अँगल कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलची मोनोक्रोम लेंस देण्यात आली आहे. ओप्पो रेनो 3 प्रो ‘अल्ट्रा नाइट सेल्फी मोड’ सह लिस्ट केला गेला आहे. तसेच फ्रंटला 44 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. हा फोन 2 मेगापिक्सलच्या सेकेंडरी सेंसरला सपोर्ट करेल जो एक डेफ्थ सेंसर आहे.

बॅटरी आणि कनेक्टिविटी ऑप्शन

सिक्योरिटीसाठी या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच स्मार्टफोन 30W VOOC फ्लॅश चार्ज 4.0 टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो आणि फोन मध्ये 4,025एमएएच ची मोठी बॅटरी मिळेल. ओप्पो रेनो 3 प्रो फोन ऑरा ब्लू, मिडनाइट ब्लॅक आणि स्काई व्हाइट रांगांमध्ये सादर केला गेला आहे.

The post 64 MP कॅमेरा, 8 GB रॅम आणि 256 GB मेमरी सह झाला लॉन्च Oppo Reno 3 Pro, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-3-pro-64mp-8gb-ram-256gb-storage-price-sale/feed/ 0
OPPO Reno 3 Pro 2 मार्चला होईल भारतात लॉन्च, या शानदार डिजाइनच्या जोरावर करेल सर्वांची सुट्टी https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-3-pro-india-launch-on-march-2nd/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-3-pro-india-launch-on-march-2nd/#respond Fri, 14 Feb 2020 13:52:40 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6601 OPPO Reno 3 Pro चीनी बाजारात लॉन्च झाला आहे पण भारतात येणारा मॉडेल चीन मध्ये लॉन्च झालेल्या मॉडेल पेक्षा खूप वेगळा असेल.

The post OPPO Reno 3 Pro 2 मार्चला होईल भारतात लॉन्च, या शानदार डिजाइनच्या जोरावर करेल सर्वांची सुट्टी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Oppo चा अपकमिंग स्मार्टफोन Reno 3 Pro अलीकडेच ई-कॉमर्स कंपनी अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वर टीज केला गेला होता. या टीजर मध्ये फोनच्या लॉन्च डेटचा खुलासा झाला होता. आता कंपनीने अधिकृत मीडिया इनवाइट पाठवून याला दुजोरा दिला आहे कि फोन 2 मार्चला लॉन्च होईल.

भारतात पाऊल टाकण्याआधी हा फोन चीन मध्ये 5G सपोर्ट सह गेल्या वर्षी लॉन्च झाला आहे. भारतात हा फोन फक्त 4G कनेक्टिविटी सपोर्ट सह लॉन्च केला जाईल. ओप्पो रेनो 3 प्रो मधील डुअल होल-पंच सेल्फी कॅमेऱ्यामुळे फोटोजना बोके इफेक्ट देता येईल. चीन मध्ये रेनो 3 प्रो मॉडेल सिंगल होल-पंच कॅमेऱ्या सह लॉन्च केला गेला आहे. पण भारतात डिवाइस डुअल पंच होल कॅमेरा सह येईल. तसेच फ्लिपकार्ट आणि अमेझॉन वर बनलेल्या माइक्रोसाइटच्या माध्यमातून कंपनीने रेनो 3 प्रो मध्ये दमदार कॅमेऱ्यांचा समावेश केल्याची माहिती मिळाली आहे.

स्पेसिफिकेशन्स

ओपो रेनो 3 प्रो चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 44 मेगापिक्सलच्या डुअल सेल्फी कॅमेऱ्यासह भारतात लॉन्च होईल. तसेच अलीकडेच हा डिवाइस गूगल कंसोल वर दिसला होता. त्या नुसार फोन मीडियाटेक पी95 चिपसेट आणि 8GB रॅम सह येईल.

OPPO Reno 3 Pro चीनी बाजारात लॉन्च झाला आहे पण भारतात येणारा मॉडेल चीन मध्ये लॉन्च झालेल्या मॉडेल पेक्षा खूप वेगळा असेल. ओपो इंडियाचे वरिष्ठ अधिकारी तसलीम आरिफ यांनी असा खुलासा केला आहे कि भारतात ओपो रेनो 3 प्रो स्मार्टफोन 4जी कनेक्टिविटी सह लॉन्च केला जाईल.

चीन मध्ये लॉन्च झालेल्या मॉडेल बद्दल बोलायचे तर हा स्मार्टफोन 6.5 इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट सह येतो. ओपो रेनो 3 प्रो चीन मध्ये एंडरॉयड 10 आधारित कलर ओएस 7 वर लॉन्च केला गेला आहे जो 2.4 गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 765जी चिपसेट वर चालतो.

फोटाग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 48 मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स586 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. सोबत 13 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलचा ब्लॅक एंड व्हाईट सेंसर आहे. चीन मधील Oppo Reno 3 Pro 32 मेगापिक्सलच्या सिंगल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो तर पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोन मध्ये VOOC 4.0 टेक्नॉलॉजी सह 4,025 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post OPPO Reno 3 Pro 2 मार्चला होईल भारतात लॉन्च, या शानदार डिजाइनच्या जोरावर करेल सर्वांची सुट्टी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-3-pro-india-launch-on-march-2nd/feed/ 0
Exclusive : जानेवारी मध्ये भारतात लॉन्च होईल पॉप-अप कॅमेरा असलेला OPPO F15, लुक असेल वेगळा https://www.91mobiles.com/marathi/exclusive-tech-news-oppo-f15-coming-to-india-in-january-look-design-like-reno-series/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-tech-news-oppo-f15-coming-to-india-in-january-look-design-like-reno-series/#respond Mon, 30 Dec 2019 12:16:06 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6146 विशेष म्हणजे आम्हाला मिळालेल्या फोटो मध्ये स्पष्ट लिहिण्यात आले आहे कि, The Next OPPO F Series Is Coming.

The post Exclusive : जानेवारी मध्ये भारतात लॉन्च होईल पॉप-अप कॅमेरा असलेला OPPO F15, लुक असेल वेगळा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने भारतात आपल्या ‘एफ सीरीज’ च्या जीवावर चांगली फॅन फॉलोइंग बनवली आहे. मीड रेंजच्या या सीरीजचे स्मार्टफोन फक्त लुक आणि डिजाईनच्या बाबतीती शानदार नव्हते तर स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत पण हे स्मार्टफोन्स खूप ताकदवान होते. ओपोच्या या सीरीज मध्ये येणारा शेवटचे स्मार्टफोन्स OPPO F11 आणि OPPO F11 Pro होते. हे दोन्ही स्मार्टफोन बाजारात झाले होते. पण त्यानंतर बातम्या येऊ लागल्या होत्या कि ओपो आपली एफ सीरीज बंद करत आहे. आज 91मोबाईल्सला एक्सक्लूसिव बातमी मिळाली आहे कि OPPO आपल्या एफ सीरीजच्या नवीन डिवाईस वर काम करत आहे आणि या सीरीज मध्ये लवकरच नवीन स्मार्टफोन OPPO F15 नावाने लॉन्च होणार आहे.

91मोबाईल्सला ओपोची एक टीजर ईमेज मिळाली आहे ज्यात कंपनीच्या आगामी स्मार्टफोनचा खुलासा झाला आहे. तसेच सूत्रांकडून माहिती मिळाली आहे कि ओपो कंपनीच्या एफ सीरीजच्या आगामी स्मार्टफोन वर काम करत आहे आणि या आगामी डिवाईसचे नाव OPPO F15 असेल. प्राप्त माहितीनुसार OPPO F15 कंपनी द्वारा जानेवारी मध्ये लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे आम्हाला मिळालेल्या फोटो मध्ये स्पष्ट लिहिण्यात आले आहे कि, The Next OPPO F Series Is Coming.

OPPO F15

ओपो एफ15 च्या फोटोवरून फोनच्या डिजाईनची माहिती पण मिळाली आहे. हा फोन बेजल लेस डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल. OPPO F15 मध्ये ‘यू’ शेप वॉटरड्रॉप नॉच असेल. आशा आहे कि OPPO F15 Pro मध्ये पॉप अप कॅमेरा मिळेल. ओपो एफ सीरीजच्या शेवटच्या स्मार्टफोन मध्ये पण पॉप अप कॅमेरा देण्यात आला होता. फोटो मध्ये OPPO F15 च्या डाव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर देण्यात आला आहे तसेच उजव्या पॅनल वर सिम स्लॉट सह पावर बटण आहे. आशा आहे कि हा पावर बटण फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड असू शकतो. महत्वाचे म्हणजे OPPO F15 कंपनी Reno सीरीज सारख्या डिजाईनसह अनु शकते. म्हणजे फोनचा रियर पॅनल OPPO Reno फोन सारखा असेल. OPPO F15 मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळेल जो बॅक पॅनल वर डावीकडे वरच्या बाजूला असेल.

Oppo F11

Oppo F11 कंपनी ने 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे. हा फोन 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.5-इंचाच्या फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन ओपो ने एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस 6.0 वर सादर केला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या मीडियाटेक हेलीयो पी70 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये माली जी72 एमपी3 जीपीयू देण्यात आला आहे.

फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 48-मेगापिक्सलचा 6पी लेंस प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे जो एफ/1.79 अपर्चरला सपोर्ट करतो. तसेच बॅक पॅनल वर 5-मेगापिक्सलचा सेकेंडी कॅमेरा सेंसर आहे. Oppo F11 चा रियर कॅमेरा सेटअप लो लाईट फोटोग्राफीचे शानदार रिजल्ट देण्याचा दावा करतो. तसेच सेल्फी साठी हा फोन 16-मेगापिक्सलच्या पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Oppo F11 इंडिया मध्ये 4जीबी रॅम वर सादर केला गेला आहे. हा फोन 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने 256जीबी पर्यंत वाढवता येतो. Oppo F11 डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई सह बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन वीओओसी फ्लॅश चार्ज 3.0 टेक्नॉलॉजी असलेल्या 4,020एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.

The post Exclusive : जानेवारी मध्ये भारतात लॉन्च होईल पॉप-अप कॅमेरा असलेला OPPO F15, लुक असेल वेगळा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-tech-news-oppo-f15-coming-to-india-in-january-look-design-like-reno-series/feed/ 0
जगातील सर्वात वेगाने चार्ज होणारा फोन Reno Ace झाला लॉन्च, सर्वात ताकदवान प्रोसेसर आणि 12जीबी रॅम आहे यात https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-ace-with-90hz-display-and-65w-fast-charging-launched/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-ace-with-90hz-display-and-65w-fast-charging-launched/#respond Thu, 10 Oct 2019 13:00:58 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5496 सर्वात महाग 12GB रॅम व 256GB वेरिएंटची किंमत RMB 3,799 (जवळपास 37,950 रुपये) आहे.

The post जगातील सर्वात वेगाने चार्ज होणारा फोन Reno Ace झाला लॉन्च, सर्वात ताकदवान प्रोसेसर आणि 12जीबी रॅम आहे यात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने चीन मध्ये आयोजित एका इवेंट मध्ये Reno आणि K सीरीजचे स्मार्टफोन्स सादर केले आहेत. कंपनीने या दोन सीरीज मध्ये Reno Ace आणि OPPO K5 लॉन्च केले आहेत. Oppo Reno Ace बद्दल बोलायचे तर हा 65 वॉट चार्जिंग टेक्नोलॉजी सह येतो जी 25 मिनिटांत फोनची बॅटरी 75 टक्के चार्ज करते.

OPPO Reno Ace ची डिजाइन

OPPO Reno Ace बेजल लेस नॉच डिस्प्ले सह सादर केला गेला आहे. डिस्प्लेच्या दोन्ही कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. तसेच डिस्प्लेच्या वर्षय बाजूला ‘वी’ शेप नॉच आहे. फोनचा रियर कॅमेरा सेटअप बॅक पॅनल वर मधोमध वर्टिकल शेप मध्ये देण्यात आला आहे. चारही कॅमेरा सेंसर एकाच लाइन मध्ये आहे आणि सर्वात वर असलेल्या सेंसर खाली 48MP लिहिण्यात आले आहे.

कॅमेरा सेटअपच्या उजवीकडे एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे. फोन मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर नाही म्हणजे हा डिवाइस इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो. OPPO Reno Ace च्या बॅक पॅनल वर खाली OPPO ब्रॅण्डिंग सोबत ‘Designed for reno’ लिहण्यात आले आहे. तसेच उजव्या पॅनल वर पावर बटण आणि डाव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर मिळेल.

Reno Ace ची किंमत

OPPO Reno Ace बद्दल बोलायचे तर कंपनीने हा तीन वेरिएंट मध्ये सादर केला आहे. या फोनच्या 8GB रॅम+ 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत RMB 3,199 (जवळपास 32,000 रुपये), 8GB रॅम व 256GB मॉडेलची किंमत RMB 3,399 (जवळपास 33,000 रुपये) आणि सर्वात महाग 12GB रॅम व 256GB वेरिएंटची किंमत RMB 3,799 (जवळपास 37,950 रुपये) आहे. हा फोन चीन मध्ये या महिन्याच्या शेवटी उपलब्ध होईल.

इंट्रोडक्टरी ऑफरमध्ये 8GB रॅम व 128GB वेरिएंट RMB 2,999 (जवळपास 30,000 रुपये) आणि 8GB रॅम व 256GB मॉडेल RMB 3,199 (जवळपास 32,000 रुपये) मध्ये सेल केला जाईल.

OPPO Reno Ace चे स्पेसिफिकेशन्स

OPPO Reno Ace चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 1080 x 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या फुलएचडी एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करेल. ओपोने आपला हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह बाजारात आणला आहे, ज्यात स्क्रीन वर टच करताच हा अनलॉक होईल. OPPO Reno Ace एंडरॉयड 9 पाई सह येतो जो 2.96गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 7एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 855+ चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफी साठी OPPO Reno Ace मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सपोर्ट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर 48 मेगापिक्सलचा Sony IMX586 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 13 मेगापिक्सलच्या टेलीफोटो लेंस, 8 मेगापिक्सलच्या सुपर वाईड एंगल लेंस आणि 2 मेगापिक्सल सेंसरला सपोर्ट करेल. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी Reno Ace मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. OPPO Reno Ace 65W SuperVOOC 2.0 टेक्नॉलॉजी सह येतो तसेच या फोन मध्ये 4000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post जगातील सर्वात वेगाने चार्ज होणारा फोन Reno Ace झाला लॉन्च, सर्वात ताकदवान प्रोसेसर आणि 12जीबी रॅम आहे यात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-ace-with-90hz-display-and-65w-fast-charging-launched/feed/ 0
48-मेगापिक्सल कॅमेरा सह येणारे हे स्मार्टफोन आहेत भारतात सेल साठी उपलब्ध, किंमत होते 10,999 रुपयांपासून सुरु https://www.91mobiles.com/marathi/smartphone-in-india-with-48mp-camera-oppo-reno-oneplus-7-pro-xiaomi-redmi-note-7-honor-vivo/ https://www.91mobiles.com/marathi/smartphone-in-india-with-48mp-camera-oppo-reno-oneplus-7-pro-xiaomi-redmi-note-7-honor-vivo/#respond Fri, 31 May 2019 15:42:08 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4479 आज आम्ही इंडियन मार्केट मधील त्या सर्व स्मार्टफोनची लिस्ट बनवली ज्यात तुम्हाला 48-मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल.

The post 48-मेगापिक्सल कॅमेरा सह येणारे हे स्मार्टफोन आहेत भारतात सेल साठी उपलब्ध, किंमत होते 10,999 रुपयांपासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन बाजारा साठी साल 2019 खूप खास होता. यावर्षी अनेक नवीन टेक्नॉलॉजी टेक मंचा सादर झाल्या. स्मार्टफोन डिजाईन पासून कॅमेरा सेटअप व स्पेसिफिकेशन्स पर्यंतच्या क्षेत्रात टेक ब्रँड्सनी खूप शानदार स्मार्टफोन सादर केले आहेत. इंडियन यूजर्सना पण हि एडवांस टेक्नॉलॉजी खूप भावली आहे. यावर्षी फक्त हाईएंड फ्लॅगशिप बजेट नाही तर लो बजेट सेग्मेंट मध्ये पण पावर कॅमेरा असलेले असे फोन लॉन्च झाले आहेत ज्यात 48-मेगापिक्सल पर्यंतचा कॅमेरा सेंसर्स आहे. आज आम्ही इंडियन मार्केट मधील त्या सर्व स्मार्टफोनची लिस्ट बनवली ज्यात तुम्हाला 48-मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल.

Xiaomi Redmi Note 7S
शाओमी ने Redmi Note 7S लॉन्च करून पुन्हा एकदा सिद्ध केले कि हि कंपनी एवढ्या कमी किंमतीत जे स्पेसिफिकेशन्स देऊ शकते ते इतर कोणताही ब्रँड देऊ शकत नाही. Redmi Note 7S भारतातील सर्वात स्वस्त 48-एमपी रियर कॅमेरा असलेला फोन आहे. हा फोन डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्याच्या बॅक पॅनल वर 5-एमपी चा सेकेंडरी कॅमेरा आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 13-एमपी च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Redmi Note 7S गोरिल्ला ग्लास 5 ने कोटेड 6.3-इंचाच्या फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले ला सपोर्ट करतो. एंडरॉयड 9 पाई आधारित मीयूआई 10 सह हा फोन ऑक्टा-कोर प्रोसेसर व क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट वर चालतो. तसेच पावर बॅकअप साठी हा फोन क्विक चार्ज 4 सपोर्ट वाल्या 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. Redmi Note 7S च्या 3जीबी रॅम व 32जीबी स्टोरेज वेरिएंट 10,999 रुपये तर 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Xiaomi Redmi Note 7 Pro
शाओमी रेडमी नोट सीरीज मध्ये लॉन्च झालेला हा डिवाईस पण 48-एमपी पावर असलेल्या कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Redmi Note 7 Pro डुअल कॅमेरा वर सादर केला गेला आहे ज्यात एफ/1.8 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स586 सेंसर प्राइमरी सेंसर तसेच 5-मेगापिक्सलचा डेफ्थ-सेंसिग सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 13-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Redmi Note 7 Pro गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड 6.3-इंचाच्या फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. एंडरॉयड 9 पाई आधारित मीयूआई 10 सह हा फोन ऑक्टा-कोर प्रोसेसर व 11एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालतो. पावर बॅकअप साठी यात क्विक चार्ज 4 सपोर्ट वाली 4,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. रेडमी नोट 7 प्रो चा 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरिएंट 13,999 रुपये तर 6जीबी रॅम + 128जीबी मेमरी वेरिएंट 16,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

OPPO F11 / F11 Pro
ओपो ने एफ सीरीजचे लेटेस्ट स्मार्टफोन F11 आणि F11 Pro डुअल रियर कॅमेऱ्याला सपार्ट करतात. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 48-मेगापिक्सलचा 6पी लेंस प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे जो एफ/1.79 अपर्चरला सपोर्ट करतो. तसेच 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर आहे. त्याचप्रमाणे सेल्फी साठी हा फोन 16-मेगापिक्सलच्या पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

OPPO F11 Pro 6जीबी रॅम मेमरी वर लॉन्च झाला आहे जो 6.5-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस 6.0 सह हा फोन आक्टा-कोर प्रोसेसर व मीडियाटेक हेलीयो पी70 चिपसेट वर चालतो. तसेच पावर बॅकअप साठी हा फोन वीओओसी फ्लॅश चार्ज 3.0 टेक्नॉलॉजी सह येणाऱ्या 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. फोनचा 64जीबी स्टोरेज वेरिएंट 24,990 रुपये तर 128जीबी स्टोरेज वेरिएंट 25,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता.

Vivo V15 Pro
वीवो चा हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. फोन मध्ये दुसरा सेंसर 8-मेगापिक्सलचा आहे तर तिसरा सेंसर 5-मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सेल्फी साठी V15 Pro 32-मेगापिक्सलच्या पॉप-अप फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Vivo V15 Pro 6.39-इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित फनटच ओएस वर सादर केला गेला आहे जो ऑक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालतो. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सोबत हा फोन 3,700एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. 28,990 रुपयांमध्ये लॉन्च झालेला हा फोन 26,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

OnePlus 7 Pro
OnePlus 7 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. याचा मेन सेंसर एफ/1.6 अपर्चर वाला आहे आणि कंपनीने हा 48-मेगापिक्सलच्या Sony IMX5867पी लेंस ने सुसज्ज केला आहे. हा सेंसर ऑप्टिकल ईमेज स्टेबलाईजेशन टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. सोबतच दुसरा सेंसर 8-मेगापिक्सलचा आहे जी टेलीफोटो लेंस आहे. यात तिसरा सेंसर 16-मेगापिक्सलचा आहे तो वाइड-एंगल साठी देण्यात आला आहे. हा सेंसर 117-डिग्री फिल्ड ऑफ व्यू ला सपोर्ट करतो. सेल्फी साठी या फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा पॉप-अप कॅमेरा देण्यात आला आहे.

यात 6.7-इंचाचा क्यूएचडी+ फ्लूइड ऐमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 9 पाई सह ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि क्वॉलकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 वर चालतो. तसेच अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सोबत फोन मध्ये Wrap चार्ज 30 फास्ट चार्जिंग सपॉर्ट सह 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 6जीबी रॅम/ 128जीबी इंटरनल स्टोरेज, 8जीबी रॅम/256जीबी स्टोरेज वेरिएंट आणि 12जीबी रॅम/256जीबी स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च झाला आहे ज्याची किंमत 48,999 रुपयांपासून सुरु होत आहे.

OnePlus 7
OnePlus 7 Pro चा छोटा मॉडेल OnePlus 7 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.7 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा 0.8-माइक्रोन कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सोबतच हा फोन एफ/2.4 अपर्चर वाल्या 5-मेगापिक्सलच्या सेकेंडरी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सेल्फी कॅमेरा पाहता OnePlus 7 च्या फ्रंट पॅनल वरील नॉच मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

OnePlus 7 6.41-इंचाच्या आप्टिक एमोलेड वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. हा फोन पण एंडरॉयड 9 पाई आधारित आक्सिजन ओएस सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर चालतो. हा फोन पण अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअप साठी 20वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली 3,700mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. OnePlus 7 चा 6जीबी रॅम व 128जीबी मेमरी वेरिएंट 32,999 रुपये तर 8जीबी रॅम व 256जीबी स्टोरेज वेरिएंट 37,999 रुपयांमध्ये 4 जून पासून विकत घेता येईल.

OPPO Reno 10x Zoom Edition
OPPO Reno 10x Zoom ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.7 अपर्चर वाला 48-मेगापिक्सल प्राइमरी सेंसर, एफ/2.2 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी तसेच एफ/3.0 अपर्चर वाला 13-मेगापिक्सल तिसरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा पॉप-अप शार्कफिन फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हा फोन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्टेड 6.6-इंचाच्या एमलोड डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. एंडरॉयड पाई आधारित हा फोन कलरओएस 6 सह हा फोन पण क्वालकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 वर चालतो. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह हा फोन वीओओसी 3.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 4,065एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. फोनचा 6जीबी रॅम व 128जीबी मेमरी वेरिएंट 39,990 रुपये आणि 8जीबी रॅम व 256जीबी स्टोरेज वेरिएंट 49,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे.

OPPO Reno
Oppo Reno चा स्टँडर्ड मॉडेल डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 48-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स586 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे तसेच हा 5-मेगापिक्सलच्या सेकेंडरी रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सेल्फी साठी या फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे जो पॉप-अप शार्क फिन डिजाईन वर बनला आहे.

हा फोन 6.4-इंचाच्या फुल एचडी+ डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे. एंडरॉयड 9 पाई आधारित हा फोन कलर ओएस 9 सह हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर चालतो. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,765 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने हा 6जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज सह सादर केला आहे. तसेच याचा एक 8जीबी रॅम वाला मॉडेल आहे जो 256जीबी स्टोरेज सह येतो.

Honor View 20
या फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात एफ/1.8 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स586 सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोनचा दुसरा कॅमेरा टीओएफ आहे जो डेफ्थ सेंसिंग आणि 3डी डिटेक्शन साठी आहे. सेल्फी साठी या फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 25-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हा कॅमेरा डिस्प्ले वरील पंच-होल मध्ये देण्यात आला आहे.

या फोन मध्ये 6.4-इंचाचा सुपर फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. एंडरॉयड 9 पाई सह हा हुआवई किरीन 980 चिपसेट वर चालतो. पावर बॅकअप साठी ऑनर व्यू20 मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी मिळेल. Honor View 20 चा 6जीबी रॅम वाल्या मॉडेलची किंमत 37,999 रुपये आहे. तर 8जीबी रॅम वाला मॉडेल 45,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Xiaomi Black Shark 2
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Black Shark 2 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 48-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 13-मेगापिक्सलचा सेकेंडरी रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 20-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. विशेष म्हणजे हा एक गेमिंग फोन आहे जो लिक्विड कूल 3.0 टेक्नोलॉजी सह येतो.

Black Shark 2 6.39-इंचाच्या ट्रू व्यू ऐमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. एंडरॉयड 9 पाई सोबत या फोन मध्ये क्वालकॉम चा सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 27वॉट चार्जला सपॉर्ट करते. शाओमीच्या या फोनच्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 39,999 रुपये आहे. तर फोनचा 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 49,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. हा डिवाइस 4 जूनला सेल साठी येईल.

The post 48-मेगापिक्सल कॅमेरा सह येणारे हे स्मार्टफोन आहेत भारतात सेल साठी उपलब्ध, किंमत होते 10,999 रुपयांपासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/smartphone-in-india-with-48mp-camera-oppo-reno-oneplus-7-pro-xiaomi-redmi-note-7-honor-vivo/feed/ 0
हटके कॅमेरा डिजाइन वाले हे फोन यावर्षी आहेत चर्चेत https://www.91mobiles.com/marathi/phone-with-the-unique-style-camera/ https://www.91mobiles.com/marathi/phone-with-the-unique-style-camera/#respond Tue, 28 May 2019 12:49:42 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4432 पुढे आम्ही अशाच शानदार कॅमेरा फोनची चर्चा केली आहे जे आपल्या हटके डिजाइनमुळे चर्चेत आहेत.

The post हटके कॅमेरा डिजाइन वाले हे फोन यावर्षी आहेत चर्चेत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्यावर्षी वीवो ने पॉप-अप कॅमेरा असलेला नेक्स फोन सादर केला होता. त्यानंतर ओपोचा फाइंड एक्स आला. या दोन्ही फोन्सची खूप चर्चा झाली आणि त्यानंतर अंदाज लावले जाऊ लागेल कि मोबाईल कॅमेरा सेग्मेंट मध्ये आता अजून नवीन इनोवेशन बघायला मिळतील. 2018 मध्ये जास्त काही नाही झाले पण 2019 येताच अनेक स्टाइलिश फोन उपलब्ध झाले. वीवो वी15 प्रो, वीवो वी15, वनप्लस 7 प्रो, ओपो एफ11 प्रो आणि ओपो एफ11 समवेत अनेक डिवाइस पॉप-अप कॅमेरा सह आले. परंतु काही असे पण फोन आले ज्यांचा कॅमेरा यापेक्षा पण हटके आहे आणि हे लोकांना आवडत पण आहेत. खास बाब अशी कि यातील काही फोन भारतात उपलब्ध झाले आहेत तर काही थोड्याच दिवसांत येणार आहेत. पुढे आम्ही अशाच शानदार कॅमेरा फोनची चर्चा केली आहे जे आपल्या हटके डिजाइनमुळे चर्चेत आहेत.

ओपो रेनो

ओपो ने आज भारतात रेनो सीरीज अंतर्गत दोन फोन लॉन्च केले आहेत. कंपनी ने रेनो स्टँडर्ड एडिशन व्यतिरिक्त रेनो 10एक्स झूम मॉडेल पण सादर केला आहे आणि या दोन्ही फोन्स मध्ये तुम्हाला यूनिक स्टाइलचा कॅमेरा मिळेल. या फोन मध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेरा आहे जो फोन बॉडीच्या आत देण्यात आला आहे. फ्रंट कॅमेरा ऑन करताच हा बॉडी बाहेर येतो पण साधारण पॉप-अप ऐवजी हा त्रिकोणी आकारात बाहेर येतो जो समुद्रातील शार्कच्या फिन प्रमाणे दिसतो. यामुळे कंपनीने याला ”शार्क फिन” कॅमेऱ्याचे नाव दिले आहे. दोन्ही मॉडेल मध्ये हाच कॅमेरा आहे. ओपो रेनो चे फुल स्पेसिफिकेशन बघण्यासाठी इथे क्लिक करा.

सॅमसंग गॅलेक्सी ए80

https://www.instagram.com/p/BwFHihbgpTs/?utm_source=ig_web_copy_link

सॅमसंग गॅलेक्सी ए80 कंपनी ने थाइलँड मध्ये लॉन्च केला आहे आणि लवकरच हा भारतात पण उपलब्ध होऊ शकतो. या फोन मध्ये तुम्हाला स्लाइड आउट रोटेटिंग कॅमेरा मिळेल. अशाप्रकारची डिजाइन पहिल्यांदा सॅमसंग ने सादर केली आहे. गॅलेक्सी ए80 मध्ये सेल्फी कॅमेरा नाही पण जेव्हा तुम्ही फ्रंट कॅमेरा ऑन करता तेव्हा रियर कॅमेरा वर येऊन सेल्फी कॅमेऱ्याचे काम करतो. त्यामुळे फ्रंट आणि बॅक दोन्ही मध्ये तुम्हाला सारखा कॅमेरा मिळेल. सॅमसंग गॅलेक्सी ए80 चे फुल स्पेसिफिकेशन बघण्यासाठी इथे क्लिक करा.

असूस झेनफोन 6

असूस झेनफोन 6 पण लवकरच भारतात येणार आहे. या फोनचा कॅमेरा पण खूप मजेदार आहे. कंपनीने असूस झेनफोन 6 फ्लिप कॅमेरा सह सादर केला आहे. बॅक पॅनल मध्ये डुअल कॅमेरा सेटअप आहे आणि जेव्हा तुम्ही सेल्फी ऑप्शन ऑन करता तोच कॅमेरा फ्लिप होऊन पुढे येतो. इतकेच नव्हे तर हा कॅमेरा तुम्ही मॅनुअली कंट्रोल करू शकता. म्हणजेच कॅमेरा फ्लिप होताना तुम्ही तुम्हाला हवा तिथे त्याला थांबवू शकता. तसेच वीडियो शूटिंग मध्ये पण तुम्ही फोन स्थिर ठेऊन फक्त कॅमेरा हलवू शकता. याचा मोशन ट्रॅकर पण शानदार आहे. मोशन ट्रॅकर ऑन करताच कॅमेरा स्वतःहून हलून सबजेक्ट ट्रॅक करतो. असूस झेनफोन 6 चे फुल स्पेसिफिकेशन बघण्यासाठी इथे क्लिक करा.

ओपो फाइंड एक्स

ओपो फाइंड एक्स कंपनीने गेल्यावर्षी लॉन्च केला होता. परंतु आता पण या फोनच्या कॅमेऱ्याची चर्चा आहे. यात कंपनीने मोटराइज्ड कॅमेरा दिला होता आणि पहिल्यांदा अशाप्रकारच्या टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला होता. आता पण ओपो फाइंड एक्स एक चांगला इनोवेटिंव डिवाइस म्हणून ओळखला जातो. फोन मध्ये फ्रंट आणि सेल्फी दोन्ही कॅमेरा लपलेले आहेत पण जेव्हा तुम्ही कॅमेरा ऑन कराल तेव्हा हा बाहेर येतो. फाइंड एक्स मध्ये कॅमेरा तुम्ही मॅनुअली पण बंद आणि उघडू शकता. ओपो फाइंड एक्सचे फुल स्पेसिफिकेशन बघण्यासाठी इथे क्लिक करा.

The post हटके कॅमेरा डिजाइन वाले हे फोन यावर्षी आहेत चर्चेत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/phone-with-the-unique-style-camera/feed/ 0
सर्वात वेगळ्या सेल्फी कॅमेरा डिजाइन सह भारतात आला Oppo Reno, 10X झूम सह आहेत हे शानदार फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-and-reno-10x-zoom-launched-in-india-know-price/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-and-reno-10x-zoom-launched-in-india-know-price/#respond Tue, 28 May 2019 10:06:42 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4424 Oppo Reno स्टँडर्ड वर्जनच्या 8जीबी रॅम आणि 256जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 32,990 रुपये आहे.

The post सर्वात वेगळ्या सेल्फी कॅमेरा डिजाइन सह भारतात आला Oppo Reno, 10X झूम सह आहेत हे शानदार फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी कंपनी Oppo ने काही दिवसांपूर्वी आपल्या नवीन सीरीज Reno चा स्मार्टफोन चीन मध्ये लॉन्च केला होता, जो आज भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आला आहे. Reno सीरीज स्मार्टफोन मध्ये कंपनीने OPPO Reno स्टँडर्ड वेरिएंट सोबत Reno 10x Zoom एडिशन सादर केला आहे.

OPPO Reno स्टँडर्ड वर्जन कंपनीने क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 SoC आणि Reno 10x Zoom एडिशन क्वॉलकॉमच्या लेटेस्ट टॉप-नॉच स्नॅपड्रॅगॉन 855 प्रोसेसर सह सादर केला आहे. दोन्ही स्मार्टफोन मध्ये ऑल-स्क्रीन, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर व wedge-शेप (शार्क फिन पॉप-अप) पॉप-अप सेल्फी कॅमेरा आहे.

किंमत आणि उपलब्धता
किंमतीबद्दल बोलायचे झाले तर Oppo Reno 10X Zoom एडिशन 6जीबी रॅम व 128जीबी 39,990 रुपये आणि 8जीबी रॅम व 256जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 49,990 रुपये आहे. तसेच Oppo Reno स्टँडर्ड वर्जनच्या 8जीबी रॅम आणि 256जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 32,990 रुपये आहे. तसेच फोन ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट वर सेल केला जाईल.

सर्वात खास आहे कॅमेरा डिजाइन
दोन्ही फोन मध्ये फुल व्यू डिस्प्ले देण्यात आली आहे आणि सेल्फी कॅमेऱ्याच्या जागी एक वेगळ्या डिजाइनचा पॉप-अप कॅमेरा दिला आहे. या नवीन कॅमेऱ्याला ‘शार्क फिन पॉपअप’ नाव देण्यात आले आहे. आता पर्यंत पॉप-अप कॅमेरा चौकोनी आकारात दिले जात होते जो फोन बॉडी बाहेर येतो. पण ओपो रेनोचा पॉप-अप कॅमेरा पण खूप वेगळा आहे. हा पॉप-अप कॅमेरा त्रिकोणी आकारात आहे तसेच वरच्या पॅनल वर लांब स्लाइड वर दिला गेला आहे. सेल्फी कमांड देताच हा एका बाजूने वर येतो आणि याच बाजूला कॅमेरा सेंसर आहे.

OPPO Reno 10x Zoom एडिशन स्पेसिफिकेशन
OPPO Reno 10x Zoom वेरिएंट बद्दल बोलायचे तर यात 6.6-इंचाचा एमलोड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रेजोल्यूशन 2,340 x 1,080 पिक्सल आहे आणि यात कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 टॉप देण्यात आला आहे. सोबत फोन मध्येतीन कॅमेरा देण्यात आले आहेत. फोनच्या मागे 48एमपी प्राइमरी सेंसर एफ/1.7 अपर्चर, 8एमपी एफ/2.2 सेकंडरी शूटर आणि 13एमपी एफ/3.0 थर्ड स्नॅपर आहे. तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. एंडरॉयड पाई आधारित हा फोन कलरओएस 6 वर चालतो आणि हा क्वालकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 वर सादर केला गेला आहे. पावर बॅकअप साठी हा फोन वीओओसी 3.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह 4,065एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.

तसेच फोन मध्ये 6जीबी / 8जीबी रॅम सह 128जीबी / 256जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. कननेक्टिविटी ऑप्शन साठी फोन मध्ये 4जी एलटीई, डुअल सिम स्लॉट, डुअल बॅंड वाई-फाई, ब्लूटूथ 5.0, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि ए-जीपीएस आहे.

ओपो रेनो च्या स्टँडर्ड वर्जन चे स्पेसिफिकेशन
Oppo Reno च्या स्टँडर्ड मॉडेल बद्दल बोलायचे तर या फोन मध्ये 6.4-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले आहे जो पूर्णपणे बेजल लेस आहे. यात तुम्हाला कोणतीही नॉच मिळणार नाही. याचा सेल्फी कॅमेरा सर्वात वेगळा आहे. पॉपअप आहे पण तिरक्या स्टाइल मध्ये उघडतो. फोन मध्ये सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी 16-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. सोबत 48-मेगापिक्सल (आईएमएक्स586) + 5-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे जो एआई सह येतो.

हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर चालतो. एंडरॉयड 9 पाई आधारित हा फोन कलर ओएस 9 वर चालतो. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,765 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने हा 6जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज सह सादर केला आहे. तसेच याचा एक 8जीबी रॅम वाला मॉडेल आहे जो 256जीबी स्टोरेज सह येतो.

The post सर्वात वेगळ्या सेल्फी कॅमेरा डिजाइन सह भारतात आला Oppo Reno, 10X झूम सह आहेत हे शानदार फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-and-reno-10x-zoom-launched-in-india-know-price/feed/ 0
सर्वात वेगळ्या कॅमेरा सेल्फी डिजाइन सह 28 मे ला भारतात लॉन्च होईल Oppo Reno, कंपनीने केला शिक्कामोर्तब https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-series-smartphone-will-launch-on-28th-may-in-india-company-send-invites/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-series-smartphone-will-launch-on-28th-may-in-india-company-send-invites/#respond Mon, 13 May 2019 13:12:20 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4303 Oppo Reno चे स्पेसिफिकेशन खूप शानदार आहेत आणि हा वनप्लसचा थेट प्रतिस्पर्धी म्हणता येईल.

The post सर्वात वेगळ्या कॅमेरा सेल्फी डिजाइन सह 28 मे ला भारतात लॉन्च होईल Oppo Reno, कंपनीने केला शिक्कामोर्तब first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी स्मार्टफोन कंपनी ओपो ने कन्फर्म केले आहे कि ती भारतात Oppo Reno Series 28 मे ला लॉन्च करेल. कंपनी ने फोनच्या लॉन्चची माहिती प्रेस इन्वाइट द्वारे दिली. ओपो ने फोनच्या लॉन्च बद्दल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर एक पोस्टर पण शेअर केली आहे. 91मोबाईल्स ने गेल्याच आठवड्यात याची एक्सक्लूसिव माहिती दिली होती कि कंपनी 28 मे ला हा फोन लॉन्च करेल.

चीन मध्ये कंपनी ने या फोनचे दोन मॉडेल सादर केले होते. एक मॉडेल स्टॅन्डर्ड आहे तर दुसरा स्पेशल एडिशन आहे. Oppo Reno सोबत Oppo Reno 10X Zoom Edition सादर केला गेला होता आणि आम्हाला जी माहिती मिळाली आहे त्या नुसार दोन्ही मॉडेल भारतात येणार आहेत. प्राइस बद्दल बोलायचे तर आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार Oppo Reno चा स्टॅन्डर्ड वेरियंट 30 हजार रुपये ते 35 हजार रुपयांपर्यंत असेल तर दुसरा वेरियंट 50 हजारांच्या बजेट मध्ये येऊ शकतो. Oppo Reno चे स्पेसिफिकेशन खूप शानदार आहेत आणि हा वनप्लसचा थेट प्रतिस्पर्धी म्हणता येईल.

Oppo Reno च्या स्टँडर्ड मॉडेल बद्दल बोलायचे तर या फोन मध्ये 6.4-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले आहे जो पूर्णपणे बेजल लेस आहे. यात तुम्हाला कोणतीही नॉच दिसणार नाही. याचा सेल्फी कॅमेरा सर्वात वेगळा आहे. पॉपअप तर आहे पण त्रिकोणी स्टाइल मध्ये उघडतो. फोन मध्ये सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी 16-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. या नवीन कॅमेऱ्याला ‘शार्क फिन पॉपअप’ नाव देण्यात आले आहे. पॉपअप सेल्फी कॅमेरा मॉड्यूल मध्ये फिट आहे. हा कॅमेरा सेल्फीची कमांड देताच फोन बॉडी बाहेर येतो. साधारणतः पॉप-अप कॅमेरा चौकोनी आकाराचा असतो पण Oppo Reno चा पॉप-अप कॅमेरा त्रिकोणी आकाराचा आहे जो एका बाजूने वर येतो.

यासोबतच यात 48-मेगापिक्सल (आईएमएक्स586) + 5-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे जो एआई सह येतो. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर चालतो. एंडरॉयड 9 पाई आधारित हा फोन कलर ओएस 9 वर चालतो. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,765 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. चीन मध्ये कंपनी ने हा 6जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज सह सादर केला आहे. तसेच याचा एक 8जीबी रॅम मॉडेल आहे जो 256जीबी स्टोरेज सह येईतो. भारतात दोन्ही मॉडेल येतील कि नाही सांगता येत नाही.

Oppo Reno 10X Zoom बद्दल बोलायचे तर याच्या बॅक पॅनल वर 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सोनी आईएमएक्स586 सेंसर देण्यात आला आहे. फोनचा दुसरा कॅमेरा सेंसर 8-मेगापिक्सलचा आहे जी 120डिग्री अल्ट्रा वाइड एंगल लेंस आहे. तसेच बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे.

हा फोन 6.65-इंचाच्या फुलएचडी+ AMOLED डिस्प्ले सह लॉन्च केला गेला आहे जो गोरिल्ला ग्लास 6 ने कोटेड आहे. कंपनी ने हा इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह सादर केला आहे. एंडरॉयड पाई आधारित हा फोन कलरओएस 6 वर चालतो आणि हा क्वालकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 वर सादर केला गेला आहे. पावर बॅकअप साठी यात फोन वीओओसी 3.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह 4,065एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post सर्वात वेगळ्या कॅमेरा सेल्फी डिजाइन सह 28 मे ला भारतात लॉन्च होईल Oppo Reno, कंपनीने केला शिक्कामोर्तब first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-series-smartphone-will-launch-on-28th-may-in-india-company-send-invites/feed/ 0
8जीबी रॅम आणि स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट सह लॉन्च झाला हा अनोखा रेनो फोन, फोटो बघून व्हाल हैराण https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-10x-zoom-edition-launch-shark-fin-pop-up-snapdragon-855-module-specifications-price/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-10x-zoom-edition-launch-shark-fin-pop-up-snapdragon-855-module-specifications-price/#respond Wed, 10 Apr 2019 12:06:20 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4056 कंपनी ने याला ‘शार्क फिन पॉप-अप’ नाव दिले आहे.

The post 8जीबी रॅम आणि स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट सह लॉन्च झाला हा अनोखा रेनो फोन, फोटो बघून व्हाल हैराण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जेव्हापासुन ओपो ने घोषणा केली होती कि कंपनी रियलमी नंतर अजून एक नवीन सब-ब्रँड ‘ओपो रेनो’ नावाने घेऊन येत आहे तेव्हा पासून संपूर्ण टेक विश्व या नवीन सीरीजच्या लॉन्चची वाट बघत आहे. वेळोवेळी रेनो संबधीत लीक समोर येत होते, ज्यात ब्रँडच्या आगामी स्मार्टफोनची माहिती मिळत होती. आज या तमाम लीक्स व गॉसिपना पूर्णविराम देत ओपो ने रेनो टेक मंचावर सादर केला आहे. या नवीन ब्रँड अंतर्गत ओपो रेनो आणि ओपो रेना 10एक्स झूम एडिशन नावाने दोन फोन लॉन्च केले गेले आहेत. यात ओपो रेनो 10एक्स ब्रँडचा हाईएंड फोन आहे जो फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये लॉन्च झाला आहे. चला एक नजर टाकूया ओपो रेनो 10एक्स झूम एडिशनच्या लुक, डिजाईन व फीचर्स तसेच स्पेसिफिकेशन्स वर :

ओपो रेनो डिजाईन
ओपो रेनो फक्त दमदार स्पेसिफिकेशन्स सह येत नाही तर खूप ओनोख्या आणि शानदार डिजाईन वर पण बनला आहे. साधारणता पॉप-अप सेल्फी कॅमेरा किंवा या स्लाईड पॅनल फोनच मार्केट मध्ये आले आहेत. पण ओपो रेनो कंपनीने खूप खास पॉप अप डिजाईन वर बनवला आहे. हा फोन फुल बेजल लेस डिस्प्ले वर बनला आहे ज्यात कोणताही पंच होल किंवा नॉच देण्यात आली नाही. या फोनचा सेल्फी कॅमेरा एक पॉप-अप मॉड्यूल मध्ये फिट आहे. हा कॅमेरा सेल्फी कमांड देताच वर येतो. साधारणतः पॉप-अप कॅमेरा चौकोनी आकाराचा असतो पण ओपो रेनो चा पॉप-अप कॅमेरा त्रिकोणी आकाराचा आहे जो एका बाजूने वर येतो. याच बाजूवर कॅमेरा सेंसर आहे. कंपनी ने याला ‘शार्क फिन पॉप-अप’ नाव दिले आहे.

ओपो रेनो च्या डिस्प्ले खाली इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनल वर मधोमध वर्टिकल शेप मध्ये आहे. कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट आहे तसेच त्याखाली ओपोचा लोगो आणि टॅगलाईन आहे. ओपो रेनो च्या उजव्या पॅनल वर पावर बटण देण्यात आले आहे तसेच डाव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आहे. स्पीकर, 3.5एमएम जॅक तसेच यूएसबी टाईप-सी पोर्ट फोनच्या खालील पॅनल वर देण्यात आला आहे.

कॅमेऱ्याची खूबी
नावावरूनच समजते कि या फोनचा कॅमेरा सेटअप 10एक्स झूम च्या नवीन टेक्नॉलॉजी सह येतो. या टेक्नॉलॉजी मुळे ओपो रेनो च्या या एडिशन मध्ये 16एमएम पासून 160एमएम पर्यंतची फोकल लेंथ मिळते ज्यामुळे लांबच्या आब्जेक्ट चा फोटो पण स्पष्ट दिसतो तसेच नाइज फ्री कॅप्चर होतो. हा कॅमेरा सेटअप हाइब्रिड ऑप्टिकल ईमेज स्टेबलाईजेशन (OIS) सोबत सुपरक्लियन नाइट मोड फीचरला पण सपोर्ट करतो.

ओपो रेनो 10एक्स झूम एडिशनच्या बॅक पॅनल वर 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सोनी आईएमएक्स586 सेंसर देण्यात आला आहे. फोनचा दुसरा कॅमेरा सेंसर 8-मेगापिक्सलचा आहे जी 120डिग्री अल्ट्रा वाइड एंगल लेंस आहे. तसेच बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. सेल्फी साठी ओपो रेनो च्या या ​एडिशन मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स
ओपो रेनो 10एक्स झूम एडिशन 93.1 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियोला सपोर्ट करतो. या फोन मध्ये 6.65-इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्टेड आहे. फोनच्या स्क्रीन वर इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे. कंपनीने हा फोन एंडरॉयड पाई आधारित कलरओएस 6 वर सादर केला आहे जो क्वालकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 वर चालतो.

ओपो रेनो चा हा एडिशन कंपनी द्वारा दोन रॅम वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे जे 8जीबी रॅम तसेच 6जीबी रॅमला सपोर्ट करतात. तसेच या वेरिएंट्स मध्ये 128जीबी मेमरी आणि 256जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. ओपो रेनो 10एक्स झूम एडिशन मध्ये डुअल फ्रिक्वेंसी जीपीएस व एनएफसी सारखे फीचर्स आहेत. चांगल्या गेमिंगसाठी या फोन मध्ये गेम बूस्ट 2.0 टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन वीओओसी 3.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह 4,065एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.

किंमत
6जीबी रॅम व 128जीबी मेमरी = 3,999 युआन (जवळपास 41,000 रुपये)
6जीबी रॅम व 256जीबी मेमरी = 4,499 युआन (जवळपास 46,000रुपये)
8जीबी रॅम व 256जीबी मेमरी = 4,799 युआन (जवळपास 51,000 रुपये)

The post 8जीबी रॅम आणि स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट सह लॉन्च झाला हा अनोखा रेनो फोन, फोटो बघून व्हाल हैराण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-10x-zoom-edition-launch-shark-fin-pop-up-snapdragon-855-module-specifications-price/feed/ 0
Oppo Reno ची लॉन्च डेट झाली निश्चित, 10X झूम, ट्रिपल कॅमेरा आणि 5G सह होईल सादर https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-with-10x-lossless-zoom-lens-5g-support-to-launch-on-april-24/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-with-10x-lossless-zoom-lens-5g-support-to-launch-on-april-24/#respond Mon, 08 Apr 2019 09:21:34 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4034 इनवाइट नुसार इवेंट 24 एप्रिलला 14:00 – 18:00 CEST (भारतीय वेळेनुसार 5:30 pm – 9:30 pm IST) ला होईल.

The post Oppo Reno ची लॉन्च डेट झाली निश्चित, 10X झूम, ट्रिपल कॅमेरा आणि 5G सह होईल सादर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Oppo आपल्या सब-ब्रँड Reno मध्ये पहिला स्मार्टफोन लॉन्च करण्यासाठी पूर्णपणे तयार झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून हँडसेट बद्दल लीक व माहिती समोर येत आहे. आता एका वेबसाइट वर Oppo Reno च्या लॉन्च डेटची माहिती मिळाली आहे. पण लीक व्यतिरिक्त कंपनी ने पण डिवाइसचे काही फीचर्सची ऑफिशल माहिती दिली होती. कंपनी ने कन्फर्म केले होते कि अपकमिंग Oppo Reno मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, 10X झूम, 48-मेगापिक्सल सोनी आईएमएक्स586 सेंसर आणि एचडीआर सपॉर्ट असेल.

पॉकेट लिंक नावाच्या वेबसाइट नुसार कंपनी ने ओपो रेनो च्या लॉन्च साठी मीडिया इनवाइट पाठवायला सुरवात केली आहे. इनवाइट नुसार कंपनी 24 एप्रिलला ज्यूरिक मध्ये एका इवेंट मध्ये हा हँडसेट लॉन्च करेल. मीडिया इन्वाइट मध्ये ‘beyond the obvious’ टॅगलाइन वापरण्यात आली आहे. इनवाइट नुसार इवेंट 24 एप्रिलला 14:00 – 18:00 CEST (भारतीय वेळेनुसार 5:30 pm – 9:30 pm IST) ला होईल.

विशेष म्हणजे याआधी 1 एप्रिल पासून रेनो ओपो च्या अधिकृत वेबसाइट सोबत चीनी शॉपिंग साइट्स वर रजिस्ट्रेशन साठी लिस्ट झाला होता. रजिस्ट्रेशन सोबत कंपनी ने फोन लॉन्च डेटची माहिती दिली होती. या माहिती मध्ये सांगण्यात आले होते कि ओपो रेनो येत्या 10 एप्रिलला टेक मंचावर येईल.

काही दिवसांपूर्वी ओपो रेनो चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना वर पण लिस्ट झाला आहे. टेना वर ओपो रेनो चे दोन मॉडेल समोर आले होते जे पीसीएटी00/ पीसीएएम00 नावाने लिस्ट होते. स्पेसिफिकेशन्स पाहता टेना वर ओपो रेनो च्या या मॉडेलचा डिस्प्ले 6.4-इंचाचा आहे जो फुल एचडी+ रेज्ल्यूशन सपोर्ट करेल. टेना लिस्टिंग मध्ये प्रोसेसरची माहिती समोर आली नाही पण असे समजले आहे कि तो 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाला असेल. तसेच ओपो रेनो क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर सादर केला जाईल.

टेना नुसार ओपो रेनो तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल. या फोनचा सर्वात मोठा वेरिएंट 8जीबी रॅम सह येईल जो बाजारात 256जीबी इंटरनल स्टोरेज तसेच 128जीबी स्टोरेज वर सादर होईल. तसेच टेना वर ओपो रेनो चा तिसरा वेरिएंट 6जीबी रॅम सह दाखवण्यात आला आहे ज्यात 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे. टेना वर ओपो रेनो पिंक व गोल्ड कलर मध्ये दाखवण्यात आला आहे.

The post Oppo Reno ची लॉन्च डेट झाली निश्चित, 10X झूम, ट्रिपल कॅमेरा आणि 5G सह होईल सादर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-with-10x-lossless-zoom-lens-5g-support-to-launch-on-april-24/feed/ 0