48-मेगापिक्सल कॅमेरा सह येणारे हे स्मार्टफोन आहेत भारतात सेल साठी उपलब्ध, किंमत होते 10,999 रुपयांपासून सुरु

स्मार्टफोन बाजारा साठी साल 2019 खूप खास होता. यावर्षी अनेक नवीन टेक्नॉलॉजी टेक मंचा सादर झाल्या. स्मार्टफोन डिजाईन पासून कॅमेरा सेटअप व स्पेसिफिकेशन्स पर्यंतच्या क्षेत्रात टेक ब्रँड्सनी खूप शानदार स्मार्टफोन सादर केले आहेत. इंडियन यूजर्सना पण हि एडवांस टेक्नॉलॉजी खूप भावली आहे. यावर्षी फक्त हाईएंड फ्लॅगशिप बजेट नाही तर लो बजेट सेग्मेंट मध्ये पण पावर कॅमेरा असलेले असे फोन लॉन्च झाले आहेत ज्यात 48-मेगापिक्सल पर्यंतचा कॅमेरा सेंसर्स आहे. आज आम्ही इंडियन मार्केट मधील त्या सर्व स्मार्टफोनची लिस्ट बनवली ज्यात तुम्हाला 48-मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल.

Xiaomi Redmi Note 7S
शाओमी ने Redmi Note 7S लॉन्च करून पुन्हा एकदा सिद्ध केले कि हि कंपनी एवढ्या कमी किंमतीत जे स्पेसिफिकेशन्स देऊ शकते ते इतर कोणताही ब्रँड देऊ शकत नाही. Redmi Note 7S भारतातील सर्वात स्वस्त 48-एमपी रियर कॅमेरा असलेला फोन आहे. हा फोन डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्याच्या बॅक पॅनल वर 5-एमपी चा सेकेंडरी कॅमेरा आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 13-एमपी च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Redmi Note 7S गोरिल्ला ग्लास 5 ने कोटेड 6.3-इंचाच्या फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले ला सपोर्ट करतो. एंडरॉयड 9 पाई आधारित मीयूआई 10 सह हा फोन ऑक्टा-कोर प्रोसेसर व क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट वर चालतो. तसेच पावर बॅकअप साठी हा फोन क्विक चार्ज 4 सपोर्ट वाल्या 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. Redmi Note 7S च्या 3जीबी रॅम व 32जीबी स्टोरेज वेरिएंट 10,999 रुपये तर 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Xiaomi Redmi Note 7 Pro
शाओमी रेडमी नोट सीरीज मध्ये लॉन्च झालेला हा डिवाईस पण 48-एमपी पावर असलेल्या कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Redmi Note 7 Pro डुअल कॅमेरा वर सादर केला गेला आहे ज्यात एफ/1.8 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स586 सेंसर प्राइमरी सेंसर तसेच 5-मेगापिक्सलचा डेफ्थ-सेंसिग सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 13-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Redmi Note 7 Pro गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड 6.3-इंचाच्या फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. एंडरॉयड 9 पाई आधारित मीयूआई 10 सह हा फोन ऑक्टा-कोर प्रोसेसर व 11एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालतो. पावर बॅकअप साठी यात क्विक चार्ज 4 सपोर्ट वाली 4,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. रेडमी नोट 7 प्रो चा 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरिएंट 13,999 रुपये तर 6जीबी रॅम + 128जीबी मेमरी वेरिएंट 16,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

OPPO F11 / F11 Pro
ओपो ने एफ सीरीजचे लेटेस्ट स्मार्टफोन F11 आणि F11 Pro डुअल रियर कॅमेऱ्याला सपार्ट करतात. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 48-मेगापिक्सलचा 6पी लेंस प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे जो एफ/1.79 अपर्चरला सपोर्ट करतो. तसेच 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर आहे. त्याचप्रमाणे सेल्फी साठी हा फोन 16-मेगापिक्सलच्या पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

OPPO F11 Pro 6जीबी रॅम मेमरी वर लॉन्च झाला आहे जो 6.5-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस 6.0 सह हा फोन आक्टा-कोर प्रोसेसर व मीडियाटेक हेलीयो पी70 चिपसेट वर चालतो. तसेच पावर बॅकअप साठी हा फोन वीओओसी फ्लॅश चार्ज 3.0 टेक्नॉलॉजी सह येणाऱ्या 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. फोनचा 64जीबी स्टोरेज वेरिएंट 24,990 रुपये तर 128जीबी स्टोरेज वेरिएंट 25,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता.

Vivo V15 Pro
वीवो चा हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. फोन मध्ये दुसरा सेंसर 8-मेगापिक्सलचा आहे तर तिसरा सेंसर 5-मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सेल्फी साठी V15 Pro 32-मेगापिक्सलच्या पॉप-अप फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Vivo V15 Pro 6.39-इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित फनटच ओएस वर सादर केला गेला आहे जो ऑक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालतो. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सोबत हा फोन 3,700एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. 28,990 रुपयांमध्ये लॉन्च झालेला हा फोन 26,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

OnePlus 7 Pro
OnePlus 7 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. याचा मेन सेंसर एफ/1.6 अपर्चर वाला आहे आणि कंपनीने हा 48-मेगापिक्सलच्या Sony IMX5867पी लेंस ने सुसज्ज केला आहे. हा सेंसर ऑप्टिकल ईमेज स्टेबलाईजेशन टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. सोबतच दुसरा सेंसर 8-मेगापिक्सलचा आहे जी टेलीफोटो लेंस आहे. यात तिसरा सेंसर 16-मेगापिक्सलचा आहे तो वाइड-एंगल साठी देण्यात आला आहे. हा सेंसर 117-डिग्री फिल्ड ऑफ व्यू ला सपोर्ट करतो. सेल्फी साठी या फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा पॉप-अप कॅमेरा देण्यात आला आहे.

यात 6.7-इंचाचा क्यूएचडी+ फ्लूइड ऐमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 9 पाई सह ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि क्वॉलकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 वर चालतो. तसेच अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सोबत फोन मध्ये Wrap चार्ज 30 फास्ट चार्जिंग सपॉर्ट सह 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 6जीबी रॅम/ 128जीबी इंटरनल स्टोरेज, 8जीबी रॅम/256जीबी स्टोरेज वेरिएंट आणि 12जीबी रॅम/256जीबी स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च झाला आहे ज्याची किंमत 48,999 रुपयांपासून सुरु होत आहे.

OnePlus 7
OnePlus 7 Pro चा छोटा मॉडेल OnePlus 7 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.7 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा 0.8-माइक्रोन कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सोबतच हा फोन एफ/2.4 अपर्चर वाल्या 5-मेगापिक्सलच्या सेकेंडरी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सेल्फी कॅमेरा पाहता OnePlus 7 च्या फ्रंट पॅनल वरील नॉच मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

OnePlus 7 6.41-इंचाच्या आप्टिक एमोलेड वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. हा फोन पण एंडरॉयड 9 पाई आधारित आक्सिजन ओएस सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर चालतो. हा फोन पण अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअप साठी 20वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली 3,700mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. OnePlus 7 चा 6जीबी रॅम व 128जीबी मेमरी वेरिएंट 32,999 रुपये तर 8जीबी रॅम व 256जीबी स्टोरेज वेरिएंट 37,999 रुपयांमध्ये 4 जून पासून विकत घेता येईल.

OPPO Reno 10x Zoom Edition
OPPO Reno 10x Zoom ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.7 अपर्चर वाला 48-मेगापिक्सल प्राइमरी सेंसर, एफ/2.2 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी तसेच एफ/3.0 अपर्चर वाला 13-मेगापिक्सल तिसरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा पॉप-अप शार्कफिन फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हा फोन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्टेड 6.6-इंचाच्या एमलोड डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. एंडरॉयड पाई आधारित हा फोन कलरओएस 6 सह हा फोन पण क्वालकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 वर चालतो. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह हा फोन वीओओसी 3.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 4,065एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. फोनचा 6जीबी रॅम व 128जीबी मेमरी वेरिएंट 39,990 रुपये आणि 8जीबी रॅम व 256जीबी स्टोरेज वेरिएंट 49,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे.

OPPO Reno
Oppo Reno चा स्टँडर्ड मॉडेल डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 48-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स586 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे तसेच हा 5-मेगापिक्सलच्या सेकेंडरी रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सेल्फी साठी या फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे जो पॉप-अप शार्क फिन डिजाईन वर बनला आहे.

हा फोन 6.4-इंचाच्या फुल एचडी+ डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे. एंडरॉयड 9 पाई आधारित हा फोन कलर ओएस 9 सह हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर चालतो. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,765 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने हा 6जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज सह सादर केला आहे. तसेच याचा एक 8जीबी रॅम वाला मॉडेल आहे जो 256जीबी स्टोरेज सह येतो.

Honor View 20
या फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात एफ/1.8 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स586 सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोनचा दुसरा कॅमेरा टीओएफ आहे जो डेफ्थ सेंसिंग आणि 3डी डिटेक्शन साठी आहे. सेल्फी साठी या फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 25-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हा कॅमेरा डिस्प्ले वरील पंच-होल मध्ये देण्यात आला आहे.

या फोन मध्ये 6.4-इंचाचा सुपर फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. एंडरॉयड 9 पाई सह हा हुआवई किरीन 980 चिपसेट वर चालतो. पावर बॅकअप साठी ऑनर व्यू20 मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी मिळेल. Honor View 20 चा 6जीबी रॅम वाल्या मॉडेलची किंमत 37,999 रुपये आहे. तर 8जीबी रॅम वाला मॉडेल 45,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Xiaomi Black Shark 2
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Black Shark 2 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 48-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 13-मेगापिक्सलचा सेकेंडरी रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 20-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. विशेष म्हणजे हा एक गेमिंग फोन आहे जो लिक्विड कूल 3.0 टेक्नोलॉजी सह येतो.

Black Shark 2 6.39-इंचाच्या ट्रू व्यू ऐमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. एंडरॉयड 9 पाई सोबत या फोन मध्ये क्वालकॉम चा सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 27वॉट चार्जला सपॉर्ट करते. शाओमीच्या या फोनच्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 39,999 रुपये आहे. तर फोनचा 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 49,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. हा डिवाइस 4 जूनला सेल साठी येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here