जगातील सर्वात वेगाने चार्ज होणारा फोन Reno Ace झाला लॉन्च, सर्वात ताकदवान प्रोसेसर आणि 12जीबी रॅम आहे यात

OPPO ने चीन मध्ये आयोजित एका इवेंट मध्ये Reno आणि K सीरीजचे स्मार्टफोन्स सादर केले आहेत. कंपनीने या दोन सीरीज मध्ये Reno Ace आणि OPPO K5 लॉन्च केले आहेत. Oppo Reno Ace बद्दल बोलायचे तर हा 65 वॉट चार्जिंग टेक्नोलॉजी सह येतो जी 25 मिनिटांत फोनची बॅटरी 75 टक्के चार्ज करते.

OPPO Reno Ace ची डिजाइन

OPPO Reno Ace बेजल लेस नॉच डिस्प्ले सह सादर केला गेला आहे. डिस्प्लेच्या दोन्ही कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. तसेच डिस्प्लेच्या वर्षय बाजूला ‘वी’ शेप नॉच आहे. फोनचा रियर कॅमेरा सेटअप बॅक पॅनल वर मधोमध वर्टिकल शेप मध्ये देण्यात आला आहे. चारही कॅमेरा सेंसर एकाच लाइन मध्ये आहे आणि सर्वात वर असलेल्या सेंसर खाली 48MP लिहिण्यात आले आहे.

कॅमेरा सेटअपच्या उजवीकडे एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे. फोन मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर नाही म्हणजे हा डिवाइस इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो. OPPO Reno Ace च्या बॅक पॅनल वर खाली OPPO ब्रॅण्डिंग सोबत ‘Designed for reno’ लिहण्यात आले आहे. तसेच उजव्या पॅनल वर पावर बटण आणि डाव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर मिळेल.

Reno Ace ची किंमत

OPPO Reno Ace बद्दल बोलायचे तर कंपनीने हा तीन वेरिएंट मध्ये सादर केला आहे. या फोनच्या 8GB रॅम+ 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत RMB 3,199 (जवळपास 32,000 रुपये), 8GB रॅम व 256GB मॉडेलची किंमत RMB 3,399 (जवळपास 33,000 रुपये) आणि सर्वात महाग 12GB रॅम व 256GB वेरिएंटची किंमत RMB 3,799 (जवळपास 37,950 रुपये) आहे. हा फोन चीन मध्ये या महिन्याच्या शेवटी उपलब्ध होईल.

इंट्रोडक्टरी ऑफरमध्ये 8GB रॅम व 128GB वेरिएंट RMB 2,999 (जवळपास 30,000 रुपये) आणि 8GB रॅम व 256GB मॉडेल RMB 3,199 (जवळपास 32,000 रुपये) मध्ये सेल केला जाईल.

OPPO Reno Ace चे स्पेसिफिकेशन्स

OPPO Reno Ace चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 1080 x 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या फुलएचडी एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करेल. ओपोने आपला हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह बाजारात आणला आहे, ज्यात स्क्रीन वर टच करताच हा अनलॉक होईल. OPPO Reno Ace एंडरॉयड 9 पाई सह येतो जो 2.96गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 7एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 855+ चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफी साठी OPPO Reno Ace मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सपोर्ट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर 48 मेगापिक्सलचा Sony IMX586 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 13 मेगापिक्सलच्या टेलीफोटो लेंस, 8 मेगापिक्सलच्या सुपर वाईड एंगल लेंस आणि 2 मेगापिक्सल सेंसरला सपोर्ट करेल. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी Reno Ace मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. OPPO Reno Ace 65W SuperVOOC 2.0 टेक्नॉलॉजी सह येतो तसेच या फोन मध्ये 4000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here