POCO M2 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:26:38 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 लो बजेट असलेला पावरफुल Poco M2 Reloaded भारतात लॉन्चसाठी तयार, किंमत असेल 10 हजारांपेक्षा कमी https://www.91mobiles.com/marathi/poco-m2-reloaded-india-launch-date-april-21-sale-flipkart/ https://www.91mobiles.com/marathi/poco-m2-reloaded-india-launch-date-april-21-sale-flipkart/#respond Mon, 19 Apr 2021 13:08:25 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10639 फ्लिपकार्टवर समोर आलेल्या फोटोज नुसार POCO M2 Realoaded कंपनी वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेवर लॉन्च करेल, ज्याच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट असेल.

The post लो बजेट असलेला पावरफुल Poco M2 Reloaded भारतात लॉन्चसाठी तयार, किंमत असेल 10 हजारांपेक्षा कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Poco भारतात आपल्या ग्राहकांसाठी लेटेस्ट स्मार्टफोन पोको एम2 रीलोडेड लॉन्च करणार आहे. या नवीन वेरिएंटच्या लॉन्चची माहिती कंपनीने ऑफिशियल ट्विटरवर दिली आहे. ई-कॉमर्स साइट Flipkart वर वेगळे पेज तयार करण्यात आले आहे ज्यात लॉन्च तारीख समोर आली आहे. फक्त लॉन्च डेट नव्हे तर, फ्लिपकार्टवर बनलेल्या पेजवरून हँडसेटमध्ये मिळणाऱ्या चिपसेट आणि त्याचबरोबर उपलब्धतेबाबत पण माहिती मिळाली आहे. लक्षात असू दे कि कंपनीने भारतात पोको एम2 गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये सादर केला होता. (Poco M2 reloaded India launch date April 21 sale Flipkart)

Poco M2 Reloaded लॉन्च डेट

पोको एम2 रीलोडेड स्मार्टफोन भारतात ग्राहकांसाठी 21 एप्रिल 2021 दुपारी 12 वाजता लॉन्च केला जाईल. जर तुम्हाला या फोनचा लॉन्च बघायचा असेल तर कंपनी याची सोय आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर करेल. तुम्ही पोकोच्या यूट्यूब, ट्विटर आणि फेसबुकवर या फोनचा लाइव लॉन्च बघता येईल.

Poco M3 Reloaded ची उपलब्धता

उपलब्धता पाहता, हँडसेटचा सेल त्याच दिवशी म्हणजे 21 एप्रिल दुपारी 3 वाजता सुरु होईल. हे आधीच स्पष्ट झाले आहे कि फोनची विक्री ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर केली जाईल. पण किंमतीबाबत अजूनही ऑफिशियल माहिती मिळाली नाही.

हे देखील वाचा : Realme Q3 Pro मध्ये असतील हे शानदार फीचर्स, 22 एप्रिलला होईल लॉन्च, करेल का Xiaomi ची सुट्टी?

Poco M3 Reloaded चे स्पेसिफिकेशन्स

Poco M2 Reloaded स्मार्टफोनमध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी MediaTek Helio G80 SoC चा वापर केला जाईल. याची माहिती फ्लिपकार्टवरून समोर आली आहे. लीकनुसार या अपकमिंग स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते. पोको एम2 रिलोडेडची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी असू शकते.

Poco M2 Reloaded ची डिजाइन

फ्लिपकार्टवर समोर आलेल्या फोटोज नुसार POCO M2 Realoaded कंपनी वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेवर लॉन्च करेल, ज्याच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट असेल. तसेच फोनच्या मागे वर्टिकल कॅमेरा सेटअप असेल. या सेटअपमध्ये कंपनी पोको एम2 प्रमाणेच क्वाड कॅमेरा सेटअप मिळेल.

हे देखील वाचा : BSNL चा सर्वात स्वस्त प्लान! फक्त 13 रुपयांच्या रिचार्जवर मिळेल 2GB डेटा, Jio-Airtel कडे पण नाही याचे उत्तर

Poco M2

POCO M2 पाहता फोन दोन रॅम वेरिएंट्समध्ये लॉन्च केला गेला होता. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच मोठ्या वेरिएंटमध्ये 6 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. किंमत पाहता पोको एम2 चा 6 जीबी + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 10,999 रुपये तर 6 जीबी + 128 जीबी मेमरी वेरिएंट 12,499 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता.

शाआोमी पोको एम2 व्हिडीओ

The post लो बजेट असलेला पावरफुल Poco M2 Reloaded भारतात लॉन्चसाठी तयार, किंमत असेल 10 हजारांपेक्षा कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-m2-reloaded-india-launch-date-april-21-sale-flipkart/feed/ 0
POCO ने दिला नवीन वर्षाची भेट, 7 स्मार्टफोन्सच्या किंमती केल्या कमी, 4000 रुपयांपर्यंत झाली किंमत कमी https://www.91mobiles.com/marathi/poco-m2-pro-poco-x3-poco-c3-smartphone-price-cut-discount-in-india-rs-4000/ https://www.91mobiles.com/marathi/poco-m2-pro-poco-x3-poco-c3-smartphone-price-cut-discount-in-india-rs-4000/#respond Thu, 07 Jan 2021 14:13:07 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9584 पोको इंडियाने चार स्मार्टफोन्सच्या एकूण सात वेरिएंट्सचे भाव कमी केले आहेत. या स्मार्टफोन्स मध्ये POCO M2, POCO M2 Pro, POCO X3 आणि POCO C3 चा समावेश आहे.

The post POCO ने दिला नवीन वर्षाची भेट, 7 स्मार्टफोन्सच्या किंमती केल्या कमी, 4000 रुपयांपर्यंत झाली किंमत कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
POCO फॅन्ससाठी साल 2021 खास असणार आहे असे वाटत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात पोको इंडिया आपल्या फॅन्सना एका मागून एक आनांदाच्या बातम्या देत आहे. कालच बातमी समोर आली होती कि पोकोचा हिट स्मार्टफोन Poco F1 चा नवीन वर्जन Poco F2 आता लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. तसेच आज कंपनीने घोषणा केली आहे कि पोकोने आपल्या 7 स्मार्टफोनच्या किंमतीत कपात करत त्यांची किंमत 4,000 रुपयांपर्यंत कमी केली आहे.

पोको इंडियाने चार स्मार्टफोन्सच्या एकूण सात वेरिएंट्सचे भाव कमी केले आहेत. या स्मार्टफोन्स मध्ये POCO M2, POCO M2 Pro, POCO X3 आणि POCO C3 चा समावेश आहे. सर्वप्रथम पोको सी3 पाहता 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेला स्मार्टफोन आतापर्यंत 10,999 रुपयांमध्ये विकला जात होता पण कंपनीने याची किंमत 2,500 रुपयांनी कमी केली आहे. या प्राइस कट नंतर POCO C3 8,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

POCO M2 स्मार्टफोनचा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होता. पण आता कंपनीने या वेरिएंटची किंमत थेट 4,000 रुपयांनी कमी केली आहे त्यामुळे हा 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 12,999 रुपये किंमत असलेल्या पोको एम2 च्या 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 3,000 रुपयांनी कमी होऊन आता 9,999 रुपये झाली आहे.

हे देखील वाचा : Poco F2 ची प्रतीक्षा संपणार, लवकरच होईल भारतात लॉन्च

POCO M2 Pro चे सर्व तिन्ही वेरिएंट्सच्या किंमतीत कंपनीने 4,000 रुपयांची कपात केली आहे. या फोनचा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट आता 16,999 रुपयांच्या ऐवजी 12,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. तर 17,999 रुपयांमध्ये मिळणारा फोनच्या 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 13,999 तर 19,999 रुपये किंमत असलेला 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत कमी होऊन 15,999 रुपये झाली आहे.

POCO X3 स्मार्टफोन ज्याचा 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज असलेला वेरिएंट आतापर्यंत 20,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होता. त्यावर कंपनीने 3,000 रुपयांचा प्राइस कट केला आहे. या कपातीनंतर पावरफुल पोको एक्स3 17,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. पोकोचे हे सर्व स्मार्टफोन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर नवीन किंमतीसह विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.

The post POCO ने दिला नवीन वर्षाची भेट, 7 स्मार्टफोन्सच्या किंमती केल्या कमी, 4000 रुपयांपर्यंत झाली किंमत कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-m2-pro-poco-x3-poco-c3-smartphone-price-cut-discount-in-india-rs-4000/feed/ 0
6GB रॅम असलेल्या Poco M2 आणि RealMe Narzo 10 मध्ये टक्कर: जाणून घ्या कोण आहे जास्त दमदार? https://www.91mobiles.com/marathi/poco-m2-vs-realme-narzo-10-comparison-price-specifications-and-features/ https://www.91mobiles.com/marathi/poco-m2-vs-realme-narzo-10-comparison-price-specifications-and-features/#respond Thu, 10 Sep 2020 13:51:47 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8086 Poco M2 ची किंमत पाहता या रेंज मध्ये एक डिवाइस आहे जो फोनला थेट टक्कर देतो आणि तो आहे Realme Narzo 10 स्मार्टफोन

The post 6GB रॅम असलेल्या Poco M2 आणि RealMe Narzo 10 मध्ये टक्कर: जाणून घ्या कोण आहे जास्त दमदार? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अनेक दिवस टीज केल्यानंतर पोकोने या आठवड्यात आपला सर्वात स्वस्त फोन Poco M2 भारतात लॉन्च केला आहे. हा बहुप्रतिक्षित फोन 10,999 रुपयांच्या बेस किंमतीत सादर केला गेला आहे. या किंमत फोन मध्ये असे अनेक फीचर्स आहेत, ज्यांच्या जीवावर पोको एम2 भारतातील रियलमी, मोटोरोला आणि स्वतःच्या पॅरेंट कंपनी शाओमीच्या फोन्सना तगडे आव्हान देतो. फोनची किंमत पाहता या रेंज मध्ये एक डिवाइस आहे जो फोनला थेट टक्कर देतो आणि तो आहे Realme Narzo 10 स्मार्टफोन.

अनेक बाबतीत दोन्ही फोन्स सारखे आहेत. हे पाहता आम्ही आज Poco M2 आणि Realme Narzo 10 ची एकमेकांशी तुलना करून बघणार आहोत कि दोघांपॅकी कोण आहे चांगला. तुलना फोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सच्या आधारवर केली जाईल.

डिजाइन

डिजाइन पाहता दोन्ही फोन्स बेजल-लेस डिस्प्ले सह येतात. POCO M2 आणि Realme Narzo 10 मध्ये वॉटर ड्रॉप नॉच देण्यात आला आहे, ज्यात एक सेल्फी कॅमेरा आहे. तसेच मागे दोन्ही फोन्स प्लास्टिक बॅक आणि ग्लोसी फिनिश सह येतात जी मागच्या बाजूला ग्लासचा लुक देते. पण दोन्ही हँडसेट मधील रियर कॅमेरा सेटअप वेगवेगळ्या जागी आहे. POCO M2 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनल वर मध्यभागी वर्टिकल शेप आहे. तर Realme Narzo 10 च्या मागे क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वरच्या बाजूला डावीकडे आहे. तसेच दोन्ही फोन्स मध्ये मागे फिंगरप्रिंट सेंसर, लोवर पॅनल वर यूएसबी पोर्ट सोबतच स्पीकर आणि 3.5एमएम जॅक देण्यात आला आहे.

डिस्प्ले

Poco M2 पी2आय कोटेड आहे ज्यामुळे स्क्रीन पाणी व धुळीपासून वाचते. स्मार्टफोन 6.53 इंचाच्या फुलएचडी+ (1,080×2,340 पिक्सल) डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीन गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन आणि टीयूवी रीनलँड ब्लू लाइट सर्टिफिकेशन सह येते. रियलमी नार्जो 10 मध्ये 20:9 आस्पेक्ट रेशियो आणि स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 89.9 सह 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. पोको एम2 प्रमाणे रियलमीने आपल्या फोनच्या स्क्रीनच्या सुरक्षा व मजबूतीसाठी फोन मध्ये गोरिल्ला ग्लास 3 कोटिंगचा वापर केला आहे.

हार्डवेयर

हार्डवेयर पाहता POCO M2 आणि Realme Narzo 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या मीडियाटेकच्या हीलियो जी80 चिपसेट वर आधारित आहेत. तसेच ग्राफिक्ससाठी या फोन्स मध्ये माली-जी52 जीपीयू चा सपोर्ट आहे. पण रॅमच्या बाबतीत दोन्ही फोन्स वेगवेगळे आहेत. रियलमी नार्जो 10 मध्ये 4 जीबी रॅम व 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आली आहे. तर पोको एम2 मध्ये 6 जीबी रॅम आहे आणि इनबिल्ट स्टोरेजसाठी 64 जीबी व 128 जीबी चे पर्याय मिळतात.

कॅमेरा

दोन्ही फोन्स मध्ये मागे क्वाड कॅमेरा सेटअप आहेत. POCO M2 च्या बॅक पॅनल वर 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

दुसरीकडे Realme Narzo 10 मध्ये एफ/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोन 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलच्या मोनो लेंसला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी रियलमी नारजो 10 मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

बॅटरी आणि कनेक्टिविटी

पावर बॅकअपसाठी पोको एम2 आणि रियलमी नार्जो मध्ये 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. तसेच दोन्ही फोन्स डुअल सिम फोन्स आहेत जे 4जी वोएलटीई सपोर्ट सह येतात. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच या फोन्स मध्ये 3.5एमएम जॅक सपोर्ट आहे. रियलमी नार्जो 10 एंडरॉयड 10 बेस्ड Realme UI वर चालतो. तर पोको एम2 मध्ये एंडरॉयड 10 बेस्ड MIUI 12 ओएस वर चालतो.

वेरिएंट्स व किंमत

POCO M2 दोन रॅम वेरिएंट्स मध्ये येतो. किंमत पाहता पोको एम2 च्या 6 जीबी + 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 10,999 रुपये तर 6 जीबी + 128 जीबी मेमरी वेरिएंटची किंमत 12,499 रुपये आहे. पण Realme Narzo फोन फक्त 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट मध्ये येतो आणि त्याची किंमत 11,999 रुपये आहे.

The post 6GB रॅम असलेल्या Poco M2 आणि RealMe Narzo 10 मध्ये टक्कर: जाणून घ्या कोण आहे जास्त दमदार? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-m2-vs-realme-narzo-10-comparison-price-specifications-and-features/feed/ 0
पोकोचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन POCO M2 लॉन्च, 6 जीबी रॅम आणि 5000एमएएच बॅटरी सह क्वॉड रियर कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/poco-m2-launched-in-india-price-rs-10999-6gb-ram-specs-sale/ https://www.91mobiles.com/marathi/poco-m2-launched-in-india-price-rs-10999-6gb-ram-specs-sale/#respond Tue, 08 Sep 2020 12:24:08 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8039 POCO M2 दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर मोठ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

The post पोकोचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन POCO M2 लॉन्च, 6 जीबी रॅम आणि 5000एमएएच बॅटरी सह क्वॉड रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
POCO ने कालच 64 मेगापिक्सल कॅमेरा आणि 5,160एमएएच बॅटरी असलेला स्मार्टफोन POCO X3 टेक मंचावर सादर केला आहे. हा स्मार्टफोन येत्या काही दिवसांत भारतीय बाजारात पण लॉन्च केला जाईल ज्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. आज पोकोने आपला सर्वात स्वस्त स्मार्टफोन इंडियन मार्केट मध्ये आणला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन POCO M2 नावाने लॉन्च केला आहे जो येत्या 15 सप्टेंबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर फक्त 10,999 रुपयांच्या बेस किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध होईल.

POCO M2

पोको एम2 ब्रँडचा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. याचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता POCO M2 कंपनीने वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च केला आहे ज्याच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन पी2आई कोटेड आहे ज्यामुळे स्क्रीन पाणी आणि धुळीपासून वाचते. पोको एम2 स्मार्टफोन 6.53 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो.

POCO M2 एंडरॉयड 10 ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो मीयूआई 12 ला पण सपोर्ट करेल. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला मीडियाटेकचा हीलियो जी80 चिपसेट देण्यात आला आहे. मोबाईल गेमिंग लॅग फ्री व स्मूद बनवण्यासाठी हा फोन हायपर इंजन गेमिंग टेक्नोलॉजी सह येतो. ग्राफिक्ससाठी हा फोन माली-जी52 जीपीयू ला सपोर्ट करतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता POCO M2 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनल वर मधोमध वर्टिकल शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये फ्लॅश लाईट सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

POCO M2 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक सोबतच फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स देण्यात आले आहेत. सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा डिवाईस फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी पोको एम2 मध्ये 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.

वेरिएंट्स व किंमत

POCO M2 दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर मोठ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. किंमत पाहता पोको एम2 चा 6 जीबी + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 10,999 रुपये तर 6 जीबी + 128 जीबी वेरिएंट 12,499 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. हा फोन Blue, Black आणि Red कलर मध्ये विकत घेता येईल.

The post पोकोचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन POCO M2 लॉन्च, 6 जीबी रॅम आणि 5000एमएएच बॅटरी सह क्वॉड रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-m2-launched-in-india-price-rs-10999-6gb-ram-specs-sale/feed/ 0