Realme Q3 Pro मध्ये असतील हे शानदार फीचर्स, 22 एप्रिलला होईल लॉन्च, करेल का Xiaomi ची सुट्टी?

Realme आपल्या Q सीरीजअंतगर्त एक नवीन स्मार्टफोन्स लॉन्च करण्याची तयारी करत आहे. या सीरीजच्या नवीन फोनबाबत अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे. आता चीनी माइक्रोब्लॉगिंग साइट वीबोवर कंपनीने Realme Q3 सीरीजच्या लॉन्च डेट बद्दल माहिती दिली आहे. कंपनीने सांगितले कि Realme Q3 22 एप्रिलला चीनमध्ये सादर केला जाईल. तसेच या लॉन्च डेट व्यतिरिक्त सर्टिफिकेशन साइट TENNA वर Realme Q3 Pro च्या स्पेसिफिकेशन सोबतच डिवाइसच्या लुकची माहिती समोर आली आहे. टिप्सटर मुकुल शर्माने TENAA वेबसाइटच्या या लिस्टिंगची माहिती दिली आहे. (realme Q3 Pro Tenaa specs launch date April 22 China)

TENAA लिस्टिंग

लिस्टिंगमध्ये काही फोटो पण समोर आले आहेत, त्यामुळे फोनची डिजाइन आणि प्रमुख स्पेसिफिकेशनचा खुलासा झाला आहे. अधिकृतपणे Realme Q3 प्रो ची किंमत Realme Q3 सह लॉन्चच्या दिवशी समोर येईल. प्रथमच कंपनी 2019 नंतर नवीन Realme Q- सीरीजचा डिवाइस लॉन्च करत आहे.

हे देखील वाचा : 5,000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम असलेला OPPO A54 भारतात लॉन्च, बघा याची किंमत

Realme Q3 ची डिजाइन

TENAA वर समोर आलेल्या फोटोज नुसार Realme Q3 प्रो च्या कोपऱ्यात पंच-होल सेल्फी कॅमेरा असेल. तसेच, मागे एक मॅट फिनिश आणि कंपनीची ब्रँडिंग ‘Dare to Leap’ लिहिण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर फोनच्या मागे आयताकृती कॅमेरा मॉड्यूल आहे, ज्यात ट्रिपल कॅमेरा सेंसर आणि एक एलईडी फ्लॅश दिसत आहे.

Realme Q3 Pro चे स्पेसिफिकेशन्स

लिस्टिंगवरून समजले आहे कि Realme Q3 प्रो मध्ये 6.43 इंचाचा स्क्रीन असेल. आशा आहे कि कंपनी हा फोन AMOLED डिस्प्लेवर सादर करेल कारण आम्हाला फोनमध्ये कोणताही फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर दिसला नाही. याव्यतिरिक्त फोनमध्ये 4,400mAh ची बॅटरी, अँड्रॉइड 11 ओएस आणि डुअल सिम सपोर्ट असेल. हँडसेटचा आकार 158.5 x 73.3 x 8.4 मिमी सांगण्यात आला आहे. Realme Q3 प्रो मीडियाटेक डाइमेंशन 1100 चिपसेटसह लॉन्च होऊ शकतो.

हे देखील वाचा : Xiaomi Mi 11X सीरीज आणि Mi 11 Ultra लॉन्चसाठी सज्ज, जाणून घ्या RAM आणि स्टोरेज क्षमता

Realme Q3 Pro लॉन्च डेट

वीबोवरील टीजर इमेजमधून समजले आहे कि Realme Q3 सीरीज 22 एप्रिलला चीनमध्ये लॉन्च होईल. सीरीजमध्ये Realme Q3 प्रो आणि Realme Q3 चा समावेश असेल. टीजरवरून समजले आहे कि फोन भारतात लॉन्च झालेल्या Realme 8 Pro सारखा असेल.

Realme Q3 चे स्पेसिफिकेशन्स

Mydrivers.com च्या रिपोर्टनुसार या फोनमध्ये 1080×2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.5 इंचाचा फुल एचडी+ IPS LCD डिस्प्ले दिला जाऊ शकतो. तसेच डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशियो 20:9 आणि रिफ्रेश रेट 120Hz असू शकतो. फोन पंच-होल डिजाइनसह मार्केटमध्ये येईल.

फोनचे कॅमेरा फीचर्स पाहता, रिपोर्टमध्ये कोणतीही माहिती देण्यात आली नाही. पण लीक रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे कि LPDDR4X रॅम आणि UFS 3.1 सह मीडियाटेक डाइमेंसिटी 1100 चिपसेट असू शकतो. फोनच्या इन-बिल्ट स्टोरेजबाबत अजूनतरी कोणतीही माहिती समोर आली नाही. यात 50 वॉट फास्ट चार्जिंगसह 4500mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here